१५ फेब्रुवारी, मिपा संमेलन...कशेळी, कर्जत

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
1 Jan 2015 - 1:34 pm

मिपाकरांनो,

प्रथमतः नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

आधीचा धागा (http://www.misalpav.com/node/29818)

ठरल्यापरमाणे मिपा संमेलन कशेळी, कर्जत जवळ होणार आहे.

पुण्याहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.इस्पिक एक्का आणि वल्ली, ह्यांच्या संपर्क साधावा.

मुंबईहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.कंजूस, श्री. नूलकर किंवा अजया ज्यांच्याशी संपर्क साधावा.

ह्या संमेलनाचे एक खास वैशिष्ट म्हणजे, श्री. नुलकर आपल्याला "ओरीगामी"ची ओळख आणि काही प्रात्यक्षिके पण दाखवणार आहेत.

मी आणि आम्ही काही मिपाकर १४ता. रात्री पासूनच संमेलनाच्या ठिकाणी असूच.

नविन वर्षाच्या सुट्ट्या हातात असल्याने आणि बरेच दिवस म्हणजे तब्बल ४५ दिवस आधीच कल्पना दिल्याने, आरक्षण आणि प्लॅनिंग करायला जड जायला नको.

आता माझा ह्या धाग्याशी संबंध संपला.

तरीपण काही मदत लागली तर अवश्य कळवा.

अरे हां..महत्वाची गोष्ट......

प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे.

ठिकाण :वनविहार ,
ही एक फलोद्यान सहकारी(बागाईत शेतीचे प्लॉट) संस्था आहे. त्यात राहणे, जेवण इत्यादिची व्यवस्था एका प्लॉटमध्ये आहे. श्री शिवाजी ते करतात.
काय आहे: लेणी(विहार), नदी, वन, मागे भिमाशंकर डोंगर, जवळ कोथळीगड (पेठचा किल्ला).
प्रवेश फी :नाही.
जेवण :नाश्ता, चहा, जेवण (वेज नॉनवेज).
पार्किँग :भरपूर.
राहणे :तीन खोल्या ४०० ते६००रु.
संपर्क 9226093034 शिवाजी
0214683313
जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार.
पुण्याच्या मिपाकरांना १२ ते ४ इतका कट्ट्यावर वेळ मिळेल.
पुण्याकडून :सकाळची सह्याद्री थेट नेरळलाही थांबते. १०.००वाजता तिथून रिक्षा करून जागेवर ११.३०होतील. परत जाण्यासाठी कर्जतहून ६.००प्रगति/ डेक्कन क्वीन मिळेल.
मुंबईकडून :नेरळसाठी खूप लोकल ट्रेनस आहेत.
कोणीही अगोदर जाऊन खात्री करू शकता.
राजमाचीवरून कोंडाणेला उतरल्यावरचे श्री अनिल/वसंत गोगटे यांचे वनविहार वेगळे आहे. तिथे आता त्यांनी एक अंबेजोगाईचे देउळ बांधले आहे.
कर्जत-कशेळे-मरबाड या रस्त्याला नेरळ -कशेळे -जामरुघ रस्ता क्रॉस जातो. कशेळेहूनच आणखी एक रस्ता खांडस (भिमाशंकरसाठी)जातो.

मौजमजामाहिती

प्रतिक्रिया

गवि's picture

23 Jan 2015 - 7:54 am | गवि

वल्ली.. पुरेल का?

बादवे वर्क फ्रोम होम वगैरे चालत नाही का एखाद्या रविवारी ?

प्रचेतस's picture

23 Jan 2015 - 8:25 am | प्रचेतस

नै ना. :(

आंबिवली लेणी माहीत आहेत पण ह्यावेळी जमणे अशक्य दिसत्ये.

चौकटराजा's picture

23 Jan 2015 - 7:32 pm | चौकटराजा

इजिप्त या देशात आस्वान धरण होणार म्हणून अबु सिम्बेलचे देवालय पूर्ण फोडून ते साडेतीनशे फूट उंच जागेवर नेले आहे. त्या तंत्रज्ञाना बोलावून वेरूळ अबिम्वली येथे शिफ्ट करा. वल्ली कंपनीच्या कारने कट्ट्याला येणार ! साहेबाना घेउन येणार !

खात्रीचा खबऱ्या पाठवत आहेत ना वल्ली. तो गुंफेत ओऽम म्हणून रिपोर्ट पाठवणार आहे. त्यामुळे सध्या पाकिट सलामत तो पांडवलेणी पचास.

इथे नदीकाठी ५०X५० फुट विहार आहे मूर्ती नाहीत. शिलालेख नाहीत. भिमाशंकर पेठ ट्रेकरांचे विरंगुळा ठिकाण आहे.

कशेळी कट्टा संयोजन : पुणे आणि पिंपरी-चिंचवड

कशेळी येथील कट्ट्याला पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथून येणार्‍या मंडळींचे संयोजन श्री चौकटराजा साहेब करणार आहेत.
त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अनेक धन्यवाद.

लवकरच ते याबाबत सभासदांशी या धाग्यावर संवाद साधतील.

सभासद त्यांना पूर्ण सहकार्य देतील याची खात्री आहेच, त्यासाठी सर्वांना आगाऊ धन्यवाद !

