ऑटीझम व ओसीडी ( ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर)

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture
स्वमग्नता एकलकोंडेकर in जनातलं, मनातलं
12 Jan 2015 - 11:32 pm

http://www.misalpav.com/node/26984
http://www.misalpav.com/node/26987
http://www.misalpav.com/node/26998
http://www.misalpav.com/node/27010
http://www.misalpav.com/node/27312
http://www.misalpav.com/node/29970
http://www.misalpav.com/node/29977
http://www.misalpav.com/node/29989
http://www.misalpav.com/node/29993
http://www.misalpav.com/node/30005
http://www.misalpav.com/node/30012

***********************************************

autismquote
ऑटीझम कमी की काय म्हणून बर्‍याचदा ऑटीझमबरोबर ओसीडी येतो. माझ्या मुलात बराच काळ असं काही दिसले नाही परंतू गेल्या वर्षभरात हळूहळू ओसीडीने शिरकाव केला आहे.
ओसीडी म्हणजे काय? तर ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर. नाव बोलकं आहे. कुठल्या तरी गोष्टीचे तसेच विचारांचे ऑब्सेशन तर त्या ऑब्सेशनच्या बरोबरीने येणारी एखादी कम्पल्सिव्ह कृती. अगदी क्लासिक उदाहरण म्हणजे, काही लोकांना घराबाहेर पडताना कुलूप लावलं की नाही याची खात्रीच वाटत नाही. त्यामुळे ते सारखे कुलूप लागले ना हे चेक करत राहातात. चुकून कुलूप लागले नाही तर हा विचार ऑब्सेशन व त्या ऑब्सेसिव्ह विचारापाठोपाठ येणारी कम्पल्सिव्ह कृती म्हणजे कुलूप ओढून ओढून पाहणे.
तुम्ही म्हणाल ३ अन ४ वर्षाच्या मुलात काय ओसीडी असणार? तेही ऑटीझम असलेल्या मुलाला? तर असू शकते. आमच्याकडे, मुलाने रात्री नीट झोपण्यासाठी मी रोज एकच टीशर्ट घालावा लागतो. तो शर्ट नसेल तर मुलाला अजिबात सुदींग वाटत नाही, झोपणं तर लांबची गोष्ट. सारखा तोच शर्ट वापरून व धूवून त्याचे अगदी मातेरं-पोतेरं झाले आहे. त्यामुळे मुलाला झोपवले की मी दुसरे कपडे घालते. कधी मुलाने रात्री उठून पाहीले तर तो ठराविक शर्ट दिसेस्तोवर झोपत नाही.
आपण देखील काही गोष्टी नकळतपणे सवयीने करत असतो. परंतू त्याची सवय या मुलाला अशी व इतकी लागेल याची कल्पना मला कधीच नाही आली. मुलाला कारसिटमध्ये बसवताना मी त्याला उजव्या दारातून बसवते. का? माहीत नाही कदाचित मलाही ते सोपे जात असावे. परंतू मुलाला इतकी सवय झाली आहे त्याची, की तो आता डाव्या सईडने बसूच शकत नाही. :( घराकडे जाताना अमुक एक रस्त्याने जायची इतकी सवय की, कधी चुकून दुसरा रस्ता घेतला की मागून आरडाओरडाअ सुरू होतो. इव्हिनिंग वॉकला रस्ता वेगळा घेतला की तँत्रम्स सुरू होतातच.
मुलाच्या समोर घरातील आर्टवर्क, खोटी झाडे हलवणे , त्यांच्या जागा बदलणे म्हणजे अगदी पाप. जोरजोरात किंचाळत तो त्या वस्तू आधीच जागेवर ठेऊन देईल. बर्‍याचदा त्याच्या वयाला / वजनाला झेपणारे नसते झाड वगैरे. पण इतकी त्याला निकड भासत असते त्या आधीच्या जागांवर वस्तू असण्याची.
चादर विस्कटणे, फरशीवर दुध्/पाणी सांडणे, लॉड्री बॅगचे झाकण नीट लावलेले नसणे, पाण्याच्या जारचे झाकण नीट नसणे या काही अजिबात सहन न होणार्‍या घटना आहेत माझ्या मुलाच्या दृष्टीने.
चित्र काढणे माझ्या मुलाला खूप आवडते. मग तो व्हाईट बोर्ड असो, भिंत असो वा हातपाय. अगदी तल्लिन होऊन चित्रकारी करतो. परंतू २ मिनिटात स्वच्छता मोहीम चालू. व्ह्हाईटबोअर्ड, भिंत हे ठिक आहे. परंतू हात पाय लगेच वेट वाईप्स (स्वतः) आणून पुसायचा प्रयत्न करतो. जमले नाही तर आम्हाला मदत मागतो.
हेच प्रतिबिंब त्याच्या खाण्यातही आले असावे. तो जे ४-५च पदार्थ खातो त्याचे कारण हेच ओसीडी असावे. अमुक एकच पदार्थ, अमुक एकच रस्ता, अमुक एकच पद्धत. अत्यंत रिचुअलिस्टीक वागणं.
हे जर असं त्याच्या मनाप्रमाणे नाही झाले तर टँट्रम्सना सामोरे जावे लागते. ट्रस्ट मी, ऑटीझम मुलाचे टँट्रम्स ही अतिशय सहन न होणारी गोष्ट आहे. आधीच बोलता येत नसल्याने संवाद खुंटला. त्याला काय सांगायचे आहे ते सांगण्यासाठी नुसतेच कर्कश ओरडणे व रडणे हातात उरते. त्याच बरोबर सेन्सरी इंटिग्रेशन इत्यदी मुळे जरा जवळ घेऊन, मिठी मारून समजावायला जावे तर अगदी शक्य नाही. कारण मूल जवळच येत नाही, अंग वेडेवाकडे फेकून द्यायचे, हात पाय झाडायचे.. ओचकारणे,चावणे हे ही होऊ शकते. मग समजवायचे कसे?
उपाय?
मला नक्की ठाऊक नाही. परंतू शक्य आहे तितके टँट्रमच्या रोलर कोस्टर राईडवर जाऊच नये. कारण साईन वेव्हप्रमाणे ती फेज सुरू झाली की पार सगळा डोंगर पार पाडेपर्यंत थांबावे लागते. विशेष काही करणे तेव्हा उपयोगाचे नसतेही.. एक तुम्हाला नक्की करता येईल. डोकं अत्यंत शांत ठेवणे. तितकाच शांत व न्युट्रल आवाज. या दोन गोष्टी इन फॅक्ट स्किल्स डेव्हलप केलेच पाहीजेत. त्याचा वापर करून जरातरी परिस्थिती आटोक्यात आणता येते.
तसेच एबीए थेरपिस्ट फ्लेक्झिबिलिटीवर रोज काम करतात. हळूहळू त्याचा उपयोग होईल.. फ्लेक्झिबल जसा जसा होत जाईल तो तसं तसं ओब्सेशन्स कमी होतीलच. तसेच औषधेही असतीलच यावर. आम्ही अजुन तरी त्या वाटेला गेलो नाही आहोत.
पण सगळ्या सोपं, साइड इफेक्ट्स नसणारं व फुकट एक सोल्युशन आहे. संवाद!
मी बर्याचदा आधीपासून त्याच्याशी बोलत जाते. आता आपण लेफ्टला जाणार इत्यादी. त्याला लेफ्ट राईट कळतं का मला माहीत नाही, पण मी त्याला सांगत असते. माझी खात्री आहे की त्याला सगळंच कळतं. त्यामुळे एकतर्फी का असेना भरपूर संवाद असणे हे गरजेचे आहे. समोरून काहीच न रिस्पॉन्स आल्याने कंटाळून, हळूहळू संवाद बंद होऊ शकतो. माझ्याकडूनही ही चूक सुरवातीला काही महिने होत होती. पण एबीए थेरपिस्टच्या मदतीने मी हळूहळू ती चूक सुधारली. आता मी इतकी बडबड करते माझ्या लेकाबरोबर. तोही कधीतरी जॉइन होईलच की माझ्या या जगावेगळ्या संवादात, या आशेवर... उम्मीदपे दुनिया कायम वगैरे वगैरे.. :)

