तुझ्या माझ्या मनोरथाचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले
बिछाने गारठलेले,श्वास भाजलेले
बाहू स्फुरलेले,ओठ नरमलेले
काही हरवून काही गवसण्याचे दिन आले
पावसाच्या सरीमधे दोन जीव भिजलेले
भिजलेल्या जीवानी दोन प्याले झोकलेले
मदिरा पिऊन झिंगण्याचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले
दवांनी पडावे फुलांवर,फुलानी अमुच्यावर
उमललेल्या फुलानी गंध उधळल्यावर
गुलाबी गुलाबी स्वपनांचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले
तुझ्या माझ्या मनोरथाचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
9 Aug 2008 - 10:14 pm | श्रीकृष्ण सामंत
ही कविता अनुवादीत असून मुळ कवी--सूरज
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
9 Aug 2008 - 10:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सामंत साहेब,
अनुवाद आवडला.
पण मुळ कविता कुठे आहे, वाचायला मिळाली तर मग अनुवादाचा अधिक आनंद घेता येईल.
9 Aug 2008 - 10:42 pm | श्रीकृष्ण सामंत
डॉ.दिलीपजी,
ही ती कविता.
मुव्ही---सातवां आसमा
(तेरी मेरी मुरादों के दिन हैं
रातों को जग कर, सोने के दिन हैं ) - २
(बिस्तर की ठंडक, सांसों की गरमी
बाहों की शक्ति, होठों की नरमी ) - २
होठों की नरमी - ३
कुछ खोके कुछ पा जाने के दिन हैं
रातों को जग कर, सोने के दिन हैं
(बारिश की बूँदों में दो जिस्म भीगे
भीगे बदन की शराबों को पीले ) - २
शराबों को पीले - ३
शराबी शराबी रातों के दिन हैं
रातों को जग कर सोने के दिन हैं
(शबनम गिरे फूल पर, फूल हम पर
महक एक रचें फिर नई तीनों मिल कर ) - २
नई तीनों मिलकर - ३
गुलाबी गुलाबी झारों के दिन हैं
रातों को जग कर सोने के दिन हैं
तेरी मेरी मुरादों के दिन हैं
रातों को जग कर, सोने के दिन हैं - २
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
9 Aug 2008 - 10:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सामंत साहेब,
मुळ कविता इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
पण आम्हाला आपला अनुवादच अधिक आवडला.
-दिलीप बिरुटे
(आपला आणि आपल्या अनुदिनीचा वाचक )
9 Aug 2008 - 10:53 pm | ऋषिकेश
असेच म्हणतो.. अनुवाद फारच सुंदर
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
9 Aug 2008 - 11:00 pm | मदनबाण
दवांनी पडावे फुलांवर,फुलानी अमुच्यावर
उमललेल्या फुलानी गंध उधळल्यावर
गुलाबी गुलाबी स्वपनांचे दिन आले
रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन आले
हे फार आवडल..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
10 Aug 2008 - 3:10 am | श्रीकृष्ण सामंत
माझा अनुवाद आपल्याला आवडला हे वाचून आनंद झाला.
डॉ.दिलीपजी म्हणतात,
"पण आम्हाला आपला अनुवादच अधिक आवडला. "
ऋषिकेशजी,
आपण सहमत आहां.आणि
मदनबाणजी,
आपल्याला ही त्यातला काही भाग आवडला.
खरं सांगू का,
कवी मंगेश पाडगांवकर म्हणतात,
"एक गोष्ट पक्की असते
तिन्ही काळ नक्की असते
तुमचं न माझं मन जुळतं
त्या क्षणी दोघानाही गाणं कळतं"
आणि हे इतकं सत्य आहे की खर्या चिकीत्सकाला आपलं मत दिल्याशिवाय राहवत नाही.
आता मला एक सागा,
१ मूळ रचनांचा उल्लेख केल्यावर अनुवादित रचनेचा charm कमी होईल असं आपल्याला नाही का वाटत?
२ काही प्रसिद्ध रचनेची आठवण,अनुवादित रचना वाचताना कळत नकळत होत राहीली तर मजा नाही का येणार?
उदा.
"हा चंद्रमुखी चेहरा
केसाचा रंग सुनेहरा
हे नीळसर नीळसर डोळे
हे लक्षण असे वेगळे
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची"
ही माझी अनुवादित रचना आपण वाचून पहावी.हे कोणते मूळ गाणे आहे हे आपले आपल्याला समजल्यावर (हुडकून काढल्यावर) नक्कीच आनंद होईल असं मला वाटतं.
"काश्मीर की कली"ह्या चित्रपटातलं गाणं
"तारीफ करूं का उसकी,
जिसने तुम्हे बनाया"
हे उदाहरण म्हणून देतो.
"ये चांदसा मुखडा तेरा
ये जुल्फोका रंग सुनहरा
ये नीली नीली आंखें …..वगैर,वगैरे.
काही गाणी तितकी प्रसिद्ध नसतात त्यामुळे मूळ रचना देवून वाचकाचा (अनुवादित) कविता वाचतानाचा आनंद फिका पडतो असं मला वाटतं.
