सैतानाच्या भात्यामधले चार बाण धारदार

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जे न देखे रवी...
17 Apr 2015 - 6:07 pm

सैतानाच्या भात्यामधले
चार बाण धारदार
उपहास, चरित्र-हनन
हत्या व जयजयकार

होता त्यांचा वार संहार
न ज्ञानामाउली वाचणार
ना महात्मा वा घटनाकार

प्रथम उपहासे यथाशक्ती दुर्लक्षीणार
लोकामुखी गाथा इंद्रायणी बुडविणार
नंतर इतिहासे चारित्र्य डागाळनार
बाई वा बाटलीशी नाळ जोडवणार
तरीही न खचला महामानव जर
हत्या त्याची निश्चित ही होणार
जर कीर्तीरूपी तो उरला
तर समाधी स्थळी माथा टेकवून
मुखे जयजयकार करणार

भयानकमुक्तक

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

17 Apr 2015 - 6:40 pm | प्राची अश्विनी

सत्य!
आवडली.

खंडेराव's picture

17 Apr 2015 - 8:48 pm | खंडेराव

आवडली. वाचुन एक प्रसिध्द कविता आठवली. ( का ते विचारु नका, मला ही नाही समजले )

पाँच पूत भारतमाता के, दुश्मन था खूँखार
गोली खाकर एक मर गया, बाक़ी रह गए चार

चार पूत भारतमाता के, चारों चतुर-प्रवीन
देश-निकाला मिला एक को, बाक़ी रह गए तीन

तीन पूत भारतमाता के, लड़ने लग गए वो
अलग हो गया उधर एक, अब बाक़ी बच गए दो

दो बेटे भारतमाता के, छोड़ पुरानी टेक
चिपक गया है एक गद्दी से, बाक़ी बच गया एक

एक पूत भारतमाता का, कन्धे पर है झण्डा
पुलिस पकड कर जेल ले गई, बाकी बच गया अण्डा

नागार्जुन

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2015 - 9:40 am | अत्रुप्त आत्मा

@बाकी बच गया अण्डा>> ह्हा ह्हा ह्हा! जबरीच!

hitesh's picture

18 Apr 2015 - 8:19 am | hitesh

वा वा ! सध्या मिपावरचे काही सदस्य आमचा उपहास करत आहेत.
...

छान

कविता१९७८'s picture

18 Apr 2015 - 4:37 pm | कविता१९७८

मस्त

एस's picture

18 Apr 2015 - 10:04 pm | एस

अचूक वर्णन. हे गोबेल्सचेपण बाप आहेत. मिपावरच बरीच उदाहरणे दिसतात. स्वतःच्या लेखाची चिरफाड झाली की एकही प्रतिसाद न देणारे, धादांत असत्य प्रतिसाद टंकणारे, खूप खूप जण आहेत.

नगरीनिरंजन's picture

21 Apr 2015 - 2:52 am | नगरीनिरंजन

वा! वा! मार्मिक कविता!

पण चरित्रहनन नव्हे चारित्र्यहनन.

मनीषा's picture

19 Apr 2015 - 8:36 pm | मनीषा

सैतानाच्या भात्यामधले
चार बाण धारदार
उपहास, चरित्र-हनन
हत्या व जयजयकार

अगदी अचूक .