एका विद्वान माणसाने मला सांगितलं,
"तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे."
कोकणातला पाऊस सर्वाना माहित आहे.एकदां पडायला लागला की मग मागे वळून बघणार नाही.
तो अति प्रचंड वृष्टीचा दिवस होता.दिवसाच रात्र झाली आहे असं वाटत होतं.ढगानी सारं आकाश व्यापलं होतं.सर्व घराच्या दारं खिडक्या लाऊन लोक घरात घुडूप होऊन बसले होते.अशा प्रसंगी माझ्या पतिना एका एकी हृदयाचा झटका आला.कुणाला मदतीला बोलवायला जायला शक्यच नव्हतं.पावसाच्या कहराबरोबर माझ्याही घरात असाच कहर झाला होता.
ती घटना होऊन गेल्यावर नंतर जवळ जवळ तीन चार दिवस पाऊस सतत पडत होता.मी घाराच्या पडवीत बसून त्या संतत धारा बघत होते.मनात ना ना तर्हेचे विचार येत होते.
माझ्या घराच्या समोर नुसतं तळं झालं होतं रस्ता दिसत नव्हता.अशा परिस्थितीत दोन गृहस्थ खोरी फावडी घेऊन माझ्या घरासमोर माझ्यासाठी वाट करून देत होते.मी घरात जाऊन खिडकीतून त्याना न्याहाळत होते.माझी मलाच लाज वाटत होती.
माझ्या मनात पहिला विचार आला की मी यांची परत फेड कशी करूं? माझे केस मला फणी घेऊन विंचरायला त्राण नव्हता.माझ्या पतिच्या निर्वतण्यापुर्वीच्या आयुष्यात मी कधीही कुणाकडून मदत किंवा सहाय्य मागितलं नव्हतं.आणि त्याबद्दल मला विशेष वाटायचं.माझं स्वातंत्र्य आणि माझ्या क्षमतेवर मी मला बांधून घेतलं होतं.आता नुसती घरात बसून
पडणार्या पावसाकडे बघण्यात मी स्वतःला काय समजू?
आता माझ्यासाठी येणारी मदत आणि प्रेम मला स्विकारायला सोपं नव्हतं.मला शेजारी जेवण आणून द्दायचे.मला त्यांच स्वागत करायला ही त्राण नव्हता.पतिच्या एकाकी जाण्याने मी अगदीच हतबल झाली होती.पूर्वी मी अशी आळशी नव्हती.मी ओक्साबोक्शी रडत होती.शेवटी माझी शेजारीण मंदा मला म्हणाली,
"तुला जेवण आणून देणं हे तुझ्यासाठी विशेष काम मला पडतं असं मी समजत नाही.उलट मला असं करायला बरं वाटतं.तुला काही तरी माझ्या कडून मदत होते ह्याचा मला खूप आनंद होतो."
त्या माझ्या अशा प्रसंगाच्या वेळी मदत करणार्या सगळ्यांकडून मी असेच उद्गार ऐकत होते.तिथल्याच एका विद्वान माणसाने मला सांगितलं,
"तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे."
आता मी पूर्वीची राहिले नाही.आता माझ्यात खूपच बदल झाला.माझ्या जीवनाचं लक्तर आतां उपकृततेने आणि विनयशिलतेने विणलं गेलं होतं.मी आश्चर्य चकित होऊन पाहू लागले की अशा परिस्थितीत माणसाला असाह्यतेतून पण धैर्य येतं.मला आता वाटायला लागलं की विनम्र होण्यात अंगात एक क्षमता येते.
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
11 Aug 2008 - 9:27 pm | नि३
अश्या निराशेच्या क्षणांतुन खुप वेळा गेलो पण आता
"तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे."
हे आठ्वुन थोड बर वाटेल.
धन्यवाद सामंत साहेब.
---नितिन.
11 Aug 2008 - 10:37 pm | श्रीकृष्ण सामंत
नितिनजी,
आपल्याला "आठवून बरं वाटलं "हे वाचून आनंद झाला
आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
11 Aug 2008 - 10:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
... अशा परिस्थितीत माणसाला असाह्यतेतून पण धैर्य येतं.
पटलं.
स्वतःच्या अनुभवातून सांगते, जेव्हा दोनच रस्ते असतात एकतर कष्टाने, झगडा करून स्वतःसाठी स्वतःच उभं रहायचं, नाहीतर सुखासुखी दुसय्राचा आधार घेऊन दु:ख कुरवाळत बसायची. तेव्हा अशीच असहाय्यता खूप बळ देते लढण्याचं, सर्वप्रथम स्वतःशी आणि मग दु:खं तर आपोआप दूर जातात.
11 Aug 2008 - 10:49 pm | श्रीकृष्ण सामंत
अदिती,
तुला दुःखातून जावं लागलं हे तुझ्या अनुभवातून तू लिहिलेलं वाचून वाईट वाटलं.
"तेव्हा अशीच असहाय्यता खूप बळ देते लढण्याचं, सर्वप्रथम स्वतःशी आणि मग दु:खं तर आपोआप दूर जातात."
हे वाचून तुझ्या लढण्याच्या जिद्दीचा अभिमान वाटला.
आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
11 Aug 2008 - 11:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुला दुःखातून जावं लागलं हे तुझ्या अनुभवातून तू लिहिलेलं वाचून वाईट वाटलं.
मला नाही वाटत! :-)
मला अनुभव मिळाला, दु:ख नाही! कदाचित जरा लहान वयात मिळाला (म्हणूनच बहुतेक कुबड्या उर्फ टारझन मला आज्जी म्हणतो).
हे वाचून तुझ्या लढण्याच्या जिद्दीचा अभिमान वाटला.
