स्वातंत्र्य तर मिळाले, पण...??

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
15 Aug 2008 - 2:50 pm

स्वातंत्र्य तर मिळाले

इंग्रज तर पळाले,

पण...

दहशतवाद जन्मला ...तो येथेच आहे.

भ्रष्टाचार जन्मला ... तो येथेच आहे.

स्वातंत्र्य तर मिळाले,

स्वराज्य तर मिळाले,

पण...

महागाई वाढली .. ती जात नाही

बेरोजगारी वाढली ..ती जात नाही

स्वातंत्र्य तर मिळाले,

लोकशाही तर मिळाली,

पण...

लोकसंख्या वाढली ... ती वाढतेच आहे

बेईमानी वाढली .. ती वाढतेच आहे.

स्वातंत्र्य तर मिळाले

इंग्रज तर पळाले,

पण...

इंग्रजी येथेच आहे ... ती जाणार नाही

गरीबी येथेच आहे ...ती जाणार नाही

कविताविचार

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

15 Aug 2008 - 3:46 pm | प्रमोद देव

वस्तुस्थितीचे विदारक वर्णन आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे