ते तिघं सध्या आपल्या सगळ्यांच्या घरात धुमाकूळ घालतायेत. त्यांना वेळीच आवरलं नाही तर घरात राहणं मुश्कील होईल. आपल्या कळत-नकळत आपली तुलना सतत त्यांच्याबरोबर होते आहे. आपलं कुटुंबप्रमुख पद त्यांच्यामुळे धोक्यात येऊ शकतं. आणि आपण काहीही केलं तरी त्यांना आता अवरु शकत नाही. ये हमारे बस की बात नही!! आता तुम्ही विचाराल , हे कोण तुर्रमखान ? त्यांची ओळख काय ? त्याचं कर्तुत्व काय ? ओळख म्हणाल तर आपल्या रोजच्या सक्तीच्या पाहण्यातले. कर्तुत्व म्हणाल तर अफ़ाट ! अचाट !
पहिला -- आजीने कष्टाने उभे केलेल्या गृह उद्योगाचा एकमेव वारस आणि मालक असलेला श्री ! (होणार सून मी त्या घरची )
दुसरा -- एका गर्भश्रीमंत घरातली पोरगी पटवण्याचा पराक्रम गाजवलेला राया !! (जावई विकत घेणे आहे )
तिसरा -- गांधीजींची सहनशीलता, टिळकांचा दुर्दम्य आशावाद, श्रावणबाळाइतका आज्ञाधारक इत्यादी गुण पदरी घेऊन साक्षात श्यामच्या आईने सुद्धा जिची ट्युशन लावावी अश्या मातेच्या पोटी जन्मलेला सुपुत्र आदित्य !!! (जुळून येती रेशीमगाठी)
आता बोला! आहे का तुमच्यात हिम्मत यांना आवरण्याची ? आहे का तुमच्यात हिम्मत संध्याकाळी ७-१० या वेळात बायकोच्या हातून रिमोट हिसकण्याची ? नाही ना ! मग गप्पं बसा. आणि त्या तिघांच्या पराक्रमाच्या गाथा पहा.
घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि आकाराच्या सहा-सात बायकांच्या कटकटी सांभाळून व्यवसायामध्ये इतकं नेत्रदीपक यश मिळवणं म्हणजे खायचं काम नव्हे. त्यात मधूनच अनेक वर्षांपूर्वी घराबाहेर काढलेला बेवडा काका घरात वापस येतो. मग वाल्याचा वाल्मिकी व्हावा तसं या काकामध्ये आमुलाग्र बदल घडून येतो. या बदलाचा शिल्पकार अर्थातच श्री असतो. काहीही कारण नसताना घर सोडून गेलेले श्री चे वडील काहीही कारण नसताना परत येतात. मग श्री स्वत: ची मानसिक कुचंबणा वैगेरे काहीतरी विसरून हळूहळू वडीलांना स्वीकारतो. हाच श्री स्वत: च्या चुकीचं प्रायश्चीत्त म्हणून घरदार सोडून एका "हौटेल" मध्ये राहून फार हलाखीचे दिवस काढतो. संगणकासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्री त्यांचा गृहउद्योग एका नव्या उंचीवर नेउन ठेवतो. आर्थिक मंदी वगैरे शब्द त्याच्या गावीच नाहीयेत.त्याने नवीन उत्पादन बाजारात आणलं रे आणलं की त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो. श्री च्या व्यक्तीमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे लग्नानंतर सुद्धा त्याचं आपल्या बायकोवर नितांत प्रेम आहे. फक्त त्याच्या बिझी शेड्युलमुळे तो तिला जास्त वेळ देऊ शकत नाही. आता एकचं माणूस कुठेकुठे पुरणार ना ! मधल्या काळात श्री च्या बायकोचा अपघात होऊन तिचा स्मृतीभंश होतो. अशातही श्री खचून जाऊन मालिका बंद पडू देत नही. तर सुरवातीचेच चाळीस पन्नास एपिसोड परत दाखवून बायकोची स्मृती परत आणतो. श्री ची सामाजिक बांधिलकी सुद्धा वाखाणण्याजोगी आहे बरं का ! फावल्या वेळात तो मित्र मैत्रिणींचे लग्न लावून देतो, लहान पोरांचे हरवलेले मायबाप शोधून देतो, सासूबाईंचे नखरे सांभाळतो. थोडक्यात काय तर श्री चं अष्टपैलू व्यक्तीमत्व समजून घ्यायला अजून ५०० एपिसोड तरी नक्कीच बघावे लागतील. तोपर्यन्त आपली खैर नाही.
