भारतात "पीके"च्या निमित्ताने तुरळक टिका चालू आहे. तो चित्रपट अजून पाहीलेला नसल्याने त्यावर भाष्य करण्याचा प्रश्न नाही. पण जे काही संतुलीत व्यक्तींकडून ऐकले त्यावरून असे दिसते की (हिंदूंच्या विरोधात आहे वगैरे) टिका अनाठायी असावी. ती असोत अथवा नसोत, एक स्वागतार्ह दिसले ते म्हणजे नुसतेच ओरडणे चालू आहे. कोणी या चित्रपटावर बंदी घाला असे म्हणल्याचे वाचनात तरी आले नाही. हे नक्कीच पुढचे पाऊल आहे. असो.
मात्र पिकेच्या आधी काही काळ "दि इंटरव्ह्यू" या विनोदी / विडंबन चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळेच वादळ उठले होते. उत्तर कोरीयाचा हुकूमशहा किम जॉंग अन याची मुलाखत आणि हत्या कशी एकत्रीत करता येईल यावर आधारीत कथानक आहे. चित्रपट विनोदी आहे आणि अनेकदा "प्रौढांसाठी" आहे याची जाणीव करून देणारा आहे. पण हे कथानक उत्तर कोरीयांतील हुकमशाहासमर्थकांना आक्षेपार्ह वाटले आणि तो प्रकाशीत करणार्या सोनी कंपनीवर सायबर अॅटॅक करणे आणि तसेच अमेरीकेत अजून एक ९/११ सारखा हल्ला करू अशा धमक्या देणे चालू झाले. त्यामुळे सोनी कंपनीने तो चित्रपट प्रकशीत करणे रद्द केले तसेच चित्रपटग्रूहांनी देखील तो प्रकाशीत झाल्यास दाखवणे अमान्य केले. यावर बरीच जाहीर चर्चा झाली. ओबामांनी सोनीच्या निर्णयावर टिका केली. त्यांच्या शब्दातः "We cannot have a society in which some dictator someplace can start imposing censorship here in the United States," Obama said. "If somebody's able to intimidate folks out of releasing a satirical movie, imagine what they start doing when they see a documentary they don't like, or news reports they don't like. Or even worse, imagine if producers and distributors and others start engaging in self-censorship because they don't want to offend the sensibilities of someone whose sensibilities probably need to be offended."
अमेरीकेत अमेरीकन राष्ट्राध्यक्षांवर देखील टोकाची टिका आणि टोकाचे विडंबन केले जाते. त्यामुळे हे त्या अर्थाने नैतिक अधिकारातून बोलले गेले. परीणामी इंटरनेट आणि थोड्या खाजगी चित्रपटगॄहातून हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रकाशीत केला गेला (येथे मोठ्या चित्रपटगृहांच्या चेन्स असतात तेथे केला गेला नाही).
त्याच दिवशी हा चित्रपट फार काही अपेक्षा नसताना जालावर पैसे देऊन पाहीला... थोडक्यात (विनोद न सांगता) खालील प्रमाणे:
डेव्ह स्कायलार्क (जेम्स फ्रँको) नामक टॅब्लॉईड टिव्ही पत्रकार आणि त्याचा सहकारी एरोन रॅपोपोर्ट (सेथ रॉजेन) यांचा स्कायलार्क शो म्हणजे काहीच्या काही पितपत्रकारीतेचा नमुना असतो. पण त्यांच्या लक्षात येते की हा शो, किम जॉम्ग अन ला आवडतो. म्हणून ते त्याला मुलाखतीसाठी संपर्क करतात. आश्चर्य म्हणजे तो ते मान्य करतो. अर्थात अट घालून की प्रश्न आणि उत्तरे तोच ठरवणार. स्कायलार्क नुसता वाचणार! तरी देखील ते तयार होतात. कारण एकदा का तेथे गेले की त्याला प्रश्नात अडकवता येईल....
मुलाखत होणार हे जाहीर होता क्षणी, सीआयए किम ला मारण्यासाठी करण्याचा त्यांचा उपयोग करण्याचे ठरवतात. तसे बोलणे देखील होते, सराव देखील होतो. पुढे कोरीयात गेल्यावर काही गंमतीजंमती आहेत. सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे कम्युनिस्ट कोरीयात स्वतःचे स्थान टिकवावे म्हणून किमने स्वत:स कसे देव करून ठेवले आहे हा.
