लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
8 Jan 2015 - 9:22 am

लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!

आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने
रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने

अभ्यास चिंतनाला शास्त्रात घोळवावे
कसदार शब्दशेती फुलण्यास लेखणीने

वास्तव चितारण्याची अवगत कला करावी
भक्कम नवीन पाया रचण्यास लेखणीने

नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने

भाकड-वृथा कथांच्या कक्षेपल्याड जावे
अभिजात सृजनाला पुजण्यास लेखणीने

लटकी-पुचाट वाणी शिरजोर होत आहे
यावे रणात गच्ची धरण्यास लेखणीने

जेव्हा चहूदिशांनी वादळ विराट तेव्हा
द्यावे अभय दिव्याला जळण्यास लेखणीने

                             - गंगाधर मुटे 'अभय'
--------------------------------------------------

अभय-गझलमराठी गझलगझल

प्रतिक्रिया

सुनील's picture

8 Jan 2015 - 9:52 am | सुनील

कालच्या पॅरिस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाचनात आलेला हा अग्रलेख.

सोडून शेतकीचे आवेशपूर्ण गाणे!
स्वीकारतोच आता शहरी काव्य-लेणे!!
गाऊन दाखवीन असे सुरेल गाणे !
आता दिसेल तुम्हा साक्षात चांदणे !!
नकोच खप्प मर्जी तुमच्या संपादकाची!
पुरवीन आस आता गाऊन गाणी तुमची!!
लागे न माळ आता शहरी प्रतिसादकाची !
मिळ्वीन पूर्ण खात्री माला आता कौतुकाची !!
पुरेत हे प्रहार शिणलो प्रतिवाद करता!
आता हवेत हार -साठी कवन करता !!
मुटे कुल-सुताची ही स्वीकार मुक्त कविता!
आवडेल नक्की तुजला थांबतो नक्की आता !!

ओ मुटे , ह. घ्या , भांडायला येऊ नका !

अन्या दातार's picture

8 Jan 2015 - 4:04 pm | अन्या दातार

तुमची कविता मी 'गे माय भू तुझे मी' च्या चालीवर म्हणून बघितली. ठिक बसतीये मीटरमध्ये :)

टवाळ कार्टा's picture

8 Jan 2015 - 4:56 pm | टवाळ कार्टा

सुखकर्ता-दुखःहर्ता ची चाल जास्त फिट्ट बसते ;)

गंगाधर मुटे's picture

8 Jan 2015 - 6:20 pm | गंगाधर मुटे

गे माय भू तुझे मी
हे राष्ट्र देवतांचे
आणि ही गझल एकाच वृत्तात (आनंदकंद) आहे. त्यामुळे चाल समान आहे.

वैभव जाधव's picture

8 Jan 2015 - 6:24 pm | वैभव जाधव

"अए दिल मुझे बता दे, तू किस पे आगया है" ह्याच्या चालीवर बसतेय बरोबर.

काळा पहाड's picture

8 Jan 2015 - 7:01 pm | काळा पहाड

"आठशे खिडक्या नऊशे दारं" ही चाल पण चालेल.

सतिश गावडे's picture

8 Jan 2015 - 7:16 pm | सतिश गावडे

अल्ताफ राजाच्या "तुम तो ठेहरे परदेसी" गाण्यातील "अब याद आ रहा हैं वो माहे जनवरी था" या चालीवरही परफेक्ट जमतंय.

मी तर 'या गो दांड्यावरना नवरा कुणाचा येतो' च्या चालीवर पण गाऊन पाह्यलं. पर्फेक्ट!!

आदूबाळ's picture

8 Jan 2015 - 8:17 pm | आदूबाळ

याचा अर्थ "हे राष्ट्र देवतांचे" हे "या गो दांड्यावरना" या चालीतही म्हणता येईल!

विटूकाका आणि इतरांची क्रिएटिविटी जबरदस्त आहे!

गंगाधर मुटे's picture

8 Jan 2015 - 8:40 pm | गंगाधर मुटे

@वैभव जाधव,
"ये दिल मुझे बता दे, तू किस पे आगया है" या गीतात थोड्याफार मात्रा कमी जास्त आहेत पण या ओळींची जवळीक आनंदकद या वृत्ताशी आहे. :)

प्रसाद गोडबोले's picture

8 Jan 2015 - 5:21 pm | प्रसाद गोडबोले

मला वाटतय ,

मुटे सरांच्या मागील धाग्यातील प्रतिसादातील ज्ञानयज्ञामुळे पब्लिक इथे प्रतिसाद द्यायचं टाळतय , दुष्ट कुठले :-\

ह्यानिमिताने शेतकर्‍यांच्या कवितांना किमान ३० प्रतिसादांचे पॅकेज द्यावे असे मी संपादक मंडळाला आवाहन करीत आहे :D

खटपट्या's picture

9 Jan 2015 - 1:04 am | खटपट्या

नवीन लेखकांना देखील असे ५० प्रतीसादांचे पॅकेज मिळावे अशी जोडमागणी करत आहे.

कपिलमुनी's picture

8 Jan 2015 - 7:15 pm | कपिलमुनी

लेखकाचा प्रत्येक धागा वेगळी कलाकृती / लेखन म्हणून घ्यावा .
बाकीच्या धाग्यांवरचे पडसाद इतरत्र नसावेत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2015 - 8:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत....! कवितेवर प्रतिसाद अपेक्षित.
बाकी मुटेंची रचना आवडली.

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

9 Jan 2015 - 11:35 am | प्रसाद गोडबोले

ओके .

पॉईट टेकन :)

एस's picture

8 Jan 2015 - 8:15 pm | एस

नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने

ह्या ओळी आवडल्या. पण कदाचित जिथे अशी अनुकूल परिस्थिती नाही तिथेही नव्या ज्ञानाच्या जोपासनेसाठी मशागत करणे हेही लेखणीचेच काम म्हटले पाहिजे.

कविता छान आहे. पुलेशु.

गंगाधर मुटे's picture

10 Jan 2015 - 4:43 pm | गंगाधर मुटे

सहमत.

आयुर्हित's picture

8 Jan 2015 - 8:25 pm | आयुर्हित

अभिजात सृजनासाठी लागणाऱ्या मशागतीसाठी शुभेच्छा.

गंगाधर मुटे's picture

10 Jan 2015 - 4:44 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद सर. आभारी आहे.

वेल्लाभट's picture

9 Jan 2015 - 11:25 am | वेल्लाभट

वा वा वा वा !

जाम आवडली ! क्या बात ! सहीच.....

गंगाधर मुटे's picture

10 Jan 2015 - 4:44 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद सर. आभारी आहे.

पैसा's picture

11 Jan 2015 - 2:07 pm | पैसा

छान कविता!

सस्नेह's picture

11 Jan 2015 - 9:42 pm | सस्नेह

धन्यवाद मॅडम. आभारी आहे.

गंगाधर मुटे's picture

13 Jan 2015 - 9:40 am | गंगाधर मुटे

धन्यवाद मॅडम. आभारी आहे.

खुप वर्षानी आपली कविता वाचली. मस्त वाटली पुर्वी सारखीच

गंगाधर मुटे's picture

25 Jan 2021 - 3:36 pm | गंगाधर मुटे

न्यावा शिवाररानी जागर सरस्वतीचा
ईडापिडा अव्यक्ती पुरण्यास लेखणीने