रायाचं कर्तुत्व ऐकून तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटेल. काहीही करत नसलेल्या रायाला एकेदिवशी अचानक लौटरी लागते. एका गर्भश्रीमंत घरातली मुलगी त्याच्या प्रेमात पडते. यथावकाश (म्हणजे सावकाश पन्नासेक एपिसोड नंतर) त्यांचे लग्न होते.श्रीमंत सासू-सासरे रायाला घरजावई व्हायला सांगतात. पण आपला स्वाभिमानी राय त्यांना ठाम शब्दात नकार देतो. पुढल्या काळात राया स्वत:चा व्यवसाय सुरु करतो ह्या लोकांना व्यवसाय सुरु करताना भांडवल, जागा, परवानग्या असल्या फालतू अडचणींना सामोरं जावं लागत नाही .मनात येईल तेव्हा व्यवसाय सुरु करायचा आणि दोन महिन्यातच त्याची कीर्ती सगळीकडे पसरवायची एवढंच त्यांना माहिती ! श्री आणि रायानी भागीदारीत आखाडी कंपनी सुरु केली ना तर अंबानी आणि अदानीची काही खैर नाही. असो. तर एकेदिवशी नाईलाजाने रायाला घरजावई म्हणून सासू-सासऱ्यांचा घरी जावं लागते. तरीही ना डगमगता राया तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. त्यात जर त्याला यश आले तर सावरकरांच्या इंग्रजांच्या कैदेतून सुटकेच्या घटनेइतकंच ऐतिहासिक महत्त्व या घटनेला प्राप्त होईल. श्री प्रमाणेच रायाच सुद्धा बायकोवर नितांत प्रेम आहे. ते सिद्ध करण्यासाठी अधुनमधून तो तिला चहा वैगेरे करून देतो. तुम्ही कितीही वेळ घोटला ना तरी तुम्हाला इतका सुंदर चहा जमणार नाही. रायाच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राया अतिशय शांत आणि संयमी आहे. बहुधा त्याचा हाच गुण बायकांना आवडत असावा.
श्री आणि राया यांच्या गाथा ऐकूनच जर तुम्ही थंडे झाले असला तर महात्मा आदित्यच्या तर जवळपासही येऊ नका. हम दिल दे चुके सनम मधल्या आजी देवगणचा वंशज असलेला आदित्य त्याच्या कितीतरी पुढे गेलेला आहे. गंमत अशी आहे की साधारण ज्या लोकांना आपण महात्मा म्हणतो, ते सगळे जन्मानंतर त्यांच्या कर्तुत्वाने महात्मा झाले. आदित्य आईच्या पोटातूनच महात्म्य घेऊन जन्माला आलाय. आदित्य च्या आईचा स्वभाव इतका गोड आहे की तिच्या फक्त सहवासानेच एखाद्याला डायबेटीस होईल. त्यामुळेच आदित्य एक अत्यंत सुस्वभावी मुलगा आहे. लग्नानंतर त्याच्या बायकोने त्याला 'हम दिल आधीचं किसीको दे चुके सनम' असं सांगितल्यावरही तो तिच्यावर चिडला नाही. तिच्यावर नातं स्वीकारण्याची जबरदस्तीही त्यानी केली नाही. याउलट तिला निर्णय घेण्याची मोकळीक दिली. हळूहळू तिला आदित्यचा चांगुलपणा उलगडू लागला. ती त्याला 'तू किती चांगला आहेस रे' असं दर एपिसोड मध्ये तीनदा म्हणायला लागली. तरीसुद्धा आदित्य तिला " मग राहा ना माझ्यासोबत भवाने !' असं एकदाही म्हणाला नाही.शेवटी तिनेच पुढाकार घेऊन प्रेमाच्या सुधारीत आवृत्तीची कबुली दिली. मगच त्यांचा सुखाचा संसार सुरु झाला. पण म्हणून मालिका बंद करण्याइतका आदित्य स्वार्थी नाहीये. तो एक जबाबदार मुलगा,भाऊ,जावई आहे. सगळ्यांच्या घरातल्या सगळ्या समस्या सोडवल्याशिवाय तो शांत बसत नाही. समस्या कमी पडल्याच तर घराबाहेरचं प्रेम प्रकरण सुद्धा तो मार्गी लावून देतो.
थोडक्यात म्हणजे श्री,आदित्य,राया ही त्या सर्वशक्तीमान ईश्वराचीच तीन रूपं असल्यासारखी वाटतात. आपल्यासारखे सर्वसामान्य पुरुष त्यांच्यासमोर काय टिकणार ? निदान त्यांची अवतारसमाप्ती होईपर्यन्त आपली धडगत नाही. जास्तीत जास्त आपण सूड म्हणून त्या तिघांना एक शाप देऊ शकतो.
