एका बापाची व्यथा .......

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
31 Mar 2015 - 12:48 pm

पाटी पुसून कोरडी करणं इतकं सोपं नसतं गं
मागे राहिलेल्यांचं जगणं इतकं सोपं नसतं गं

फोडासारखं जपलं तुला, मनासारखं फुलू दिले
रागावलोही बाप म्हणून, जरी मुक्त खुलू दिले
तेव्हाचं ते रडू विसरणं इतकं सोपं नसतं गं

सतरा हे काय वय का गं असा निर्णय घेण्याचं
अव्हेरून सारी नाती शरीर झोकून देण्याचं
तुझं नसणं मान्य करणं इतकं सोपं नसतं गं

काय सलत होतं तुला कधी बोलली असतीस तर
त्या घडीला तुझ्याजवळ मी हजर असतो तर
'जरतर'ला या सामोरं जाणं इतकं सोपं नसतं गं

शेवटच्या त्या क्षणी पिल्ला, तुला खूप दुखलं का ?
कणभर का होईना , आमची आठवण आली का ?
सतत प्रश्न घेऊन जगणं इतकं सोपं नसतं गं

विराणीकविता

प्रतिक्रिया

जेपी's picture

31 Mar 2015 - 1:02 pm | जेपी

...

कविता१९७८'s picture

31 Mar 2015 - 1:33 pm | कविता१९७८

काय बोलाव सुचत नाही ,

अत्रुप्त आत्मा's picture

31 Mar 2015 - 1:34 pm | अत्रुप्त आत्मा

बाप रे!

सुन्न झालोय..शब्द नाहीयेत

काय सलत होतं तुला कधी बोलली असतीस तर

अशी पश्चातबुद्धी घेऊन हाय मॉरल ग्राउंडवर जगणारे वायझेड पाहिले आहेत. स्वतः वागायचं हुकूमशहासारखं, मग कुणाची काय टाप आहे बोलायची?

पॉइंट ब्लँक's picture

31 Mar 2015 - 2:17 pm | पॉइंट ब्लँक

+१

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Mar 2015 - 3:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत. माणुस गेला तरी चालेलं माझं तेचं खरं वागणार्‍या लोकांवरच अशी पश्चात्तापाची वेळ येते.:(

चुकलामाकला's picture

31 Mar 2015 - 3:39 pm | चुकलामाकला

बर्‍याचदा हे खरेही असते पण असे जनरलायझेशन नका हो करू.

पॉइंट ब्लँक's picture

31 Mar 2015 - 3:49 pm | पॉइंट ब्लँक

जनरलाझेशन करने हे चुकीचे आहे आणि कवितेतून संदर्भ पूर्ण कळत नसल्यामूळे खरी परिस्थिती काय आहे हे समजने कठिण आणि त्या अनुशंगाने न्यायनिवाडाही. पण वरील प्रतिक्रिया जनरिक आहेत, त्या इथे लागू करून एखाद्याला कटघर्यात उभा करण्याचा कुणाचा उद्देश असवा असं वाटत नाही. त्यामुळे जास्त वाईट वाटून घेवू नका.

मी पण खाली प्रतिसाद दिला आहे. हे प्रतिसाद असे घडते तेव्हाची सर्वसाधारण परिस्थिती पाहता जे वाटते त्याबद्दल आहेत. अपवाद असतीलच. जनरलायझेशन नको हे तुमचे बोलणे अगदी खरे. आपल्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.

चुकलामाकला's picture

31 Mar 2015 - 3:53 pm | चुकलामाकला

तसे नाही हो. आपल्या भावना पोचल्या.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Apr 2015 - 6:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जनरलायझेशन करायचं नव्हतं. पण पाहण्यामधे अशी बरीचं उदाहरणं आहेत. आधी मी म्हणीन ती पुर्व दिशा असा गब्बरशाही धाक ठेवायचा आणि नंतर समोरच्यानी टोकाचा निर्णय घेतला की नंतर हळहळत बसायचं. त्यापेक्षा आधी जर का आपली इच्छा नं लादता काही मध्यम मार्ग काढला असता तर पश्चात्तापाची वेळं आलीचं नसती. हे बहुतेक जणांना वेळ निघुन गेल्यावर समजतं.