समाजविचार

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 Jan 2015 - 11:40 pm | मुक्त विहारि

"तोही कधीतरी जॉइन होईलच की माझ्या या जगावेगळ्या संवादात, या आशेवर... उम्मीदपे दुनिया कायम..."

सहमत....

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

12 Jan 2015 - 11:58 pm | स्वमग्नता एकलकोंडेकर

एक आशेचा किरण :

हा लेख लिहून ६ महिने होतील. हा लेख लिहीण्याच्या सुमारास मी खूप वरीड होते, की हे ऑब्सेसिव्ह बिहेविअर कसं कमी करता येईल. मुलाच्या एबीए थेरपिस्टबरोबर मी बोलले. स्पेशली बाहेर पडल्यावर अमुक एकच रस्ता फॉलो करायचा, मी सारखा तो एकच स्पेसिफिक शर्ट घालायचा या गोष्टी खूप बॉदरसम वाटत होत्या मला. एबीए थेरपिस्ट, प्रोग्रॅम मॅनेजर यांनी प्रोग्रॅम्स मध्ये बदल करून - फ्लेक्झिबिलिटी वाढवणे हा मेन कार्यक्रम ठरवला. रोज बाहेर घेऊन जायचे व कम्पल्सरी वेगवेगळे रस्ते ट्राय करायचे असं करून आता तो बाहेर पडल्यावर बराच शांत असतो. :)
तसेच त्या माझ्या स्पेसिफिक शर्टबद्दलः मी बेडरूमच्या दाराला एक लॅमिनेट चिकटवून ठेवले. बेडटाईम रुटीनः व त्यात अंघोळ, मसाज, रीड अ बुक,ललाबाय्ज याच्याबरोबर माझ्या त्या ग्रीन शर्टबद्दल लिहीले. मुलाने तो शर्ट घालायचा आग्रह करायला लागला की त्याला सौम्य आवाजात समजवायचे की इट'स नॉट बेडटाईम यट. बेडटाईमला ममा विल वेअर दॅट शर्ट. असं करून करून आता निदान झोपायच्या आधीपर्यंत तो थांबतो.
बराच फरक पडला या बाबतीत त्याच्यात. नवनवीन क्वर्क्स उपटतातच मात्र आता आम्ही तितके हवालदील होत नाही. कारण एकेकाळी हा रोज बाहेर पडल्यावर टँट्रम्स थ्रो करणार की काय अशी भिती जी वाटायची त्यातून बाहेर पडू शकलो सहीसलामत. कॉन्फिडन्स वाढला त्यामुळे.