"अरे चांडाळान्नो, तुम्हाला सुद्धा रोज ह्याच मालिका बघाव्या लागो रे !!!"
--चिनार
प्रतिक्रिया
22 Jan 2015 - 9:13 am | निनाद
जबरी!!
22 Jan 2015 - 9:38 am | कहर
पण मला त्या चौथ्या जय चे अप्रूप वाटते …. एवढ्या मुली त्याच्याशी फ्लर्ट करतात … लाइन मारतात … अगदी त्याच्या बायकोसमोर … पण बायकोला काही वाटतच नाही … उलट ती असू दे म्हणून सर्व सहन करते …. मी एकदा सहज बायकोला म्हणालो ऑफिस मधी एक कलिग माझ्यावर लाईन मारते ( बहुतेक )…. तर तिने त्याच रात्री माझा रीसुमे नोकरि.कॉम वर अपलोड करायला लावला … डोळ्यात पाणी आणलेस रे ….
22 Jan 2015 - 9:52 am | चिनार
तुमचं बरोबर आहे. पण माझ्या बायकोला ती मालिका एवढी आवडत नाही. त्यामुळे जय च्या लीला बघण्याच अहोभाग्य मला लाभत नाही.
त्यामुळे त्याच्यावर लिहू शकलो नाही
22 Jan 2015 - 4:28 pm | मोहनराव
ते जय नावाचे पात्र तर एकदम मंद आहे. अभिनयच्या नावाने बोम्ब.
22 Jan 2015 - 4:38 pm | टवाळ कार्टा
या सगळ्या सिरीयलस मध्ये मंद कोण नाहिये??? :)
22 Jan 2015 - 5:03 pm | मोहनराव
आणखी एक म्हणजे ती आदिती. एवढ्या श्रीमंत घरातली मुलगी, जावेकडून, रजनी नावाच्या जय वर लाईन मारणाऱ्या पोरीकडून सगळं मुकाट ऐकून घेते. जावेच्या घरात गपगुमान कामे करते. अरे काय साळसूदपणाचा कहर!!
22 Jan 2015 - 6:06 pm | कपिलमुनी
आता कळला तु ऑनलाईन का नसतोस ते !
22 Jan 2015 - 6:08 pm | मोहनराव
:)
22 Jan 2015 - 6:14 pm | मी-सौरभ
पर्देशस्थ लोकान्ना ह्या मलिका ओनलाईन बघाव्या लागत्तात असे ऐकुन आहे ;)
22 Jan 2015 - 6:16 pm | कपिलमुनी
ऑनलाईन आणी कंपलसरी बघायला लागत आहेत असे मोहनरावांच्या वाढलेल्या ज्ञानावरून वाटत आहे
22 Jan 2015 - 6:17 pm | मोहनराव
उगवलास.. पत्ते खेळून झाले वाटतं. ;)
12 Jun 2015 - 8:14 pm | अमितसांगली
तिसऱ्याच कर्तुत्व वाचल्यानंतर हेच खटकत...जयला कसे विसरले साहेब....अजून आपले खंडेराय व वाल्याचा वाल्मिकी झालेल्या कार्तिकला ( असे हे कन्यादान) पण विसरलात...
22 Jan 2015 - 9:44 am | स्पा
=))
बाकी त्या मेघनावर आमचा फार जीव
22 Jan 2015 - 9:51 am | टवाळ कार्टा
जान्व्ही वर डोला नका ठेउ रे ;)
22 Jan 2015 - 3:58 pm | सूड
यक्क !! ती त्या श्रीलाच लखलाभ होवो. तिने रोज तासभर वर्कआऊट केला तर कोल्हापुरातल्या आखाड्यातली मल्ल वाटेल ती. प्रिया बापट, उर्मिला कानिटकर, मृण्मयी देशपांडे सारख्या नाजूका एकेकाळी झीवर असायच्या. आता ती मेघना त्यातल्या त्यात बरी आहे.
22 Jan 2015 - 4:20 pm | टवाळ कार्टा
प्रिया बापट, उर्मिला कानिटकर बाबत सहमत पण मृण्मयी देशपांडे??? ती काकूबाई??
22 Jan 2015 - 5:24 pm | सूड
असो.
22 Jan 2015 - 6:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मृण्मयी देशपांडे काकुबाई नाहिये. गुगलवुन बघ!!
22 Jan 2015 - 8:07 pm | सूड
चिमणराव, अशा वेळी असो म्हणावं आणि सोडून द्यावं. ;)
22 Jan 2015 - 8:10 pm | टवाळ कार्टा
बघितले...काह्ही मिळाले नाही...तुमच्याकडे काही असेल तर द्या पाठवून...
