आज मी माझ्या आयुष्यात आलेल्या वादळाची कहाणी येथे मांडणार आहे. 2010 साली मला मासिकपाळीचा त्रास होत होता,आमच्या फैमिली डॉ ना कन्सल्ट करुन त्यांनी मला माझ्या आग्रहा (Insist) मुळे महिला स्त्री रोग विशेषज्ञ चे नाव रेफर केले त्या मॅडम ने काही टेस्ट करुन मला 3-4 महीने ट्रिटमेंट दिली व दर महिन्याला मासिक पाळी च्या 3-4थ्या दिवशी भेटायला बोलवत असे. औषधोपचार काही लागू पडत नाही हे पाहून मॅडम ने सोनोग्राफी व काही चाचण्या केल्यावर त्या म्हणाल्या कि गर्भ पिशवी काढायला हवी नाहितर कैंसर् होइल.मला हा धक्का च होता,जेमतेम 35 क्रॉस केलेय आत्ताच, हे कसे शक्य आहे?माझा मुलगा 5 वित् व लेक 10वि ला. तिच्या पेपर ला रजा हवी म्हणुन मी रजेचे प्लॅनही केले होते.
मी डॉ ना म्हटले कि 4-5 महिन्यांनी ऑपरेशन करु. लेकीचे अभ्यासा चे दिवस आहेत.तर त्या म्हणाल्या उशिर झाला तर कैंसर होइल मग काय करशील.
हल्ली सोपी व सुलभ surgery करता येते hysterectomy म्हणजे दुर्बिणीने झटपट शस्रक्रिया होतात.थोड़ी खर्चिक आहे पण 4/5 दिवसात नॉर्मल होउन office ला ही जाऊ शकते. So मी डॉ च्या नर्सिंग होम मधे एडमिट झाले व् next day लोडशेडिंग चा त्रास नको म्हणून त्यांनी पहाटेची ऑपरेशनची वेळ ठरवली मला anastheshiast ने भूल देताना काही बाहि विचारले व् नन्तर चे मला 6/7 तासाने शुद्धित आल्या वर माझ्या नवरया ने सांगितले कि ऑपरेशन टेबल वरच माझे ब्लड प्रेशर वाढले व् मला oxygen वर् ठेवावे लागले व् आश्चर्य म्हणजे ह्या dr ने बाहेरून दुसरे dr बोलावले. माझ्या dr ना हि surgery येत नाहीं व त्याचे laparoscopic instruments ही त्यांच्याकड़े नाहीत. सगळे काही कुणा एका बाहेरच्या डॉ ने manage केले. मी अजिबात हा विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हते जशी शुद्धित आले तसे मळमळ, चक्कर व uneasy वाटायला लागले dr म्हणाल्या तुला हॉस्पिटल च्या वातावरणा चा त्रास होत असेल . 4 दिवसांनी मी डिस्चार्ज घेउन घरी आल्यावर मला खुप् ढेकर व् उचक्या लागल्या .पोट दुखी ,उलटी असे सगळे त्रास सुरू झाले. परत त्यांच्या कडे गेलेे .त्या म्हणाल्या urine ,blood test करा .
हे असे टेस्ट करणे सतत सुरु होते व् urine infection असेल म्हणुन वेग वेगळ्या डॉ कड़े त्या मला पाठवत राहील्या.
gen physician, gen surgeon, urologist, gastroentrologist असे सगळ्या डॉ ना दाखवत राहिले
urologist ने सांगितले urine tube choke व् crack झाली त्यात stents टाकावे लागतील मग 2 divas त्यांच्या हॉस्पिटल मधे admit झाले तेव्हा माझ्या डॉ व् दूसरे म्हणजे ज्यानी hysterectomy केली ते दोघेही uroligist च्या हॉस्पिटल मधे हजर होते.तेथे दोन्ही ureters मध्ये stents टाकून मला under observtion म्हणून परत मैडम च्या nursing home मधे shift केले.2 दिवस तिथे एडमिट राहिले.पुढें 4 महीने मला प्रचंड पोटदुखी सतत सुरू राहिली. Urologist चे म्हणणे foreign part, body मधे adjust होताना त्रास होतो so सहन करा व् pain killer घ्या व् एकदा jaslok ला senior urologist ला दाखवा असे सुचवले.
दरम्यान माझ्या लेकीचे paper सुरू झाले व् मी त्या पुर्ण दिवसात high painkiller वर् राहिले कारण तिचे महत्वाचे वर्ष होते आणि थोडयाच दिवसांचा प्रश्न होता .तिच्या शेवट च्या पेपर च्या दिवशी मी तिला परीक्षा सेंटर वरुन सरळ jaslok ला घेउन गेले तिथल्या यूरोलॉजिस्ट नी sonography व् काही tests सांगीतल्या त्यां 2 दिवसांत केल्या तेव्हा ते म्हणाले बहुदा दोन्ही kidneys खराब झाल्या आहेत open surgery करावी लागेल मगच कळेल की एक की both the kidneys are damaged.
मी व् माझा नवरा हादरलो आता पर्यंत 2 surgery न औषध व एवढे डॉ व् इतक्या tests... ह्या सगळ्यात खूपच खर्च झाला म्हणून सरळच विचारले कि हया surgery ची खात्री असेल का? ते म्हणाले no guarantee आणि ख़र्च minimum rs.5 /7 lakh depending on the which stage it is .
दोघेही सुन्न झालो .घरी आलो तेव्हा काहीच सुचत नव्हतं nursing home मधे डॉ मॅडम ना भेटलो त्या म्हंटल्या काय करायचे ते ठरवा मी urologist शी बोलते पण तो काही discount देणार नाही. लीलावती,हिंदुजा कुठेही खर्च होणारच.आत्ता पर्यंत चा ख़र्च व् आजार बघता आम्हाला मुलांच्या भवितव्याची सोय पाहुन जाणीवपूर्वक निर्णय घेणे जरूरी होते. त्या रात्री झोपले म्हणजे डोळे मिटुन पडले झोप होती कुठे? सकाळी मला जाग आल्यावर डोळे च उघडेना. आरशा समोर उभी राहिले तर लक्षात आले कि पूर्ण शरीर सुजले आहे . मी घाबरले dr मॅडम कड़े धाव घेतली त्यानी urologist ला फ़ोन केला तर ते सेमिनार ला गेले म्हणून 2 दिवस भेटणार नव्हते .
मी घरी आले व् खूप रडले 2 दिवस आतून पुर्ण पणे फट्टू झाले होते पण मुलाना व् नवरयाला अजुन tension नको म्हणून आव आणून normal रहाण्याचा प्रयत्न करत होते .
2 दिवसांनी urologist भेटले मला पाहून उडालेच . "go to some big institute now " असे म्हणाले मला वाटले stents काढून टाकावे का? पण urologist म्हणाले "it may be a crime now" त्यांनी ही आपले कर्त्तव्य म्हणून मला saifee hospital चा reference दिला.जे काही बील होईल त्यावर 5000/ कमी होतील असे ही सांगितले.
मग आम्ही घरी आलो न माझ्या डॉ मैडम ना कळवले .त्याना आमचा " sion hospital" ला जायचे ठरवल्याचे चे सांगितले .
दुसऱ्या दिवशी सकाळी च् डॉ मैडम ने त्यांची कार व् ड्राईवर पाठवले सायन ला जायला.
मुलांचि 5/6 दिवसात परत येते अशी समजुत घातली .धाकटया मुलाची परीक्षा सुरू झाली होती.घरातून बाहेर पड़ताना उद्विग्न मनःस्थी तीत होतो-
sion hospital ला पोहोचलो. Urology चे head डॉ ने तपासले व् तातडीने admit व्हायला सांगितले. माझ्या नवर्याला एडमिट करायला बरेच सोपस्कार करावे लागले.महिला वार्ड मधे भर्ती झाले.नवरा चटई टाकून वार्ड च्या बाहेर passage मधे झोपला. पुढे त्याने 2 महीने असेच काढले.
2 र्या दिवशी सकाळी च् surgery केली (PCN) . dr ने किडनी मधे पाठीतुन 2 ट्यूब घातल्या.ट्यूब चे एक टोक किडनी त तर दूसरे टोक पाठितुंन बाहेर काढून त्याला urine bag लावली व .urine bypass केली .8 दिवस urine चे reading घेतले .मग तिथुन TATA hospital ला rhenal function test करायला पाठवले. माझ्या किडण्या वाचल्या ...
आता पुढे मोठी surgery करायची ठरली .डॉ ने नवर्याला बोलावून सांगितले कि open surgery करणार तेव्हा च आतील प्रॉब्लेम कळतील.
सकाळी operation ला सुरुवात झाली तेव्हा एक injection ने भुल दिली ........
