रशिया आणि जॉर्जियातील युध्द आज थांबले आहे.पण जसे हे युध्द सुरु झाले तसेच या युध्दातील विरोधाभास स्पष्टपणे दिसुन येउ लागला.मुळात रशियातील जे परदेशी नागरीक व इंग्रजी भाषा समजारे व आंतरराष्ट्र्यि मिडियाचे दर्शक असणारे रशियन नागरीक यांना तर या युध्दाने एकदमच confuse करुन टाकले.त्यामुळे युध्द सुरु करण्यात हात नक्की कुणाचा होता हे अजुनही येथे स्पष्ट झालेले नाही. आंतरराष्ट्रिय मिडीया म्हणजे सीएनएन्,बीबीसी पुर्णपणे जॉर्जियाच्या बाजुने बातम्या देत होता व रशियन मिडीया त्याच्या बरोबर विरुध्द बातम्या देत होता.
एक गोष्ट मात्र नक्की की जॉर्जियाचे राष्ट्रपती मिहाईल(मायकल) साकश्विली यांनी आंतराष्ट्रिय मिडियाचा अतिशय चांगल्या पध्दतीने वापर करुन घेतला.मुख्य म्हणजे त्यांना इंग्रजी येत असल्याने त्यांचा पत्रकारांशी थेट संवाद होत होता व ते सतत मिडीयाच्या बरोबर राहुन आपली वक्तव्ये करत होते. तर त्याच्या बरोबर विरुध्द रशियन मिडीया जॉर्जियाची कशी चुक आहे व जॉर्जियन राष्ट्रपती कसे खोटे बोलत आहेत हे दाखवत होते.एका बातमीमध्ये साकश्वीली रस्त्यावर बुलेट प्रुफ जॅकेट घालुन आलेले सीएनएन,बीबीसीने दाखवले होते त्याच्या रशियन मिडीयानी चांगलाच समाचार घेतला.बातमीच्या आधीच्या फुटेजमधे साकश्विली मनसोक्त हसताना रशियन मिडीया ने दाखवले व सांगितले की 'यांचा देश अतिशय मोठ्या संकटात आहे हे साकश्विली सांगतात आणि इथे तर मनसोक्त हसत आहेत्'.मग थोड्या वेळानी साकश्विली यांनी पत्रकारांना सांगितले की रशिया कसा हल्लेखोर आहे ,त्यानंतर मग आकाशातुन कसलातरी आवाज आला आणि एकदम साकश्विली आणि त्यांचे अंगरक्षक पळापळ करु लागले आणि नंतर साकश्विली खाली बसले व त्यांना वरुन व इतर सर्व बाजुंनी अंगरक्षकांनी गराडा घातला.यावेळी आंतरराष्ट्रिय मिडीयानी सांगितले की आकाशातुन जॉर्जियावर हल्ला होण्याची शक्यता आहे वगैरे.याचा समाचार घेताना रशियन मिडीयानी दाखवले की हा सर्व साकश्विली यांनी केलेला स्टंट होता कारण अस इतक लगेच घाबरुन जाण्यासारख काहीच झाल नव्हत. नंतर परत अशीही पुस्ती जोडली की साकोश्वीली सगळ्या जॉर्जियन्सना सांगत आहेत की 'घाबरु नका' आणि साकोश्विली स्वतःच घाबरले आहेत.
एकीकडे जॉर्जियन राष्ट्रपती रशिया वर सगळा दोष टाकत होते आणि असेही सांगत होते की रशियाने बीबीसीच्या पत्रकारांवर हल्ला केला त्याचवेळी रशियन मिडीया जॉर्जियावर दक्षिण आसेतियन लोकांवर जॉर्जिया करत असलेल्या 'जिनोसाईड्'चा इतिहास देत होता.जॉर्जियन राष्ट्रपती असेही म्हणत होते की 'जॉर्जिया हा जगातल्या सर्वात चांगल्या लोकशाही देशांपैकी एक देश आहे' तर रशियन वरीष्ठ पत्रकार सांगत होते की जॉर्जिया जगातला सर्वात मोठा शस्त्र खरेदी करणारा देश आहे.जॉर्जियाने विविध देशांकडुन खरेदी केलेल्या शस्त्रांची यादीही रशियन मिडीया दाखवत होता. जॉर्जियाने गेल्या ५ वर्षात आपले डीफेन्स बजेट ३० पटीने का वाढवले आहे,इतक्या लहान देशाला १ अब्ज डॉलर्स इतक डिफेन्स बजेट कशाला लागत्,तसेच जॉर्जिया जगातला सर्वात चांगला लोकशाही देश नाही तर सर्वात जास्त युध्दसामग्री खरेदी करणारा देश आहे हे सांगत होते.