अवांतर - अश्या विषयांसाठी मिपावर पुरुषांचा वेगळा विभाग नसल्याने माझी पुरुषसुलभ कुचंबणा झाल्यासारखी वाटते :)
22 Jan 2015 - 4:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
एक प्रेमाचा सल्ला रे बाबा तुला. चुकुन माकुन जान्हवी पटलीचं तुला, तर कानात घालायचे बोळे, चांगुलपणाच्या अतिजेवणानंतर अपचन होउ नये म्हणुन गोळ्या, झालचं तर बसचा महिन्याचा पास, घरात रँडम पोरांसाठी डायपर, सासुबैंना चोरायला वस्तु, सासरेबुवांसाठी ऑपरेशन थिएटर, मेव्हण्यासाठी रेडीमेड बिझनेस वगैरे ची तयारी ठेव.
=))
22 Jan 2015 - 4:38 pm | टवाळ कार्टा
खिक्क....मला भेटली तर मी तर सगळ्यांना सोडून दुसरीकडेच राहीन ;)
22 Jan 2015 - 6:19 pm | जेम्स बॉन्ड ००७
तिलापण सोडुन राहायची वेळ येइल रे बाबा
22 Jan 2015 - 6:27 pm | जेम्स बॉन्ड ००७
तिच्याकडे बघुन तुम्चा जीव फारच उतु चाल्लाय हे दिस्तंच आहे
22 Jan 2015 - 9:50 am | टवाळ कार्टा
खिक्क =))
22 Jan 2015 - 10:10 am | योगी९००
मला फक्त चला हवा येऊ द्या आवडते..
भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि डॉ. निलेश यांच्यामुळे बघणेबल होते. विनोदात तोच तोच पणा असला तरी भाऊ कदम यांच्या काहीश्या निरागसतेने खुपच मजा येते.
बाकी मल्हार मार्तंड यांच्या सिरियलचे टायटल साँग खुप आवडते.? या सिरीयल विषयी काय मत आहे?
22 Jan 2015 - 10:13 am | टवाळ कार्टा
+११११११११११
त्याचे फक्त टायटलसाँगच चांगले आहे ;)
22 Jan 2015 - 10:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
नै रे बाबा. बाणुवर जीव हाय आपला (म्हणजे माझा)
कधीतरी जाता येता दिसतं असते डोळ्याला. तेवढाचं श्रमपरिहार =))
22 Jan 2015 - 10:37 am | टवाळ कार्टा
=))
22 Jan 2015 - 1:50 pm | योगी९००
सागर कारंडे.. यांचे नाव विसरलो. तो पण खूप मजा आणतो च.ह.ये.द्या मध्ये...!! त्याने नाना पाटेकर समोर त्याचीच नक्कल फार छान उतरवली होती.
22 Jan 2015 - 5:04 pm | संदीप डांगे
कुणीतरी झोपडी(?)च्या बाहेर येतं, मग बाणू लचकत झोपडीतून बाहेर येते. ती ती दोघं काहीतरी बोलतात. किंचित टेन्स असतात.
दरबारात मार्तंड इकडून तिकडे आणि तिकडून इकडे मान फिरवत मानकऱ्यांचे आइकत असतात.
मार्तंड तोंड उघडतील तर कॅमेरा फुटेल अशा भीतीने त्यांना स्वगत बोलण्याची शिक्षा डिरेक्टर ने केलेली असते.
मागच्या वर्षभरात हे अवघे तीनच सीन रिपीट मारतात असे वाटत आहे.
16 Apr 2016 - 8:19 pm | किचेन
अरे बापरे !
22 Jan 2015 - 10:10 am | बोका-ए-आझम
माई मोड आॅन:
छानच लिहिलं आहेस रे चिना-या!रोजरोज या मालिका बघितल्यामुळेच मला इन्शुलीनचं इंजेक्शन घ्यावं लागतं असं हेही म्हणतात!
माई मोड आॅफ.
22 Jan 2015 - 10:13 am | चिनार
मी मल्हार मार्तंड यांच्या मालिकेवर भाष्य केले तर लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील. ज्यांना बघावते त्यांनी बघावं
22 Jan 2015 - 10:14 am | टवाळ कार्टा
त्यातला शिवशंभू इतका "भोळा" आहे की बस्स....समजून जा
22 Jan 2015 - 2:23 pm | कपिलमुनी
लिहा हो बिन्दास्त ! तुम्ही त्या पात्रांवर टीका करत आहात
22 Jan 2015 - 10:18 am | खटपट्या
सुरवात कोणत्या मालीकेने करावी याचे मार्गदर्शन मिळेल का?
