माझी मुलगी ११ वर्षांची आहे, काल तिच्याशी बोलताना सहज काही विषय निघाला आणि तिला मी २-३ मिनिटात एक एक करून जयदेव पायेंग , बाबा आमटे, प्रकाश आमटे, बंकर रॉय, पोपटराव पवार यांच्या गोष्टी सांगीतल्या. त्यांनी काय काम केले, कशा परिस्थितीत केले, त्याने कोणाला काय फायदा झाला इत्यादी इत्यादी. हेतू हा की तिला सध्या वेगळे काम करणाऱ्या लोकांची ओळख व्हावी आणि थोडे इन्स्पीरेशन मिळावे.
या गोष्टी मी मला त्यांचे काम जसे आठवेल तसे सांगितले,त्यातील काही बरोबर,काही चूक तर काही अर्धवट असेल,पण तिला या गोष्टी आवडल्या. टेड वरचा बेअरफुट कॉलेजचा व्हिडिओ पण दाखवला. जेथे जमले तेथे गुगल सर्च करून त्या त्या लोकांचे फोटो दाखवले.
मला माहिती आहे की ही यादी फार लहान आहे, पण तुम्ही ही यादी वाढवायला मदत करू शकता का? आणखी कोणाकोणाबद्दल मी तिला सांगू शकतो? मला जर माहिती नसेल तर नेट वर त्यांच्याबद्दल चांगली माहिती असेल तर तिची लिंक देऊ शकता का? यात मी ऐतिहासिक लोकांचा समावेश केला नाही, शक्यतो गेल्या ५०-६० वर्षातील लोकांबद्दल सांगायचा विचार आहे.
प्रतिक्रिया
30 Mar 2015 - 6:55 pm | प्रसाद गोडबोले
श्री श्री यो यो हनी सिंगच्या गांण्यांचे व्हिडीयो दाखवावेत =))
30 Mar 2015 - 7:24 pm | वेताळ
व त्याचा लोकपाल ह्याच्या गोष्टी सांगा.
30 Mar 2015 - 7:28 pm | हाडक्या
त्यांना गल्ली चुकल्याची फीलींग पह्यल्या दोन पर्तिसादातच देऊ नका राव.. ;)
30 Mar 2015 - 7:45 pm | टीपीके
तीन दिवस मिपा बंद होते ना, मग घालू द्या राहिलेला थोडा धिंगाणा. :)
एनीवे, दोनचार चांगली नावे मिळाली तर धागा मार्गी लागला समजीन नाही तर माहितीच आहे की नवीन लोकांची मिपावर कशी शाळा घेतात ते, त्यामुळे वाइट नाही वाटणार. कही और धुढेंगे :)
30 Mar 2015 - 10:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
५ वर्ष ६ महिने वयोमान. म्हणजे लैचं जेष्ठ. नवे कुठले =))
आणि चांगल्या धाग्यावर धिंगाणा होत नाही.
31 Mar 2015 - 12:18 am | टीपीके
तसे नाही हो, पण मी वाचनमात्र होतो, फार कधी लिहिले नाही आणि पहिले २ प्रतिसाद जरा बोउन्सर होते म्हनुन
31 Mar 2015 - 2:47 am | हाडक्या
ह्या ह्या ह्या.. चिमणराव.. भारी पकडलेत हो.. काय हो लब्बाड..? मिपावरचे आजोब्बा तुम्ही ना.. ;)
30 Mar 2015 - 7:34 pm | वेताळ
एक सुंदर लेख मालिका आली होती "यांनी घडवली अमेरिका" ही तिला वाचुन दाखवा.खुप छान लेखमाला आहे.
30 Mar 2015 - 7:40 pm | टीपीके
ओक्के. पण भारतातली आणखी काही व्यक्ती सुचवू शकलात तर बरे होइल. एक होता कार्व्हर पण वाचून दाखवायचा विचार आहे (जरी भारतीय नसला तरी)
31 Mar 2015 - 7:47 pm | मितान
रश्मी बन्सलने तयार केलेली सुंदर पुस्तकं आहेत दोन तीन. आय हॅव अ ड्रीम त्यातलं एक. बाकी नावं आत्ता आठवत नाहीत. तुम्ही वाचून लेकीला गोष्ट स्वरूपात सांगू शकाल.
30 Mar 2015 - 8:05 pm | हाडक्या
एक सांगा, फक्त समाजसेवी कार्य करणार्यांचीच नावे हवीत की इतर पण प्रेरणादायक चालतील ?