सूड's picture

6 Apr 2015 - 7:03 pm | सूड

अगदी हेच म्हणायचंय!!

पण आपल्याकडे माणूस गेल्यानंतरच त्याचा उदोउदो करण्याची प्रथा आहे. ;)

अजया's picture

31 Mar 2015 - 3:11 pm | अजया

:(

ही अशी अवघड वेळ वैर्‍यावर पण न येवो. :(
बोलायला हवं हे अगदी खरं आहे. बोलल्याने बरेच नकोसे प्रसंग टळू शकतात. पण त्याआधी बोलू पहाणार्‍या लहानग्या जिवांना तुमचं ऐकले जाईल असा विश्वास लहानपणापासून द्यायच काम आपलं वडीलधार्‍यांच.

भिंगरी's picture

31 Mar 2015 - 3:59 pm | भिंगरी

मनाला भिडली ही कवीता.कारण कालच आमच्या क्लिनिक जवळ एक तरून मुलीने फास लावून आत्म्हत्या केली.असं वाटलं तिच्या वडीलांचीच मनातली खळबळ मांडली आहे.

सौन्दर्य's picture

31 Mar 2015 - 10:46 pm | सौन्दर्य

खरंच, अगदी मनाला भिडली हो तुमची कविता. हे प्रश्न फार अवघड असतात. मुलांना त्यांच्या मनासारखे वागू दिले तर पालक म्हणून आपले कर्तव्य ते कोणते ? मुलांचे प्रश्न समजून घेतले, त्यावर आपल्या अनुभवानुसार प्रतिक्रिया दिली, पण जर ती प्रतिक्रिया मुलांना पसंत नाही पडली तरी पुन्हा प्रश्न 'जैसे थे' उभे आहेतच. खरंच काय करावे, कसे वागावे हे कळणे फार कठीण असते.

मदनबाण's picture

1 Apr 2015 - 10:39 am | मदनबाण

:(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..

आकाश कंदील's picture

1 Apr 2015 - 5:17 pm | आकाश कंदील

शेवटच्या त्या क्षणी पिल्ला, तुला खूप दुखलं का ?
कणभर का होईना , आमची आठवण आली का ?

रडवल तुम्ही भाऊ

काय सलत होतं तुला कधी बोलली असतीस तर

आपलं बोलणं ऐकून घेतलं जाईल अशी शाश्वती असली तर बोलण्यात अर्थ आहे. आपण वारंवार बोलून पण माझं तेच खरं होणार असेल तर बोलून आपल्या तोंडाची वाफ का दवडा!!

बॅटमॅन's picture

1 Apr 2015 - 5:43 pm | बॅटमॅन

आपलं बोलणं ऐकून घेतलं जाईल अशी शाश्वती असली तर बोलण्यात अर्थ आहे. आपण वारंवार बोलून पण माझं तेच खरं होणार असेल तर बोलून आपल्या तोंडाची वाफ का दवडा!!

अगदी अगदी! वर आणि खालील मुक्ताफळे ऐकायला मिळतातचः

-तुझ्या भल्यासाठीच सांगतोय.
-जास्ती बोललास/लीस तर थोबडवीन.
-या घरात मी म्हणतो तसंच झालं पाहिजे.

निव्वळ जन्म देऊन काही वर्षे सांभाळ केला म्हणून कुत्र्यासारखे आज्ञापालन करावे अशी मुलांकडून अपेक्षा असणार्‍यांना अशी पश्चातबुद्धी सुचणारच, आणि हाईट म्हणजे त्यांचे नक्राश्रू समाजालाही खरेच वाटतात मोस्टलि. मजा आहे.

हाईट म्हणजे त्यांचे नक्राश्रू समाजालाही खरेच वाटतात मोस्टलि.

अगदी!! बहुधा आपण कसे चान चान आहोत अशी इमेज आधीच करुन ठेवलेली असते. त्यामुळे अशांचे पाय धुवून पाणी प्यायला तत्पर असलेले लोक येतात सहानुभूती दाखवायला आणि पुन्हा त्यांचाच उदोकार करायला.