"यादे माझी आहेत तुझ्याजवळी
श्रावणमासी ओलेते दिवस मात्र
अन माझ्या कोऱ्या कागदावरची
लिपटलेली ती काळोखी रात्र
जा विसरून ती यादे या क्षणी
अन परतव माझ्या त्या आठवणी"
हा एका प्रसिद्ध गाण्याचा अनुवाद "परतव माझ्या आठवणी" असे शिर्षक असलेली माझी कविता वाचून आपण मूळ गाणं अवश्य (हुडकून) शोधून काढा आपल्याला आनंद होईल असं मला वाटतं.आशा भोसले हे गाणं गातात आणि संगीत रचना R.D.Burman याची आहे.एव्हडीच hint देतो.
"बुगडी माझी सांडली गं
जाता सातारला"
हे गाणं कवी माडगुळकर यानी त्याचा अनुवाद
"झुमका गीरा रे
बरेलीके बाझार मे"
ह्या गाण्यावरून केला हे मला अलिकडेच कवियत्री शांता शेळके यांच्या तोंडून "नक्षत्राचे देणे"ह्या कार्यक्रमात ऐकायला मिळालं.आणि माझ्या मनात जरा खटकलं.कदाचित माझं चुकत असेल. अर्थात अनुवाद म्हणजे word to word copy नसते हे आपल्याला माहित आहे ह्याची मला नक्कीच खात्री आहे.
आपली चिकीत्सा वाखाणनीय आहे असं मला वाटतं.
आपल्या सर्वांचे फिरून एकदा आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
11 Aug 2008 - 2:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे गाणं कवी माडगुळकर यानी त्याचा अनुवाद
मला वाटत होतं 'पडछाया' (हाच ना तो चित्रपट ज्यात, 'बुगडी माझी सांडली गं' आहे) तो 'मेरा साया' च्या आधी आला आणि मूळ मराठी गाण्यावरून 'झुमका गिरा रे' आलं.
11 Aug 2008 - 10:33 pm | श्रीकृष्ण सामंत
अदिती,
गाणं कवी माडगुळकरांचच आहे पण ते "पडछाया" ह्या चित्रपटातलं नसून "सांगते ऐका" ह्या चित्रपटातलं आहे आणि त्याचं संगीत राम कदम यानी दिलं आहे.
"मेरा साया" ह्या हिंदी चित्रपटात "झुमका गीरा रे" हे गाणं आहे हे ही खरंच आहे.
मेरा साया हा चित्रपट १९६६ साली प्रदर्शित झाला.
सांगते ऐका हा चित्रपट १९५९ साली प्रदर्शित झाला.
याचा अर्थ तू म्हणतेस तसं मराठी चित्रपटातलं गाणं हिंदी चित्रपटात आलं.हे खरं आहे.
परंतु, कवयत्री डॉ. शांता शेळके यांच्या "नक्षत्रांचे देणे" ह्या कार्यक्रमात (व्हिसीडीवर)
माडगूळकरानी ते मराठीत अनुवादीत केलं हे
"अनुवाद" ह्या विषयावर बोलताना त्यानी म्ह्टलं आहे.त्याचा मी आधार घेतला.एव्हडच.
"चिकीत्सा हा शोधाचा उगम आहे"
आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
11 Aug 2008 - 10:48 pm | प्राजु
पडछाया नव्हे.... मेरा साया ज्यावरून घेतला तो "पाठलाग"
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Aug 2008 - 11:23 pm | श्रीकृष्ण सामंत
प्राजूजी,
आपलं ही म्हणणं बरोबर आहे.
"पाठलाग" ह्या चित्रपटाची "स्टोरी" "मेरासायात" आहे. "पडछायाची" नाही हे खरं आहे.
पण
मेरा साया मधलं गाणं
"झुमका गीरा रे"
हे माडगूळकरांच्या
"बुगडी माझी सांडली गं!"
ह्या गाण्याचा अनुवाद आहे.
आणि ते गाणं "पडछायात" नसून "सांगते ऐका" त आहे.
आणि हिंदी चित्रपटात मराठी चित्रपटातून गाणं घेतलं हे अदितीचं म्हणणं पण बरोबर आहे.
शेवटी असं म्हणावं लागेल की "मेरा साया"ने
"स्टोरी" पाठलागची घेतली
आणि
गाणं "सांगते ऐकातून घेतलं"
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
10 Aug 2008 - 4:30 am | प्राजु
अनुवाद म्हणा किंवा तुमची कविता म्हणा. पण हे काव्य मला आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Aug 2008 - 5:24 am | श्रीकृष्ण सामंत
प्राजुजी,
आपल्याला काव्य आवडलं ह्यातच सगळं आलं
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
11 Aug 2008 - 2:15 pm | पावसाची परी
अनुवाद्च जास्त आवडला
खुप खुप छान आहे
11 Aug 2008 - 11:25 pm | श्रीकृष्ण सामंत
परीजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com