यामध्ये अमेरिकेच्या भुमिकेचाही उहापोह झाला. साकश्विली अमेरिकेने यात हस्तक्षेप करावा व लष्करी मदत करावी अशी भुमिका घेत होते.त्याचबरोबर जॉर्ज बुश यांनीही रशियावर सहकार्य करत नसल्याचा आरोप केला.रशियाने मात्र फक्त 'अमेरिका या सर्वाच्या मागे आहे' एव्हढ म्हणनच बाकी ठेवल होत.रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांनी अमेरीकन डिप्लोमॅट्स व 'एक माणुस'(वाचा-जॉर्ज बुश) यामागे आहेत असे जवळपास स्पष्ट बोलत होते तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्रिय मिदवेदोव म्हणत होते की आमचे पश्चिमेकडिल 'पार्टनर्स' आम्हाला समजुन घेत नाहीत व त्यांनी साकोश्विलींच्या बोलण्यावर फारस लक्ष देउ नये.रशियाच्या युएन मधल्या ब्युरोक्रॅटनी मात्र सडेतोड उत्तर दिली.अमेरिकेचे १२३ वरीष्ठ अधिकारी जॉर्जियात काय करत आहेत्,अमेरिका जॉर्जियन सैन्याला इराकमधुन स्वतःच्या दळणवळणाच्या साधनांतुन जॉर्जियात वापस का आणत आहेत असे सडेतोड प्रश्न विचारत होता.त्याचबरोबर रशियन मिडीया अशीही बातमी देत होते की अमेरीकेनी जॉर्जियन सैनिकांना खास प्रशिक्षण दिले आहे त्याचबरोबर एक कृष्णवर्णीय अमेरिकनही यात मरण पावला आहे.तो अमेरीकेचा सैनिक असावा असे त्यांचे म्हणने होते.
हा मुळ वाद तसा जुनाच आहे.पंधरा वर्षांपुर्वी फाळणीवादी आसेतियन्सनी मोठा उठाव केला होता.रशियाचे म्हणने आहे की त्यावेळी जॉर्जियाने हजारो आसेतियन्सचे 'जिनोसाईड' केले.त्यानंतर रशियन शांतीदुत दक्षिण आसेतियात गेले.त्यानंतर रशिया म्हणत होता की उत्तर आसेतियन्सप्रमाणे दक्षिण आसेतियन्सनाही रशियात यायचे आहे.त्यांनी जवळपास २०००० आसेतियन्सना रशियन पासपोर्ट दिले.म्हणजे थोडक्यात हे लोक रशियाचे नागरीक झाले.आधी फाळणीवाद्यांनी हल्ले करायला सुरुवात केली असे जॉर्जिया म्हणते आहे.मग जॉर्जियाने त्श्किनवाली वर हल्ला केला ज्यात रशियाचे काही शांतीदुत व रशियाचे नागरीक्(आसेतियन ज्यांना रशियाने पासपोर्ट दिले) मारले गेल्याने रशियाने प्रतिहल्ला केला.जॉर्जियाचे राष्ट्रपती म्हणत आहेत की रशियाने प्रथम हल्ला केला आणि त्यांचा उद्देश जॉर्जियावर हल्ला करुन सत्ता उलथवण्याचा आहे.साकश्विली रशियन सरकारला मुख्यकरुन व्लादिमीर पुतीन यांना अजिबात आवडत नाहीत कारण साकश्विलींनी पुतीन यांना 'लिलिपुतीयन' म्हणुन हिणवले होते.पुतीन असेही म्हणुन गेले की साकश्विली बरोबर बोलणी होउ शकत नाहीत्.