9 तास ऑपरेशन चालले.दोन्ही ureters damage (strictures)झाले होते ते कापून टाकले व माझ्या आतड़याचा 20 cm part कापून तिथे लावला....(ILEAL REPLACEMENT SURGERY) पोटात urine leak होउन सगळे आतडे चिकटले होते त्यामुळे त्याना Mobilise करायला पोटात खुप gases सोडावे लागले त्यामुळे व इतक्या वेळ पोट उघडे रहिल्याने ते बंद करता येईना म्हणून कच्चे टाके घालुन फक्त वरची कातडी शिवली व मला ventilator वर हलवले. नवरा देवाचा धावा करत होता डॉ नी त्याला explain केले "critical case आहे खुप गुंन्ता गुंत होती. पुढिल 5-6 दिवस ventilator वर ठेवू ,वाचली तर पुढची ट्रीटमेंट करू".
सुदैवाने दुसऱ्या च दिवशी मी शुद्धि वर आले.मग पुढील 8 दिवसांनी परत 4 तास लागले पक्के टाके घालायला.ह्या 2 महिन्यातले
8 दिवस सोडल्यास माझ्या संपूर्ण शरीरात तब्बल 14 नळया होत्या .
मी सुखरूप आहे पण कायम दर 2 ते 2 1/2 तासांनी यूरिन पास करणे गरजेचे आहे .दर 4 महिन्यानी sonography, urine व् blood test करुन sion hospital ला follow up ला जावे लगते.हे मी "हयात"असे पर्यन्त सुरु राहणार. ह्या सर्व दरम्यान मुले ,घर ,नवरा त्यांची नौकरी सगळ्याचीच हेळसांड झाली.
प्रतिक्रिया
1 Feb 2015 - 2:40 pm | दिपक.कुवेत
फारच भयानक अनुभव आणि जिवघेणा देखील! देव तुम्हाला शारीरीक तसेच मानसीक बळ देवो हिच सदिच्छा.
1 Feb 2015 - 2:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या धैर्याला दाद देतो, देव आपणास ठणठणीत बरे करो आमच्या शुभेच्छा पाठीशी आहेत.
-दिलीप बिरुटे
1 Feb 2015 - 5:37 pm | रेवती
आईगं! काय हे!
देव करो नि तुम्हाला संपूर्ण बरे वाटो.
1 Feb 2015 - 6:32 pm | अजया
केवढं सोसलंत हो.
पहिल्या आॅपरेशनच्या वेळी युरिटर्स डॅमेज झाल्या का हे वेगळेच काॅम्प्लिकेशन आहे सांगीतले? बर्याचदा सि सेक्शन डिलिवरीनंतर गर्भाशयाचे आॅपरेशन झाल्यास हे प्राॅब्लेम येतात असे ऐकुन आहे.
1 Feb 2015 - 6:56 pm | स्वप्नांची राणी
आईग!..मिश्रेया किती किती आणि कसं कसं सहन केलस ग!
खंबीर रहा, धीर सोडू नकोस ग.
1 Feb 2015 - 7:21 pm | मनिमौ
वाचून.पण तुम्ही फारच धी धीराने सामोरे गेला
1 Feb 2015 - 7:37 pm | सुचेता
ह्या सगळ्यात हे स्पष्ट करा न हलगर्जी कुठल्या स्टेपला झाली नक्की, सध्या साधारण याच प्रकारचा त्रास सुरु झालाय आणि हे वाचुन गोंधळात पड्लेय. ट्रीटमेंट सुरु करायलाच भिती वाटतेय .
1 Feb 2015 - 11:24 pm | संदीप डांगे
किमान चार वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवा. एकालाही दुसऱ्याकडे गेलो होतो किंवा जाणार आहे हे अजिबात म्हणजे अजिबात सांगू नका. सगळ्या टेस्ट परत दहावेळा करायला लागल्या तरी चालतील. चुकूनही "अमुक या डॉक्टरांनी पण अश्याच टेस्ट सांगितल्या, आताच केल्या, हे त्याचे रिपोर्ट्स" हे शब्द तोंडातून बाहेर पडू नये. दहा टेस्ट्स मध्ये गेलेला पैसा आणि वेळ परवडेल पण वर ह्या ताईंनी जे सोसले आणि भोगले ते तरी वाट्याला येणार नाही. पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे इथे खेदाने म्हणावे लागते.
चार ठिकाणी चार वेगवेगळे निदान बघून तुम्ही चकित व्हाल पण ह्या तथाकथित शास्त्र म्हणवल्या जाणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात भयंकर भोंदुबाजी सुरु आहे. एकतर अशा डॉक्टरला खरच काही कळत नाही, कळत असेल तर रुग्ण हाताबाहेर जाईस्तोवर रक्त शोषणार.
देव म्हणाव्या अश्या काही पुण्यवंत डॉक्टर्सच्या पुण्याईवर बाकीचे फक्त प्रमाणपत्र आणि नोंदणीक्रमांक असलेले भोंदू रुग्णांना फसवत आहेत. त्यांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी उपचाराआधीच योग्य ती चौकशी करणे हाच उपाय उत्तम आहे. साधी भाजी घ्यायची असेल तर आपण चार ठिकाणी चौकशी करून दर्जा आणि किंमत बघून घेतो.
डॉक्टर असलेल्या मिपाकरांना माझा प्रतिसाद बोचरा वाटेल पण भयंकर व प्रत्यक्ष अनुभव पाठीशी आहेत म्हणून चीड येते. माझ्या मावशीला व तिच्या नणदेला (दोघींचे वय ४० दरम्यान) फायब्रोईड गाठींसाठी गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. पण दुसऱ्या ठिकाणी मत घेतल्यावर नुसत्या गोळ्यांनी समस्या संपली.
गर्भाशय काढून टाकणे हा अत्यंत मुर्ख सल्ला डॉक्टर्स जेंव्हा देतात तेव्हा आपण त्यांच्या अधिकाराला आव्हान देऊ शकत नाही. पण म्हणजे त्यांचा होरा बरोबरच असेल असेही नाही आणि हे स्वतः प्रत्येक डॉक्टर मान्य करतो.
थोडेफार ज्योतिषवाल्यासारखेच आहे. ज्योतिषाचे निदान जीवावर बेतत नाही पण डॉक्टरचे बेतू शकते. पण अशा डॉक्टर विरोधात तेवढे जोरदार आंदोलन होत नाहीत.
मी कुठल्याही पद्धतीने सरसकट सगळे डॉक्टर असेच असतात असे कधीच म्हणत नाही. अश्या भोंदू डॉक्टरांपासून शेवटी चांगल्या डॉक्टरांनीच वाचवले आहे त्यामुळे त्यांचा ऋणी आहेच.
1 Feb 2015 - 11:51 pm | रेवती
अगदी अगदी. उत्तम डॉक्टरांपासून ते फसवणार्यांपर्यंत अनेक असतात, जसे इतर क्षेत्रात असतात. मागे एकदा आलेल्या मॅस्टेक्टमी च्या धाग्यावर माझ्या सासूबाईंचा अनुभव (अवांतर म्हणून) लिहिला आहे. कारण नसताना वयाच्या तिशीत गर्भाषयाच्या झालेल्या शल्यकर्माने त्यांचे बरेच नुकसान झाले. अगदी नेहमी न चुकता या विषयाच्या आसपासचे बोलणे निघाले की त्या वाईट वाटलेले सांगतात. विनाकारण आपल्या शरिराचे नुकसान झालेले सहजी विसरता येत नाही. कृपया चांगल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने काय ते करावे.
2 Feb 2015 - 11:08 am | सस्नेह
संदीप डांगे यांच्याशीही सहमत.
एक निरिक्षण : हल्ली डॉक्टर लोक्स डायग्नोसिस किंवा रोगनिदान याबाबत क़्वचितच जागरूक दिसतात. बहुश: भारंभार टेस्ट्स (ज्यांची खरोखर गरज असते का हे एक ते आणि दुसरा परमेश्वरच जाणोत) करायला लावतात आणि त्यानंतरही अचूक निदान झालेले दिसत नाही कारण औषधे दिली जातात ती अनुमानानेच. मेडिसिनवाले डॉक्टर तर रोगनिदान काय आहे याबद्दल सांगायची तसदी न देता थेट औषधे लिहून देतात. अनुभव असा की पेशंट सांगू पहात असलेली रोगलक्षणे बरेच डॉक्टर्स ऐकूनही घेत नाहीत व तपासण्यांच्या रिपोर्टवर सगळी मदार.
