आपण फक्त बोलतो,
काही तू बोलते,
काही मी बोलतो,
बोलत बोलत कधी हसते
कधी रडते,
मी हि तसाच बोलतो
हसतो ,
पण तुला काय वाटत
या लोकांना ,
आपल्याकडे बघून काय वाटत,
तू म्हणशील सोड न यार ! ह्यांना काय वाटत ,
त्यांना जे वाटत ते वाटत ,
महत्वाच हे आहे कि आपल्याला काय वाटत .
पण मला वाटत आपल्याला समजून घ्यायला पाहिजे
कि यांना काय वाटत कारण
आपल्यालाही कधी कधी आपल्या सारख्यांना पाहूनकहि तरी वाटत
काय हो काका तुम्हलाला काय वाटत
आमच्याकडे बघुन,
मला वाटत
तुम्ही गेला आहात एकमेकांच्या प्रेमात बुडून .
बघितल
तू तर माझी वर प्रेम करत नाही,
तस माझ्याबाबतीतहि काही नाही ,
आपण फक्त बोलतो
जस आई वडिलांशी बोलतो
मित्रांसी बोलतो,
मित्रांच्या मित्रांशी बोलतो.
पण यांना वाटत कि आपण प्रेम करतो ,
आता बघ यांना काय वाटत ,
काय काकू तुम्हाला काय वाटत
आमच्या कडे बघून
तम्ही दोघे बहिण भाऊ आहात वाटत
अस म्हणून काकू गेल्या निघून,
बघितल, तू कधी बांधली नाही मला राखी
मीहि कधी तुझ्यावर 'लक्ष' ठेवलं नाही सखी ,
मी तुझ्यावर प्रेम करत नाही अस नाही …
मी सगळ्यांवर प्रेम करतो ,
पण बघ या नजरांकडे आपल्याला कितीतरी पवित्र
आणि किती तरी वाईट नजरेतून
बघायला कमी करणार नाही.
तू म्हणते तेच खर
सोड यार काय म्हणतात लोक
काढा गाड्या ,स्कूट्या आणि फिरा मनसोक्त. —
प्रतिक्रिया
6 Feb 2015 - 11:38 pm | अर्धवटराव
:)
6 Feb 2015 - 11:52 pm | रुपी
१७ वर्षे , १ दिवस - असं मला वाटतं
6 Feb 2015 - 11:54 pm | विशाखा पाटील
अहो पिनुराव, तुम्हाला शीर्षक न सुचण्याचा प्रॉब्लेम आहे का? यावर काहीतरी इलाज शोधा बरं.
7 Feb 2015 - 9:01 am | अजया
=))
7 Feb 2015 - 12:04 am | गणेशा
छान कविता आहे
7 Feb 2015 - 12:16 am | ज्योति अळवणी
अस खुपस वाटता वाटता कविता सुचली बहुतेक. पण चटणी छान झाली आहे
7 Feb 2015 - 5:04 am | जेपी
चांगलय...
.
.
.
.
.
अस मला वाटत... *wink*
7 Feb 2015 - 11:15 am | सस्नेह
पहिलं इतक्यात बालवर्गात गेलं वाट्टं ? =D
7 Feb 2015 - 11:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
ते १७ व्या वर्षी बालवाडीतं गेलं. हे २२ व्या वर्षीचं दिस्तयं!!! =))
7 Feb 2015 - 11:23 am | स्पा
सगळं चार पाच वर्षापुर्विच सुचुन गेलं वाटतं.
----चार पाच वर्षापूर्वी केलेल्या पाक्रु, भटकंती, कलाकुसर, काथ्याकुट इ.इ. जिलब्यांच्या प्रतीक्षेत ( स्पाराव)
7 Feb 2015 - 11:26 am | स्वामी संकेतानंद
=))
आताशा पडत नाहीत का नीट? कधीपासून होतंय हे? आहेत डॉक्टर आमच्याकडे. आत्मूस, मदत करा ह्यांना. ताज्या जिलब्या पाडायला मदत करा.
7 Feb 2015 - 11:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आपलं अध्यात्मिक मागलंदर्शन मिळालं तर त्यांच्या मानसिक तांब्यातल्या पिठाचा निचरा नीट होईल असं मला वाटतय स्वामीजी.
बाकी ४-५ वर्षांपुर्वी लिहिलेलं भविष्य, मुक्तपीठीयं कविता वगैरे वगैरेचा एकदाचं निचरा करुन टाका की ओ...
9 Feb 2015 - 6:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
ते बहुदा FIFO नियम पाळताहेत ! ;)
9 Feb 2015 - 6:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
नै त्यांचा आजचं कुठेतरी LIFO पण वाचला =))
9 Feb 2015 - 7:20 pm | सूड
FOFI असावं, First Out on Paper, First In on Mipa ;)
9 Feb 2015 - 7:08 pm | पैसा
पाटा वरवंटा, रगडा का मिक्सर?
9 Feb 2015 - 7:12 pm | दिपक.कुवेत
मी प्रतिसाद चार्-पाच वर्षानीच देईन. णिदान तोपर्यत तरी कळेल अशी आशा करतो. बाय.
9 Feb 2015 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्व चार पाच वर्षाचं, दहा वर्षाचं, अरे बस कर भो. वात आलाय. :)
नवं कै होत नै का ?
-दिलीप बिरुटे
9 Feb 2015 - 10:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
प्लानिंग केलयं प्रा.डॉ. =))
9 Feb 2015 - 8:52 pm | खमक्या
शष्प
10 Feb 2015 - 9:07 am | नाखु
तुम्हा जे वाटलं ! ते इथे टाकलं !!
ज्यानी वाचलं ! त्यांचं फुटलं !!
नाही वाचलं ! तेच सुटलं !!
जर पटलं ! तर करा खटलं !!
========
फुटलं = नशीब
सुटलं =मुक्तता
पटलं = आत्मभान
खटलं= कारभारीन *secret*
आप्ल्याच "चार-पाच वर्षांच्या खालकवीता" या जिल्बीसंग्रहातून साभार *YES*
10 Feb 2015 - 10:11 am | प्रमोद देर्देकर
आता आम्हाला काय वाटतं ते आम्ही तुम्हाला सांगुच असे तुम्हाला कसं काय वाटलं आणि वाटता वाटता ... हुश्श वीट आला
अहो पिनुराव तुम्हाला सरळं चार पाच वर्षांपुर्वीचे आत्ता मिपावर द्यावसं का हो वाटतं?
तुम्ही आयुष्यात सगळे निर्णय असेच घेणार काय हो. लग्नाच्या बाबतीत असे करु नका हो.
नाहीतर एखाद्या १ , २ मुल असलेल्या बाईला म्हणाल....
मला तुझ्याशी चार पाच वर्षांपुर्वीच लग्न करावसं वाटलं पण....