आज फ्रान्सचे राष्ट्रपती निकोलस सार्कॉझी मॉस्कोत आले व त्यांनी मिदवेदव यांच्याशी चर्चा केल्यावर रशियने शस्त्रसंधी केली.पण अमेरीका व युरोपियन देशांचा या युध्दामागे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण नॅटो मधे गेलेल्या रशियन एन्व्हॉयनी मे२००८ मध्येच जॉर्जिया युध्दाच्या तयारीत आहे असे वक्तव्य केले होते.मात्र रशियात रहाणार्या लोकांना नक्की कुणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही आहे कारण आंतरराष्ट्रिय मिडीया व रशियन मिडीया एकदम परस्परविरोधी विधाने करत आहेत.
प्रतिक्रिया
14 Aug 2008 - 8:47 am | सखाराम_गटणे™
चिन्या, ऐक चांगला विषय चालु केल्याबद्दल आभार.
जॉर्जिया हा रशिया(USSR)तुन १९९१ साली फुटुन निघाला. (जॉर्जिया हा रशिया(USSR) मध्ये १९२३ साली गेला होता. स्टैलिन हा जॉर्जिया तलाच होता.)
जॉर्जियाने आसेतियाचा २ स्वयंनिर्णय डावलले. मला वाटते आहे की हे चुकीचे आहे.
रशियाचे म्हणतो की आम्ही आमच्या नागरीकांचे रक्षण करणार जरी ते दुसर्या देशात असले तरी. हे कितपत बरोबर आहे, ह्याची मला शंका आहे.
सखाराम गटणे
14 Aug 2008 - 4:43 pm | चिन्या१९८५
मुळात रशिया ज्या नागरीकांचे संरक्षण करायचे म्हणत आहे ते खरेतर आसेतियन्स आहेत्.दोन्हीही बाजु एकमेकांवर जिनोसाईडचा आरोप करत आहेत्.इथे रहाणार्यांना तर अजिबात कळत नाहीये की कोण बरोबर आहे ते
14 Aug 2008 - 9:27 am | अनिल हटेला
चिन्या !!
छान लेख !!
कारण बातम्या वाचुन झाल्या तरी नेमक काय घडल ह्याचा अन्दाज येत नव्हता...
हे वाचुन थोडी आयडीया आली....
अजुन काही नविन असेन तर अप्डेट कर ना राव !!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
14 Aug 2008 - 4:54 pm | चिन्या१९८५
धन्यवाद आन्या. सध्या सीझफायर झाल आहे.पण काहीकाही लोकांच म्हणन आहे की साकश्विलीनी चांगलाच डाव टाकला होता. रशियाने जर प्रतिहल्ला केला नसता तर आसेतियन्स मरत होते त्यामुळे आसेतियन्सनी परत रशियात जायला पाठींबा दिला नसता आणि रशियानी हल्ला केला आणि साखश्विलीनी आंतरराष्ट्रिय मिडीयाला हाताशी धरुन आता रशियाची ओळख ऍग्रेसर( हल्लेखोर?) झालीय. त्यामुळे रशियाने आता एक बाजु घेतली आहे.आता रशिया जॉर्जिया आणि आसेतियन्सच्या भांडणात मध्यस्त म्हणुन येउ शकत नाही.
14 Aug 2008 - 10:21 am | सुचेल तसं
चिन्या,
छान माहिती दिलीस...
>>पण अमेरीका व युरोपियन देशांचा या युध्दामागे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही
नक्कीच!!! जन्माने जॉर्जियन असलेल्या स्टॅलिननेच जॉर्जियाचे (आणि आसपासच्या काही छोट्या प्रदेशांचे) स्वातंत्र्य चिरडुन त्याला सोविएट रशियाशी जोडले होते.
खरं पाहता दक्षिण ऑसेशियातील लोकांना रशियातच राहणे पसंत आहे. त्यासाठी तेथे नोव्हेंबर २००६ मध्ये मतदानही घेण्यात आले होते. त्यात ९५% लोकांनी मतदान केले. मतदानाचा कौल पाहता सरळसरळ असे दिसले की सार्वमत हे रशियाच्या बाजुने आहे. एकुण मतांपैकी ९९% लोकांनी रशियात राहण्याला पसंती दिली. या सार्वमतावर ३४ देशांच्या आंतरराष्ट्रीय समितीने देखरेख केली होती. पण तरीही या सार्वमताच्या निर्णयाला संयुक्त राष्ट्रांनी व अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांनी मान्यता दिली नव्हती.