कित्येकदा स्त्रियांना गर्भाशयाचा किरकोळ त्रास असताना गरज नसताना गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो. आणि कहर म्हणजे रुग्ण स्त्रिया देखील बऱ्याचदा 'जाउदे कटकट' असे म्हणून आनंदाने गर्भाशय काढून घेतात !
धागाकर्तीला आयुरारोग्य लाभो !
13 Feb 2015 - 6:36 pm | बाप्पू
संदीप डांगे यांच्याशी पूर्ण सहमत.
देव आपणास लवकर बरे करो. आमच्या शुभेच्छा पाठीशी आहेत
30 Jan 2016 - 2:47 pm | पूर्वाविवेक
आम्हालाही याचा अनुभव आलाय. सासूबाईंचे शुल्लक कारणावरून गर्भाशय काढून टाकले. (मी खरतर त्यावेळी त्यांना सेकंड ओपिनियन घेवू या व के.ई.एम. मध्ये माझी मावशी आहे, तिथे जावू या. अस सुचवलं होत. पण इतर खूप हुशार मंडळी त्यांच्या खूपच काळजीत असल्याने त्या जणू काही हट्टालाच पेटल्या होत्या. असो.) त्या ऑपरेशन नंतर अनेक दुखणी चालू झाली. हर्नियाचे ऑपरेशन सुद्धा करून घ्यावे लागले.
मिश्रेया, धीर सोडू नका. काळजी घ्या.
4 Feb 2015 - 5:58 am | स्पंदना
सुचेता, मलापण वयाच्या ३५शीत असा त्रास झाला होता. पण सिंगापुरात एकाही डॉक्टरने मला ऑपरेशनचा पर्याय सुचवला नाही.
अगदी स्पष्ट शब्दात सांगू का? हल्ली अशी ऑपरेशन्स काही काही डॉक्टर नुसती वरकमाई म्हणुन करताहेत. माझ्या आईंना वयाच्या ६०व्या वर्षी म्हणे तुम्हाला कॅन्सर होउ शकतो. आता मेनापॉज नंतर गर्भाशयाच्या पेशी थोड्या जाड होतात अस आमच्या फॅमीली डॉक्टरच म्हणनं, तर हा गायनॅक ऑपरेशन ठरवुन मोकळा. म्हणे पैसे भरा. आई नाही म्हणाल्या, गेल्याच नाहीत. आणि मग दुसरीकडे टेस्ट केली नथींग.
मीश्रेया चा लेख वाचून खरतर अतिशय त्रास झाला त्यामुळे प्रतिसाद द्यायचा टाळत होते. कोणाला अतिशयोक्ती वाटेल, अन काही डॉक्टर्स ना वाईट सुद्धा वाटेल, पण बरेच डॉक्टर संगमनत करुन पेशंटना सरळ सरळ लुटतात.
मीश्रेयांच्या बाबतीत त्यांच्या डॉक्टरने स्वतःकडे उपलब्ध नसलेलं ऑपरेशन दुसर्या डॉक्टरला मशेन्सह बोलवुन केलय ही सरळ सरळ धंदेवाईक वृत्ती आहे. बर त्या दुसर्या डॉक्टरचा अनुभव क्रेडीबीलीटी हे सगळ एक गुपित आहे. मे बी हात साफ करायला गीनीपिग वापरला गेला :(
मला जेंव्हा असा काही गर्भाशयाशी संबधीत त्रास झाला तेंव्हा पहिला गोळ्या अन मग मायरीना ही आय्युडी असा इलाज केला गेला. माझा त्रास गेला. त्यातच दुसर्या वेळेला पॉलीप निघालं, ते ही सोप्प्या पद्धतिने काढल गेलं.
सुचेता संदिप डांगेच म्हणन ऐक. आणि बहुतेल सरकारी हॉस्पिटल मध्ये टेस्टस करुन घे, जेथे त्यांना स्वतःला काही फायदा नसतो असे रिपोर्ट देउन.
1 Feb 2015 - 9:31 pm | निवेदिता-ताई
देव करो नि तुम्हाला संपूर्ण बरे वाटो.
1 Feb 2015 - 9:36 pm | टवाळ कार्टा
प्रचंड सहमत...मिपावर काही अनमोल, अचाट, आचरट, टवाळ धागे आहेत....धमाल आहे नुस्ती....वाचत बसा...आनंदी रहा :)
1 Feb 2015 - 10:15 pm | सानिकास्वप्निल
तुम्ही सगळे धीराने घेतलत, तुम्हाला लवकर बरे वाटो.
विश यु अ स्पीडी रिकव्हरी.
2 Feb 2015 - 9:51 am | पद्मश्री चित्रे
सहमत. धीर सोडू नका.
1 Feb 2015 - 10:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
वाचुन खुप वाईट वाटलं......विशींग यु अ हेस्टी अॅंड हेल्दी रीकव्हरी...!!! धीरानी घ्या...
2 Feb 2015 - 12:05 am | मुक्त विहारि
सहमत
1 Feb 2015 - 10:53 pm | खटपट्या
बाप्रे, तुम्ही संपूर्ण बर्या व्हाल...
1 Feb 2015 - 10:54 pm | बोका-ए-आझम
तुमच्या शारीरिक आणि मानसिक वेदना नुसत्या वाचताना त्रास झाला. पण आपण त्या प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत. यापुढचे आयुष्य निरोगी जावो ह्याच शुभेच्छा!
2 Feb 2015 - 5:52 pm | आंबट चिंच
+१ हेच म्हण्तो कसे सहन केलंत तुम्ही? धैर्यवान आहात. पुढिल आरोग्यास शुभेच्छा!
1 Feb 2015 - 11:21 pm | संचित
तुमची हिम्मत खरोखरच दाद देण्यालायक आहे. नियमित जमेल तसा व्यायाम करा आणि पूर्णपणे ठीक होण्याची आशा सोडू नका. चमत्कार होतात.
2 Feb 2015 - 12:56 am | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या बाबतित अत्यंत दुर्दैवी प्रकार झाला आहे यात काहीच शंका नाही.
सर्वप्रथम, तुमच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होवो आणि तुमच्या यापुढच्या आरोग्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !
वैद्यकिय व्यवसायात सद्याची जी अवस्था आहे ही संदीप डांगे यांनी वर अत्यंत स्पष्ट शब्दांत व्यक्त केली आहे. त्यांत थोडासा फरक/भर करून मी असे म्हणेन की...
योग्य रितीने अनेक शिक्षित आणि कुशल डॉक्टर्स उत्तम सेवा देत आहेत. पण त्याबरोबरच इतर अनेक जण खर्या / खोट्या प्रमाणपत्रांसह रुग्णांना फसवताना आढळत आहेत. दुर्दैवाने सद्याची वैद्यकनियत्रंतक व्यवस्था आणि एकंदर न्यायव्यवस्था पाहता त्यांच्या विरुद्ध लढा देणे हे सर्वसामान्य रुग्णाच्या आवाक्यातली गोष्ट नाही. त्यामुळे, उपचाराआधीच योग्य ती चौकशी करणे हाच उत्तम व्यावहारीक उपाय आहे. साधी भाजी घ्यायची असेल तर आपण चार ठिकाणी चौकशी करून दर्जा आणि किंमत बघून घेतोच ना ?
"मोठ्या आ़जाराचे निदान / मोठ्या महागड्या तपासण्या / मोठ्या उपचाराचा सल्ला" यांच्या संदर्भात मी माझ्या नातेवाईकांना खालील सल्ला देतो :
१. त्या विषयातल्या दुसर्या तज्ञाचा त्वरीत सल्ला ह्या, याला सेकंड ओपिनियन म्हणतात, आणि हा रुग्णाचा हक्क आहे. त्यामुळे तुमच्या फॅमिली डॉक्टरवर / पहिल्या तज्ञावर अविश्वास दाखवला असे होत नाही. किंबहुना, असे दुसरे मत पहिल्या तज्ञाशी संबंध नसलेल्या तज्ञाकडून आणि पहिल्या तज्ञाच्या माहितीशिवाय घ्यावे असे माझे मत आहे... तरच ते विश्वासूपणे निष्पक्ष असेल.
२. वरच्या प्रमाणे घेतलेले मोठ्या शासकीय रुग्णालयातल्या (विशेषतः वैद्यकीय विद्यालयाशी संबधीत) जाणकार तज्ञाचे मत हे जास्त शास्त्रिय असण्याची सर्वात जास्त शक्यता असते. कारण तेथे गर्दी आणि काहिशी असुविधा असली तरी त्या प्रकारात व्यावसाईक व आर्थिक अनुग्रह (प्रोफेशनल अँड फिनानशियल ऑब्लिगेशन्स) असण्याची शक्यता (असलीच तर) सर्वात कमी असते.