चौकटराजा's picture

29 Jan 2015 - 12:41 pm | चौकटराजा

नेरळ ते कशेळे व कशेळे ते आंबिवली या अंतरावर किती सहज व मोठ्या प्रमाणात वहातुक चालू असते. त्या बद्दलची नक्की माहिती कुणास आहे का ? तसे नसेल तर जे काही पुणेकर येणार असतील. त्यानी एक मोटर पुण्याहुन करावी त्याला मी व इतर चिंचवड वासी आमचे येथून सामील होउ. मी खरे तर दुचाकीवरून चिंचवड ते आंबिवली जाणार होतो. पण परत येताना अंधार पडला तर पंचाईत नको म्हणून तो बेत मी रद्द केला. पण पुणेकरानी एकजूट केल्यास येता जाता धमाल मजा करीत जाता येता येईल. त्यासाठी येणार्‍यांची नक्की यादी करण्यासाठी मला व्यनि करावा. व यादी पक्की झाल्यास पुण्यातीलच एकाकडे मोटर निवडण्याची जबाबदारी द्यावी. पाहू या कसे जमते ते !

प्रचेतस's picture

29 Jan 2015 - 6:29 pm | प्रचेतस

अत्रुप्तजी आत्मा हे येणारच आहेत.

पुण्याकडून वाहनाने येण्याचा मार्ग दिलेला आहे. कर्जत-कशेळे आणि कशेळे-आंबिवली यावर अगदीच तुरळक वाहतूक असते.

चौकटराजा's picture

30 Jan 2015 - 10:30 am | चौकटराजा

पुण्याकडून वाहनाने येण्याचा मार्ग दिलेला आहे. कर्जत-कशेळे आणि कशेळे-आंबिवली यावर अगदीच तुरळक वाहतूक असते. याचा अर्थ आपण असा घेउ शकतो की वाई येथून पाचगणी येथे जाण्यासाठी एस टी बस नाही मिळाली तरी अडत नसे. जुन्या मोठ्या डॉज पंपं तिथे सर्रासपणे ट्याक्स्या म्हणून मिळत असत. तसे इथे सिक्स सिटरचे नसेल तर हु दे खर्च्व्च पण सुरक्षित घरी येउ असा बेत करून खाजगी गाडीनेच जाणे श्रेयस्कर. पण त्यासाठी ३०० किमी चे भाडे द्यावे लागेल. काय करावे ?

जेपी's picture

30 Jan 2015 - 10:32 am | जेपी

लक्ष आहे माझे.

सुधीर जी's picture

30 Jan 2015 - 3:36 pm | सुधीर जी

मि येनार आहे
मुबंईहुन

कंपणीतील ट्रेनिंगमुळे मला येणे शक्य नसल्याने खेद व्यक्त करतो.
कृपया माझे बुकिंग कॅन्सल किंवा नविन कोणाला यायचे असल्यास त्याला देवु शकताल का ?

क्षमस्व
गणेशा

संदीप डांगे's picture

4 Feb 2015 - 3:52 am | संदीप डांगे

मला ह्या कट्ट्याला यायचे आहे. १४ रात्रिपासुन. आता नाव नोंदवले तर चालेल काय?

मुक्त विहारि's picture

4 Feb 2015 - 3:55 am | मुक्त विहारि

पण तुम्ही पुण्याहून येणार की? मुंबई हून...

संदीप डांगे's picture

4 Feb 2015 - 4:14 am | संदीप डांगे

नाशिकवरुन कल्याण. कल्याणवरून बसने किंवा रेल्वे ने नेरूळ, मग तिथून शेअर रिक्षा. बरोबर ना?

मुक्त विहारि's picture

4 Feb 2015 - 4:41 am | मुक्त विहारि

ह्यांना विचारायला पाहिजे.आम्ही त्यांचे बोट पकडूनच गेलो होतो.

बादवे,

ते "नेरूळ" नसून "नेरळ" आहे.

संदीप डांगे's picture

4 Feb 2015 - 4:45 am | संदीप डांगे

हो. नेरळ.

संदीप डांगे's picture

4 Feb 2015 - 4:53 am | संदीप डांगे

कशेळे माहिती आहे. कधी गेलो नाही पण सदर परिसराची नकाशा माहिती आहे.

खाली दिलेला मार्ग योग्य आहे.
जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार.

संध्याकाळी किती वाजेपर्यंत पोचावे?

येत्या शनिवारी किंवा रविवारी फायनल प्रोग्राम ठरेल.

मग सोमवारी तसा धागा काढूच.

म्हणजे कल्याण-मुंबई हून येणार्‍या मिपाकरांची गैर सोय होणार नाही.

संदीप डांगे's picture

4 Feb 2015 - 5:10 am | संदीप डांगे

फारच छान.
पेट्रोल थोडे स्वस्त झाले आहे. त्यामुळे कार घेऊन येणेसुद्धा परवडेल असे वाटते आहे. :-)
कार कि रेल्वे हे नेमक्या वेळी ठरेल

सुबोध खरे's picture

14 Feb 2015 - 12:00 am | सुबोध खरे

मग शेवटी कोण कोण येत आहेत आणि कोणी कोणी शेंडी लावली ?

संदीप डांगे's picture

14 Feb 2015 - 12:30 am | संदीप डांगे

मी येत आहे पण रविवारी सकाळी...

मुक्त विहारि's picture

14 Feb 2015 - 6:22 am | मुक्त विहारि

स्टेशनवर येत आहे...

मुक्त विहारि's picture

14 Feb 2015 - 7:22 am | मुक्त विहारि

आमची अर्धांगिनी पण येत आहे...

अत्रुप्त आत्मा's picture

14 Feb 2015 - 7:35 am | अत्रुप्त आत्मा

मी , चौकट राजा, समीर२०, आणि अन्या दातार .. असे पुण्याहून कारनी येत आहोत. (१५ तारखेला,भल्या पहाटे निघणार अ
आहोत. )अजुन १ सिट खाली आहे. कुणाला यायचे असल्यास जॉइन होउ शकतो . :)