22 Jan 2015 - 10:18 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
का ओ...असा शाप का देताय आम्हा पामरांना =))
22 Jan 2015 - 10:18 am | टवाळ कार्टा
हा शाप त्या तिघांना आहे
22 Jan 2015 - 10:21 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ओह!! मला वाटलं आपल्या मिपाकरांना आहे.
बाकी ह्यातल्या एकाही घरात चालु स्थितीमधला टी.व्ही. दिसलेला नाही.
नाही म्हणायला मल्हार-मार्तंड मधे आय-पॅड म्हणा किंवा कम्युनिकेटर म्हणा दिसले होते मधे कधीतरी.
22 Jan 2015 - 10:21 am | आनन्दा
आईशप्पत! असला शाप देता आला तर मी त्यांना असल्या मालिका + त्या पुढचे पाऊल वगैरे दिवसातून ३ वेळेस बघायचा शाप देईन.
22 Jan 2015 - 10:47 am | सर्वसाक्षी
इतक्या सुंदर आणि युजर फ्रेंडली मालिकांवर टिका केल्याबद्दल निषेध - विषेतः जान्हवी.
वा वा! किती सोपी मालिका! लेखक, दिग्दर्शक वगैरेची गरजच भासत नाही. आपण लहानपणी संध्याकाळी शाळेतून आल्यावर अंगणात जमायचो आणि ठरवायचो आज काय खेळायचं? तस या मालिकेत प्रत्येक भागात पात्र ठरवतात. उदाहरणार्थ एक भाग 'उशीर' वर.
किमान ५-७ पात्रे कुठल्याही प्रसंगी उपस्थित असतातच.
पहिले पात्रः आज जान्हवी नाही आली अजुन
जितकी पात्रे तितक्या वेळा हे वाक्य.
दुसरे पात्रे: फोनही केला नाही उशीर होइल म्हणुन.
आधी 'हो ना' च्या अॅडिशनसह सर्व उपस्थित पात्रे हेच वाक्य क्रमाने.
मग तिसरे पात्र हातात फोन घेउन : 'फोन लावते तर बंद आहे असे उत्तर येताय'
सगळी पात्री क्रमा क्रमाने : 'हो फोनही लागत नाहीये'
बघा. चार पाच वाक्ये गुणिले ७-८ माणसे आणि दर वाक्या आधी एकमेकाच्या तोंडाकडे बघणे यात १५ मिनिटे सहज जातात. उरलेला वेळ आधी काय झालं, पुढे काय होणार आहे आणि जाहिराती. झाला एक भाग.
आणि समजा पात्र वेळेत सेट वर पोचली नाहीत तर? तर काय - उपस्थित पात्रांपैकी एकाला आढ्याकडे बघत बसवायचं मग उरलेलं काम एडिटरचं. काढा जुनी रिळं आणि दाखवा सेपियामध्ये.
बघा किती सोपे आहे. लेखन, पाठांतर झिग्झिग नाही.
अशा सहज सुंदर मालिकांवर टिका करणे बरे नाही
22 Jan 2015 - 11:26 am | मितान
साबांच्या कृपेने अधुनमधुन दर्शन होते या सगळ्यांचे.
बाकी सर्वसाक्षी म्हणतात तेच सर्वकाही !!!! :))
22 Jan 2015 - 4:17 pm | मोहनराव
अगदी अगदी... :)
22 Jan 2015 - 10:57 am | मुक्त विहारि
(श्वेतांबराचे मनापासून २च भाग बघीतलेला) मुवि
22 Jan 2015 - 11:17 am | सस्नेह
कोण बरं हे तिघे ?
आम्ही नाही पाहिलं यांना कधी !
( मराठी सिरीयलद्वेष्टी )
स्नेहांकिता
22 Jan 2015 - 11:24 am | मुक्त विहारि
मला पण हाच प्रश्र्न पडला होता.
22 Jan 2015 - 4:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्ही सिर्यल बघत नै??? म्या आजपासुन तुमचा फॅण झालो मग. =))
22 Jan 2015 - 11:31 am | स्पार्टाकस
या तिघांना घेऊन पुढची कथा लिहावी म्हणतो
;)
22 Jan 2015 - 1:01 pm | बॅटमॅन
खबर्दार!!!!
22 Jan 2015 - 2:31 pm | असंका
रमेश भाटकर ची सिरीयल आठवली...खबरदार!!!
22 Jan 2015 - 11:38 am | वाह्यात कार्ट
हे आवडलंय...
22 Jan 2015 - 11:46 am | डॉ सुहास म्हात्रे
हा... हा... हा... !!!!!!