आणि जिद्द म्हणाल तर ती कधी रग बनते हे समजलं तर फार बरं!
11 Aug 2008 - 11:46 pm | श्रीकृष्ण सामंत
तुला दुःखाचा अनुभव मिळाला अदिती.
मला तुझ्या दुःखाचं वाईट वाटतं अनुभवाचं नाही.
आणि "जरा लहान वयात मिळालं" हे वाचून मला आणखी वाईट वाटतं.
आज्जी म्हणजेच अनुभवाचा बटवा नाही काय?
काहीना त्यासाठी आयुष्य घालवावं लागतं खरं आज्जी व्ह्यायला. तर काहीना ते अगोदेरच कळतं.तुझ्यासारख्याना.
अदिती,
जिद्द-म्हणजे हट्ट- हा लाडकापण असू शकतो.तर कधी आवश्यकतेसाठी असतो.पण त्या जिद्दीला जेव्हा "गर्वाची" बाधा होते त्यावेळी तो हट्ट "रग" -म्हणजे रागाची बहिण- होते.
मला सुचलं ते मी लिहिलं.कदाचित माझं चुकत असेल.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
13 Aug 2008 - 12:12 am | टारझन
म्हणूनच बहुतेक कुबड्या उर्फ टारझन मला आज्जी म्हणतो
आहो आज्जी मला काय माहित तुमचा दिडशे वर्षांपुर्वीचा ईतिहास ? मी असेच तुम्हाला आज्जी ... यम्मी आज्जी म्हणतो .. :)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
12 Aug 2008 - 4:46 am | वेदनयन
असल्या अनुभवातुन गेलेलो नाही. परंतु जेव्हा वेळ येईल तेव्हा हे नक्किच आठवेल.
--रोहित
12 Aug 2008 - 6:14 am | श्रीकृष्ण सामंत
ध्यानजी,
तुमची प्रतिक्रिया वाचून बरं वाटलं. खरं म्हणजे असाच निर्धार हवा.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
12 Aug 2008 - 10:43 am | मनीषा
दु:खाने माणसे जोडली जातात.. वर वर्णन केलेल्या प्रसंगात ती स्त्री स्वतःवर आणि कुटुंबियांवर निर्भर होती. पण प्रसंग येताच जे तीच्या मदतीला आले त्यांचे मोल तिच्यासाठी कितीतरी मोठे आहे.. हेही तिला जाणवले असणार.
दु:खाला सामोरे जाणे ही मोठी गोष्ट खरीच... आणि त्या दु:खात ज्यांनी साथ दिली त्यांच्या ऋणात राहणे ही नम्रता..
खुप छान लेख आहे ..
12 Aug 2008 - 11:04 am | श्रीकृष्ण सामंत
मनीषाजी,
थोडक्यात आणि मोजक्या शब्दात आपण विश्लेषण केलंत
आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
12 Aug 2008 - 11:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
दु:खाला सामोरे जाणे ही मोठी गोष्ट खरीच... आणि त्या दु:खात ज्यांनी साथ दिली त्यांच्या ऋणात राहणे ही नम्रता..
एवढं छान मला नाही लिहिता येत! पण एवढं जरूर कळलंय की माझी वाईट वेळ होती तेव्हा चार लोक आले म्हणून मी सावरले, अगदी सहज! त्यांनी कुबड्या दिल्या नाहीत म्हणून (खवीस, तुझ्याबद्दल लिहित नाही आहे)! त्यामुळे आज मी सावरल्यावर ऋणात राहिले, नाही राहिले हे त्यांनी ठरवावं, पण वाईट वेळ आलेल्याला मदत जरूर करेन आणि करते!
12 Aug 2008 - 11:19 pm | श्रीकृष्ण सामंत
हे बघ अदिती ,
हिम्म्त मर्दा/मर्दानी तो मदत खूदा!
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
12 Aug 2008 - 11:17 am | पावसाची परी
>>... अशा परिस्थितीत माणसाला असाह्यतेतून पण धैर्य येतं.
पटलं.
यमीताईन्शी सहमत.
नक्की सान्गता येणार नाही ते दु:ख कस्ल्या प्रकारचे होते पण हुशार नसेन म्हणुन किन्वा अन्पेक्षित अपयश आल्याने मी सुध्धा खुप खचले होते.माझा टीन एज त्यात्च गेल...सम्पल.....पण आता सावरलेय्....त्या दु:खातच डुम्बत बस्ले अस्ले तर नक्की बुडाले असते. मला मात्र ते आठवुन त्रास होतो......पण मुळ स्वभाव फार वेळ दु:खी राहण्यातला नाही त्यामुळे मनातल्या मनात पटकन त्याला जोरात डिच्चु देते . :)
12 Aug 2008 - 11:22 pm | श्रीकृष्ण सामंत
परी जी,
हे ही दिवस जातील!
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
12 Aug 2008 - 8:41 pm | लिखाळ
"तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे."
छान लेख.
दु:खाला सामोरे जाणे ही मोठी गोष्ट खरीच... आणि त्या दु:खात ज्यांनी साथ दिली त्यांच्या ऋणात राहणे ही नम्रता..
वा.. मनिषा यांचे मत सुद्धा योग्यच आहे.
अश्या प्रसंगी आपल्यावर झालेल्या उपकराम्ची परतफेड उपकार स्मरल्याने आणि इतरांवर वेळ आल्यावर आपण त्यांना मदत करण्याने अंशतः होते.
-- (सज्जनांची संगत लाभलेला) लिखाळ.
12 Aug 2008 - 11:28 pm | श्रीकृष्ण सामंत
लिखाळ जी,
प्रतिक्रियेबद्दल आभार्.परतफेडीबद्दल आपलं म्हणणं अगदी खरं आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com