लँडलाईनच्या काळात राॅंग नंबर म्हणजे एक प्रकारची डोकेदुखी होती. टेलेकम्युनिकेशन आणि मोबाईल क्रांतीमुळे त्यातुन सुटका झाली. पण मार्केटिक काॅलमुळे नवीन डोकेदुखी सुरु झाली पण राॅंग नंबर व मार्केटिक काॅलमुळे करमणूकही होते कशी याचेच काही किस्से मी सांगाणार आहे
किस्सा 1.
सर्वसाधारणपणे आपण ज्याला फोन करतो त्याची खात्री करुन आपल्याला ज्याच्याशी बोलयचे आहे त्याचे नाव सांगतो. फोन वाजला नंबर पाहून अंदाज आला अनओळखी नंबर आहे.
समोरील व्यक्ती ः कोण बोलतय
मी ः आपल्याला कोणाशी बोलयच
समोरील व्यक्ती ः परत कोण बोलतय
मी ः आपल्याला कोणाशी बोलयच
समोरील व्यक्ती ः आवाज वाढवून कोण बोलतय
मी ः आम्ही शिवाजी राजे भोसले बोलतोय, आपण
समोरील व्यक्ती ः तुम्ही शिवाजी राजे भोसले तर मी अफजलखान
मी ः मग शामयानात या तुमचा बदोबस्त करुन ठेवला आहे
मी ः हॅलो, हॅलो फोन कट.....
किस्सा 2.
मी ः मी निलेश ह....बोलतोय. मला तुमचा नंबर आपल्या समाजाच्या कार्यालयातून भेटला. मी माझ स्थळ सुचवत आहे तुम्हीच्या मुलीसाठी.
मुलीचे वडिल ः तुम्ही आमच्या मुलीची प्रत्रिका पाहिली का?
मी ः अच्छा तुमच्या मुलीच लग्न झाले का
मुलीचे वडिल ः नाही हो मी जन्मप्रत्रिकाबददल बोलतोय
मी ः त्याचा लग्नाशी काय संबंध
मुलीचे वडिल ः तुमच्या प्रत्रिका जुळतात का ते तपासुन पाहवे लागेल.
मी ः आता हे कोण तपासतोे कोणी तज्ञ की कोणी सोम्या गोम्या चालतो आणि काय हमी देतो, नाही कारण माझया जन्माच्यावेळी आमच्या ज्योतिष्याने सांगितले होते की मी डाॅक्टर होईन पण मी तर साधा कपाउडरही झालो नाही म्हणून म्हटलं
मी ः हॅलो, हॅलो फोन कट.....
किस्सा 3.
बॅंंक सेल्स ः सर तुमच A/c आमच्या बॅंंकेत आहे आणि तुमचा Track Record चांगला आहे म्हणून बॅंंक तुम्हाला क्रेडिट कार्ड आॅफर करत आहे
मी ः धन्यवाद, मला नकोय
बॅंंक सेल्स ः घ्या ना
मी ः विचार करुन सांगतो
काही दिवसानंतर................
बॅंंक सेल्स ः सर मग काय विचार केला
मी ः खरंच, मला नकोय
बॅंंक सेल्स ः सर घ्याना फुकट आहे.
मी ः खरंच, मग 500 क्रेडिट कार्ड पाठवून दया सर्व आॅफिसमध्ये वाटतो
मी ः हॅलो, हॅलो फोन कट.....
किस्सा 4.
बॅंंक सेल्स ःसर, तुमच होम लोन आमच्या बॅंंकेत आहे आणि तुमचा Track Record चांगला आहे म्हणून बॅंंक तुम्हाला पर्सनल लोन आॅफर करत आहे
मी ः धन्यवाद, मला नकोय
बॅंंक सेल्स ः घ्या ना
मी ः विचार करुन सांगतो
काही दिवसानंतर................
बॅंंक सेल्स ः सर मग काय विचार केला
मी ः खरंच, मला नकोय
बॅंंक सेल्स ः सर घ्याना बॅंंक तुम्हाला special discount rate offer करत आहे
मी ः नंतर फोन करा आता मी मिटींग मध्ये आहे
बॅंंक सेल्स ः कधी फोन करु
मी ः तसा मी नेहमी अलार्म लावून झोपतो पण सकाळी पाच वाजता फोन केलास तर फार बरं होईल मला आॅफिसला जाण्यास नेहमी उशिर होतो
मी ः हॅलो, हॅलो फोन कट.....
किस्सा 5.
बॅंंक सेल्स ः सर तुमच A/c आमच्या बॅंंकेत आहे आणि तुमचा ज्तंबा तमबवतक रेकाॅर्ड चांगला आहे म्हणून बॅंंक तुम्हाला क्रेडिट कार्ड आॅफर करत आहे
मी ः धन्यवाद, मला नकोय
बॅंंक सेल्स ः घ्या ना. तुम्हाला शाॅपिंगए पेट्ोल वर रिबेट मिळेल
मी ः माझयाकडे ना कार आहे आणि ना बाईक आहे आणि पेट्ोल आपल्या पोटात गेल्यावर आपण डिरेक्ट विमान बसतो.
मी ः हॅलो, हॅलो फोन कट.....
किस्सा 6.
काॅल सेंटर एक्सक्यूटिव ः सर, मी .... संस्थेतून बोलतेय, तुमच्या साठी आमच्याकडे एमबीए कोर्स आहे
मी ः स्वगत, अहो आमच्या इंग्रजीची बोंब आहे मी भलेही तुमचा एमबीए कोर्स पोपटपंची करुन पास होईन पण मॅनेजर च्या खुर्चीत बसल्यावर इंग्रजी तर त्या लेवलच बोलता आले पाहिजे ना.
