दृष्टी
वर्तमानाच्या खांध्यावर बसून
भविष्याकडे पाहीले.
धुक्यातून काहीच दिसेना
पण ऐकू आले अस्पष्ट नाद.
बोलावणारे, भुरळ पाडणारे.
त्या नादाचे बोट पकडुन
सुखाच्या शोधात जावे म्हटले.
पण ठेच लागण्याच्या भितीने
पाउल पुढेच पडेना!
भुरळ पाडणारे नाद येतच होते.
नंतर तेही धुक्यात विरून गेले.
धुके आणखिनच दाट.
मी मुके धुके ऐकत तिथेच थिजलेला.
..............
वर्तमानाच्या खांद्यावर बसून
मागच्या दिशेला भूत पाहीले.
स्वच्छ प्रकाशात उजळलेल्या वाटा
फ़ुले काटे खड्डे रस्ते महाल झोपड्या
स्पष्ट ऐकू येणारे नाद, संगीत, सूर, बेसूर.
अगदी डोळे मिटून,
कोणाचेही बोट न पकडता
जाऊ शकेल मी त्या दिशेला.
पण फक्त कान आणि डोळेच मागे जागे.
पाय तसेच थिजलेले. मागे वळेचना.
तेव्हा अचानक लक्षात आले..............
आज स्पष्ट दिसणारे मागचे रस्ते
काल धुक्यातच मुक्याने दडले होते.
मग मी समोर दिसणाऱ्या गाढ धुक्यात...
डोळे मिटून पाऊल टाकले.
प्रतिक्रिया
14 Aug 2008 - 12:06 pm | अनिल हटेला
मग मी समोर दिसणाऱ्या गाढ धुक्यात...
डोळे मिटून पाऊल टाकले.
यालाच जीवन ऐसे नाव !!!
जमलये बर !!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
14 Aug 2008 - 2:42 pm | राघव१
म्हणतो. छान लिहिलेत.
राघव
14 Aug 2008 - 12:47 pm | बेसनलाडू
(वाचक)बेसनलाडू