फार थोड्या लोकांना खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे हे माहीत असतं.

संस्कार की काय तरी नाव असलेला पु. ल. देशपांडेंचा एक लेख होता तो असल्या बापांना वाचायला देऊन काही फरक पडला तर पडला.

पिलीयन रायडर's picture

1 Apr 2015 - 6:19 pm | पिलीयन रायडर

वरचे प्रतिसाद वाचुन मी जरा गोंधळुन गेलेय..
आधी मला एका आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडीलांची कविता वाटली.. वाईट वाटलं..
पण इथे असं का धरुन चाल्लेत लोक की बापाने मुलीला आधी काही बोलायची संधी दिलीच नाही.. कधी ऐकुन घेत्लंच नाही.. आणि आता मात्र खोटी टिपं गाळत बसलाय..
अनेकदा मुलं घरी काही बोलत नाहीत आणि टोकाचे निर्णय घेतात.. आई वडीलांची"च" चुक असेल असं कसं म्हणता येईल?

की माझं काही वाचायचं राहुन जातय?

अनेकदा मुलं घरी काही बोलत नाहीत आणि टोकाचे निर्णय घेतात.. आई वडीलांची"च" चुक असेल असं कसं म्हणता येईल?

आईवडिलांचीच चूक असते असं नाही, पण मुलं का बोलत नाहीत अन तडकाफडकी निर्णय का घेतात याबद्दल आत्मपरीक्षण करणारे लोक किती आहेत? ऊठसूट आजकालच्या मुलामुलींबद्दल एक मताची पिंक ठेवून दिली की झालं असाच खाक्या असतो.

किमान ही दुसरी बाजू विचारार्ह आहे हे सांगण्याचा खटाटोप समजा, दुसरं काही नाही. आता हा इश्श्यू इतका मोठा आहे का, असल्यास अशाच शब्दांत तो मांडावा का, सध्याची मुलं उगीच माजलेली आहेत का, इ.इ. गोष्टींची तीव्रता वैयक्तिक कलाप्रमाणे कमीजास्त असू शकते, पण मुळात असे काही तरी आहे हे लक्षात आले तरी बास झाले.

आई वडीलांची"च" चुक असेल असं कसं म्हणता येईल?

नसेल असंही नाही ना म्हणता येत!! पूर्वी प्रपंच मालिका लागायची. त्यात नातीचं प्रेमप्रकरण की काहीतरी बाहेरुन कळतं तेव्हा आजोबा नातीला काय सांगतात ते फार आवडलं. ते वाक्य काहीतरी अशा अर्थाचं होतं की, "ही गोष्ट आम्हाला बाहेरुन कळते याचा अर्थ आम्ही कुठेतरी कमी पडलोय. तसं नसतं तर ही गोष्ट तू आधी आम्हाला सांगितली असतीस".

माझी मुलगी/मुलगा मला काही सांगत नसेल तर ती माझी चूक आहे, मी तिचा/त्याचा विश्वास तितका संपादन केलेला नाही की मनमोकळेपणाने सगळं मला सांगू शकेल.

पिलीयन रायडर's picture

1 Apr 2015 - 6:40 pm | पिलीयन रायडर

बॅट्या.. सुड..

आईवडीलांच काहीतरी चुकत असेलच.. त्याशिवाय मुलं असं वागणार नाहीत. पण केवळ तेच एक कारण असेल असं नाही. १०० गोष्टी असु शकतात. दुसरी बाजु मांडण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे पण ही कविता बापाची खंत बोलुन दाखवणारी आहे. कुठेही "काय ही आजकालची पिढी..." असा सुर लावलेला नाहीये. तिथे एवढ्या तीव्र शब्दात तुम्ही का प्रतिक्रिया देत आहा ते कळालं नाही. म्हण्जे असं वाटुन गेलं की जणु काही ह्या कवितेची पार्श्वभुमी तुम्हाला माहिती आहे आणि त्यात बापाचीच चुक असल्याने तुम्ही इथे लिहीताय.. असो.. तुम्ही जनरल लिहीत असाल..

जाता जाता.. आई बाप म्हणजे कुणी आकाशातुन आलेले नसतात.. ती सुद्धा माणसंच असतात.. त्यांच्याही चुका होतात. पालक म्हणुन परफेक्ट होण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात पण मुलांच्या आयुष्यावर प्रभाव पाडणारे इतर अनेकही घटक असतात जे पालक प्रत्येक वेळेसच नाही कंट्रोल करु शकत.. त्यांच्या हाताबाहेर..कुवती बाहेरही गोष्टी जाउ शकतात.. कुणी मुद्दाम करत नाही हे.. प्रत्येकाची कुवत असते माणूस म्हणुन.. त्या हिशोबानी नाती व्यक्ति सांभाळत असतो.. मुलांना सांभाळत असतो.. काहींना धाक असणं महत्वाचं वाटतं, काहींना मैत्री.. कुठलाच एक मार्ग बरोबरच आहे असं नाही म्हणता येत.. अशावेळस जर काही वावगं घडलं तर पालक म्हणून अपराधी असतात्च ही माणसं पण त्यांनी जे काही केलेलं असतं ते त्यांच्या समजुती प्रमाणे..

अत्यंत विचित्र लोकही असतात..जे आपल्या मुलांना अजिबातच नीट वागवत नाहीत.. पण मा ते अशा कविताही लिहीत नसावेत..

दुसरी बाजु मांडण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे पण ही कविता बापाची खंत बोलुन दाखवणारी आहे. कुठेही "काय ही आजकालची पिढी..." असा सुर लावलेला नाहीये. तिथे एवढ्या तीव्र शब्दात तुम्ही का प्रतिक्रिया देत आहा ते कळालं नाही. म्हण्जे असं वाटुन गेलं की जणु काही ह्या कवितेची पार्श्वभुमी तुम्हाला माहिती आहे आणि त्यात बापाचीच चुक असल्याने तुम्ही इथे लिहीताय.. असो.. तुम्ही जनरल लिहीत असाल..

कसंय ना, पोरांवर (त्यांच्या मते चांगल्या हेतूने) जबरदस्ती करणे, धाकात ठेवणे, इ. केल्यानंतर पोरांनी बंड केलं तर कवितेतल्याप्रमाणे सूर लावणे हे अतिशय कॉमन आहे. हा ढोंगीपणा कैक केसेसमध्ये पाहिला आहे आणि निव्वळ पालक म्हणून हाय मॉरल ग्राउंड घेणारेही पाहिलेत. तो पवित्रा डोक्यात जातो म्हणून तीव्र शब्दांत लिहिलं. प्रेमस्वरूप, वात्सल्यसिंधू आणि कर्दनकाळ यांच्या मध्येच बहुसंख्य पालक असतात. वरीलप्रमाणे वागणारे पालक तसे हिटलर नव्हेत, पण हे त्यांना समजत नाही हे तुम्हांला विचित्र वाटत नाही का? की पालक असणे म्हणजे कसल्याही जजमेंटच्या पार असणे असेच तुम्ही मानता?

पिलीयन रायडर's picture

1 Apr 2015 - 6:52 pm | पिलीयन रायडर

जजमेंटच्या पार असते तर त्यांना मी अपराधी म्हणलच नसतं ना.. फक्त हे सगळे मुद्दे थोडे शांतपणे लिहीता आले असते. तुम्ही एका साध्याशा कवितेवर इतके का पेटलाय ते कळत नाही..

असो.. तुमचा मुद्दा कळालाय.. माझाही कळाला असेलच..
धन्यवाद..

तुम्ही एका साध्याशा कवितेवर इतके का पेटलाय ते कळत नाही..

कुणी कशावर पेटावं याचे नियम असतील तर सांगा तसं, त्यांप्रमाणेच वागू, हाकानाका.

बाकी धन्यवाद.

हाडक्या's picture

22 Apr 2015 - 3:50 pm | हाडक्या

बॅटमॅन भौ.. सामान्यतः तुमच्याशी असहमत आणि त्याच वेळी पिराशी सहमत होण्याची वेळ आली नै कधी पण इथे नक्कीच तसं होतंय.
पिराचा मुद्दा तरी शांतपणे समजून घ्या की राव.