जॉर्जियातच असलेल्या अबखाझिया प्रांतालाही स्वातंत्र्य हवे आहे व रशियाची त्यालाही सहानुभूती आहे. अमेरिकेला मुख्य भिती अशी वाटत आहे की रशिया कदाचित पुन्हा जुन्या सोविएट साम्राज्याचा विस्तार करत आहे. त्यामुळे कदाचित अमेरिका आता जॉजिर्याला शस्त्रास्त्रांची मदत करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रशिया आणि अमेरिकेत पुन्हा एकदा शीतयुद्ध चालु होईल.
http://sucheltas.blogspot.com
14 Aug 2008 - 5:16 pm | चिन्या१९८५
प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद्.तुम्ही लिहिलेल्या गोष्टी अगदी बरोबर आहेत्.मुळात उत्तर आसेतियाप्रमाणेच दक्षिण आसेतियालाही जॉर्जियात रहायच नाहीये.साकश्व्हिलीनी पुर्ण प्रयत्न केला की अमेरिकेने अथ्वा नॅटोने यात लष्करी हस्तक्षेप करावा पण सध्या इराकमधील परीस्थितीमुळे अमेरिका हे करु शकत नव्हत व नॅटोने जरी लष्करी मदत केली असती तरी आमच्या देशात लुडबुड केली म्हणुन रशियाशी संबंध अजुन खराब होण्याची शक्यता होती.पण या युरोपियन देशांनी अनेक शस्त्रास्त्रांची मदत जॉर्जियाला केलेली आहे.त्याबद्दल सर्व सविस्तर माहीती रशियन चॅनेल्स दाखवत होते
14 Aug 2008 - 10:57 am | नीलकांत
चिन्या,
या विषयावर उत्तम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
नीलकांत
14 Aug 2008 - 5:17 pm | चिन्या१९८५
धन्यवाद नीलकांत
14 Aug 2008 - 11:38 am | सहज
इथे मांडल्याबद्दल व चांगला हाताळल्याबद्दल धन्यवाद.
14 Aug 2008 - 5:19 pm | चिन्या१९८५
धन्यवाद सहज !!!!!
14 Aug 2008 - 6:31 pm | मदनबाण
चिन्याराव उत्तम माहिती दिलीत...
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
14 Aug 2008 - 6:55 pm | चिन्या१९८५
धन्यवाद मदनबाण
14 Aug 2008 - 7:05 pm | खादाड_बोका
चिन्याराव उत्तम माहिती दिलीत. ईथे अमेरीकेत मिडीया असे प्रोजेक्ट करुन राहीली आहे की सगळी चुक रशीयाचीच आहे. पण बिचार्या अमेरीकेन बापड्यांना कोण खरे शिकवणार ? तुमची माहीती ईंग्रजी मध्ये करुन दुसर्या ब्लॉगवर टाका, म्हणजे थोडा खरा प्रसार होईल.
सत्यमेव जयते....
14 Aug 2008 - 11:10 pm | चिन्या१९८५
धन्यवाद ,खादाड बोका!!!!!!!
बरोबर आहे पण ते काम रशियन करतील .मी करायची गरज नाही.
14 Aug 2008 - 8:36 pm | संदीप चित्रे
खूप छान लेख आहे चिन्या... तुझे वाचन चौफेर दिसतेय.
14 Aug 2008 - 11:12 pm | चिन्या१९८५
धन्यवाद ,संदिप चित्रे
14 Aug 2008 - 11:46 pm | अभिज्ञ
मला वाटते कि मिडियाची माहिती बर्याच वे़ळा हि सत्य सांगतेच असे नाहि.
त्यातल्या त्यात बीबीसी,सीएनएन सारख्या वाहिन्या ह्या आंतर्राष्ट्रीय बातम्या देताना नेहमीच पाश्चिमात्य देशांशी सुसंगत धोरण
अवलंबतात. पॅलेस्टाइन्-ईस्त्राइल,भारत-पाक,चीन-तैवान ह्या सर्व वादग्रस्त संबंधांवर
पाश्चिमात्य देश विशेषतः अमेरीका,ब्रिटन ह्यांच्या परराष्ट्र धोरणाला अनुसरुन ह्यांचे वृत्तनिवेदन असते.
त्या पार्श्वभूमीवर रशिया-जॉर्जिया वादात हेच पहायला मिळणे स्वाभाविक आहे.
छान माहितीबद्दल चिन्या तुला धन्यवाद.
अभिज्ञ.