पुढे या संदर्भात बरेच विनोद आहेत. त्यातील काही विनोद हे "अमेरीकन चीप ह्यूमर" या कॅटेगरीत बसतील असे आहेत. काही दृश्ये ही लहान (म्हणजे अगदी टीनएजर्स पण) मुलांना योग्य नसलेली आहेत. अर्थात चित्रपट हा अमेरीकन संज्ञे प्रमाणे "R" अर्थात "Restricted" असाच आहे.
या चित्रपटाला गांभिर्याने घेऊन विरोध करणे हा एक विनोदच आहे. पण तसा तो केला गेला आणि सोनी सारख्या कंपनीने देखील तो वरकरणी गांभिर्याने घेतला. वरकरणी म्हणण्याचे कारण इतकेच की या निमित्ताने चित्रपट सरळ ऑनलाईन प्रकाशीत करणे कसे धंदा म्हणून चालू शकेल हे या निमित्ताने पडताळले गेले आहे. त्यामुळे हा देखील एक उद्देश असल्यास आश्चर्य वाटायला नको.
Spoiler alert: चित्रपटात शेवटी किम ला मारले गेलेले दाखवले आहे. जरी किम हा वास्तवात समर्थनीय नसला तरी त्याला म्हणजे एका राष्ट्राध्यक्षास असे मारलेले दाखवणे हे कलास्वातंत्र्याचा अतिरेक असलेले वाटले. हेच जर कुठल्याही वास्तवातील प्रगत राष्ट्रपमुखाबाबत दाखवले तर अमेरीकेचा आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्यांचा मुद्दा काय असता हा प्रश्न पडतो...
ते सोडल्यास डोके बाहेर ठेवून, American humor आवडत असल्यास एकदा बघण्यासारखा चित्रपट आहे.
प्रतिक्रिया
28 Dec 2014 - 8:31 am | सस्नेह
बाकी आम्रविकी चित्रपट चित्रणाच्या दृष्टीकोनातून तरी अफलातून असतात. त्या मानाने टेक्निकली आपण अजून बरेच मागे आहोत.
मिळाला तर जरूर पाहीन.
आणि पीकेवर बंदी घाला असे कोणसेसे ओरडत असलेले कालच एका च्यानलवर ऐकले !
28 Dec 2014 - 9:55 am | स्पंदना
द इंटरव्ह्यु बद्द्ल बरीच न्युज सुरु आहे येथे सुद्धा टीव्हीवर. ओबामांचा स्टँड आवडला पण उगा आख्ख्या सिनेमागृहाला, आणि त्याबरोबर आख्ख्या मॉलला धोका पत्करायला कोणी तयार नाही.
बाकी पीके मध्ये सगळे उपदेशामृत हिंदुंना पाजून रिकामे झाल्याची भावना वाटते आहे, स्टील आय वोन्ट फरगेट द डाय्लॉग फ्रॉम सरफरोश,"मुसलमान का मतलब समझते हो? जीसका इमान पहाड की तरहा हिलता नही वो होता है मुस्सलइमान॥"
28 Dec 2014 - 8:38 pm | मदनबाण
आजच सकाळी ओबामा माकड असल्याची बातमी वाचली आणि ती या विषयाशी संबंधीत आहे... ;)
UPDATE 4-North Korea blames U.S. for Internet outages, calls Obama 'monkey'
@ अपर्णा तै...
स्टील आय वोन्ट फरगेट द डाय्लॉग फ्रॉम सरफरोश,"मुसलमान का मतलब समझते हो? जीसका इमान पहाड की तरहा हिलता नही वो होता है मुस्सलइमान॥"
क्या डायलॉग हयं वह...जरा फिर सुनने के इच्छा हो गयी |
बाकी हिंदू लोक मोठ्या संखेने "पीके" पाहत आहेत ! या वादाचा फायदा मिळुन अजुन वेगाने गल्ला भरला जाइल. कोणत्याही हिंदू जमावानी / लोकांनी चित्रपटातली दॄष्य पाहुन "चित्रपट्गृहात" गोंधळ / आक्रमकता दाखवली नाही किंवा "जय भोलेनाथ" च्या घोषणाही दिल्या नाहीत. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ये जो चिलमन हैं, दुश्मन हैं... { मेहबूब की मेहंदी (१९७१) }
29 Dec 2014 - 11:15 am | मदनबाण
इस विषय के गेहराई मे.... ;)

Everything You Need to Know About Sony's Unprecedented Hacking Disaster
Sony PlayStation struggling to restore network after Christmas hacking attack
North Korea was NOT behind the Sony hack according to multiple security experts who discredit FBI findings and reveal that a studio insider named 'Lena' may be responsible
Leaked: The Nightmare Email Drama Behind Sony's Steve Jobs Disaster
Angelina's Cleopatra Catastrophe: The Other Side of Sony's Jobs Disaster
How Amy Pascal Hacked Our Hearts
Sony Hack 2014: Offensive Conversations About Angelina Jolie, President Obama & More Leak, Some Respond
just days after humiliating 'spoiled brat' emails were leaked
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Make in India: Ministries told to prefer domestically-manufactured electronic goods
28 Dec 2014 - 10:19 am | एस
आवडला!
