अभिव्यक्ती

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
10 Jan 2015 - 6:44 pm

आपल्या देशात प्राचीन काळापासूनच अभिव्यक्तीच्या स्वतंत्रतेला महत्व दिल्या गेले आहे.नास्तिक चार्वकला सुद्धा ऋषी म्हणून संबोधित केले आहे. भांड, तमाशा इत्यादी लोकनाट्यात देवी देवतांवर टिप्पण्या केल्याच जातात आणि लोक ही ते सहजतेने घेतात. कुणालाही वाईट वाटत नाही. संत कबीर सारख्यांनी तर निंदकाचे स्वागतच केले आहे.त्यांनी म्हंटले आहे,

निंदक नियरे राखिए, ऑंगन कुटी छवाय।
बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय।।

हिंदू -मुसलमान दोन्ही धर्मांत पसरलेल्या अंध विश्वासांवर कबीर ने चौफेर हल्ला चढविला होता, काही उदाहरणे:

पाहन पुजे तो हरि मिले, तो मैं पूजूँ पहाड़।
ताते या चाकी भली, पीस खाए संसार।।

कॉंकर पाथर जोरि कै, मस्जिद लई बनाय।
ता चढ़ मुल्‍ला बॉंग दे, बहिरा हुआ खुदाए।।

एवढे असूनही, त्या वेळी हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मांच्या लोकांनी, कबीरला संत म्हणून स्वीकारले. आज तेवढी ही सहनशीलता आपल्यात नाही. आज दुष्ट प्रकृतीचे लोक स्वत:ला 'धर्मगुरू' म्हणवितात आहे. जर सैतानांनी, धर्मगुरुंचे रूप धारण केले तर त्यांना आपल्या विरुद्ध कोणी काही म्हंटलेले कसे आवडेल. दुष्ट प्रकृतीच्या लोकांना निंदा सहन होत नाही. त्यांच्या विरोधात उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला ते दाबण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना कळले पाहिजे व्यक्तीची हत्या केल्याने त्याचे विचार नष्ट होत नाही. प्रभू येशू क्रिस्त यांना सूळीवर चढविले. पण त्यांचे विचार नष्ट झाले नाही. अपितु ते जगभर पोहचले. धर्म जात आणि पंथ नावाच्या खाली आज अभिव्यक्तीला दाबण्याचा प्रयत्न होतो, आपण त्याचा निषेध केला पाहिजे. काही महिन्यांपूर्वी अभिव्यक्ती या विषय वर कविता लिहिली होती. पुन्हा ती कविता, थोडी बदलून

अभिव्यक्ती
कानात बोलली
छाटून टाकली
जीभ तिची.

अभिव्यक्ती
शब्दात वाचली
जाळून टाकली
पुस्तके ती.

अभिव्यक्ती
रेषांत दिसली
छाटून टाकले
हात ते.

नराधम राक्षसाना
वाटते सदा भीती
सत्याची.
अभिव्यक्तीची

समाजविचार

प्रतिक्रिया

राही's picture

10 Jan 2015 - 7:04 pm | राही

खरे आहे.

कोंबडी प्रेमी's picture

10 Jan 2015 - 7:13 pm | कोंबडी प्रेमी

दादागिरी ज्याची अभिव्यक्ती विषयीचे नियम त्याचे
बळी तो कान पिळी
सत्ते पुढे शहाणपण नाही