15 Aug 2008 - 8:12 pm | चिन्या१९८५
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अभिज्ञ!!!!!!तुमच म्हणन एका अर्थानी बरोबर आहे आणि यावेळी तर साकश्विलीने त्याचा व्यवस्थित वापर करुन घेतला
15 Aug 2008 - 12:03 am | धनंजय
अभिनंदन.
असेच विश्लेषक लेखन येऊ द्यात.
15 Aug 2008 - 8:15 pm | चिन्या१९८५
धन्यवाद धनंजय!!!!!!
16 Aug 2008 - 5:08 pm | चिन्या१९८५
शनिवार १६ ऑगस्ट २००८
बाकी काल रशियन मिडीयाला चांगलच कोलित सापडल. फॉक्स न्युज वर एका पत्रकाराने दोन दक्षिण आसेतियन स्त्रीयांना बोलावले व त्यांना विचारले की तुम्हाला काय सांगायचे आहे. त्यांनी सांगायला सुरुवात केली 'जॉर्जियन रणगाड्यांनी आमच्यावर हल्ला करायला सुरुवात केली .त्यात रशियन सैन्याचा हात नव्हता.आम्ही रशियन सैन्याचे आभार मानतो की त्यांनी आमच्याविरुध्द होणारे जिनोसाईड थांबवले.' असा एकदमच अनपेक्षित सुर आल्याने मुलाखतकार घाबरलाच. त्यानी लगेच ब्रेक घेतला.मग ब्रेकनंतर त्यानी सांगितल की 'काही तांत्रिक कारणांमुळे आम्ही हा कार्यक्रम पुढे चालु ठेवु शकत नाही.'त्यानी दुसर्या महीलेला म्हटले की तुम्ही ३० सेकंदात तुमचे मत नोंदवा. ती म्हणाली 'मला माहीती आहे की तुम्हाला हे ऐकायच नाहीये पण माझ्या घरावर आधी जॉर्जियन रणगाड्यांनी हल्ला केला.माझा मुलगा त्यात मरण पावला.जॉर्जियन सैन्याने आधी केलेल्या हल्ल्याने २००० आसेतियन्स मरण पावले आहेत्.याला साकश्विली व जॉर्जियन सरकार जबाबदार आहे'. लगेच मुलाखतकाराने कार्यक्रम थांबवला.हे जरी त्यांनी टि.व्ही.वर दाखवल नाही तरी हा व्हिडीओ इंटरनेटवर लीक झाला.त्यामुळे काल दिवसभर रशियन न्युज चॅनेल्स दाखवत होते की कशा प्रकारे अमेरीकन मिडीयाचा जॉर्जियाला पाठींबा आहे वगैरे.
नेमस्तक ,वरील माहीती माझ्या लेखाच्या शेवटी टा़काल का???इथे माझे लेख संपादित करता येण्याची सोय आहे का???
16 Aug 2008 - 6:03 pm | सहज
त्या इंटरनेटवर लीक झालेल्या व्हिडिओचा दुवा आहे का?
तोवर हा एक व्हिडीओ
16 Aug 2008 - 10:57 pm | चिन्या१९८५
माझ्याकडे नाही पण काल टिव्हिवर दाखवत होते. तुम्ही फॉक्स टिव्हीशी संबंधित सर्च करुन पहा.
19 Aug 2008 - 1:16 am | चतुरंग
http://www.youtube.com/watch?v=ZFcaNM2J3VE
खरंच फॉक्स न्यूजची पळता भुई थोडी झाली!
जय "तू नळी"! ;)
चतुरंग
19 Aug 2008 - 3:14 pm | चिन्या१९८५
धन्यवाद व्हिडीओ शोधल्याबद्दल्.त्या राइस बाईंच्या पत्रकार परीषदेचाही एक असाच व्हिडीओ आहे वाटत बहुतेक
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
16 Aug 2008 - 6:59 pm | अभिज्ञ
आज पहाटे बीबीसीवर रशियन सैनिकांनी आंतरराष्टिय पत्रकारांवर केलेला जीवघेणा हल्ला दाखवण्यात आला.
तो प्रकारहि भयावह होता.
अभिज्ञ.