३. निदान किंवा उपचार करणारा डॉक्टर योग्य विषयातला सर्टीफाईड तज्ञ आहे की नाही हे नक्कीच तपासून पहावे. यासाठी केवळ कोणाच्या तोंडी माहितीवर विश्वास ठेऊ नये... लाखोंची गुंतवणूक करताना आपण जितकी चौकशी करतो आणि काळजी घेतो त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त चौकशी/काळजी करावी, कारण शेवटी हा केवळ लाखोंचाच प्रश्न नसून तुमच्या जीवन-मरणाचा निर्णय/निवड असते आणि त्याचे तुमच्या भविष्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशी खात्री करून घेणे हा रुग्णाचा हक्क आणि कर्तव्य आहे.
४. एकदा तुमच्या आजाराचा/चे तज्ञ, चाचण्या आणि उपचार नक्की झाले की मगच रुग्णालयातल्या इतर सुखसोईंचा विचार करावा. उपचार घेताना शक्यतो तुमच्या निवडीच्या तज्ञाच्या नेहमीच्या प्रॅक्टीसचे आणि तुमच्या खिशाला परवडणारे रुग्णालय निवडावे. पंचतारांकीत सोई आणि उत्तम शास्त्रिय उपचार यांचा तडक संबंध असेलच असे नाही.
वरील विचार जसा दुखण्याच्या सुरुवातीला करायचा असतो, तसाच तो दुखण्यातल्या दर मोठ्या घटनेसाठी करायचा असतो.
2 Feb 2015 - 3:34 am | संदीप डांगे
सर्वात महत्वाचे : कधीही धीर सोडू नका.
दोन तीन दिवसांनी किंवा आठ दिवसांनी फार काही फरक पडत नाही (एकदम तातडीचा अपघात किंवा आन्त्रपुच्छ वैगेरे नसेल तरच). घाबरून जाऊन विचारशक्ती क्षीण होते आणि अगदी सामान्य वाटणाऱ्या गोष्टी लक्ष्यात येत नाहीत. ठाण्यातल्या एका प्रतिष्ठित हॉस्पिटल मध्ये पत्नीचे पहिले बाळंतपण झाले. डीलीवरीच्या अगदी दहा दिवस आधी डॉक्टरांनी ठाम सांगितले कि मुलगा पायाळू आहे. सीझर करावे लागेल. आता चार वर्षांनतर बायको जेव्हा एक एक गोष्ट शांतपणे आठवत होती तेव्हा तिला जाणवले कि असे काही झालेच नव्हते. बाळ मुळीच फिरले नव्हते. पण डॉक्टरांनी भीती दाखवून घाबरून सोडले. सेकंड ओपिनियन वैगेरे घ्यायचे डोक्यात पण आले नाही. आणि उगाच पोट फाडायला लागले.
जाऊ द्या. मन फार विषण्ण होते. माझ्या ह्या डॉक्टर अनुभवांवर सविस्तरच लिहीन नंतर.
तूर्तास मिश्रेया यांना खडखडीत बऱ्या होण्यासाठी खूप शुभेच्छा. तुमची इच्छाशक्ती मजबूत राहो आणि आरोग्य उत्तम.
2 Feb 2015 - 3:44 am | रेवती
व्यवहार्य सूचना. धन्यवाद.
2 Feb 2015 - 10:48 am | साती
डॉ. इस्पिकचा एक्का यांच्याशी सहमत!
दुसरं म्हणजे आजकाल भारतात एकाच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून दुसर्याच कडून इलाज करून घ्यायची(पेशंटच्या माहितीशिवाय) पद्धत बोकाळली आहे.
तुमच्या केसमध्येही असेच झालेय.
भूल दिल्यानंतर कुणी तिसरेच डॉक्टर येऊन सर्जरी करून जातात.
(याऊलट परदेशात अगदी ऑपरेटींग सर्जन्,स्टाफ, भूलतज्ज्ञ इ सगळ्यांची प्लॅन्ड सर्जरीत ओळख करून दिली जाते.)
इतक्या जीवावरच्या प्रसंगातून पार पडल्याबद्दल अभिनंदन. सायनबद्दल तर काय प्रश्नच नाही , (माझं स्पेशलायझेशनचं शिक्षणही तिथून झालंय. ) जागेअभावी रूग्णांची , विशेषतः नातेवाईकांची गैरसोय होते. पण एकदा सरकारी खाक्याशी जुळवून घेता आले की अचूक उपचारांची गॅरंटी.
हा लेख वाचणार्यांना एकच विनंती आणि सूचना, प्लॅन्ड सर्जरीसाठी नक्कीच सेकंड ओपिनियन घ्या.
2 Feb 2015 - 4:22 am | शिद
वरील सर्वांशी सहमत.
पुढील आयुष्य निरोगी जावो हिच सदिच्छा.
2 Feb 2015 - 10:22 am | सुनील
अत्यंत दुर्दैवी प्रकार. तुम्हाला शुभेच्छा.
या प्रकरणी मेडिकल कौंसिलकडे दाद मागता यावी.
2 Feb 2015 - 10:58 am | सविता००१
खडखडीत बर्या व्हा हो लवकर. तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा! फार फार सोसलंय तुम्ही.
माझा त्रास तुमच्या तुलनेत काहीच नाही.पण मीही अशीच एक डॉ. नी बनवलेली गिनी पिग होते आणि अजूनही त्याचे भरपूर त्रास भोगतेय त्यामुळे समजूच शकते.
2 Feb 2015 - 11:21 am | पिलीयन रायडर
वाचुन खुप वाईट वाटलं.. हकनाक तुम्ही हे सगळं भेगत आहात असं वाटत राहीलं..
एक विचारते.. प्लिझ रागावु नका...
मला वाचताना असं वाटलं की ज्या मॅडम कडे तुम्ही गेलात आणि त्यांनी गर्भाशय काढायचा सल्ला दिला, त्यांनाच पुढे दुसरा डॉक्टर आणुन तुमचे ऑपरेशन करावे लागले ना? मला तरी तुमच्या सांगळ्यावरुन त्या मॅडम तितक्याशा बरोबर वाटत नाहीत. तुम्ही अजुनही त्यांच्या कडेच जाताय का? तुम्ही कधी सेकंड ओपिनियन घेतले नाही का?
अशा वेळी एक तरी फॅमेली डॉक असायला हवा असं वाटतं, ज्याच्यावर आपल्याला पुर्ण विश्वास असावा आणि तो ही तेवढाच अनुभवी असावा की पुढे योग्य स्पेशालिस्ट कडे पाठवु शकेल. शिवाय अशा डॉक्टरांना आपली संपुर्ण हिस्टरी माहिती असते..
तुम्हाला लवकर बरं वाटो...
2 Feb 2015 - 4:58 pm | चिगो
ह्या ज्या कोणी 'मॅडम' होत्या, त्यांनी तुमच्या बाबतीत प्रचंड हेळसांड केली आहे, हे लक्षात येतंय.. अगदी "आठवड्याभरात ऑपरेशन केलं नाहीस तर कँसर होईल" अशी भिती दाखवणे हे पण जरा जास्तच झालं. आणि त्यांनी ज्या सर्जनकडे ते ऑपरेशन आऊटसोर्स केलं, तिथूनच कॉप्लिकेशन्स सुरु झालीत, हेही वाटतंय तुमच्या सांगण्यातून.. असं असूनही तुम्ही त्यांच्याचकडे सल्ल्याला जाताय, ह्याचं आश्चर्य वाटलं..
असो. देव तुम्हाला शक्ती, सहनशक्ती आणि आरोग्य देवो, हीच सदिच्छा..
2 Feb 2015 - 9:15 pm | सखी
हाच विचार मनात आला, डॉक्टरही मनुष्य आहे आणि चुका होऊ शकतात याची कल्पना असली तरी हे जीवावर बेतणार असल्याने आपल्याला अजुन काळजी घ्यावी लागते.
धीराने घ्या, आपल्याला आणि कुटुंबियांना पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा.
2 Feb 2015 - 11:25 am | मीता
लवकर बर्या व्हा.तुम्हाला शुभेच्छा
2 Feb 2015 - 1:05 pm | सुबोध खरे
एक्का साहेब आणि साती ताई यांच्याशी बाडीस
मला असा प्रकार बर्याच वेळेस दिसून येतो कि एखादा रोग झाल्यावर रुग्ण सरळ विशेष तज्ञाकडे जातो. मग तेथे एखादी शल्यक्रिया करायला सांगितली कि शल्यक्रीयेपुर्वी ज्या तपासण्या सांगतात त्यातील सोनोग्राफी साठी माझ्याकडे आल्यावर मला असे आढळते कि यांनी आपल्या फ्यामिली डॉक्टराना सांगितलेलेच नसते आणि आता सरळ तज्ञाकडे गेल्यामुळे त्यांच्या कडे परत जायची लाज वाटते. मग नंतर त्यतून काही दुसरे निष्पन्न झाले कि कुठे जावे अशा स्थितीत ते येतात.
