गेल्या २ -२.५ वर्षापासून मी हाडांशी संबंधित एका व्याधीने त्रस्त आहे. ऑर्थोपेडिक (ऐलोपथी म्हणा हवे तर ) डॉक्टरांच्या कडे यावर शस्त्रक्रिया करून त्याजागी कृत्रिम भाग बसवण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते सांगतात. त्यामुळे तुम्ही उद्याच रुग्णालयात भरती व्हा. आणि शस्त्रक्रिया करून टाका जर हे नाही केले तर थोड्याच दिवसात ते हाड co-laps होऊन तुम्हाला परत इथेच यावे लागेल. त्यापेक्षा आत्ताच शस्त्रक्रिया करा असे सांगतात. परंतु मी शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला कारण एक तर माझे वय अत्यंत कमी आहे आणि शत्रक्रिया केल्यानंतर माझ्या बर्याच दैनंदिन कामावर त्याचा परिणाम होणार आहे. गेले अडीच वर्षे मी फक्त पथ्य पाणी आणि व्यायाम याद्वारे ते दुखणे कंट्रोल मध्ये ठेवले आहे. कालच केलेल्या MRI मध्ये असे दिसून आले कि अडीच वर्षापासून त्यामध्ये काहीच बदल झालेला नाहीये. त्यमुळे इतर डॉक्टरांनी काही दिवसात च हाड co-laps होण्याची जी भीती दाखवली होती ती चुकीची होती हे समजले. त्यामुळे आता माझा आत्मविश्वास देखील वाढला आहे कि "जर हे दुखणे मी काहीही न करता कंट्रोल करू शकतो तर यावर आणखी प्रयत्न केल्यास मी त्याला हरवू हि शकतो. "
आता यावर आय्रुवेदाद्वारे काहीतरी उपाययोजना कराव्यात असे वाटते. परंतु मला या क्षेत्रातील जास्त अनुभव नाहीये. मिपावर बरीच अनुभवी लोक आहेत. जर कोणाला हाडांशी संबंधित रोगांवर कुशलतेने उपचार करणारे आयुर्वेद तज्ञ माहिती असतील तर कृपया सांगावे. आपले अनुभव आणि सल्ले सांगितले तर सोन्याहून पिवळे.
मला कोणत्याही परिस्थितीत कृत्रिम भाग शरीरामध्ये इतक्या कमी वयात बसवून घ्यायचा नाहीये. परमेश्वराने जे काही आपल्या शरीरात निर्माण केले आहे तेच अथक प्रयत्न करून टिकवावे हाच खटाटोप चालू आहे. त्यासाठी आपण काही मदत करू शकलात तर खूप खूप आभारी राहीन आपणा सर्वांचा...
प्रतिक्रिया
12 Apr 2015 - 10:15 pm | संदीप डांगे
तुमच्या व्याधीवर खात्रीशीर इलाज मिळून तुम्ही लवकरात लवकर खडखडीत बरे व्हा अशी इश्वरचरणी प्रार्थना. तुमची इच्छाशक्ती मजबूत असल्याचे दिसून येते. ती तशीच असू देत. बाकी अनुभवी लोक मार्गदर्शन करतीलच. फक्त कुठलीही शस्त्रक्रिया दुर्दैवाने करायची वेळ येऊ नये. तशी आलीच तरी ती करण्याआधी किमान ३-४ चांगल्या डॉक्सना दाखवा. कुणाही डॉकला दुसर्याकडे गेलो होतो हे चुकूनही सांगू नका.
13 Apr 2015 - 4:48 am | अत्रन्गि पाउस
अगदी हेच...आणि कोणत्याही परिस्थितीत किमान २ पर्याय उपलब्ध असतातच हे गृहीत धरून पुढे चला
12 Apr 2015 - 11:16 pm | टवाळ कार्टा
काहीही करा पण इच्छाशक्ती कायम असुदे
13 Apr 2015 - 6:15 am | निर्वात
मला वाटते तुम्ही होमिओ पंथी चेक करावे
13 Apr 2015 - 6:27 am | स्पंदना
व्याधीचे नाव सांगायला काही संकोच आहे का?