मी ःअहो माझी फिल्ड वेगळी आहे, मी सोफटवेअर मध्ये आहे
काॅल सेंटर एक्सक्यूटिव ः ठिक आहे त्याचासाठीही आमच्याकडे कोर्स आहे
मी ः तुम्ही मला त्याचे detail mail करा
काही दिवसानंतर................
काॅल सेंटर एक्सक्यूटिव ः सर मग काय विचार केला
मी ः मला एक कोर्स करायचा आहे, त्याच duration & fee काय असेल
कोणता कोर्स सर
मी ः intercourse
मी ः हॅलो, हॅलो फोन कट.....
किस्सा 7.
काॅल सेंटर एक्सक्यूटिवः सर, मी .... टुर अन्ड ट्रावेल कंपनी तून बोलतोय
मी ः बर
काॅल सेंटर एक्सक्यूटिव ः आमच्याकडे तुमच्यासाठी टुर पॅकेज
मी ः मी सारी दुनिया फिरुन आलो आहे आता फक्त स्वर्ग आणि नरक पाहयाचा बाकी आहे, तुम्ही कोठे पाठविणार मला.
मी ः हॅलो, हॅलो फोन कट.....
किस्सा 8.
बिहारी स्त्री चा फोन आला.
बि. स्त्री ः कोण बोलतय
मी ः आपल्याला कोणाशी बोलयच
बि. स्त्री ः परत कोण बोलतय
मी ः आपल्याला कोणाशी बोलयच
बि. स्त्री ः परत कोण बोलतय
मी ः मी अमिताभ बच्चन बोलतोय
बि. स्त्री ः पप्पु के पप्पा, चाचा, चाची, अमिताभ बच्चन है फोनावा पर
मी ः आता मात्र फोन कट करण्याची पाळी माझी होती.
टिपः यातील काही प्रसंग काल्पनिक आहेत.तुमचेही मजेशीर किस्से येउ दया.
प्रतिक्रिया
6 Feb 2015 - 3:07 pm | विजुभाऊ
लँडलाईन फोन जोरात होते तेंव्हा क्रेडीट कार्डे / लोन यासाठी ब्यांका कधीच फोन करायच्या नाहीत.
6 Feb 2015 - 3:26 pm | अदि
मी पाचवी सहावी मधे असेन.. असाच एक फोन आला. " हेलो हेलो,मी जेठालाल नागडा बोलतेय.. मनोहरशेट आहे काय घरामंदी??" मी बाबांना सांगितले, "बाबा कोणत्या तरी नागड्याला तुमच्याशी बोलायचय.." फोन बाबांकडे देइपर्यंत माझ्या हसण्याच्या आवाजाने त्या माणसाने फोन कट केला, तो अजुनपर्यंत केला नाही.. =)))))) =)))))) =))))))
8 Feb 2015 - 1:30 pm | NiluMP
हा हा हा
6 Feb 2015 - 3:58 pm | कैलासवासी सोन्याबापु
एक ऐकीव , वेळ रात्री अडीच पावणे तीन
१ :- तुमचे कुत्रे आमच्या आंगणात घाण करते आहे
२ :- अहो पण माझ्याकडे कुठे कुत्रे आहे?
१ :- असो! माझ्याकडेच कुठे अंगण आहे!!!
फोन कट!
6 Feb 2015 - 4:02 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
हेच म्हणणार होते.तसे लॅन्ड लाईन फोन जोरात वगैरे कधी नव्हते.२/४ वर्षे चांगली वाट बघायला लागायची.ट्रकॉल प्रकार असल्याने एका शहरातले फोन कामाशिवाय दुसर्या शहरात जात नसत.
6 Feb 2015 - 4:21 pm | जयन्त बा शिम्पि
एका डॉक्टरांना रात्री दोन वाजता फोन येतो,
तो:- हलो , डॉक्टर आहेत का ?
डॉक्टर-- हं, बोला , मी डॉक्टरच बोलतोय , काय पाहीजे ?
तो:- डॉक्टर , मला ना झोपच येत नाही हो , काहीतरी करा ना ! !
डॉक्टर- एक काम करा, रिसिव्हर कानाला जरा जवळ धरा, मी अंगाई गीत म्हणतो मग तुम्हाला झोप येईल ! !
6 Feb 2015 - 6:37 pm | जयंत कुलकर्णी
अरेरे........ :-(
6 Feb 2015 - 8:31 pm | ईन्टरफेल
आमच्या काळातील गोष्ट , आंम्हि लहान होतो अंगनात खेळत होतो . गावचे पाटलांची आई बाहेर ओसरीत बसलेली घरात फोन वाजला आंम्हि आजिला बोललो आजि फोन आला. आजी तेथेच बसुन म्हंनते बाबा रे नंतर ये घरात कुनिहि नाही ...........
8 Feb 2015 - 11:26 am | mayurpankhie
मस्त हो ...आजी रॉक्स !
8 Feb 2015 - 1:31 pm | NiluMP
+१
8 Feb 2015 - 11:23 am | mayurpankhie
सगळे किस्से मस्त ... ६ वा किस्सा खरा कि काल्पनिक *ROFL*
8 Feb 2015 - 1:32 pm | NiluMP
काल्पनिक;-)
8 Feb 2015 - 7:14 pm | पैसा
भारी किस्से!
8 Feb 2015 - 8:47 pm | ईन्टरफेल
आज हि डोळ्या समोर येतोय तो किस्सा ........