28 Dec 2014 - 10:49 am | पिंपातला उंदीर
लेख आवडला . अमेरिकन ह्युमर हा एक भन्नाट प्रकार आहे . मुख्य म्हणजे ते त्यात कुणाचीच पत्रास ठेवत नाहीत . the Simpsons हि माझी आवडती मालिका आहे . स्टार World या वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रोज रात्री आठ वाजता असतॆ . त्यात ते जिझस , कथोलिक चर्च आणि एकूण धर्माची जी रेवडी उडवतात ती बघून आपल्याकडच्या धर्मप्रेमी लोकाना फेफरे येऊ शकतात . म्हणूनच ते आपल्या चित्रपटातून जॉर्ज बुश शी ची हत्या झाल्याच दाखवू शकतात (पाहा डेथ ऑफ प्रेसिडेण्ट चित्रपट ) मग The Interview या चित्रपटात मारला जातो असे दाखवला गेलेला किम किस चिडीया का नाम है . हॉट शोटस या चित्रपटातून त्यांनी सद्दाम हुसेन ची अशीच खिल्ली उडवली होती . अतिरेकी धर्मांध लोक तिथे पण आहेत पण जनमानस प्रगल्भ असल्याने त्याना एका सीमेबाहेर आपला चड्फ़डाट व्यक्त करता येत नाही . दा विन्सी कोड चित्रपटात तर त्यांच्या धर्मावर मुलभूत प्रश्न उपस्थित केले होते आणि तिथल्या अतिरेकी धर्मान्धानी त्यावर बंदी आणण्यासाठी खूप प्रयत्न पण केले पण सर्वसामान्य वाचकाने ते पुस्तक पण भरपूर विकत घेतले आणि त्यावर बनलेला चित्रपट पण खूप चालला . मला स्वतःला या बाबतीत अमेरिकेच्या तुलनेत आर्थिक दृष्ट्या खूप मागे असलेल्या , जाती धर्मात विभागलेल्या भारतीय समाजमनाचे अमेरिकन समाजमना शी धक्कादायक साधर्म्य आढळते . म्हणजे धर्माचे ठेके घेतलेल्या लोकांनी कितीही आरडा ओरडा केला तरी पीके तिकीट खिडकीवर खच्चून चालतो , लज्जा या पुस्तकाच्या शेकडोंनी प्रती खपतात आणि वारकरी संप्रदायाने आक्षेप घेऊन पण एलिझाबेथ एकादशी चित्रपट houseful गर्दी खेचतो . बाकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हि दुधारी तलवार आहे . एकूणच पीके च्या समर्थनात उतरलेली मंडळी 'मी नथुराम बोलतोय' नाटकाचा विषय निघताच काखा वर करू लागतात . असे का ? let people choose . लोक ठरवतील ना काय पाहायचं आणि काय नाही ते . आणि आता पर्यंत चा अनुभव असा आहे कि भारतीय जनता अतिरेकी वादाला स्वीकारत नाही . अतिरेकी पणा त्याना पचत नाही . बाकी पीके वरच्या अनाठायी आरोपांना हिंदू लोकांनीच या वर्षातला सगळ्यात मोठा हिट चित्रपट बनवून उत्तर दिले आहे .
अवांतर - एक कलाकृती म्हणून पीके मला मुळीच आवडला नाही . त्यापेक्षा याच विषयावरचा Oh My God कितीतरी सरस होता .
28 Dec 2014 - 3:31 pm | मराठी_माणूस
हो, आपण तर इतक्या मोठ्या मनाचे आहोत की गुन्हेगार प्रवृत्तीच्या कलाकारांचे (उदा: संजय्,सलमान) सिनेमे सुध्दा गर्दी करुन पहातो
28 Dec 2014 - 6:07 pm | विकास
अमेरिकन ह्युमर हा एक भन्नाट प्रकार आहे . मुख्य म्हणजे ते त्यात कुणाचीच पत्रास ठेवत नाहीत.
