वय सोळावं सरलं की.....

अनिरुद्ध अभ्यंकर's picture
अनिरुद्ध अभ्यंकर in जे न देखे रवी...
11 Aug 2008 - 3:35 am

वय सोळावं सरलं की
सगळं हिरवं दिसू लागत
स्वतःभोवती गिरकी घेत
मनात पाखरू वसू लागत

वसंताच्या बागेमध्ये
चाफा केवडे फुलू लागतात
फुलां भोवती पिंगा घालण्या
भवरे ही जमू लागतात
न बोलता प्रत्येकाला
सार काही कळू लागत
वय सोळावं सरलं की.....

पुनवेच्या रातीला
सागराला भरती येते
क्षितिजावर आकाशाला
भेटायला धरती येते
प्रेमाची ही आगळी भाषा
प्रत्येकजण बोलू लागत
वय सोळावं सरलं की.....

पहिला वाहिला पाऊस अन
पहिली वाहिली प्रीत असते
प्रत्येकाच्या ओठांवरती
धुंद एक गीत असते
ओलाचिंब मन तेव्हा
वार्‍यावर झुलू लागत
वय सोळावं सरलं की.....

हिरव्या हिरव्या पानांमध्ये
सळसळणार वारं असत
तुझ्या डोळ्यांच्या नजरबंदीत
शब्दांवाचून सारं असत
स्पर्शामधून एक नवं
गाणं मनी रुजू लागत
वय सोळावं सरलं की....

-अनिरुद्ध अभ्यंकर

कविता

प्रतिक्रिया

एकदम साध्या सोप्या शब्दांचं, नवथर प्रितीचं गाणं सुरेखच आहे.

चतुरंग

स्वाती दिनेश's picture

11 Aug 2008 - 12:01 pm | स्वाती दिनेश

नवथर प्रितीचं गाणं सुरेखच आहे.
आवडले.
स्वाती

पिवळा डांबिस's picture

11 Aug 2008 - 4:35 am | पिवळा डांबिस

वसंताच्या बागेमध्ये
चाफा केवडे फुलू लागतात
फुलां भोवती पिंगा घालण्या
भवरे ही जमू लागतात
न बोलता प्रत्येकाला
सार काही कळू लागत
वय सोळावं सरलं की.....

क्या बात है!!

पिसाट वारा मदनाचा,
पतंग उडवी पदराचा,
तोल सुटावा अशी वेळ ही,
तरी चालणं ठेक्याचं
सोळावं वरीस धोक्याचं गं...
याची आठवण करून दिलीत...
जियो!

सर्किट's picture

11 Aug 2008 - 8:55 am | सर्किट (not verified)

वय चाळीसावं
सरलं की
सगळंच पिवळं
दिसू लागतं

पँक्रियाजचा होतो भुगा
इन्सुलिन कमी कमी
व्हायला लागतं

चाला मुलांनॉ, लिहा, मला आता वेळ नाही !

अनिरुद्ध शेठ,

कविता आवडली, हे सांनल !
- सर्किट

विसोबा खेचर's picture

11 Aug 2008 - 9:02 am | विसोबा खेचर

छान, सुंदर, सुरेख, अप्रतीम, कविता... :)

तात्या,
इयत्ता अकरावी. :)

मृगनयनी's picture

11 Aug 2008 - 9:54 am | मृगनयनी

खूपच सुंदर....

वर काव्यात उल्लेखलेला प्रसंग माझ्याबाबतीत २ वर्षांपूर्वी च घडला.......:)

ईश्श्स्श्श......
(मी लाजले..)

--***मृगनयनी.***--

प्रकाश घाटपांडे's picture

12 Aug 2008 - 3:17 pm | प्रकाश घाटपांडे

लाजु नको वली! समद्यांच च तस्ल व्हतयं! आता कोन हा म्हन्तय कोन नाय म्हन्तय यवढचं. नाय म्हन्नारे ख्वॉट बोलत्यात वली!
फड सांभाळ तुर्‍याला ग आला....
प्रकाश घाटपांडे

मनीषा's picture

11 Aug 2008 - 11:54 am | मनीषा

कविता आवडली ...

पुनवेच्या रातीला
सागराला भरती येते
क्षितिजावर आकाशाला
भेटायला धरती येते
प्रेमाची ही आगळी भाषा
प्रत्येकजण बोलू लागत
वय सोळावं सरलं की.....

हिरव्या हिरव्या पानांमध्ये
सळसळणार वारं असत
तुझ्या डोळ्यांच्या नजरबंदीत
शब्दांवाचून सारं असत
स्पर्शामधून एक नवं
गाणं मनी रुजू लागत
वय सोळावं सरलं की....

खुप छान ...

बेसनलाडू's picture

11 Aug 2008 - 12:04 pm | बेसनलाडू

हिला कविता नाही,गाणे म्हणावेसे वाटले. गाणे आवडले. छान!
(आस्वादक)बेसनलाडू
प्रेमात पडल्यावर निसर्ग,पानेफुले,चंद्रचांदण्या,डोळे-शब्द - वरणभात, घरदार, नोकरीचाकरी सोडून काय काय डोक्यात येतं तद् माताय ;)
(प्रेमवीर)बेसनलाडू

सचिन पवार's picture

11 Aug 2008 - 4:45 pm | सचिन पवार

:X हि कविता वाचलि आणि आवडली :P ;)

अमोल केळकर's picture

11 Aug 2008 - 4:50 pm | अमोल केळकर

वा गुरुजी
मस्तच रचना
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

पद्मश्री चित्रे's picture

11 Aug 2008 - 5:08 pm | पद्मश्री चित्रे

पाडगावकरांची 'बोलगाणी" आठवली...
सहज्-सुन्दर रचना

धनंजय's picture

11 Aug 2008 - 7:16 pm | धनंजय

त्या वयातल्या नवथर जाणिवांचे तरल वर्ण आहे.

कविता आवडली.

प्राजु's picture

11 Aug 2008 - 7:31 pm | प्राजु

खूप साध्या शब्दांत नेमके भाव पकडले आहेत.
अभिनंदन
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

12 Aug 2008 - 10:24 am | मदनबाण

सुंदर कविता..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

श्रीकृष्ण सामंत's picture

12 Aug 2008 - 10:36 am | श्रीकृष्ण सामंत

अभ्यंकरजी,
कविता फारच आवडली.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

राघव१'s picture

12 Aug 2008 - 6:59 pm | राघव१

छानच आहे. कुणालाही आवडेल अन् आपलीशी वाटेल अशी! :X

लिखाळ's picture

12 Aug 2008 - 8:07 pm | लिखाळ

छान कविता..
पाडगावकरांच्या बोलगाण्यांची आठवण झाली..
--लिखाळ.

संदीप चित्रे's picture

13 Aug 2008 - 1:04 am | संदीप चित्रे

>> पुनवेच्या रातीला
सागराला भरती येते
क्षितिजावर आकाशाला
भेटायला धरती येते

मस्तच ... खूपच आवडली कविता :)