ज्ञानियांच्या मेळ्यामध्ये

अंकुश चव्हाण's picture
अंकुश चव्हाण in जनातलं, मनातलं
13 Aug 2008 - 5:24 pm

ज्ञानियांच्या मेळ्यामध्ये
आम्ही अज्ञानी भाबडे.
तुम्हा रुचतील का हो
माझे शब्द हे रांगडे.

तुम्ही शाल मखमली,
आम्ही फाटके घोंगडे.
का हो ज्ञान मेळ्यात या
आम्हा करता नागडे.

जन्म अंधारात गेला,
अमुचे सूर्याशी वाकडे.
जरा समजून घ्यावे
हेची तुम्हासी साकडे.

जरा सरावुद्या हात,
नीट वळू द्यावे शब्द.
मग करू अमुची व्यथा
तुम्हासाठी ओवीबद्ध.

विडंबन

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

13 Aug 2008 - 5:28 pm | अनिल हटेला

अंकुश जी !!

येउ देत !!

सुरुवात छान आहे !!!

अजुनही ओव्या येउ देत !!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

प्राजु's picture

13 Aug 2008 - 5:35 pm | प्राजु

अंकुशभाऊ,
मस्त आहे कविता. बाकीचे शब्द कधी ओवीबद्ध करताय सांगा?
सुंदर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

कुंदन's picture

13 Aug 2008 - 5:46 pm | कुंदन

जरा सरावुद्या हात,
नीट वळू द्यावे शब्द.
मग करू अमुची व्यथा
तुम्हासाठी ओवीबद्ध.

येउ देत अजुन ...

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Aug 2008 - 6:36 pm | बिपिन कार्यकर्ते

येउ देत अजुन...

विसोबा खेचर's picture

14 Aug 2008 - 9:14 am | विसोबा खेचर

क्या बात है, सुंदर कविता...!

तात्या.

सुचेल तसं's picture

14 Aug 2008 - 9:37 am | सुचेल तसं
सहज's picture

14 Aug 2008 - 9:49 am | सहज

अंकुश आवडेश!!

:-)

प्रकाश घाटपांडे's picture

14 Aug 2008 - 9:54 am | प्रकाश घाटपांडे

आवडली कविता! अंकुश
प्रकाश घाटपांडे

यशोधरा's picture

14 Aug 2008 - 10:00 am | यशोधरा

छान लिहिलय, आवडली कविता.

सुमीत भातखंडे's picture

14 Aug 2008 - 10:22 am | सुमीत भातखंडे

सुन्दर ओव्या.
अभिनंदन

पिवळा डांबिस's picture

14 Aug 2008 - 10:30 am | पिवळा डांबिस

जन्म अंधारात गेला,
अमुचे सूर्याशी वाकडे.
जरा समजून घ्यावे
हेची तुम्हासी साकडे.

जरा सरावुद्या हात,
नीट वळू द्यावे शब्द.
मग करू अमुची व्यथा
तुम्हासाठी ओवीबद्ध.

हे विशेष आवडले....
"कालचा पाऊस आमच्या गावात पडलाच नाही...
सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे..."
याची आठवण झाली...
जियो!

बेसनलाडू's picture

14 Aug 2008 - 10:54 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

लिखाळ's picture

26 Aug 2008 - 1:50 am | लिखाळ

कवीता छान आहे. आवडली.
--लिखाळ.

अंकुश चव्हाण's picture

25 Aug 2008 - 7:14 pm | अंकुश चव्हाण

नमस्कार मंड्ळी,

तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल मी तुमचा आभारी आहे.

असाच क्रुपावर्शाव राहु द्या.

आपला क्रुपाभिलाशी,

अंकुश चव्हाण.

केशवराव's picture

26 Aug 2008 - 12:38 am | केशवराव

अतिशय सोप्या शब्दात मनाची व्यथा मांडलीत. व्यथा मनाला भिड्ली. अजुन कविता येउद्या. फारच छान!

चतुरंग's picture

26 Aug 2008 - 12:48 am | चतुरंग

अंकुशराव, असेच काव्य वाहूदेत!

चतुरंग