: मालिकाग्रस्त इ ए
22 Jan 2015 - 11:58 am | नाखु
बाहेरच्यांची समस्या फक्त मालिकावाल्यांनाच सोडवता येतात हे खर आहे. घरातल्या समस्यांची उणीव अशा रित्या भरून काढली जाते.
वेळेवर संपवल्यामुळे "अग्निहोत्र" मालिकेचा पंखा ( आणि त्या मुळेच एअर टेल कनेक्शन घेऊन पस्तावलेला)
22 Jan 2015 - 12:12 pm | पदम
एवढ काय आहे त्यांच्यात.
22 Jan 2015 - 12:26 pm | आनन्दा
बाकी यावरून आठवलं.. माझा एक मॅनेजर म्हणायचा, तुम्हाला जर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग शिकायचे असेल तर या मालिका बघा..
दिग्दर्शक यामध्ये फक्त क्लासेस तयार करून त्यांचे इन्स्टन्सेस सोडून देतो सिरियलमध्ये. बाके सगळे आपोआप होते..
22 Jan 2015 - 12:48 pm | श्रीगुरुजी
जबरी उपहास! मजा आली.
आमच्याकडे रोज ८ ते ९:३० या वेळात, "होसूमीत्या", "जुयेरे" आणि नंतर "लौआत्रि" या लागोपाठच्या तीन मालिका हाउसफुल्ल होत असल्याने या दीड तासात हॉलमध्ये फिरकायची आम्हाला परवानगी नाही.
22 Jan 2015 - 12:55 pm | चिनार
धन्यवाद गुरुजी . आपल्या घरातील प्रेक्षकांना सुद्धा वाचायला द्या
22 Jan 2015 - 1:54 pm | टवाळ कार्टा
चक्क तुमच्या घरचेच तुमचे ऐकत नाहीत =))
22 Jan 2015 - 8:30 pm | श्रीगुरुजी
काय करणार? आमच्या सौं. च्या इच्छेविरूद्ध ब्र काढायची आमची प्राज्ञा नाही. :YAHOO:
23 Jan 2015 - 9:12 am | खटपट्या
तेव्हाच ईकडे मोठे मोठे प्रतीसाद देउन भरपाई करत असता..:)
23 Jan 2015 - 10:05 pm | श्रीगुरुजी
खरंय. आम्ही मिपावर येऊन कितीही डरकाळ्या फोडल्या तरी घरी आम्ही शेळी आहोत. *LOL*
22 Jan 2015 - 2:39 pm | उदय के'सागर
हे "लौआत्रि" काय आहे?
22 Jan 2015 - 2:39 pm | असंका
लौट आओ त्रिशा..?
22 Jan 2015 - 2:51 pm | उदय के'सागर
आयला, असल्या नावाची पण सिरियल आहे का? कमाल आहे ब्वा... उद्या काहीही वाक्य काढून त्याच्या सिरियल बनवतील.. लाईक :
आओ बैठो यहा
मूझे अॅसिडीटी हुई
यहा से लेफ्ट लेना
कैच्या काय...
22 Jan 2015 - 3:13 pm | असंका
अगदी अगदी... मीही विचार करत होतो की हे लौआत्री काय असावं म्हणून. तुम्ही विचारल्यावर एकदम आपोआप शब्द उमटले मनात. आणि मला स्वत:लाच खरं वाटलं नाही की हे असं नाव असेल. मग आधी गूगल वर सर्च केलं आणि खात्री करून मगच इथे लिहिलं...
22 Jan 2015 - 5:11 pm | दिपक.कुवेत
यहा से लेफ्ट लेना तर खासच!!!
23 Jan 2015 - 10:09 pm | श्रीगुरुजी
काल संध्याकाळी ९ च्या सुमारास आमच्या सौ. आमच्या मुलीला सांगत होत्या की "तुला कळलं का, अमृताचा खून झाला ते.". आम्ही दुसर्या खोलीत होतो. अमृता नावाची एक महिला आमच्या माहितीतली आहे. त्यामुळे खून झाला हे ऐकल्यावर आम्ही जोरात दचकलो आणि घाईघाईत सौं. ना विचारले की, "काय सांगतेस? अमृताचा खून झाला? शॉकिंग. कधी झाला?". आमच्या सौ. नी अत्यंत त्रासिक आणि केविलवाण्या दृष्टीने आमच्याकडे कटाक्ष टाकून आमच्या बुद्धीची कीव करत सांगितले की "लौआत्रि मधील अमृताचा खून झाला.". हे ऐकल्यावर आमच्या अज्ञानाचे आम्हाला ज्ञान झाले.
