वेळेवर अलार्म झाला, कोंबडा कानि ओरडला,
पाऊसही आला मजला, उठवण्या ||१||
आवरले मग वेगात, आंघोळ उरकली झटपट,
धावलो बॅगसह पटपट, स्टेशनी ||२||
गाडी न थांबली पूर्ण, तरि कुदलो आतच थेट,
बैसण्यास 'विंडो सीट', मिळविली ||३||
अजिबात हले ना गाडी, स्टेशनात होई 'शोर',
गाडीस मिळेना जोर, धावण्या ||४||
पाऊस वाढला फ़ार, आतले प्रवासी गप्प,
'सेंट्रल'चे धंदे ठप्प, जाहले ||५||
एक तास थांबुन आत, मग मुकाट जागा सोडत,
पकडली घराची वाट, सगळ्यांनी ||६||
माझा जो झाला पोपट, कविता त्याचीच करून,
'पावा'त दिली 'मिसळू'न, चाखण्या ||७||
प्रतिक्रिया
11 Aug 2008 - 8:45 am | विसोबा खेचर
मस्त रे! झक्कास कविता... :)
आपला,
(पाऊसप्रेमी मुंबईकर) तात्या.
11 Aug 2008 - 12:42 pm | अजिंक्य
धन्यवाद, तात्या!
मी असा अधूनमधून आपली लेखनक्षमता आजमावून पाहत असतो...
प्रतिसाद मिळाल्यावर बरं वाटतं.
(आणि पुढील लेखन करण्यासाठी उभारीही येते!)
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.
11 Aug 2008 - 2:24 pm | पावसाची परी
अजिन्क्य
अतिशय सुन्दर ........खुप खुप आवडली
मस्तच रे
12 Aug 2008 - 4:32 pm | अजिंक्य
मनापासून आभार, पावसाची परी.....
माझ्या पुढील लेखनास असाच प्रतिसाद द्याल, अशी आशा!
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.