कुणी कशावर पेटावं याचे नियम असतील तर सांगा तसं, त्यांप्रमाणेच वागू

ते आपलं आपल्याला समजतच पण मयताला जाऊन "डांन्स बसंती डांन्स" लाऊन नाचायचं, वरुन "माय चॉइस" म्हणायचं, असं कशाला करायचं.? (उपमा समजून घे. नै तर त्यावर अवांतर व्हायचं)

तुझा मुद्दा मान्यच पण तो मुद्दा इथे खूप तीव्रतेनं आणि अवांतर म्हणून आल्यासारखा वाटतोय बस्स.

पिराचाही मुद्दा समजून घेतलाय, मेन आक्षेप आमच्या प्रतिसादातील तीव्रतेबद्दल दिसतो आहे. तर तेवढं चालायचंच.

पण मयताला जाऊन "डांन्स बसंती डांन्स" लाऊन नाचायचं, वरुन "माय चॉइस" म्हणायचं, असं कशाला करायचं.? (उपमा समजून घे. नै तर त्यावर अवांतर व्हायचं)

इतकीही तीव्रता आहे असे वाटले नाही. कवितेची दुसरी बाजू सांगितली, त्यावर लोकांनी "हो, पण असो" छाप प्रतिक्रिया दिल्यामुळे अंमळ तीव्रपणे मांडावे वाटले कारण लोक तिकडे दुर्लक्ष करताहेत असे वाटले इतकेच.

इत्यलम्.

तुमचे मुद्दे पटतायेत पण बर्‍याचदा आपण माणूस आहोत तसा समोरचाही आहे, एखादवेळेस त्याचं ऐकायला हरकत नाही असं मत फार कमी पालकांचं असतं. लिहीण्यासारखं बरंच आहे पण कवितेवर अवांतर नको, नंतर कधीतरी!!

बर्‍याचदा आपण माणूस आहोत तसा समोरचाही आहे, एखादवेळेस त्याचं ऐकायला हरकत नाही असं मत फार कमी पालकांचं असतं.

प्लुस ओनीईईईईईईईईईईईईईईईईई

पिलीयन रायडर's picture

1 Apr 2015 - 7:08 pm | पिलीयन रायडर

मुद्दा आहेच बोलण्यासारखा...
पण फकत अवांतर नको हेच म्हणायचं होतं.. उगा प्रतिसाद अस्थानी वाटत आहेत.. (जेन्युइन असले तरी..)

चुकलामाकला's picture

1 Apr 2015 - 7:36 pm | चुकलामाकला

ही कविता एका वडिलांचे दु:ख मांडते की ज्यांच्या कोवळ्या मुलीने आत्महत्या केलीय . त्यात वडिलांचा दोष आहे की नाही ही गोष्ट बाजूला ठेवू पण त्या बापाचं दु:ख नक्राश्रू नसते ते खरेच असते .या सगळ्या प्रश्नांना , जर तर ला घेऊन जगणे फार कठीण असते . त्यात जर तो बाप कठोर किंवा वर उल्लेखिलेल्याप्रमाणे माझेच म्हणणे खरे असणारा असेल तर त्या पश्चातापाच्या आगीत तो कायम जळत राहतो . ( नक्राश्रू वाले बाप असतीलही पण फारच थोडे )
मुलाला कधीही न रागावणाऱ्या, पु लं च्या चौकोनी(बऱ्याचदा त्रिकोणी) कुटुंबातील मुलं घराबाहेरच्या जगात मिळालेले नकार न पचवता आल्याने आत्महत्येचा टोकाचा मार्ग पकडताना पाहिली आहेत , हिटलर आई बाबांची मुले आई वडिलांना न आवडते कृत्य घडल्याने घाबरून आत्महत्या करताना पाहिली आहेत , किंवा या दोन्ही टोकंच्या मधल्या विचारांच्या घरातील मुलेही असा निर्णय घेताना पहिली आहेत . जसं मुल चुकतं तसे पालक सुद्धा चुकतात .तर कधी बाह्य परिस्थिती जबाबदार असते . अशावेळी " माझं तेचं खरं वागणार्‍या लोकांवरच अशी पश्चात्तापाची वेळ येते." किंवा "निव्वळ जन्म देऊन काही वर्षे सांभाळ केला म्हणून कुत्र्यासारखे आज्ञापालन करावे अशी मुलांकडून अपेक्षा असणार्‍यांना अशी पश्चातबुद्धी सुचणारच, आणि हाईट म्हणजे त्यांचे नक्राश्रू समाजालाही खरेच वाटतात मोस्टलि. "
असे जनरलायझेशन चुकीचे ठरते . असो .
अशा वेळी एक घर मात्र कायमचं उध्वस्त होते हे खरे .