अगदी सहमत!
डेथ ऑफ अ प्रेसिडण्ट पाहीलेला नाही माहीतीपट स्टाईल चित्रपट दिसतो आहे. नक्कीच बघेन... धन्यवाद.
फक्त वर मूळ लेखात म्हणल्याप्रमाणे, कधी कधी पातळी घसरते (चीप ह्युमर) आणि त्यातून काही हसण्यासारखे वाटत नाही. पण मुद्दा तो नाही. मुद्दा accept करण्याचा आहे, जो तेथे कायद्याने केला आहे. हे केवळ फक्त विनोद/विडंबन/चित्रपट या पुरतेच मर्यादीत नाही तर कुठल्याही कलाविष्कारात, लेखनात लागू होते. त्याचा देखील कधी कधी अतिरेक देखील होतो. पण तरी ते जेंव्हा सर्वांना समान आहे हे दिसते तेंव्हा त्याचे महत्व समजते आणि आवडते देखील. त्यात मग क्रुसाचे विकृतीकरण केलेले "कलात्मक" चित्र हे एखाद्या आर्ट गॅलरीत येणे देखील असते, तर राष्ट्रध्वज जाळण्याचा (देखील) हक्क आहे हे मानले जाते. फ्लोरीडामधील एका पाद्र्याने तर मुस्लीमांना/मुस्लीमधर्माला (सध्याच्या दहशतवादाचे) मूळ आहेत असे म्हणून एकदा कुराण जाहीरपणे जाळण्याचा प्लॅन केला होता. त्याला देखील अमेरीकन न्यायसंस्था अडवू शकली नाही. केवळ ओबामाला "विनंती" करावी लागली की असले काही करून दोन कम्युनिटीजमधे दूरगामी भांडणे वाढतील असे करू नका म्हणून...
मग अशा देशात जर कधी कधी हिंदू देव देवतांचे विचित्र वापर हे काही धंदेवाईकांनी केले (आणि तसे केलेले पाहीले आहेत) तर त्यावर म्हणूनच निषेध करता येतो आणि तसा तो करावा देखील कारण ते स्वातंत्र्य आहेच, पण बंदी घाला म्हणणे जमू शकत नाही आणि तसे कोणी म्हणू देखील नाही ...
आपल्याकडे या स्वातंत्र्यांचा तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, निवडक हक्क दिला जातो, बजावला जातो. वाद तरी देखील वाटत तर करू नये पण तेथे चालू होतो. त्यात सर्वसाधारणपणे हिंदूंच्या भावनांचा विचार केला जात नाही हा मुद्दा असतो. त्यात आक्रस्ताळीपणा असेल पण अनेकदा अतिरेकी धर्मांधता नसते असेच वाटते. कायदा समान न पाळण्याच्या दृष्टीकोनातून असा विरोध बरोबरच आहे. पण तरी देखील, ज्या तत्वज्ञानामुळे हिंदू धर्म इतकी सहस्त्रके राहीला त्या तत्वज्ञानाला पायदळी तुडवणार्या भोंदू बुवाबाबांना फायदा होईल असले काही सजग आणि सुजाण हिंदूंनी वागू नये असे नकी वाटते... आज पिके सारखे बॉलीवूडपट नुकसान करणार नाहीत असले नुकसान हे भोंदूबाबा करत आहेत. (अगदी काल परवा ऐकलेले लेटेश्टः किसिंग बाबा)
28 Dec 2014 - 1:17 pm | नांदेडीअन
Putlocker वर उपलब्ध आहे चित्रपट.
28 Dec 2014 - 2:50 pm | श्रीगुरुजी
>>> एकूणच पीके च्या समर्थनात उतरलेली मंडळी 'मी नथुराम बोलतोय' नाटकाचा विषय निघताच काखा वर करू लागतात .
नथूरामवर कोणतरी चित्रपट काढणार आहे म्हणे. नथूरामवर चित्रपट निघणार ही नुसती बातमी येताक्षणीच आरडाओरडा सुरू झालाय. चित्रपट खरंच बनला तर तो प्रदर्शित व्हायच्या आधीच त्यावर बंदी आलेली असेल. "पीके" चित्रपटाचे समर्थन करणारेच नथूरामवरील चित्रपटावर बंदी घालावी ही मागणी तारस्वरात करत असतील.