म्हणजे असे की डॉ. बंग किंवा तसेच लोक तुम्हास अपेक्षित आहेत की संशोधक, उद्योजक पण चालतील ?
(आमी एक नाव दिले बगा इथेच - डॉ अभय आणि राणी बंग. :) )
30 Mar 2015 - 8:51 pm | टीपीके
मी वर दिलेल्या नावांवरून तुम्हाला थोडीफार category ची कल्पना आलीच असेल, पण शक्यतो सामाजीक कार्य करणारेच मी आधी विचार करत होतो. संशोधक , उद्योजक पण चालतील पण मला फारसे सुचत नहियेत. एडिसन ची मी तिला एक छोटी गोष्ट सांगितली होती, पण फार नाही मला शक्यतो छोट्या छोट्या प्रयत्नातून सकारात्मक बदल घडवणाऱ्या लोकांबद्दल सांगायचा विचार आहे.
डॉ अभय आणि राणी बंग बद्दल फार माहीत नाही, शोधून सांगीन तिला. धन्यवाद :)
30 Mar 2015 - 8:14 pm | श्रीरंग_जोशी
अधून मधून अशा प्रेरणादायी व्यक्तीमत्वांबाबत मुलांना सांगणे हे ठीक राहील पण याचा अतिरेक होणार नाही याची कृपया काळजी घ्या.
आणखी एक विचार आला, आपल्याकडे आपण व्यक्तीमाहात्म्याकडे पटकन आकर्षित होतो पण सांघिक कामगिरीला तेवढे महत्व देत नाही. सांघिक कामगिरीची प्रेरणादायी उदाहरणे सांगता आली तर बघा.
एक सहज आठवले - मृत्यूछायेतले ६९ दिवस...
30 Mar 2015 - 8:53 pm | टीपीके
हे पण छान आहे. BTW बुकमार्कची सोय बंद झाली का आजपासून ?
30 Mar 2015 - 9:06 pm | विकास
हाती ज्यांच्या शून्य होते. संपादक - अरूण शेवते, ऋतुरंग प्रकाशन. किंमत २०० रुपये.
भारतीय आणि परदेशी असे अनेक दिसतील. भारतीय सगळेच (आत्ताच्या नावामुळे) पटतील असे नाही. पण सुरवात कुठून आणि कशी केली हे पाहीले तरी प्रेरणा मिळण्यासाठी चांगले ठरू शकते...
30 Mar 2015 - 9:26 pm | टीपीके
ऐकले नव्हते या पुस्तकबद्दल. आता विकत घेइन. BTW यात तिस्ता सेटलवाड पण आहेत :P
30 Mar 2015 - 9:29 pm | टीपीके
स्वारी, अमेरिकन त्रिशंकू यांच्याऐवजी तुम्हाला प्रतिसाद पडला. तुम्हीही सांगितलेले पुस्तक शोधिन. पण जालावर काही माहिती असेल तर उत्तम. भारताबाहेर प्रत्येक पुस्तक पटकन मिळेलच असे नाही (आणि ही जाहिरात नाही :) )
30 Mar 2015 - 9:29 pm | विकास
सुशीलकुमार पण! :)
(अर्थात सुशीलकुमार मान्य आहेत. टिस्टा काय प्रकरण आहे ते माहीत असल्याने त्यांच्यावरील प्रकरण मी वाचण्याच्या भानगडीत पडलो नाही. ;) )
30 Mar 2015 - 9:12 pm | आदूबाळ
अगदी ३ मिनिटं धरलं तरी ३६ सेकंदात एक गोष्ट!
30 Mar 2015 - 9:24 pm | टीपीके
प्रत्येकी हो. ज्यांच्याबद्दल मला माहीत होते ती गोष्ट जास्त वेळ ;) आणि तिने प्रश्न विचारले तर शोधून आणखी माहिती दिली. काय तुमच्यासारख्या जेण्टलमेन लोकांना सगळे इस्कटुन सांगावे लागते का? (ह. घ्या.)
30 Mar 2015 - 9:50 pm | आदूबाळ
:)
रिचर्ड फेनमन या माणसाबद्दल नक्की सांगा.
30 Mar 2015 - 9:58 pm | टीपीके
कोण हा? काही लिंक?
30 Mar 2015 - 10:02 pm | विकास
http://www.feynman.com/
मोठ्ठा शास्त्रज्ञ! त्याच्यावर मराठीत भाषांतरीत केलेले पुस्तक देखील आहे.