अशा वेळी एक घर मात्र कायमचं उध्वस्त होते हे खरे .

पर्फेक्ट!! चर्चेच्या नादात राहून गेलं. काव्य म्हणून लिखाण आवडलं!! :)

प्रपंच मालिकेची आठवण आवडली. मी एक पालक म्हणून सांगते की बहुदा आम्ही मुलांच्या बाबतीत आमच्या पालकांच्या चुका (आम्हाला मूल म्हणून वाटलेल्या) नकळतपणे सुधारायला बघतो. इथे गोंधळ असा होतो की त्या सुधारता सुधारता आणखी काही नवीन चुका करून ठेवतो. :(
मुलांचे ऐकावे हे खरे आहे. त्यांच्या जगात काय चालले आहे हे कळते हे किमान समाधान तरी असते. समस्यांवर सल्ला दिला तर मुलं मोठी होताना पालक म्हणून आमचा सल्ला बर्‍याचदा ऐकत नाहीत हे आम्हा पालकांना शिकायला मिळते. सुरवातीला फार त्रास होतो परंतु ती मोठी झाल्याचा हा पुरावा आहे हे कालांतराने कळते. या विषयावर एक स्वतंत्र धागा काढला तर नवी पिढी काय दु:ख मनात बाळगते आहे ते पालकांना कळेल तरी. मुलांच्या संतापाला बोलल्यामुळे काही वाट मिळेल आणि पालक त्यांची काही बाजु असेल तर तिथे मांडतील.

टवाळ कार्टा's picture

1 Apr 2015 - 9:43 pm | टवाळ कार्टा

बॅट्या आणि सूडशी कचकून सहमत

नाखु's picture

6 Apr 2015 - 8:25 am | नाखु

सहमतीशी सहमती.
संवादाचा अभाव म्हणजे एकतर फक्त सं(पूर्ण) वाद नाहीतर घुसमट!

जगीं वादवेवाद सोडुनी द्यावा
जगीं वाद्संवाद सुखे करावा
जगीं तोचि संतापहारी
तुटे वाद संवाद हितकारी ||१०९||
मनाचे श्लोक

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Apr 2015 - 3:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एकवेळ वाद झालेला परवडतो हो. कमीत कमी राग आणि ताण कमी तरी होतो. घुसमट झाली की संपलं.

सं(पूर्ण) वाद नाहीतर घुसमट!

संपूर्ण वाद काही पटलं नाही नाखुकाका. आपण भांडतो कुणाशी? आपली मतं काय आहेत हे ज्याला सांगावंसं वाटतं त्याला, आणि आपण त्याला हे का सांगतो? कारण ती व्यक्ती आपल्याला 'आपली' वाटत असते.

उदा. एखाद्या मित्राला तुम्ही अमुक अमुक गोष्ट करु नको केव्हा सांगाल? जेव्हा तुम्हाला त्यात काहीतरी काळंबेरं वाटेल तेव्हा! आणि हे तुम्ही सांगाल कारण मित्राचं हित तुम्हाला अपेक्षित आहे.

आता हेच जेव्हा घरातली मुलं एखादं मत मांडतात तेव्हा केवळ आपण जास्त पावसाळे पाह्यलेत या जोरावर पूर्ण फाट्यावर मारण्यात काही पॉइंट नाही ना! निदान एकदा तरी विचार करुन बघा. आता ह्या गोष्टी वारंवार घडल्या तर मुलं सांगायचे कष्ट कशाला घेतील. जर माहीतीच आहे की आपली गोष्ट तशीही फाट्यावर मारली जाणार आहे तर मुलं काही सांगत बसायच्या फंदात पडणार नाहीत.