22 Jan 2015 - 2:03 pm | hemants.gokhale
ऱोगेर मूर वेर मुलि फिदा होत होत्या असे ऐकले होते , हा जय रोगेर मूर च्या वर आहे , जि याल पहाते ति लगेच फिदा....
23 Jan 2015 - 6:36 pm | वैभव जाधव
रोगेर?????
आणी मूर?????
शेतातल्या किटकनाशकात पण होमीपाथी आली का?
22 Jan 2015 - 2:19 pm | विशाल कुलकर्णी
<<श्री च्या व्यक्तीमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे लग्नानंतर सुद्धा त्याचं आपल्या बायकोवर नितांत प्रेम आहे.>>> हा खरोखर षटकार आहे राव ;)
22 Jan 2015 - 2:37 pm | चिनार
*biggrin* :-D :D +D =D :biggrin: *biggrin* :-D :D +D =D :biggrin: *biggrin* :-D :D +D =D :biggrin:
22 Jan 2015 - 2:49 pm | उदय के'सागर
तो राया, आयचा - जाम डोक्यात जातो तो.. त्याचं थोबाड असलं शेळपट आहे, मंदसारखा हसत असतो आणि शाळेतल्या गॅदरींग मधे ज्यांना मारून-मुटकून भाग घ्यायला लावला असतो त्यांच्यासारखे डॉयलॉग डिलीवरी करतो @#$#$@#$...
आणि तो श्री... नेहमी ढूं*ण आवळून चालत असतो, आणि चेहर्यावर तेच भाव - खळखळून जुलाब होत असल्यासारखे. असं वाटतं की जुलाब दाबून धरलेत आणि कॅमेरा दुसर्यावर गेला आणि पुन्हा ह्याच्यावर येईपर्यंत हा मोकळा होऊन येतो.
जयमल्हार तर दगडच, हाव-भावाने पण आणि डोक्यानेपण (अतिपैलवानाचा गुडघ्यात असतो म्हणतात तसा). सदा-न-कदा त्याला तो प्रधान सल्ले देत असतो नाहीतर बायको डाफरत असते. हा आपला फक्त डोले-शोले दाखवत फिरत असतो - मख्ख.
आणि ह्या सगळ्यात, तुम्ही अस्मिता ला... ओह सॉरी 'अस्मिता प्रभाकार अग्नीहोत्री (हग्रीमुत्रि)" ला कसं विसरलात ? आहो बी.बी.सी शेरलॉक च्या तोडीच्या केसेस असतात... शेरलॉक (बेनेडीक्ट) ने जर पाहिलं ना अस्मिता तर तडक तोही शेरलॉक सोडून ट्रासजेंडर होऊन अस्मिता चा रोल काबीज करेल हो... एवढी जबरदस्त आहे आमची अस्मिता.
22 Jan 2015 - 2:55 pm | बॅटमॅन
हग्रिमुत्रि =)) =)) =))
आगायायायायायाया, पार वाटच लावलीत की हो =))
22 Jan 2015 - 3:31 pm | आदूबाळ
रायाबद्दल अगदी सहमत. आणि ती रायबाघन नाकाखालच्या भागाला सौम्य सूज आल्यासारखी दिसते. (बाद्वे - ती शिरल संपणारे असं कळलं)
काही (कैच्याकै) ऐकीव माहिती:
(१) "होणार सुन्न मी याघर्ची" शिरलची संवादलेखिका मधुगंधा कुलकर्णी म्हणजे "जुळू नये ती रे. गा." मधली मोठ्या भावाची बायको
(२) "जुळू नये ती रे. गा." फेम प्राजक्ता माळीचा नवरा म्हणजे जैमल्हारचा नवा हेगडे प्रधान
(सौजन्यः मातोश्री)
22 Jan 2015 - 4:29 pm | उदय के'सागर
ही माहिती अगदी बरोबर आहे. स्वतः मधुगंधाचा लोकसत्ता मधे लेख आला होता त्यात तिने ह्याचा उल्लेख केला होता. आणि ती त्या गुणी परेश मोकाशी पत्नी बरं का (माहित नसल्यास). परेश मोकाशी ची पत्नी म्हंटल्यावर आणि अभिनय पण चांगला करते म्हणून तिच्याबद्दल थोडा आदर वाटला(अगदी गोड गोड किंवा नखरेबाज, अक्रस्ताळा, रडका जो अभिनय बाकी बाया करतात त्या सिरीयल मधे, तसा मधुगंधा फार करत नाही म्हणून चांगला अभिनय). पण जेव्हा हे कळालं की हो.सु.मी.ह्या.घ. ची लेखिका ती आहे... आदर पार कोलमडला.
