जालावर लंबुळक्या लेखात / भाषणात हमखास आढळणारी चटपटीत वाक्ये (काही घासून गुळगुळीत झालेली) यांचं संकलन इथे करूयात.
उदा.
वर्गीकरण एक
१. अर्धा ग्लास रिकामा आहे की अर्धा भरलेला आहे हे पाहणा-याच्या दृष्टीवर अवलंबून असतं.
२. सिस्टीम बदलू शकत नसेल तर सिस्टीमचा भाग व्हावे.
३. देश तुम्हाला काय देतो यापेक्षा ...
४. आपल्याला जे म्हणायचे आहे ते न म्हणता ते कसे "दिसेल" याची काळजी घेतली जाते.
५. आपल्यासाठी लोकशाही ही चैन आहे... ( अगागागा)
वर्गीकरण दोन
१. या ठिकाणी
२. घोषणा करण्याच्या संबंधाने
३. शेतक-यांच्या, कष्टक-यांच्या, गरीबांच्या माध्यमातून
४. उधळून लावल्याशिवाय राहणार नाही
५. अरे काय चाललंय हे ?
प्रतिक्रिया
18 Feb 2015 - 11:47 pm | एस
अरे काय लिहिलंय हे!
18 Feb 2015 - 11:50 pm | खटासि खट
मनसे लिव्हलंय अन काय
18 Feb 2015 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
* अरे, कुठे नेऊन ठेवलाय "क्ष्क्ष्क्ष" माझा ?
* आमच्याकाळी... / ते दिवस आता राहिले नाहीत / पूर्वीसारखं "क्ष्क्ष्क्ष" आता राहिलं नाही
* लक्षात ठेवा...
18 Feb 2015 - 11:52 pm | खटासि खट
ते दिवस आता राहिले नाहीत >>> हे त्या एका विशिष्ट आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक शहरात ऐकू येतं पावलापावलाला
18 Feb 2015 - 11:59 pm | श्रीरंग_जोशी
यामागे सांप्रदायिक शक्तींचा हात आहे.
19 Feb 2015 - 12:02 am | डॉ सुहास म्हात्रे
बरोबर आहे... आजकाल,
यामागे परकिय शक्तींचा हात आहे... याची जागा त्या वाक्यप्रचाराने घेतली आहे :)
19 Feb 2015 - 12:12 am | सूड
19 Feb 2015 - 12:20 am | श्रीरंग_जोशी
भ्रष्टाचार्यांची गय केली जाणार नाही.
19 Feb 2015 - 1:22 am | सांगलीचा भडंग
१. या प्रकरणाचा तपास सीबीआई कडे देण्यात यावा असे निवेदन मी मुख्यमंत्री यांना करणार आहे .
२. भारतीय राज्यघटनेची पायमल्ली खपवून घेतली जाणार नाही
३. दिल्ली मध्ये राहून गावातले प्रश्न समजणार नाहीत . त्यासाठी मातीशी नाळ जुळलेली असणे महत्वाचे
५. या अश्या प्रवृत्ती वेळीच ठेचल्या नाहीत तर पुढे मागे या देशावर राज्य करतील
19 Feb 2015 - 1:24 am | सांगलीचा भडंग
वरचा ४ नंबर चा मुद्दा गायब करण्यामागे आरएसएस चा हात आहे
19 Feb 2015 - 1:26 am | श्रीरंग_जोशी
'नया है वह' - हे देखील त्याच्या अतिरेकी वापरामुळे या गटात मोडू लागेल असा अंदाज आहे.
19 Feb 2015 - 10:58 am | कैलासवासी सोन्याबापु
"ह्या बाबतीत 'क्ष' असे म्हणतो की....."
वेयर क्ष कॅन बी एनी वन फ्रॉम अब्राहम लिंकन टू पंडित दीनदयाल उपाध्याय!!!
19 Feb 2015 - 12:26 pm | टवाळ कार्टा
मुठभर वाईट लोकांमुळे सगळे डिपार्टमेंट्/जात्/धर्मिय (इथे जे हवे ते घ्या) बदनाम होतात
19 Feb 2015 - 1:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
19 Feb 2015 - 1:59 pm | टवाळ कार्टा
मस्त मॉडर्न आर्ट :)
19 Feb 2015 - 2:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्याचा अर्थ असा की, "मूठभर माणसंही ठो ठो बोंबा मारू लागली की कितीतरी मोठा गदारोळ होतो !" :) ;)
: जागतीक किर्तीचा कोट(Quote)कला समिक्षक इए
19 Feb 2015 - 12:56 pm | नाखु
आमच्यात जरी मतभेद होते तरीही विकासाच्या (कुणाचा विकास हा कायम संभ्रम हील अश्या खर्जातच) मुद्द्यावर एक आहोत
हे जुलमी सरकार इंग्रजांपे़क्षाही वाईट आहे.
मला बदनाम करणे हा विरोधकांचा डाव आहे.
अण्णा/अप्पा जे कुणी व्यासपीठावर असतील ते आम्हाला गुरुस्थानी आहेत.(प्रत्यक्षात आम्ही त्यांची कधीही पत्रास ठेवली नाही)
19 Feb 2015 - 1:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
१. सर्वधर्मसमभावास धोका पोचवणार्यांची हयगय केली जाणार नाही (दाढी नं कुरवाळणार्यांची गय केली जाणार नै)...हल्ली आमचे नमो आल्यापासुन ऐकलं नाही वाक्यं. पुर्वी अपचन होईपर्यंत ऐकु यायचं.
२. आपल्या मिपावरचं म्हणाल तरं "फाट्यावर मारणे"...हल्ली लोक्सवर कैचं परिणाम दिसतं नाही.
19 Feb 2015 - 1:36 pm | खटासि खट
शिवाजी जन्मास यावा पण तो शेजारच्या घरात....
( च्यायला, आमच्या घरात काय धरणजी का ? )
19 Feb 2015 - 1:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोण धरणजी ?
आमच्या घरात गेला बाजार बिल गेट्स / मुकेश् अथवा अनिल अंबनी (धिरुभाई नको, कष्ट करून फार्फार उशीरा श्रीमंती आली), सॅम वॉल्टन, वॉरन बफे, कार्लोस सिन हेलु, अमान्सिओ ओर्टेगा किंवा लॅरी एलिसन यापैकी कोणीपण चालेल. +D
19 Feb 2015 - 1:59 pm | टवाळ कार्टा
त्यापेक्षा घड्याळवाले काका आले तर पुढच्या १०० पिढ्या बसून खातील :)
19 Feb 2015 - 2:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा. (गुण २ विभागणी अर्थ सांगणे १ मार्क, वाक्यात उपयोग १ मार्क)
१. स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेणे
२. कुर्हादीचा दांडा गोतास काळ
21 Feb 2015 - 11:00 am | खटासि खट
२. क-हांडेंचा दांडा खोतास काळ
असं पाहीजे का ?
23 Feb 2015 - 11:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
=)) ह्ये बी चाललं!!! =))
20 Feb 2015 - 10:28 am | खटपट्या
शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात.......
23 Feb 2015 - 6:09 am | निनाद मुक्काम प...
ह्या कृत्या अगर घातपातामध्ये धर्माध हिंदुत्ववादी संघटनांचा हात आहे
त्यास पूरक वाक्य
गांधीजीच्या देशात धर्मनिरपेक्ष भारतीय जनता कधीही ह्यांचे हेतू पूर्ण करणार नाही ,
मुंबई मध्ये मराठी माणूस ......