नाखु's picture

6 Apr 2015 - 3:56 pm | नाखु

कारण मी मांडणी करण्यात कमी पडलो आहे.जितक्या तीव्रतेने आपण सांगतो तितक्याच तीव्रतेने ती नाकारण्याचा किंवा दुर्लक्षण्याचा धोका वाढतो विशेषतःपॉगंडावस्था/किशोर अवस्था यामध्ये, त्यामुळे बरेच विचार त्यांचे समवयस्क किंवा अगदी आजी-आजोबा वयाचे यांचेकडून प्रगट करणे रास्त.
अर्थात वरील उदाहरणात मित्रही एकांगी विचार करणारा नसेल तर नक्केच सुसंवाद होईल किमान निर्णय घेण्याची शमता आणि पाया दोन्ही भक्कम होईल, परंतु मुलांबाबतीत जास्त पावसाळे पेक्षा, मला तुझी काळजी आहे आणि तुझ्या निर्णयाचा/कृतीचा तुला आणि इतरांना तितकाच त्रास्/तोटा होणार आहे हे बरायाचदा समजूतीने पण कधी थोड्या कठोरपणे सांगावे लागतेच.
पण मुलांचा संवाद व्हावा यासाठी आपणही त्यांचे किमान ऐकले पाहिजेच याच्याशी तीव्र सहमती.

टवाळ कार्टा's picture

6 Apr 2015 - 7:04 pm | टवाळ कार्टा

+१

बाकी कविता नि:शब्द करणारी आहे
पण 'सांगितलं असतंस' च्या ओळीचा संदर्भ घेऊन सहज म्हणावसं वाटतं. व्यक्तिशः घेऊ नये कुणी हं.
one may not be agreeable, but he/she should try to be approachable.

सस्नेह's picture

6 Apr 2015 - 3:14 pm | सस्नेह

वरचे प्रतिसाद वाचून (अन मूळ लेखही) 'हत्ती आणि सहा आंधळे' या गोष्टीची आठवण झाली.

पॉइंट ब्लँक's picture

6 Apr 2015 - 6:04 pm | पॉइंट ब्लँक

विषय लै सिरियस झालाय म्हणून जरा आवांतर

आंधळा क्रं १- बॅटमॅन
आंधळा क्रं २ - पॉइंट ब्लँक
आंधळा क्रं ३ - कॅप्टन जॅक स्पॅरो
आंधळा क्रं ४ - पलाश
आंधळा क्रं ५ - सूड
आंधळा क्रं ६ - टवाळ कार्टा
आंधळा क्रं ७ - नाद खुळा

आयला लई आंधळे झाले. नाद खुळा यांची प्रतिक्रिया बाद मानन्यात यावी. सहापेक्षा जास्त आंधळे झेपणार नाहीत, उगाच हत्तिला राग येइल. ( का ह्याचा नीट विचार करा. न कळल्यास व्यनि करणे ;) ) .
नाद खुळा तुम्हाला म्होरल्या येळस चानस मिळेल. जरा लवकर प्रतिक्रिया द्यायचं बघा. गावामागनं आल्यावर डाव बाद होतोया!
होप फुली हत्ती आंधळा नसवा.

उद्या सविस्तर स्पष्टीकरण लिवते तोवर कोण कोणास काय व का म्हणाले याचा अभ्यास करा +)

पॉइंट ब्लँक's picture

6 Apr 2015 - 10:06 pm | पॉइंट ब्लँक

नग. भावना आधिच पोच्ल्यात, म्ह्णून शान "आवांतर करतोय" अस सपष्ट लिवलय. त्यात तुमी आणि स्पष्टीकरण देवू नगा, उगाच आगीत तेल ओतल्यावानि हुईल - :)

चुकलामाकला's picture

6 Apr 2015 - 6:38 pm | चुकलामाकला

ती फुली काढा राव, हत्ती बी आंधळाच हाय रं

असंका's picture

22 Apr 2015 - 3:32 pm | असंका

:-)