आपण घर बांधतो तेंव्हा आपल्या खात्रीचा माणूस तेथे देखरेखीसाठी ठेवतो तसाच फ्यामिली डॉक्टर/ घरचा /ओळखीचा डॉक्टर असणे आवश्यक आहे तो नसल्यामुळे काही गुंतागुंत झाली तर कुठे जावे हे कळत नाही. साधे शल्यक्रियेनंतर ड्रेसिंग करायला परत त्याच रुग्णालयात परत जाऊन दुप्पट पैसे देऊन ते करून घ्यावे लागते. फ्यामिली डॉक्टरची फी १००- २०० रुपये वाचविण्यासाठी रुग्ण असे सर्रास करताना आढळतात. (penny wise pound foolish). (शिवाय फ्यामिली डॉक्टरच्या बिलाचा परतावा बर्याच कंपन्या/ विमा कंपन्या देत नाहीत हेही एक कारण आहे.)
बाकी प्रत्येक माणसाला प्लंबर, सुतार, शिंपी( बायकांच्या ड्रेसचा तर १०० % बायकांना) यांच्या बद्दल जसा एक तरी वाईट अनुभव येतो तसाच डॉक्टरचा प्रत्येकाला एखादा तरी वाईट अनुभव येतो. त्यातून समाजाच्या पैश्याच्या हव्यासाची लागण वैद्यकीय व्यवसायालाहि लागली आहे. त्यातून अनेक चुकीचे प्रकार घडताना दिसतात.
परंतु महत्त्वाचा आजार/ शल्यक्रिया असेल तर चार वेळेस खात्री करूनच पुढे जावे. मुंबईपुण्याच्या बाहेर तर बरीचशी रुग्णालये आयुर्वेदिक होमियोपथिक डॉक्टर चालवतात आणि सर्जन स्त्रीरोग तज्ञ गरजेनुसार बोलावले जातात. तेथे तर नक्कीच व्यवस्थित चौकशी करून पुढे जावे.
2 Feb 2015 - 3:43 pm | मराठी_माणूस
प्रतिसादतुन असे वाटते की रुग्णाने फॅमिली डॉ. शी कंसल्ट न करणे ही रुग्णाची चुक आहे . ज्या तज्ञा कडे गेले त्याची काहीच जबाबदारी नाही का ?
ह्याचा काही डेटा आहे का ? मेडीकल मधेले गैर प्रकार सर्वत्र होत असतात.
2 Feb 2015 - 4:00 pm | साती
निरीक्षण आहे हे म_मा.
एक्झॅक्ट डाटा पण मिळू शकतो.
त्याहून भारी म्हणजे तुमची मोठी शहरे सोडल्यास आमच्या छोट्या शहरात चक्क एम डी असं लिहून वास्तवात एम डी आयुर्वेद असणारे सिझेरियन /हिस्टरेक्टॉमी करतात.
ते अगदी पद्धतशीर डिग्री घेऊन एम डी आयुर्वेदिक गायनॅक असतील तरी त्यांना ह्या शस्त्रक्रीया करायची परवानगी नाही.
बर्याचदा रुग्णं ओपन केला की पुढे कन्फ्यूज होऊन मग धावत पळत अॅलोपथिक गायनॅकला बोलविले जाते.
अजून एक प्रकार म्हणजे बी ए एम एस /बी एच एम एस लोक हॉस्पिटल काढून मग पॅनेल ऑफ ऑनररी डॉक्टर म्हणून अॅलोपथिक डॉक्टरांची नावे लिहून ठेवतात.
मी तरी बर्याचदा कन्फ्यूजिंग बोर्डस पाहिले आहेत.
एम बी बी एस. एम डी . (फिजीशीयन) अश्या पाटीने आमच्या गावात एक जण प्रॅक्टीस करतात.
वास्तवात एम बी बी एस हा जनरल फिजीशीयन असल्याने त्यांना फिजीशीयन लिहण्यात कायदेशीर अडचण काही नाही.
मात्रं ते एम डी फोरेन्सिक मेडिसीनमध्ये (न्यायवैद्यकशास्त्रं)आहेत. ;)
आता कायदेशीररीत्या बरोबर असूनही ते लोकांची दिशाभूलच करताहेत की नाही.
3 Feb 2015 - 12:27 pm | मिश्रेया
आपले म्हणणे अगदी योग्य आहे. मि ह्याच करता माझा फेसबुक वर पेज उघडला आहे.
प्लीज आपण हिच प्रतिक्रिया तेथे नोन्दवाल का.
https://www.facebook.com/shreyafightsback
मला खुप मदत होइल.आभारी आहे.
2 Feb 2015 - 4:02 pm | अजया
डेटा देणे कठिण असेल.पण मी राहाते तशा लहानशा गावात सर्रास अशी प्रॅक्टिस चालते.विशेषतः स्त्रीरोगतज्ञ म्हणून हाॅस्पिटल काढुन बसलेले डाॅक्टर्स एखादा डिजीऒ गायनॅक पकडून त्याच्याकडून सिझेरियनसारखी,गर्भाशय काढणे अशी अाॅपरेशन्स करुन घेतात.तो सर्जन अक्षरशः हात धुवुन निघुन जातो.बाकीचं हे डाॅक्टर्स बघतात.काॅम्प्लिकेशन झाल्यावर रुग्ण सरकारी दवाखान्यात न पाठवता खाजगी महागड्या हाॅस्पिटलला जातो.कारण तिथे ताबडतोब रुग्ण दगावल्यास पोस्टमार्टम रिपोर्ट फेवरेबल बनवता येतो.सरकारीमध्ये प्रथम पोलिस केस होते.(माता बाल मृत्यु नोंदणी)मग तपासण्या होतात.पिएम तिथेच होते ते मॅनेज करणे कठिण असते.
फार वाईट वाटतं हे लिहितानासुध्दा.निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखे असे डाॅक्टर्स गावोगावी आहेत.
2 Feb 2015 - 4:07 pm | पिलीयन रायडर
साती आणि अजया...
वाचुन खुप धक्का बसला आणि वाईट वाटलं..
ह्यावर सरकार काहीच करत नाही का?
(अनेकदा बोलण्यात आमचे बाबा "अरे चांगला असणार तो डॉक्टर.. एम.डी आहे.. " असं बोलतात. पण एम.डीची ही नवीन भानगड साती कडुन आजच कळाली...)
2 Feb 2015 - 4:50 pm | गवि
...खाली लिंक डकवतो आहे. या संकेतस्थळावर आपले डॉक्टर रजिस्टर्ड मॉडर्न मेडीसिनचे डॉक्टर आहेत किंवा नाहीत ते पाहता येईल. डॉक्टरांचे नाव टाकून. अगदी क्वचित नाव न सापडल्यास जरासे स्पेलिंग बदलून पाहिले की मिळते आहे. नुसत्या आडनावाने किंवा नावातल्या काही अक्षरांनी शोधून मग त्या रिझल्ट पेजवर कंट्रोल + एफ करुन आणखी सहज सापडते.
http://online.mciindia.org/imr//Index.aspx
९० टक्के नावं आणि तपशील (पास झाल्याचे वर्ष, ठिकाण, पत्ता, डिग्रीचे नाव इ) सापडले. लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री डॉक्टरांच्या केसेसमधे जरा जास्त शोधावे लागले.
2 Feb 2015 - 9:04 pm | असा मी असामी
दिलेल्या लिंक वरती एका डॉक्टर ची माहिती तपासली. डॉक्टर यांनी साईट वर M.D. लिहिले आहे पण http://online.mciindia.org/ वर M.B.B.S दाखवत आहे. माहिती अद्यावत नसेल का?
2 Feb 2015 - 9:18 pm | असा मी असामी
Medical Council साईट वर लिहिले आहे
"This section of our website publishes the Registered Doctors with the various State Medical Councils across India upto to the year 2009 (Except Haryana)
Medical Council of India is in progress to complete the above list for the year 2010."
3 Feb 2015 - 12:48 pm | मिश्रेया
maharashtra medical council ला गेली ३ वर्स मी पाट्पुरावा करते आहे.
काही उपयोग नाही.
खुप मनस्ताप आहे. मी लडणार आहे च.
बघु कधी न्याय मिळतो ते.
3 Feb 2015 - 12:41 pm | मिश्रेया
आपले म्हणणे अगदी योग्य आहे. मि ह्याच करता माझा फेसबुक वर पेज उघडला आहे.
