हेच तंत्र, हाच मंत्र

सुवर्णमयी's picture
सुवर्णमयी in जे न देखे रवी...
14 Nov 2007 - 8:44 pm

गातो जो पोवाडे बाजू घ्यावी त्याची
असे सव्यसाची झाले बहू

मागून लपुनी ध्येयास गाठावे
भीष्मांना पाडावे धारातीर्थी

इमान स्वार्थाशी इमान ध्येयाशी
धरोनी हाताशी गीता सार

माणसाचा जन्म हे भाग्य जीवाचे
चाळे माकडाचे का रे बाबा?

दुसर्‍याच्या जागी स्वतःला ठेवावे
जगाला बघावे मग जरा

हे एवढे कष्ट जो कोणी घेईल
तयाचा जाईल वेळ फार

म्हणून् म्हणावा हा एकच मंत्र
हेच एक तंत्र आचरावे ऐका

माणसे जपाया बोलू नये सत्य
बोला सदा मिथ्य हेच खरे

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

14 Nov 2007 - 11:10 pm | विसोबा खेचर

माणसे जपाया बोलू नये सत्य
बोला सदा मिथ्य हेच खरे

क्या बात है!

सोनाली, काही रेफरन्सेस विस्कळीत वाटले, (कसे ते मी सांगू शकणार नाही, परंतु मला तसे जाणवले.)

परंतु एकंदरीत कविता सुंदर आहे असंच मी म्हणेन...

तात्या.

प्राजु's picture

15 Nov 2007 - 12:05 am | प्राजु

सत्यं ब्रुयात प्रियं ब्रुयात...
असत्यं अप्रियं न ब्रुयात....

अगदी खरं आहे...

सोनाली,
छान कविता..

प्राजु.. (गोड बोलणारी)

सर्किट's picture

15 Nov 2007 - 2:15 am | सर्किट (not verified)

मागून लपुनी ध्येयास गाठावे
भीष्मांना पाडावे धारातीर्थी

असे झाले आहे खरे. बरेच संदर्भ अचूक आहेत. कविता छान आहे. (अगदी कुणाला संदर्भ नाही लागले, तरी आवडेल अशी आहे :-)

कदाचित "मागून लपुनी" च्या ऐवजी "हिजड्यांआडूनी" अधिक संयुक्तिक ठरेल.

इमान स्वार्थाशी इमान ध्येयाशी
धरोनी हाताशी गीता सार

इथे "गीता सार" पेक्षा "ज्ञानेश्वरी" वृत्तातही बसते, आणि चपखलही आहे.
- सर्किट

सुवर्णमयी's picture

15 Nov 2007 - 2:33 am | सुवर्णमयी

वरच्या ओळीमधला संदर्भ पहाता गीता सार योग्य वाटले.
असो. बाकी प्रत्येकाने जसा हवा तसा अर्थ लावावा. काही संदर्भ विस्कळीत वाटताहेत असा फिड्बॅक आहे, अभंगात सुधारणेला जागा आहे असे मी समजते.

सर्किट's picture

15 Nov 2007 - 2:38 am | सर्किट (not verified)

नंतरच्या ओळीतला "माकडाचे चाळे" हा संदर्भ पाहिला तर ?

-सर्किट

माकडिणीची गोष्ट माहिती आहे ना? ती स्वार्थासाठी पिलाला मारते, शिवाय उगीच काही तरी करत राहण्याला माकडचाळे म्हणतात.. उत्क्रांतीच्या माहितीच्या आधारे माकडानंतर माणूस झाला असे काही आहे. (मी त्या प्रांतातली अधिकारी नाही)
म्हणून स्वार्थ आणि चाळे असे एकत्र केले..
थोडक्यात कवितेला मॉडिफिकेशनची गरज आहे:)

सर्किट's picture

15 Nov 2007 - 3:06 am | सर्किट (not verified)

खरे तर माझी संपादनाची वगैरे लायकी नाही, पण तरीही करून बघतो ;-) ठळक अक्षरांतले शब्द माझे.

गातो जो पोवाडे बाजू घ्यावी त्याची
असे सव्यसाची झाले बहू

गाती स्तुतीपाठ ठेवलेले भाट
कंपूच्या नायका धन्य वाटे

मागून लपुनी ध्येयास गाठावे
भीष्मांना पाडावे धारातीर्थी

हिजड्याआडूनी मारुनिया तीर
भीष्मांसी पाडावे धारातीर्थी

इमान स्वार्थाशी इमान ध्येयाशी
धरोनी हाताशी गीता सार

आपले ईमान, आपमतलब
आहेच पाठीशी ज्ञानेश्वरी

माणसाचा जन्म हे भाग्य जीवाचे
चाळे माकडाचे का रे बाबा?

नराच्या जन्माला आलास भाग्याने
चाळे वानराचे, का रे बाबा ?

