एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.
एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.
एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.
एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.
एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.
एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.
एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी
प्रतिक्रिया
14 Aug 2008 - 11:38 am | सुचेल तसं
हर्षद,
ही कविता तुमचीच आहे का? कारण काही दिवसांपुर्वीच ही कविता मला ईमेल वर आली होती.
http://sucheltas.blogspot.com
14 Aug 2008 - 11:43 am | केशवटुकार
अरे काय पोपट करता सुचेल राव !!
आम्ही आख्खं विडंबन मारलं ना राव त्यांची कविता वाचुन !
14 Aug 2008 - 11:50 am | सुचेल तसं
तुम्ही नका काळजी करु...
तुमचं विडंबन एकदम "ओरिजनल" आहे :)
http://sucheltas.blogspot.com
14 Aug 2008 - 12:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणजे हे विडंबन आहे? वाचावं ते नवलंच!
14 Aug 2008 - 12:23 pm | सुचेल तसं
अहो हर्षदनी लिहीलेलं नाही तर केशवटुकारांनी लिहीलेलं विडंबन आहे :)
http://sucheltas.blogspot.com
14 Aug 2008 - 11:49 am | अनिल हटेला
अहो कविता छान आहे !!
आणी आता कविता म्हनुन न बघता कच्चा माल म्हणुनच बघत असतो मे पन !!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
14 Aug 2008 - 12:20 pm | सर्किट डांबिस (not verified)
http://www.misalpav.com/node/1196
सरपंचांनी हे जे काही लिहून ठेवले आहे, त्याची जरा अंमलबजावणी होईल का ?
- सर्किट
14 Aug 2008 - 12:40 pm | अरुण मनोहर
हा म्हणतो आहे एक प्रेयसी पाहिजे, पण खरतर इथे सात प्रेयसींचे मागणे केले आहे.
मिळुदे बापुड्याला. (मिळाल्यावर पस्तावू नको!)
कपया ;;) ह.घ्या.
14 Aug 2008 - 10:07 pm | रेवती
बर्याच अपेक्षा आहेत. तिच्या अपेक्षा येऊ द्या आता.
रेवती