आपल्या सारख्या सामान्य माणसाला हे सगळ कळ्त नसते हि च जागरुकता यावी म्हणुन,
प्लीज आपण हिच प्रतिक्रिया तेथे नोन्दवाल का.
https://www.facebook.com/shreyafightsback
मला खुप मदत होइल.आभारी आहे.
3 Feb 2015 - 12:28 pm | मिश्रेया
आपले म्हणणे अगदी योग्य आहे. मि ह्याच करता माझा फेसबुक वर पेज उघडला आहे.
प्लीज आपण हिच प्रतिक्रिया तेथे नोन्दवाल का.
https://www.facebook.com/shreyafightsback
मला खुप मदत होइल.आभारी आहे.
2 Feb 2015 - 1:29 pm | आरोही
खरेच खूप कठीण अनुभवातून गेला आहात तुम्ही ...धीर सोडू नका ,तुम्हाला लवकर बरे वाटो .
2 Feb 2015 - 1:33 pm | क्लिंटन
तुम्हाला लवकरात लवकर बरे वाटो ही सदिच्छा.
2 Feb 2015 - 1:51 pm | vikramaditya
तुमच्या ह्या लेखामुळे अनेक जण सावध होतील. परमेश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य देवो.
मानवी शरीरात सेल्फ-हीलींग ची प्रचंड शक्ती आहे. श्रद्धा, सबुरी ठेवा. योग, रेकी ह्यांची पण मदत होईल.
एक आणखी मुद्दा म्हणजे कधी कधी 'सर्टिफाईड' डॉक्टर नवे शिकलेले तंत्रज्ञान वापरायाला पेशंटना गिनिपिग म्हणुन वापरतात. म्हणुन सेकंड ओपीनीयन ला पर्याय नाही.
3 Feb 2015 - 12:38 pm | मिश्रेया
खुप आभार.
मुळात ह्या बाबतित जागरुकता यावी हाच उद्देश्य आहे.
आपले म्हणणे अगदी योग्य आहे. मि ह्याच करता माझा फेसबुक वर पेज उघडला आहे.
प्लीज आपण हिच प्रतिक्रिया तेथे नोन्दवाल का.
https://www.facebook.com/shreyafightsback
मला खुप मदत होइल.आभारी आहे.
2 Feb 2015 - 1:56 pm | लव उ
तुम्हाला लवकरात लवकर बरे वाटो ही सदिच्छा.
2 Feb 2015 - 2:42 pm | श्रीगुरुजी
वाचून खूपच वाईट वाटले. फारच वाईट अनुभवातून गेलात तुम्ही. काय सुचवावे ते कळत नाही. परंतु जमल्यास ओळखीतल्या एखाद्या एक्स्पर्ट डॉक्टरचा पुन्हा एकदा सल्ला घ्या. पुण्यात डॉ. कल्याण गंगवाल हे अत्यंत निष्णात डॉक्टर आहेत. त्यांची फी जरा जास्त आहे. परंतु ते अत्यंत निष्णात आहेत. ते कदाचित योग्य ती पुढील उपचारयोजना सुचवू शकतील.
तुमची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी शुभेच्छा.
3 Feb 2015 - 12:34 pm | मिश्रेया
खुप आभार, तुमच्या जर हे डॉ खुप जवळ्चे असतिल तर त्यान्ना माझी केस सान्गा किव्वा मला त्यान्चा फोन नम्बर पत्ता
द्या.मी नक्की सम्पर्क करेन.
आणी
आपले म्हणणे अगदी योग्य आहे. मि ह्याच करता माझा फेसबुक वर पेज उघडला आहे.
प्लीज आपण येथे हि प्रतिक्रिया तेथे नोन्दवाल का.
https://www.facebook.com/shreyafightsback
मला खुप मदत होइल.आभारी आहे.
4 Feb 2015 - 2:12 pm | श्रीगुरुजी
मिश्रेया,
तुम्हाला "व्यक्तिगत संदेश" सुविधेतून संपर्क क्रमांक कळविलेले आहेत. ते बघा किंवा तुमचे ई-मेल बघा.
2 Feb 2015 - 2:47 pm | स्नेहल महेश
तुम्हाला लवकरात लवकर बरे वाटो आनि पुढचे आयुष्य निरोगी जावो ह्याच शुभेच्छा!
2 Feb 2015 - 2:55 pm | पदम
खूप धीराच्या आहात हो तुम्ही लवकर बरे व्हाल खात्रि आहे.
2 Feb 2015 - 3:13 pm | कपिलमुनी
लौकर बर्या होण्यासाठी शुभेच्छा !
2 Feb 2015 - 3:24 pm | स्मिता चौगुले
तुम्हाला लवकरात लवकर बरे वाटो ही सदिच्छा.
माझ्या आईच्याबाबतीत देखिल आम्हाला साधारण असाच अनुभव आहे. आईलाही मासिक पाळीचा काहीतरी(तेव्हा मी साधारण ६-७वीत होते आणि मी पहिलेच आपत्य त्यामुळे आई साधारण ३०-३२ वर्षाची असेल) त्रास होत होता त्यामुळे गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला गायन्याकने. आम्ही तेव्हा सोलापुरला रहायचो. तेव्हा सेकंड ओपिनिअन वैगेरे घेतले की नाही आठवत नाही.एक बर्यापैकी नावाजलेल्या गायन्याक डॉक्टर दांपत्याकडे ट्रिट्मेंट सुरु केली. कालातंराने ऑपरेशन झाले. त्याकाळात ही भरपुर पैसे घेतले त्यांनी. आई बरी होवुन घरी आली आणि तिला फ्रिक्वेंट युरिनेशनचा + पोट दुखीचा इ. त्रास सुरु झाला. अगदि १० मिनीट्सही मधे अंतर नाही आणि थांबवणे ही शक्य व्हायचे नाही तिला. तिथुन मग डॉक्टर विझिट सुरु झाल्या. प्रत्येकवेळी एकच उत्तर आणि फारतर मेडिसिनमधे बदल. 'आत्ताच झाले आहे ऑपरेशन , होइल थोडे दिवसानी निट' , पण बराच काळ लोट्लातरी काही फरक पडे ना . दरम्यान डॉक्टर बद्लुन झाले पण उपयोग शुन्य.
नंतर आजोळी एका गायन्याकला दाखवले, त्यानी असे निदान केले की ऑपरेशन दरम्यान युरिन ट्युबला(सिस्टिमला) धक्का लागल्याने हा प्रोब्लेम सुरु झाला आहे. माझे पप्पा या बाबतित थोडे कड्क स्वभावाचे त्यानी तड्क आधिच्या डॉक्टरला गाठले आणि याबद्दल जाब विचारला तर त्याची ततपप..त्यानी कबुल केले की त्यांच्या बायकोने ही शस्त्रक्रिया केली (याच्या उपस्थितित) आणि त्यादरम्यान असे झाले कारण तिला ह्या टाईपच्या शस्त्रक्रियेचा जास्त अनुभव नाही ती नेह्मी डिलिवरीस बघते.
कालांतराने दुसर्या डॉक्टरच्या ट्रिट्मेंटने/ तिच्या स्वताच्या विल पॉवरने,ती शारिरि़क झिज भरुन निघाली आणि ते १० मिनिट्सचे अंतर आता २-अडिच तासावर आले आहे. पण ती २-३ इअर्स आईला जो त्रास सहन करावा लागला तो केवळ शब्दात सांगता येणार नाही, कुठे बाहेर जाता यायचे नाही,जाण्याचा प्रसंग आलाच तर तिला लाज वाटत राहायची. आणि हे सगळ फक्त त्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे.
2 Feb 2015 - 4:22 pm | MaheshW
....पूर्ण सहमत
2 Feb 2015 - 4:24 pm | प्रसाद१९७१
साधे टीव्ही वगैरे असल्या गोष्टी घेताना आपण चार ठीकाणी चौकशी करतो. मित्रात विचारतो की हा ब्रँड कसा आहे वगैरे.
स्वताच्या आरोग्याशी खेळ असताना, डॉक्टरची आधी चौकशी नको का करायला? किंवा ३-४ ओळखीच्या लोकांनी रेकमेंड केलेल्या डॉक्टर कडे नको का जायला?
Second Opinion तर मस्ट आहे कसलीही सर्जरी करायच्या आधी.