16 Aug 2008 - 11:07 pm | चिन्या१९८५
असेलही. काही सांगता येत नाही.दोन्हीही बाजु आक्रमक आहेत. आता जॉर्जियाने जर प्रथम हल्ला केला तर रशियाने आसेतिया जिंकुन थांबायला हव होत पण त्यांचे सैन्य नंतर जॉर्जियातल्या गोरी शहरातही घुसले
17 Aug 2008 - 6:38 pm | ऋषिकेश
चांगले संकलन. असे संकलन देताना आधी दोन्ही देशांचा, प्रवृत्तीचा किंचीत इतिहास, सध्याचा वाद आणि नंतर युद्धाचे संकलन आले असते तर वाचायला अधिक मजा आली असती असे वाटते.
परंतू हे सगळं वाचून एक गोष्ट स्पष्टपणेसमोर आली आहे ते म्हणजे "मिडीया" या आयुधाचा वाढता वापर. भविष्यातील युद्धात मिडीयाचा उत्तम वापर हे सामरीक कौशल्याचा भाग म्हणून गणले जाईल हे नि:संशय.!
-('मिसळ'लेला)
17 Aug 2008 - 7:16 pm | सखाराम_गटणे™
जेम्स बाँड चा ऐक ह्याच्या वर आधारीत चित्रपट आहे.
काही तरी, चीन आणि ब्रिटन याचा संघर्ष दाखवला आहे.
सखाराम गटणे
हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
18 Aug 2008 - 12:18 am | चिन्या१९८५
स्टॅलिन हा सोव्हियत युनियनचा राष्ट्राध्यक्ष जॉर्जियन होता.त्या वेळी स्थापन झालेल्या सोव्हियत युनियन मध्ये जॉर्जिया होता. नव्वदीत जेंव्हा युनियन फुटली तेंव्हा रशियाची अनेक शकले पडली त्यापैकी एक जॉर्जिया होते.जॉर्जियामध्ये असलेल्या आसेतिया प्रांताला जॉर्जियात रहायचे नव्हते म्हणुन त्यांनी विरोध केला. उत्तर आसेतिया रशियाचा भाग झाला तर दक्षिण आसेतियाला जॉर्जियात रहायचे नव्हते.त्यावेळी जॉर्जियाने तिथे सैन्य घुसवले.जॉर्जिया जिनोसाईड करत आहे असे रशियाचे म्हणने होते. नंतर १५ वर्षापुर्वी रशियाने दक्षिण आसेतियात शांतीसेना पाठवली.ती शांतीसेना अजुनही तिथे होती.आत्ताच्या वेळी आधी हल्ला कोणी केला हे नक्की सांगता येत नाही पण एकुण दोन्ही बाजु ऐकल्यानंतर मला असे वाटते आहे की जॉर्जियाने आधी हल्ला केला.मग रशिया पण त्या भागात सैन्यानीशी घुसला.
अशी एकुण पार्श्व्हभुमी आहे.प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद्.माझे लेख बर्याचदा फार मोठे असतात असे अनेकांना वाटते म्हणुन मी याबद्दल लिहिले नव्हते
गटणे ,बहुतेक तु 'टुमारो नेव्हर डाईज' बद्दल बोलतोय्.पण तिथे मिडीया युध्द घडवुन आणतो.इथे तसे नाहीये असे .
19 Aug 2008 - 1:25 am | विकास
लेख आवडलाच! (आज वाचला...)
स्टॅलीन हा "गोरी" भागातीलच होता.
दोन दिवसांपूर्वी एनपीआर वर ऐकले त्यात एक अमेरिकन ऍनॅलीस्टच म्हणत होता की असा हल्ला जर मेक्सिकोने आपल्या सरहद्दिवर केला असता तर आपण काय केले असते? तेच रशियाने एक महासत्ता म्हणून केले..
पण ते लांब राहूंदेत - आपण (भारत/भारतीय) असे प्रकार/कुरापती होतात तेंव्हा कसे विचार करतो - आधी व्यक्ती म्हणून मग समाज म्हणून आणि मग त्याचाच परीणाम म्हणून राजकारणी म्हणून या वर बरेच काही विचार करायला लावणारे वाटते.
19 Aug 2008 - 3:16 pm | चिन्या१९८५
धन्यवाद विकास!!!
बघा- http://gandharvablog.blogspot.com/
22 Aug 2008 - 7:40 am | सखाराम_गटणे™
आज चांगला लेख मटामध्ये आलाय
रशिया संपलेला नाही!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3391184.cms
सखाराम गटणे
हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.