झटकून टाक ती राख...

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
16 Dec 2014 - 8:39 pm

जो बोलत नाही त्याचे ऐकून घेतले जात नाही.
जो बोलतो त्याचेच ऐकले जाते.
जो देत राहातो त्यालाच मागितले जाते.
जो देत नाही त्याला मागितले जात नाही.
जो घाबरतो त्यालाच जास्त घाबरवले जाते.
जो घाबरत नाही त्यालाच सगळे घाबरतात.
जो हक्क गाजवतो, त्याचे कर्तव्य विसरले जाते.
जो कर्तव्यच करत राहातो, त्याचे हक्क विसरले जातात.
जो टीकाच करतो त्याचेवर कुणी टीका करायला धजावत नाही.
जो प्रशंसाच करतो त्याचेकडून टीका ऐकण्याची सवय राहात नाही.
तुम्ही फक्त हसतच राहाल तर लोक तुमचे रडणे ऐकणार नाहीत.
तुम्ही फक्त रडतच राहाल तर लोक तुम्हाला कधीच हसू देणार नाहीत.
तुम्ही भिडस्त राहून लोकांना तुमचा फायदा घेवू देऊ नका.
तुम्ही काहीच बोलत नाही, काहीच घेत नाही, नेहेमी घाबरतात, कधीच मौजमजा करत नाही, फक्त कर्तव्यच करतात अशी सवय लोकांना लावू नका.
नाहीतर नेहेमी तुम्हाला फक्त लोकांचे ऐकत, लोकांना देत, लोकाना घाबरत, काम करत, कर्तव्य करत, रडत जीवन जगावे लागेल.
त्यापेक्षा ऐका पण बोलासुद्धा.
द्या पण घ्या सुद्धा.
घाबरा पण घाबरवासुद्धा.
कर्तव्य करा पण तुमच्या हक्काची जाणीव सुद्धा करून द्या.
काम करा तशी मौजमजा पण करा.
टीका करा पण प्रशंसा सुद्धा करा.
रडा आणि हसा सुद्धा.
जीवन हे फक्त कर्तव्यासाठी नाही, उपभोग घेण्यासाठी सुद्धा आहे!
झटकून टाका ती भिडस्तपणाची राख...!!

समाजविचार

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

16 Dec 2014 - 8:40 pm | सुबोध खरे

आमची आई म्हणते
भीड भिकेची बहीण

खटपट्या's picture

16 Dec 2014 - 11:33 pm | खटपट्या

पटलं.

योगी९००'s picture

17 Dec 2014 - 10:06 am | योगी९००

झटकली ती राख...!!

बाकी "जो देत राहातो त्यालाच मागितले जाते. जो देत नाही त्याला मागितले जात नाही." हे वाचून थोडे विचित्र वाटले.

मदनबाण's picture

18 Dec 2014 - 10:30 am | मदनबाण