2 Feb 2015 - 8:01 pm | आजानुकर्ण
वाईट वाटले. मात्र आश्चर्य वाटले नाही. आम्हा कुटुंबियांना डॉक्टरलोकांचे अत्यंत वाईट अनुभव आले आहेत. कन्सल्टिंग टाईप डॉक्टरची सेवा असेल तर काही हरकत नाही. पण हॉस्पीटलमध्ये गेल्यास फसवणूक होणारच याची मानसिक तयारी कायमच ठेवावी. डायलिसिसच्या वेळी माझ्या काकांना चिंचवडमधील एका नामांकित इस्पितळात चुकीचे इंजेक्शन दिल्याने ३ दिवस आयसीयूमध्ये काढावे लागले होते. इस्पितळात चालत गेलेले काका 'नातेवाईकांना बोलावून घ्या' या सल्ल्यापर्यंत पोचले. माझ्या वडिलांच्या ऑपरेशनपूर्वी एक दोन चाचण्या करताना चुकीचे सँपल पाठवले व निकाल यायला प्रत्येकवेळी दोन दिवस लागत असल्याने तीनचार दिवस मुक्काम वाढ(व)ला. शहाण्या माणसाने व्यायाम वगैरे करुन या डॉक्टरलोकांपासून जितके दूर राहता येईल तसे राहून स्वतःचे आरोग्य सांभाळावे. चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण आरोग्य महत्त्वाचे. दुर्दैवाने बायकांना बाळंतपणा वगैरेंमुळे डॉक्टरच्या खेपा घालाव्याच लागतात. त्याला काही इलाज नाही.
3 Feb 2015 - 12:18 pm | मिश्रेया
Hysterectomy करताना माझ्या दोन्ही मूत्र नलिका ना ईजा झाली होती. हे sion hospital ला admit झाल्यावर तिथल्या डॉ ने सांगितले.
माझ्या डॉ मॅडम ने आम्हाला ह्या बाबतीत काहीही कळु दिले नाही.व जवळ जवळ 4 महीने काही बाही घरगुती उपाय सुचवत राहिल्या व बऱ्याच इतर डॉ कडे refer करत राहिल्या.मी sion hospital वरुन 50 दिवसांनी discharge घेवुन घरी आल्यावर त्या मला भेटायला आल्या.
खुप आपुलकी दाखवुन म्हणाल्या "I owe you my entire life, मला तुमच्या त्रासा ची कल्पना आहे.दर 2 ते 2 1/2 तासाने urine pass करायला उठायचे म्हणजे रात्रीची झोपमोड ही होणार. "Better to use ADULT DIAPER" हा विचित्र पर्याय उपाय होऊ शकतो का?? मी काही braindead नाही मला Sense आहे.हा उपाय माझ्यासाठी तरी
नाही. आम्ही त्याना ह्या वर आमचे मानसिक,शारीरिक व आर्थिक नुकसाना बद्दल बोललो व आमचा कायदेशीर कारवाई करण्याचा विचार आहे असे सांगितल्या वर त्या म्हणाल्या "मला ही मुलंबाळ आहेत, मला कल्पना आहे तुमच्या सर्व त्रासा ची त्यामुळे मी माझ्या कडून जमेल ती मदत करेन".मला त्यांनी 2 दिवसांची वेळ मागितली व काय best करू शकते ते कळवते असे म्हणाल्या.
दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांचा फ़ोन आला तेव्हा त्या म्हणाल्या "तुला काय करायच ते कर.
Medical council वगैरे माझे काही वाकडे करू शकत नाही. मी तुला काहीही मदत करणार नाही, एक पैसा ही देणार नाही.you can do whatever you want."
मग मात्र मी ठरवले आता legal way ने जाऊ. तशी तक्रार Maharashtra medical council ला व consumer court(CST) मधे केली.
Medical council मधे माझी केस 2012 सालापासून अशीच pending आहे without any action, as she had warned me.......
Consumer court मधे judges ना मेडिकल terms समजत नसल्यामुळे व काही गोष्टी MANAGE होत असल्यामुळे 3 /4 महीने पुढची तारीख मिळते.
खुप वेळा हताश होते आपल्या ह्या सिस्टममुळे, ढेपाळते ही.कारण त्या डॉक्टरतर ऊजळ माथ्याने त्यांची प्रेक्टिस करत आहेत व त्रास फक्त मीच भोगते आहे. त्यांना काहिही करता येत नाही कि त्यांची प्रेक्टिसही थांबवता येत नाही. पण मग विचार करते मी नशीबवान आहे की मी जिवंत आहे,माझ्या मुलां सोबत, माझ्यासाठी अतोनात कष्ट घेऊन मरणातुन खेचून आणणार्या माझ्या नवर्यासोबत आहे. तेवढे पुरेसे आहे.पण म्हणतात ना म्हातारि मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. मी अन्याया विरुद्ध लढते त्यात काहीच चुकीचे नाहीये ना?
गप्प बसले असते तर क्लेश, मनस्ताप झाला असता.त्यापेक्षा मी प्रामाणिक प्रयत्न करते आहे म्हणून मला समाधान आहे.
मी ह्या संदर्भात ज्या डॉ ना भेटले त्यात काही असे मोठे थोर डॉ आहेत ज्यांनी मला सल्ला रूपी warning दिली की समजा road accident मधे एखाद्या ट्रक ने उडवले असते तर काय केले असते??? So just forget it. एक महाशय तर म्हणाले की पैसे देऊन गुंडांकडून हया डॉ कडून भरपाई वसूल करा.
आश्चर्य वाटते क़ी माझ्याकड़े कामाला येणाऱ्या बाई च्या हातून काचेची बरणी फुटली तर ती म्हणाली "माझ्या पगारातून कापून घ्या ताई"
पण ह्या सुशिक्षित व आर्थिक दृष्टया सक्षम असणाऱ्या ना इतकी ही जाणीव असु नये???
माझा खुप विश्वास आह प्रथम देवा वर व नंतर sion हॉस्पिटल्सच्या डॉ वर ,ज्यानी मला ह्या प्रकरणात सर्वोपरी सहकार्या साठी आश्वस्त केले आहे ...म्हणून भले देर सही सवेरा तो होना ही है.
मि आता सायन होस्पिटल शिवाय अन्य डॉ कडे जात नाही.
न्याय मिळावा म्हणुन मी खालील प्रमाणे पेज तयार केलाय.
https://www.facebook.com/shreyafightsback
तुम्हाला विनन्ती आहे क्रुपया त्या ला लाईक करा व शेअर करा.
3 Feb 2015 - 12:48 pm | सस्नेह
फेसबुक पेजवर लाईक केल्यामुळे तुम्हाला न्याय कसा मिळेल हे समजले नाही.
3 Feb 2015 - 1:09 pm | गवि
+१.
शिवाय कायदेशीर कारवाई आणि तत्सम गोष्टींबाबत एक बाजू ऐकून दुसरी बाजू न जाणता किंवा ती जाणण्याची क्षमता नसताना असा मोहिमेच्या उद्देशाने एकतर्फी पाठिंबा कसा देणार. दिला तरी तो जेन्युइन कसा असेल आणि तो कुठे मोजला जाणार?
कायदेशीर लढाईत तुम्हाला मानसिक बळ मिळो आणि त्याबाबत आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच.
3 Feb 2015 - 9:40 pm | श्रीरंग_जोशी
लोकजागॄती होण्यासाठी त्यांनी फेसबुक पेज सुरू केले असावे जेणे करून अशा शस्त्रक्रियांबाबत निर्णय घेण्यापूर्वी लोक अधिक काळजी घेतील.
याखेरीज इतर लोकांनी सदर पेज लाइक करण्यामुळे कायदेशीर लढाई लढताना शुभेच्छांचे बळ आपल्या पाठिशी आहे ही भावना अंतःकरणात राहील.
श्रेयाताई - आपल्या आरोग्यात सुधारणा होवो व कायदेशीर लढाईसाठी परमेश्वर आपल्याला बळ देवो.
4 Feb 2015 - 6:12 am | स्पंदना
हरामखोर ही एकच शिवी तोंडात येते.
मीश्रेया माझ्या बहिणीला वय वर्षे २६ ब्रेस्ट मध्ये झालेली गाठ २न्ड लेवल कॅन्सरम्हणुन रिपोर्ट देउन पुरी कॅन्सरची ट्रीटमेंट दिली गेली. नंतर मुंबईत एका हॉस्पिटलने मुळ टेस्तची स्लाईड मागीतली..........
गाटह फायब्रॉइडची होती. कॅन्सरस नव्हती.
आज सगळे सगळे केमो रेडीएशनचे साईड एफेक्तस आणि बरच काही...
3 Feb 2015 - 12:35 pm | गवि
अत्यंत मनस्तापजनक आहे हे सर्व. इतकं सहन केल्यावरही पेशंटला दाद मागणं इतकं अवघड जावं आणि तक्रार २०१२ पासून पेंडिंग रहावी हे निराशाजनक आणि दु:खदायक आहे.
