अंतर थोडेसे

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
18 Aug 2008 - 9:01 am

सत्य आणि असत्य
ह्यांत फक्त एका अक्षराचे अंतर
अशाच छोट्याशा अंतरामुळे
छोट्या नारायणाचा जीव गेला.

जीवन आणि मृत्यु
ह्यात फक्त एका श्वासाचे अंतर
पण मृत्यु फक्त शरीरारालाच येतो.
जीवन पुढे चालू रहात असेल कां?

उधळपट्टी, कंजुषी आणि काटकसर
ह्यात फक्त गरजेचे अंतर

गरज नसतांना केलेला खर्च---- उधळपट्टी
गरज असतांना न केलेला खर्च---- कंजुषी
गरज तोलून मापून केलेला खर्च---- काटकसर

आवड आणि नावड
ह्यात फक्त चवीचे अंतर
उगाच नाही म्हणत,
नावडतीचे मीठ अळणी

कवी आणि लेखक
ह्यात आळशीपणाचे अंतर
आळशी लेखक कवी बनू शकतो.
चारोळ्यांवर सुरवात करून
कडवीभरून कविता लिहीतो.

कधी नवीन कल्पना शोधायला आळस करून
विडंबन लिहीतो.

अवांतरः कवितेचे विडंबन झाले तर कवीला थोडी नोंद मिळते, हेही नसे थोडके!

कविताविरंगुळा