मला उशीरा कळले, पण विद्यार्थ्यांसाठी योग्य वयात त्यांची भौतिकशास्त्रावरील भाषणे खूप चांगली आहेत...
http://www.feynmanlectures.info/
30 Mar 2015 - 10:08 pm | आदूबाळ
+१
थोर मनुक्ष.
एका ज्ञानशाखेत स्पेशलायजेशन करतो आहे म्हणून बाकी छंद जोपासू नयेत असं नसतं, हे या बुवाजींकडे बघून पटतं. यांना पदार्थविज्ञानाचं नोबेल मिळालं. त्याबरोबरच ड्रम वाजवणे, कुलपं उघडणे वगैरे अनेक उद्योग यांनी केले.
शुअर्ली यू आर जोकिंग मिस्टर फेनमन हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे.
30 Mar 2015 - 9:21 pm | अमेरिकन त्रिशंकू
"खरेखुरे आयडॉल्स" या नावाचं पुस्तक आहे. ते मिळालं तर बघा.
http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4741129754118837375
31 Mar 2015 - 6:07 am | अमेरिकन त्रिशंकू
"खरेखुरे आयडॉल्स - भाग २"
http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4810880002830271267
भारताबाहेर असाल तर इथूनही मागवता येईल.
http://kharedi.maayboli.com/shop/Khare-khure-Idols.html
30 Mar 2015 - 9:21 pm | खेडूत
यादी मोठी आहे .
तूर्तास -
जिजाऊ , स्वामी विवेकानंद , स्वा. सावरकर , झाशीची राणी , शंतनूराव किर्लोस्कर , जमशेदजी आणि जे आर डी टाटा , एपीजे अब्दुल कलाम , आमटे कुटुंबीय , चंद्रकांत गोखले, साईना नेहवाल , डॉ कुरियन , डॉ नारळीकर , डॉ माशेलकर , ई श्रीधरन , कुमारजी,
याशिवाय कदाचित तुमच्या आजूबाजूची, नात्यातली, परिचयातली एखादी कर्तृत्ववान व्यक्ती असू शकेल तर प्रत्यक्ष भेट घालून देऊ शकता !
30 Mar 2015 - 9:30 pm | टीपीके
नक्कीच , धन्यवाद
30 Mar 2015 - 9:44 pm | विकास
"विवेकानंद रॉक मेमोरीअल" हे सामान्य भारतीयाच्या पैशाने उभारण्याचा संकल्प करणारे आणि पूर्ण करणारे एकनाथजी रानडे.या संघाच्या प्रचारकाच्या प्रकल्पास कम्युनिस्टांपासून इंदीरा गांधींपर्यंत सर्व राजकीय व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला...गुड ओल्ड डेज्
नानाजी देशमुख - संघाच्या दिनदयाळ उपाध्याय यांच्या लेखणीतून उतरलेला एकात्म मानवतावाद (इंटीग्रल ह्युमॅनिजम) हा चित्रकुटाच्या भागात वास्तवात आणणारे नानाजी देशमुख... जेंव्हा आणिबाणीच्या काळात संघावर बंदी घातली गेली आणि "संघिष्ठांचे" अटकसत्र सुरू झाले तेंव्हा नानाजी इंदीरा गांधीकडे जाऊन म्हणाले की "मी संघकार्यकर्ता आहे, अटक करा." अर्थातच बाईंनी त्याच्याकडे सविनय दुर्लक्ष केले. आणिबाणी विरोधीचळवळीत कार्यरत होते. नंतर ७७ साली निवडून आले पण ८० साली वयाची साठी झाली म्हणून सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले आणि चित्रकूट प्रकल्प उभारला...
असे अनेक आहेत. विविध वैचारीक पद्धतीतले. बर्याचदा केवळ समाजवादी आदर्शच समोर येतात म्हणून ही दोन वेगळी व्यक्तीमत्वे उदाहरणादाखल दिली...
31 Mar 2015 - 7:49 pm | मितान
+++१११
30 Mar 2015 - 10:11 pm | सौन्दर्य
हेलेन केलर विषयी सांगा, अतिशय प्रभावी व्यक्तीमत्व.
स्टीफन हॉकिन्स हे देखील ग्रेट.
30 Mar 2015 - 10:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सावरकर, भगतसिंग, राजगुरु, मंगल पांडे, आझाद, सुभाषचंद्र बोस वगैरे अस्सल स्वातंत्र्यसैनिकांच्या गोष्टी.
झालचं तर किरण बेदी, कल्पना चावला, सुनिता विल्यम्स, साईना नेहेवाल, सनिया मिर्झा वगैरेंच्या गोष्टी.