दुसर्‍याच्या जागी स्वतःला ठेवावे
जगाला बघावे मग जरा

कधीतरी करी दुजांचा विचार
एवढा विवेक मनी ठेवी

हे एवढे कष्ट जो कोणी घेईल
तयाचा जाईल वेळ फार

म्हणून् म्हणावा हा एकच मंत्र
हेच एक तंत्र आचरावे ऐका

पण ते कराया लागताती कष्ट
म्हणुनी हा मंत्र ऐक आता

माणसे जपाया बोलू नये सत्य
बोला सदा मिथ्य हेच खरे

वदे सत्य त्याला सर्व दुरावती
खोट्याची चलती हीच खरी

- (अनाहूत संपादक) सर्किट

प्रियाली's picture

15 Nov 2007 - 3:14 am | प्रियाली

तुम्हाला साष्टांग नमस्कार!!!! :))))))

टग्या's picture

15 Nov 2007 - 3:17 am | टग्या (not verified)

क्लास! :))))))))))))))))))))))))

बेसनलाडू's picture

15 Nov 2007 - 3:41 am | बेसनलाडू

हिजड्याआडूनी मारुनिया तीर
भीष्मांसी पाडावे धारातीर्थी
तुम्हीच वर्णन केलेत म्हणून बरे!
(पितामह)बेसनलाडू

सुवर्णमयी's picture

15 Nov 2007 - 3:49 am | सुवर्णमयी

अभंगाचे काय झाले.. या ओव्या तरी आहेत का? नॉट शुअर..
असो,
सर्किटराव , तुमचा प्रयत्न चालू द्या.. चांगली कविता होईल..

सर्किट's picture

15 Nov 2007 - 8:55 am | सर्किट (not verified)

अभंग हे वृत्त आहे का ?
अभंगाचे नियम काय असतात ?

(आम्ही आजवर "भजनी तालात" म्हणजे "धीनाधीधिना, तीनातीतिना" ह्याला अभंग म्हणत होतो. उदा. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव.. पायीची वहाण पायी बरी.. इत्यादि त्या चालीत आमचे संपादन तर व्यवस्थित बसते बॉ.)

- संत सर्किटोबा

विसोबा खेचर's picture

15 Nov 2007 - 8:51 am | विसोबा खेचर

गाती स्तुतीपाठ ठेवलेले भाट
कंपूच्या नायका धन्य वाटे

कृपया कंपूच्या नायकाचे आणि त्याच्या भाटांची नांवे पोष्टकार्डाने किंवा खरडवहीतून कळवा! :)

आपले ईमान, आपमतलब
आहेच पाठीशी ज्ञानेश्वरी

हा हा हा! :) हे बाकी सहीच...

नराच्या जन्माला आलास भाग्याने
चाळे वानराचे, का रे बाबा ?

ज्ञानेश्वर महाराजांचं दुर्दैव! दुसरं काय? :)

असो, विडंबन छान आहे...

तात्या.

सर्किट's picture

15 Nov 2007 - 8:53 am | सर्किट (not verified)

असो, विडंबन छान आहे...

विडंबन नाही हो तात्या,

ह्याला हल्ली संपादन म्हणतात ;-)

- सर्किट

विसोबा खेचर's picture

15 Nov 2007 - 8:58 am | विसोबा खेचर

:)

माझ्या मनात काय, अर्थ लावला तो काय.. अरे देवा..
या साईटवर असणार्‍या अप्रकाशित करा या बटनाचा वापर करण्याचा मोह आवरत नाहीये.

बेसनलाडू's picture

15 Nov 2007 - 3:49 am | बेसनलाडू

आपण सामान्य माणसे, ना कोणी महात्मे! मी बघा त्या मोहात कधीच पडलो आणि काम झाले! :)
(मटिरियालिस्टिक)बेसनलाडू

सुवर्णमयी's picture

15 Nov 2007 - 3:51 am | सुवर्णमयी

बेसनलाडू तुमचे बरे आहे हो.. माझ्यासारख्या संसारी माणसाला अवघड जाते.

बेसनलाडू's picture

15 Nov 2007 - 3:55 am | बेसनलाडू

तुमची वाचण्यात काहीतरी चूक झालेली दिसते. 'मी त्या मोहात कधीच पडलो नाही' असे लिहिलेले नाही, तर 'कधीच पडलो' असे लिहिले आहे. संसारी माणसाला तर मोहात पडणे माझ्यासारख्यापेक्षा जास्त सोपे असते, असे वाटते.
(ब्रह्मचारी)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

15 Nov 2007 - 8:57 am | विसोबा खेचर

सोनालीजी,

माझ्या मनात काय, अर्थ लावला तो काय.. अरे देवा..

कविता म्हणून म्हणाल तर तुमची कविता मला आवडली आहे, असं वरही मी म्हटलेलं आहे. परंतु सदर कवितेतून तुमच्या मनातला अर्थ तेवढासा स्पष्ट होत नाहीये, तो जरा नीटपणे जाणून घ्यायची इच्छा आहे! :)

या साईटवर असणार्‍या अप्रकाशित करा या बटनाचा वापर करण्याचा मोह आवरत नाहीये.

प्रकाशितच राहू द्या हो! काही मोह टाळाच! :)

तात्या.