सखी's picture

13 Jan 2015 - 12:18 am | सखी

वाचते आहे. प्रत्येक लेखाबरोबर तुमच्या पिल्लाला अनेक आशिर्वाद आणि तुम्हाला शुभेच्छा! जसं की तुमची वरची पोस्ट तुमचा कॉन्फिड्न्स वाढला - हे वाचुन बरं वाटलं. तुमचे यावरचे सर्वच लेख सोपे आणि अतिशय सकारात्मक आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2015 - 12:27 am | डॉ सुहास म्हात्रे

छान लिहीत आहात... लिहीत रहा. पुभाप्र.

वाचतिये. आता वागण्यात फरक पडू पाहतोय म्हणून बरे वाटले.

सविता००१'s picture

13 Jan 2015 - 12:42 pm | सविता००१

लिहिता आहात. तुमच्या इतक्य अथक प्रयत्नांमुळे आणि तुमच्य अतिशय सकारात्मक विचारसरणीमुळे नक्कीच तुमच्या पिल्लात खूप सुरेख फरक पडेल.

टवाळ कार्टा's picture

13 Jan 2015 - 1:13 pm | टवाळ कार्टा

_/|\_

सो बेसिकली नो सरप्राईझेस..

आनन्दा's picture

13 Jan 2015 - 3:11 pm | आनन्दा

बाय द वे, या तुमच्या टेक्निक्स केवळ ऑटिस्टिक नव्हे तर सार्‍याच लहान मुलांना सांभाळताना उपयोगी पडणार्‍या आहेत.

झकास's picture

14 Jan 2015 - 8:47 am | झकास

अगदी सहमत !

पदम's picture

14 Jan 2015 - 11:17 am | पदम

तुमच्या या प्रयत्नाना लवकरच यश येइल. तुमच्या सहनशीलतेला सलाम.

सस्नेह's picture

14 Jan 2015 - 11:28 am | सस्नेह

उपाय? मला नक्की ठाऊक नाही. परंतू शक्य आहे तितके टँट्रमच्या रोलर कोस्टर राईडवर जाऊच नये.

सहमत. एक उपाय सुचवू शकते. मुलाच्या OCD बिहेविअर कडे दुर्लक्ष केल्यासारखे दाखवणे आणि मूल ज्या गोष्टी वारंवार करते त्याच गोष्टी आपण त्याच्यासमोर योग्य पद्धतीने (आणि फ्रिक्वेन्सीने ) करत राहणे. ही मुळे नकळत आपल्याला ऑब्झर्व्ह करत असतात. त्यांना थेट सांगू नये किंवा सरळ पाहू नये पण सहजपणे किंवा अप्रत्यक्षपणे योग्य पद्धत दाखवून द्यावी.

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

14 Jan 2015 - 10:24 pm | स्वमग्नता एकलकोंडेकर

मला नीटसं कळलं नाही. तो ज्या गोष्टी वारंवार करत आहे म्हणजे रिपिटेटिव्ह बिहेविअर का? ते आपण केल्याने ओसीडी बिहेविअर कसे कमी होईल?
शिवाय माझा मुलगा ऑब्झर्व करतो मात्र फार कमी वेळा. ९०% वेळेस तो प्रचंड हायपर व पळापळी करत असतो. ही डझन्ट रिअली लुक अ‍ॅट यू, ऑर पे अटेन्शन टू व्हॉट यु आर डुईंग ऑर रिस्पाँड टू हिज नेम. :(
सध्या लेखातली लक्षणं कमी झाली आहेत, अपवाद कधीतरी मला अजुनही तो हिरवा शर्ट घाल म्हणून दिवसा गोंधळ घालतो. पण नवीन म्हणजे, सोफ्याचा एक कोपरा त्याने त्याचा ठरवून घेतला आहे. तिकडे सगळी पेनं,मार्कर्स, कागद काय काय गोळा करून बसतो. तिकडे आम्ही बसलेलं चालत नाही त्याला. चाललं आहे त्याला हळूहळू समजवणे.