मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वय सोळावं सरलं की.....

अनिरुद्ध अभ्यंकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
वय सोळावं सरलं की सगळं हिरवं दिसू लागत स्वतःभोवती गिरकी घेत मनात पाखरू वसू लागत वसंताच्या बागेमध्ये चाफा केवडे फुलू लागतात फुलां भोवती पिंगा घालण्या भवरे ही जमू लागतात न बोलता प्रत्येकाला सार काही कळू लागत वय सोळावं सरलं की..... पुनवेच्या रातीला सागराला भरती येते क्षितिजावर आकाशाला भेटायला धरती येते प्रेमाची ही आगळी भाषा प्रत्येकजण बोलू लागत वय सोळावं सरलं की..... पहिला वाहिला पाऊस अन पहिली वाहिली प्रीत असते प्रत्येकाच्या ओठांवरती धुंद एक गीत असते ओलाचिंब मन तेव्हा वार्‍यावर झुलू लागत वय सोळावं सरलं की..... हिरव्या हिरव्या पानांमध्ये सळसळणार वारं असत तुझ्या डोळ्यांच्या नजरबंदीत शब्दांवाचून सारं असत स्पर्शामधून एक नवं गाणं मनी रुजू लागत वय सोळावं सरलं की.... -अनिरुद्ध अभ्यंकर

वाचन 5175 प्रतिक्रिया 0