डेथ ऐप्लिकेशन

म्हया बिलंदर's picture
म्हया बिलंदर in जनातलं, मनातलं
1 Feb 2015 - 10:21 pm

सर - ह्यालो
मी - हं सर बोलाना ?
सर - आरं आईक की. .
मी - हं
सर - त्यो आपला ह्यो हाय का.. गणू ?
मी - म्हणजे डॉ. गणेश ना? त्याचं काय?
सर - हा त्योच, त्याचा बा म्येलाय तर त्यो गेलाय सुट्टीवर
मी - अरेरे. . वाईट झालं.
सर - तर त्याला लिहायचय डेथ ऐप्लिकेशन.
मी - सर, लीव ऐप्लिकेशन
सर - त्येच, मी सुरुवात करून दिलीये फुडच्या दोन ओळी जरा सांगचिल का ?
मी - हो सर, काय लिहिलंत?
सर - Dear Sir, आता सांग.
मी - Dear Sir, I am sorry to inform…
सर - Sorry? Sorry कशाला? बा मेलाय ही काय चूक हाय का?
मी - सर इथे Sorry म्हणजे 'खेद' या अर्थाने आहे.
सर - मग खेद ला अजून दुसरं काय हाय का?
मी - बरं मग Dear Sir, I regret to inform you about..
सर - हां (MS Word मध्ये समानार्थी शब्द शोधीत)regret कसं मोठ्ठ वाटतंय, बरं फुडं?
मी - Dear Sir, I regret to inform you about the sad demise of my father…
सर - काय डीमाईस??(पुन्न्हा MS Word) कसलं स्याड? पार नातुंड-पर्तुंड बघून म्येलाय म्हतारा,
बरं फुडं hence grant me leave of ten days आसं लितो, पार सातवं करूनंच ये म्हणतो ब्येन्याला.
ल्येका बा मारायचा ह्यांनी आणि डेथ ऐप्लिकेशन लिहायचं आम्मी?
मी - सर, लीव ऐप्लिकेशन.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Feb 2015 - 2:23 am | डॉ सुहास म्हात्रे

झ्याक !

कोंची कंपनी म्हनावी तुम्ची ? :)

सस्नेह's picture

2 Feb 2015 - 3:31 am | सस्नेह

मिसळपाववर स्वागत !
आणिक जरा पैस लेखन युंदे

श्रीरंग_जोशी's picture

2 Feb 2015 - 4:37 am | श्रीरंग_जोशी

मिपावर स्वागत.

म्हया बिलंदर's picture

2 Feb 2015 - 9:36 am | म्हया बिलंदर

धन्यवाद

सविता००१'s picture

2 Feb 2015 - 11:26 am | सविता००१

भारी

असंका's picture

2 Feb 2015 - 12:13 pm | असंका

खल्लास!! मजा आली....

लालगरूड's picture

2 Feb 2015 - 11:40 pm | लालगरूड

छान

आतिवास's picture

2 Feb 2015 - 11:50 pm | आतिवास

आवडलं!