हे ही शक्य असेल... कारण प्राजक्ता म्हणे हार्डकोर क्लासिकल डांसर आहे आणि तो प्रधान पण आहे क्लासिकल डांसर...
22 Jan 2015 - 5:09 pm | आदूबाळ
हे माहीत नव्हतं.
बाद्वे - का रे दुरावाचा लेखक अंबर हडप आहे हे श्रेयनामावळीत वाचून वाईट वाटलं. बालक पालक (मूळ एकांकिका) आणि "थरारली वीट" सारखी विस्फोटक, वादग्रस्त एकांकिका लिहिणार्या वाघाला हे गवत लिहायला लागलं हे वाईट्च
22 Jan 2015 - 6:20 pm | मी-सौरभ
त्याची पोटापाण्याची सोय असावी :)
22 Jan 2015 - 7:41 pm | उदय के'सागर
अहो प्रविण तरडेंचं ही तेच झालं हो... पुण्यातल्या कॉलेजसला पुरुषोत्तम करंडक मिळवून देणारी नाटकं दिली आणि नुसतं अवॉर्ड /करडंकच नाही पण लोकप्रिय एकांकिका दिल्या. पण नंतर जेव्हा असे गुणी कलाकार पिंजरा, कुंकू सारखे मालिका लिहीतात हे समजलं तेव्हा वाईट वाटलं. (अता पुन्हा नव्याने तरडे साहेब 'क्वालीटी' काम करताहेत हे पाहून छान वाटलं)
22 Jan 2015 - 5:44 pm | थॉर माणूस
मला तर त्या रायाच्या सगळ्याच घरच्यांची मजा वाटते... नाही म्हणजे घरातल्या आजीपासून मुलींपर्यंत सगळे एकाच माणसाला राया म्हणत असतील तर किती विचित्र वाटेल ते. :)
26 Nov 2015 - 4:31 pm | DEADPOOL
भाऊ जरा थंड घ्या!!!
22 Jan 2015 - 2:56 pm | पिलीयन रायडर
छळ आहेत.. छळ... बाकी मेघनाने "प्रेमाच्या सुधारित आवृत्तीची कबुली" खतरनाक पंच!!!
एक प्रश्न.. जय मल्हार मध्ये खंडेराय आपले शिवत्व म्हाळसाला देतात ना.. आणि आता मी "सामान्य माणूस" म्हणुन दाग-दागिने काढुन, सेवक सोडुन गेले आहेत ना... मग आता ते जागो जागी "शिवलिंग" कसे स्थापन करत आहेत?
22 Jan 2015 - 3:36 pm | बॅटमॅन
अहो फ्रँचायझी दिली असेल, असं काय करता.
22 Jan 2015 - 3:02 pm | भुमन्यु
जबरी लिहिलंय.... आमच्या कडे याचे रिपीट एपिसोड्स पण बघितले जातात.
22 Jan 2015 - 7:58 pm | पैसा
त्यात काही वेगळं दिसतंय का बघत असतील!
22 Jan 2015 - 3:28 pm | सिरुसेरि
आदित्य नगरकरला काही बोलायचे नाही बरं का ... वा.........
22 Jan 2015 - 3:40 pm | कहर
महादेव नावाची सिरियल … सुरुवातीला छान वाटली पण त्यात नंतर तेच तेच राक्षस नवीन नवीन नावाने अवतरीत व्हायला लागले … आणि त्यातही बहुतेक बजेट कमी म्हणून कि काय प्रत्येक राक्षस शिवांश म्हणजे तो रोल पण मोहित रैना करणार …. म्हणजे त्याला महादेवचा अवतार म्हणावे कि राक्षस तेच कळायचे नाहि।… त्या मालिकेत महादेवाणे जसे असुरांचे marathon (WWE च्या भाषेत Royal Rumble Match ) संपवले तशीच ती मालिकाही अचानक मधेच संपवावी लागली …. (२४ वर्षे शिव शंकराचे अखंड स्मरण करणारा आमच्या जवळचा शिवभक्त सुद्धा कंटाळला म्हणे त्या महादेवाला । आता बोला )
22 Jan 2015 - 3:46 pm | कपिलमुनी
जय मल्हार मध्ये असलेला टॅब आणि व्हिडीओ कॉलिंग जबर्या !
आता मला कळला देवांना पृथवीकडे लक्ष द्यायला वेळ का नाहिये ते ;)
22 Jan 2015 - 4:21 pm | मोहनराव
22 Jan 2015 - 3:47 pm | अजया
एवढ्या लोकाना माहिती असलेलं काही मला माहित नसल्याचं दुःख झालंय.बघायला हव्या शिरियली.पण मग पुस्तकं वाचायला वेळ कसा मिळेल? काय विवंचना आहे!