चार पाच वर्षांपूर्वी लिहीलेली कविता
लेखनविषय:
काव्यरस
आपण फक्त बोलतो,
काही तू बोलते,
काही मी बोलतो,
बोलत बोलत कधी हसते
कधी रडते,
मी हि तसाच बोलतो
हसतो ,
पण तुला काय वाटत
या लोकांना ,
आपल्याकडे बघून काय वाटत,
तू म्हणशील सोड न यार ! ह्यांना काय वाटत ,
त्यांना जे वाटत ते वाटत ,
महत्वाच हे आहे कि आपल्याला काय वाटत .
पण मला वाटत आपल्याला समजून घ्यायला पाहिजे
कि यांना काय वाटत कारण
आपल्यालाही कधी कधी आपल्या सारख्यांना पाहूनकहि तरी वाटत
काय हो काका तुम्हलाला काय वाटत
आमच्याकडे बघुन,
मला वाटत
तुम्ही गेला आहात एकमेकांच्या प्रेमात बुडून .
बघितल
तू तर माझी वर प्रेम करत नाही,
तस माझ्याबाबतीतहि काही नाही ,
आपण फक्त बोलतो
जस आई वडिलांशी बोलतो
मित्रांसी बोलतो,
मित्रांच्या मित्रांशी बोलतो.
पण यांना वाटत कि आपण प्रेम करतो ,
आता बघ यांना काय वाटत ,
काय काकू तुम्हाला काय वाटत
आमच्या कडे बघून
तम्ही दोघे बहिण भाऊ आहात वाटत
अस म्हणून काकू गेल्या निघून,
बघितल, तू कधी बांधली नाही मला राखी
मीहि कधी तुझ्यावर 'लक्ष' ठेवलं नाही सखी ,
मी तुझ्यावर प्रेम करत नाही अस नाही …
मी सगळ्यांवर प्रेम करतो ,
पण बघ या नजरांकडे आपल्याला कितीतरी पवित्र
आणि किती तरी वाईट नजरेतून
बघायला कमी करणार नाही.
तू म्हणते तेच खर
सोड यार काय म्हणतात लोक
काढा गाड्या ,स्कूट्या आणि फिरा मनसोक्त. —
वाचन
4328
प्रतिक्रिया
22