व्याधी मग ती कोणतीही असो, थोडीच आपण बोलावुन घेतो? आहारा विहाराशी संबंधीत व्याधी ज्या आपण आपल्या हाताने ओढवुन घेतो त्या मारी प्रतिष्ठीत होउन बसल्या?
13 Apr 2015 - 9:14 am | बाप्पू
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. उघडपणे जालावर लिहिण्यास संकोच वाटत माही पण इथे मिसळपाव च्या सभासदांव्यतिरिक्त अनेक लोक भेट देत असतात. आणि हि वैद्यकीय गोष्ट असल्याने, जास्त डीटेल्स जर दिले तर त्या डीटेल्स मुळे काही लोक इथे आलेल्या सल्यांना आणि प्रतीसादांनाच उपाय मानून ते आंधळेपणाने सुरु करतील. जे मला नको आहे. कोणतेही औषधोपचार असोत ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्हावेत या मताचा मी आहे. ( उदा. मला ताप आहे आणि त्याची संपूर्ण लक्षणे आणि माहिती जर इथे मी लिहिली आणि त्यावर काही गोळ्या किंवा औषधोपचार सभासदांनी सल्ला म्हणून लिहिले आणि ते वाचून कोणीतरी दुसर्याने ते आंधळेपणाने आमलात आणले तर निशितच प्रोब्लेम होऊ शकतो )
आपणास जर सारे डीटेल्स हवे असतील तर मी व्यनि करू शकतो.
13 Apr 2015 - 1:06 pm | स्पंदना
औषधे गोळ्या नाही कुणी सुचवणार येथे, पण जर हां बाबा एखादा आयुर्वेदिक उपचार आहे जो या या ठिकाणी मिळेल, किंवा असाच एखादा डॉक्टरांच्या सांगण्यावरुन ऑपरेशन्साठी निघाला असेल, किंवा ज्याचे ऑप होउन त्याला अजून रिलीफ नसेल अश्या सगळ्याच व्यक्ती आपापले उपचार पडताळुन पहातील. न्युमोनिया झालाय म्हणजे काय होते नक्कि हे जर येथे सांगितले तर घरातली एखादी व्यक्ती बोगस डॉक्टर कडुन नुसते कुरवाळुन घेत असेल (हो. मला कुरवाळुनच म्हणायच आहे. असला एक बोगस दॉक्टर आम्ही सगळे लय ग्रेट मानायचो.) तर काहीतरी ज्ञान मिळुन सुटका करुन घेउ शकेल.
13 Apr 2015 - 9:31 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
एका विचारपुस धाग्याची आठवण झाली.
बाकी डिंकाचे लाडु खा भरपुर आणि सेकंड ओपिनिअन पण घ्या.
13 Apr 2015 - 12:50 pm | नाखु
आणि ठण्ठणीत बरे व्हा. मिपाकडून फक्त माहीती(जरी एखाद्याने व्य्नी सल्ला दिला तरी) घ्या, योगग्य सल्ला व उपचार तज्ञाकडूनच घ्या.
पुण्यामध्ये सरकारी खात्यातर्फे संचालीत एक केंद्र आहे ताडीवाला रस्त्यावर आहे "नॅशनल नेचर दुवा खाली दिला आहे
मी स्वतः उपचार घेतले नाहीत पण माझे शेजारी वय ६० चे पुढे त्यांनी इथे अगदी कमी खर्चात गुढगे-दुखीवर (हाडा संबधीत विकारावर) उपचार घेतले आहेत्.आणि लक्षणीय सुधारणा आणि आराम मिळाला आहे.
तिथेच सल्ला सेवाही उप्लब्ध आहे.नॅशनल नेचर
15 Apr 2015 - 10:59 am | खंडेराव
या केंद्राविषयी मी सुद्धा चांगले ऐकले आहे.
13 Apr 2015 - 6:23 pm | hitesh
निदान कळू शकेल का ?