एका मिसळीचे बिल भरलेच नाही
दोघांच्याही मनात होतं,
दोघांनाही ते ठाऊक होतं
कुणी खाताना काही बोललेच नाही
एका खाण्याचे बिल भरलेच नाही
खाण्या-पिण्याच्या वेळाही एक
ठरूनच गेल्या बहुतेक
वाट्या तर्रीच्या मिळाल्याच नाही
एका मिसळीचे बिल भरलेच नाही
नजर भिरभिरते, मालकां शोधते
दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी धस्तावते
मालकाच्या नजरेस पडलेच नाही
एका मिसळीचे बिल भरलेच नाही
असेना का भरले पोट तरी
आजन्म ठेवतिल मिसळीस ओठी
पैशांचे कोडे कधी पडलेच नाही
एका मिसळीचे बिल भरलेच नाही
-- ज्ञात (संदीप चित्रे) :)
www.atakmatak.blogspot.com
----------
विडंबनासाठी प्रेरणा : पावसाच्या परीने पोस्टलेली कविता
http://www.misalpav.com/node/2592
प्रतिक्रिया
13 Aug 2008 - 10:21 pm | शितल
हा हा हा..
विडंबन लै भारी :)
14 Aug 2008 - 3:51 pm | योगेश ९८८१
मस्त एक्दम मस्त