अशा बाबतीत निष्काळजीपणा नेमका कसा सिद्ध करतात? शस्त्रक्रियेदरम्यानच चूक झाली आणि अमुकच डॉक्टरच्या हातून झाली असं कसं सिद्ध करतात? विशेषतः एकामागून एक अनेक सर्जरी झाल्या असतील तर?
हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत आणि एकूण दोष डॉक्टरचा आहे असं सिद्ध करणं अत्यंत अवघड असावं असं दिसतंय.
3 Feb 2015 - 7:18 pm | आजानुकर्ण
खरंय. डॉक्टरांना नक्की कशी अकाऊंटिबिलिटी असते ते या निमित्ताने जाणून घ्यायला आवडेल. दीड वर्षापूर्वी कलकत्ता उच्च न्यायालयाने एका हॉस्पीटलला ६ कोटी रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला होता. मला तो निर्णय प्रचंड आवडला होता.
http://www.thehindu.com/news/national/kolkata-hospital-3-doctors-told-to...
कदाचित एखाद्या अनुभवी वकीलाशी चर्चा वगैरे करुन पाहता येईल असे सुचवावेसे वाटते. मेडिकल कौन्सिल वगैरे *ट काही करणार नाही असे मला वाटते. बेडरुममध्ये पैशाच्या थप्प्या लावणारे केतन देसाईंसारखे लोक मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. बीसीसीआय आणि एमसीआय यांच्या एथिक्समध्ये फारसा फरक दिसत नाही.
3 Feb 2015 - 1:45 pm | पिलीयन रायडर
त्या मेडमचं नाव सांगु शकता का? की केस चालु असल्याने सांगु नये? पण असल्या डॉक्टरांचा अनुभव शेअर करायला एखादी फोरम हवी.. जिथे लोक असे अनुभव लिहु शकतील.
3 Feb 2015 - 9:20 pm | प्रभाकर पेठकर
एकूणातच तुमचा अनुभव हा अंगावर सर्रकन काटा आणणारा आहे. ह्या पुढची कायदेशीर लढाई तर अजूनच किचकट. तुम्हाला आरोग्य लाभो आणि तुमच्या कायदेशीर लढाईत तुम्हाला यश येवो हिच इश्वरचरणी प्रार्थना.
3 Feb 2015 - 10:22 pm | पैसा
खूपच वाईट अनुभव. डॉक्टरच्या हातात आपण विश्वासाने जीव सोपवतो, त्याच्याकडून असे व्हावे आणि वर काय करायचे ते कर ही धमकी? भयानक आहे.
माझ्या ओळखीच्या एका बाईंची डिलिव्हरी मुंबईच्या एका नामांकित हॉस्पिटलमधे झाली. मात्र डिलिव्हरीला उशीर झाला आणि बाळाला प्राणवायु कमी पडून तो निळा पडला. हॉस्पिटलमधे ऑक्सिजन सिलेंडर्स नव्हते. बाळाला दुसर्या हॉस्पिटलमधे हलवा सांगून प्रत्यक्ष घेऊन जाऊन ऑक्सिजन लावीपर्यंत मधे जो वेळ गेला तेवढ्यात त्याच्या मेंदूच्या पेशी मृत झाल्या आणि आज तो २२/२३ वर्षाचा मुलगा भाजीपाला होऊन जगतो आहे. मानसुद्धा स्वतःची स्वतः वर उचलता येत नाही. डोळ्यांना दिसत नाही की बोलणे चालणे नाही. त्याला कसल्याही संवेदना नाहीत. केवळ जिवंत आहे. त्याच्या आईवडिलांकडे पैसा आहे म्हणून त्याला तसाच सांभाळत आहेत इतकंच. जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी दिसतो तेव्हा त्यांच्या आयुष्याचा नरक करणार्या डॉक्टरला केवळ शिव्याशापच तोंडात येतात.
3 Feb 2015 - 10:43 pm | vikramaditya
आणि लोकांच्या आयुष्याची वाताहत करुन पुन्हा दुसरे दिवशी निर्विकारपणे कामावर हजर होणा-या महाभागांना कोपरापासुन नमस्कार.
It is simply not possible unless one discards one's conscience completely.
11 Feb 2015 - 12:20 am | आयुर्हित
वाचून खूप वाईट वाटले.
अशी वेळ कोणावरही चुकुनही येवू नये हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करीन.
असे आढळून आले आहे कि ४८% hysterectomy शल्यक्रिया ह्या गरज नसतांना होतात!
44% advised unnecessary surgery: 2nd opinion-givers
पण याची एक दुसरी बाजूही आहे/असते.
याला जबाबदार आपण सारे भावी patients च असतो!
दुसरा कोणी ह्याच (किंवा अजून इतर कोणत्याही आजाराने )आजारी असेल तर त्याची नीट विचारपूस न करणे किंवा त्याचे भोग तो भोगतोय असे म्हणून आपण आपली स्वत:ची (चुकीची) समजूत काढून त्यावर कधीच सखोल विचार करत नाही व आजाराविषयी दूरदृष्टी तर अभावानेच दिसते.
Patient मालदार असला तर ताबडतोब शल्यक्रिया करायला लावून आजाराचे फक्त management केले जाते.
पण आजाराचे मूळ कारण बहुतेक वेळेला (>९०% वेळेला) तसेच ठेवले जाते व पुढच्या मोठ्या आजाराची एक सुरवात होते. त्यातून अजून एक मोठी शल्यक्रिया केली जाते. असे वर्षानुवर्षे आजारी पडून सारे मनस्वास्थ्य घालवून बसतो.
ज्याचा कोणाचा सल्ला घेणार तो complete recovery साठीच घेत जावा अथवा मला ह्याही आजारासाठी व्यनी करा!
30 Jan 2016 - 12:50 pm | श्रीगुरुजी
वैद्यकिय हलगर्जीचे एक नवीन प्रकरण ऐकले.
एका वर्गभगिनीच्या डोळ्याच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायची होती. बाहुलीच्या मापानुसार भिंगाची ऑर्डर दिली होती. प्रत्यक्ष डोळा उघडल्यावर भिंग बसविताना लक्षात आले की जे भिंग बसविले जात आहे ते ठरलेल्या मापापेक्षा वेगळ्या मापाचे भिंग आहे. तरीसुद्धा डॉक्टरांनी तेच बसवायचा निर्णय घेतला. महिलेने त्यावर आक्षेप घेतल्यावर नवीन भिंगाची शोधाशोध सुरू झाली. दुर्दैवाने त्याक्षणी रूग्णालयात तेच एकमेव भिंग उपलब्ध होते. दोन्ही भिंगांच्या मापात फार जास्त फरक नाही असा डॉक्टरांनी दावा केला. शेवटी नाईलाजाने पूर्णपणे न जुळणारे भिंग डोळ्यात बसविले गेले. त्यामुळे अर्थातच रिकव्हरीला जास्त वेळ लागला. रूग्णाने इतरांना असा सल्ला दिला आहे की शस्त्रक्रिया सुरू होण्याच्या आधीच डोळ्यात बसविण्याचे भिंग योग्य मापाचे आहे का नाही याची खात्री करा व नंतरच शस्त्रक्रियेला सुरूवात करा.
अशीच दुसरी केस म्हणजे डोळ्यात महागडे इम्पोर्टेड भिंग टाकतो असे सांगून त्याचे पैसे घेऊन प्रत्यक्षात आयत्यावेळी स्थानिक कमी प्रतीचे स्वस्तातले भिंग टाकले. जेव्हा रूग्णाने विरोध केला तेव्हा आता शस्त्रक्रिया सुरू झाली आहे व याक्षणी दवाखान्यात हेच एकमेव भिंग उपलब्ध आहे असे सांगून तेच वापरले गेले. त्यानंतर तिच्या नवर्याने तक्रार दाखल केल्यावर प्रकरण अंगाशी येत आहे हे पाहून डॉक्टरांनी नाईलाजाने वरचे पैसे परत दिले. परंतु कमी प्रतीचे स्वस्तातले भिंग टाकल्यामुळे ते लवकर खराब व्हायची शक्यता आहे व त्यामुळे हीच शस्त्रक्रिया भविष्यात काही काळात पुन्हा करावी लागेल.
सारांश - डोळ्याची शस्त्रक्रिया सुरू होण्यापूर्वी डोळ्याच्या मापाचे जे ठरविलेले भिंग आहे तेच उपलब्ध आहे याची खात्री केल्यानंतरच शस्त्रक्रिया सुरू करा.
30 Jan 2016 - 12:58 pm | यशोधरा
बापरे! कठीण आहे!
30 Jan 2016 - 3:00 pm | एस
असेही होऊ शकते हे माहीत नव्हते. इथे हा अनुभव लिहिल्याबद्दल धन्यवाद.