28 Dec 2014 - 4:28 pm | बोका-ए-आझम
नथुरामवर नव्हे पण गांधीहत्येवर आणि त्याच्या आधीच्या घटनांवर ' नाइन अवर्स टू रामा ' हा चित्रपट आलेला आहे पण तो भारतात प्रदर्शित झाला नाही आणि परदेशी समीक्षकांचं त्याच्याबद्दल काही खास मत नाही.
29 Dec 2014 - 7:34 pm | श्रीगुरुजी
>>> नथुरामवर नव्हे पण गांधीहत्येवर आणि त्याच्या आधीच्या घटनांवर ' नाइन अवर्स टू रामा ' हा चित्रपट आलेला आहे पण तो भारतात प्रदर्शित झाला नाही आणि परदेशी समीक्षकांचं त्याच्याबद्दल काही खास मत नाही.
नथुरामवर चित्रपट काढण्याची घोषणा झालीये आणि चित्रपट चित्रित व्हायच्या आधीपासूनच त्याच्यावर बंदी घालावी यासाठी काही जण न्यायालयात गेलेत. पुण्यातले न्यायालय या खटल्यावर लवकरच निर्णय देणार आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याच्यावर टीका करणे किंवा बंदी घालण्याची मागणी करणे समजू शकते. पण इथे अजून चित्रीकरणाचा सुद्धा पत्ता नाही आणि त्याआधीच काही जणांना त्यावर बंदी घालाविशी वाटतीये.
http://indiatoday.intoday.in/story/nathuram-godse-mahatma-gandhi-hindu-m...
29 Dec 2014 - 9:43 pm | विकास
या संदर्भात, "गोडसे" हा शब्द राज्यसभेचे उपसभापती कुरीयन यांनी असांसदीय ठरवल्याचे आठवले. पण गंमत म्हणजे कम्युनिस्ट हा शब्द देखील असांसदीय असल्याने, तो तत्वतः संसदीय कामकाजात वापरण्यावर बंदी आहे!
30 Dec 2014 - 9:22 am | पिंपातला उंदीर
आपल्या नाशिक च्या खासदार साहेबांच कस होईल मग
28 Dec 2014 - 7:14 pm | टपरी
"दि इन्टरव्ह्यू" http://www.vodly.to वर उपलब्ध आहे
28 Dec 2014 - 7:35 pm | टवाळ कार्टा
आजच लगेच बघितला...इतका काही खास विनोदी वाटला नाही...पण काही सीन्स खुसखुशीत आहेत
28 Dec 2014 - 8:18 pm | विकास
इतका काही खास विनोदी वाटला नाही
अमेरीकन ह्यूमर हा प्रकार बर्याचदा असाच असतो... जर त्याला विरोध करणे, तो प्रकाशीत करण्यापासून थांबवणे असे प्रयत्न झाले नसते तर फार काही टीकला नसता. म्हणूनच एक आयएमडीबी सोडल्यास फार स्टार्स नाहीत!
29 Dec 2014 - 5:31 am | स्पंदना
अमेरिकन ह्युमरचा अतिशय घाणेरडा प्रकार म्हणजे "द एंपरर".
आयला डोक दुखायला लागल तो पिक्चर पहाताना. अतिशय घाणेरडा अन किळसवाणा पिक्चर. सेन्सॉरने पासच कसा केला असा प्रश्न पडतो असले चित्रपट पाहून.
29 Dec 2014 - 6:22 am | श्रीरंग_जोशी
चित्रपटाची ओळख आवडली. लेखाच्या आशयाशी सहमत.
काही महिन्यांपूर्वी द डिक्टेटर हा याच पठडीतला चित्रपट पाहिला होता. कथासुत्र आवडण्यासारखे असले तरी अनेक विनोदांची पातळी अतिशय निम्न दर्जाची होती.
30 Dec 2014 - 6:57 am | स्पंदना
मी चुकुन द एंपरर लिहिलयं.
हाच तो डोकेदुखी पिक्चर.
29 Dec 2014 - 11:56 am | रेवती
नुकत्याच झालेल्या प्रवासात भ्रष्ट आवृत्ती पीके पाह्यला सुरुवात केली. लगेच झोप लागली ती शंकराच्या सीनला जाग आली. लगेच ५ मिनिटात झोप लागली. जागी झाले तेंव्हा आमीर खानबरोबर रणबीर होता. नंतर शिनेमा संपला.