किर्लोस्कर, टाटा वगैरे उद्योगघराण्यांच्या उदयाच्या गोष्टी
अतिमारा केला नाहीत तर बरं होईल.
31 Mar 2015 - 12:22 am | टीपीके
अतिमारा नाही, आठवड्यातून १ गोष्ट असे टार्गेट ठेवायचा विचार आहे.
30 Mar 2015 - 10:28 pm | अत्रन्गि पाउस
एका रॅन्ग्ल्रर ची गोष्ट वाचून दाखवा (जयंत नारळीकरांच्या आईने लिहिलेले)
कृपा करा आणि "शामची आई" घरात सुद्धा आणू नका
31 Mar 2015 - 8:24 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी २००% सहमत. मुलांना संस्कारक्षम बनवा पण हळवं आणि रडुबाई नको.
31 Mar 2015 - 8:41 am | श्रीरंग_जोशी
शामची आई पुस्तकाबाबत तुमच्या तीव्र भावनांच्या मागील उद्देशांविषयी शंका व्यक्त करत नाहीये. पण वाढत्या वयात एखादे पुस्तक वाचल्याने लगेच ते मुल तसले स्वभावगुण आत्मसात करणार हे गृहितक पटण्यासारखे नाही.
अत्यंत देवभोळ्या व पापभिरू वातावरणात लहानाची मोठी झालेली पण लाथ मारीन तिथे पाणी काढीन किंवा साम दाम दंड भेद धोरण राबवणारी अनेक व्यक्तिमत्वे पाहिली आहेत.
31 Mar 2015 - 11:35 am | अत्रन्गि पाउस
सध्याच्या काळात आणि येणाऱ्या आव्हानात्मक भविष्यात ...आपल्या अपत्यामध्ये कोणते गुणविशेष येण्यासाठी शामची आई वाचणे अनिवार्य आहे असे तुम्हाला वाटते ?
31 Mar 2015 - 6:49 pm | श्रीरंग_जोशी
हेच काय कुठलेच पुस्तक मला अनिवार्य वाटत नाही बुवा.
मी स्वतः ठरवून एखाद दुसरेच पुस्तक वाचले असेल. बाकी जशी हाती लागली तशी वाचली.
शामची आई पुस्तकामधला पोहणे शिकण्याचा प्रसंग खूप भावतो.
तात्पर्य - जसे ठरवून वाचणे मला फारसे पटत नाही व ठरवून न वाचणेही पटत नाही.
31 Mar 2015 - 8:35 pm | ज्ञानोबाचे पैजार
जोशी सरांशी बाडीस
आजकाल साने गुरुजी, महात्मा गांधींसारख्या लोकांना उगाचच नावे ठेवण्याची फॅशन झाली आहे.
पैजारबुवा,
1 Apr 2015 - 8:15 pm | अत्रन्गि पाउस
मी फक्त शामची आई ह्या पुस्तकाबद्दल लिहिले आहे ...
30 Mar 2015 - 11:59 pm | इडली डोसा
तोत्तोचान आणि Little Women- Louisa May Alcott( मराठी अनुवाद चौघीजणी - शांता शेळके ) ... तुमच्या मुलीला वाचनाची आवड असेल तर ही पुस्तके सुद्धा छान आहेत
31 Mar 2015 - 6:19 am | चाणक्य
अनिल अवचटांचं 'कार्यरत' नावाचं एक पुस्तक आहे. त्यात समाजकार्य करणा-या काही व्यक्तींची खूप छान माहीती आहे. बंग दांपत्य, हिम्मतराव, अशोक कुलकर्णी आणि ईतरही बरेच
6 Apr 2015 - 10:36 am | स्पंदना
मी पण कार्यरत बद्द्लच सांगणार होते.
31 Mar 2015 - 9:03 am | कापूसकोन्ड्या
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे देशोदेशींचे दार्शनिक आणि दीपस्तंभ ही पुस्तके
फादर फ्रान्सिस दिब्रिटो काही पुस्तके
अतिरेक करु नका
अतिरेक करु नका
अतिरेक करु नका
1 Apr 2015 - 11:04 am | सिरुसेरि
खालील पुस्तके आठवली -
आईची देणगी - गो. नी. दांडेकर - अनेक कर्तुत्ववान लोकांच्या कथा ,
देश विदेशच्या परीकथा - मालती दांडेकर - विविध देशांमधील लोक कथा , परिकथा व त्यामुळे समजणारी त्या त्या देशांमधील संस्क्रुतीची व जगाची ओळख .