हे मि.पा. वर काय चालले आहे?

गमत्या's picture
गमत्या in जनातलं, मनातलं
8 Aug 2008 - 10:11 pm

सध्या मि.पा. संकेतस्थळा चे भारताच्या लोकसभेमध्ये रुपांतर झाल्याचा भास मला क्षणभर झाला.

खरे तर मि.पा. ला निखळ आनंद देणारे संकेतस्थळ म्हणुन माझ्यासारखे हजारो, लाखो वाचक भेट देत असतात पण मागील काही दिवसां पासुन कोणत्या हि लेखाच्या प्रतिक्रियांमध्ये जी काही चिखल फेक होते आहे ति बघुन असे वाटते काहि तरी चांगले मनोरंजक, आभ्यास पुर्ण लेख लिहण्याची ताकत आपण नाहक वाया घालवत आहोत.

मि मि.पा. च्या एकाहि सदस्याला व्यक्तिगतरीत्या ओळखत नाही याची कृपया नोंद घ्यावी. आणि मि.पा. मध्ये चाललेल्या अंतरगत राजकारणामध्ये हि मला काडीमात्र रस नाहि.

मला फक्त येवधेच सांगावे वाटते कि मि.पा. सारख्या सुंदर संकेतस्थळाला आपल्या घाणेरड्या चिखलफेकीने बरबटुन टाकु नका.

आपला.

मि.पा. चा निस्सिम चाहता (गमत्या)

धोरणविचार

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

8 Aug 2008 - 10:50 pm | विसोबा खेचर

आपल्या आपुलकीबद्दल धन्यवाद गमत्याराव!

काही काळजी करू नका. मिपाला अश्या छोट्यामोठ्या पेल्यातल्या वादळांची भिती नाही! आम्ही कुठल्याही क्षणी हरकतीत येऊन डिलीट या बटणाचा वापर करू आणि इकडची चिखलफेक निपटून काढू! :)

अहो लिहिणार्‍याला कष्ट पडतात, मला डिलिटचे बटण वापरायला फक्त काही सेकंदच पुरतात! :)

तात्या.

प्राजु's picture

8 Aug 2008 - 11:51 pm | प्राजु

अहो लिहिणार्‍याला कष्ट पडतात, मला डिलिटचे बटण वापरायला फक्त काही सेकंदच पुरतात!
कसले आलेत कष्ट तात्या?? सगळं वातावरण आनंदी असताना, उगाच कोणत्याही लेखनाची चेष्टा (की कुचेष्टा??)करायची आणि सगळं वातावरण गढूळ करायचं. यात कसले आलेत कष्ट?? चांगल्या गोष्टी व्हायला वेळ लागतो पण वाईट गोष्ट पट्कन करता येते, हे माझं मत आहे. नुकतेच कोणाचा तरी प्रतिसाद वाचला की, मिपावर आता चांगले लेखन वाचायला मिळते आहे. तो पर्यंत या अशा गोष्टी घडाव्यात आणि इथल्या उत्तम प्रतिभा असणार्‍या लेखकांनीही त्याला पाठिंबा द्यावा याचेच आश्चर्य वाटते. असो. मिपावर नित्यनेमाने मी येणारी असल्याने या प्रकारांचे वाईट वाटले इतकेच सांगायचे होते...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

9 Aug 2008 - 12:29 am | मदनबाण

तात्या आता मात्र फार कंटाळा आला आहे या सर्व गोष्टींचा..सारख सारख काय तेच तेच रवंथ करत बसायच्..कधी नमोगता वरच्या गोष्टी तर कधी इतिहास...
आम्हाला वर्तमानात राहुन मिपा चा आनंद कधी मिळणार ??
आता हे सर्व अगदी कंटाळवाण झाल आहे !!
जे नवीन सभासद आहेत त्यांच्या लेखी भांडाभांड करण्याची आणि त्या भांडणाचा आस्वाद घेण्याची जागा म्हणजे मिपा हेच स्थान आहे अशी समजुत झाल्यास नवल नाही ..

(हेच का ते माझ सुंदर मिपा) या प्रश्नात अडकलेला..
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

विसोबा खेचर's picture

9 Aug 2008 - 12:49 am | विसोबा खेचर

जे नवीन सभासद आहेत त्यांच्या लेखी भांडाभांड करण्याची आणि त्या भांडणाचा आस्वाद घेण्याची जागा म्हणजे मिपा हेच स्थान आहे अशी समजुत झाल्यास नवल नाही ..

तुझं म्हणणं योग्य आहे रे मदनबाणा! यापुढे काळजी घेईन! :)

कुणी कितीही मारे टॅलेन्टेड अन् हुश्शार वगैरे असला तरी यापुढे त्याचे फालतू बकबक करणारे उथळ लेखन येथून सरळ उडवून लावीन! कुणीही टेन्शन घेऊ नका रे... :)

अद्यापही मिपावर आणिबाणीच सुरू आहे हे काही मंडळी विसरली आहेत! ;)

आता जरा हात सुटा सोडून 'डिलिट'च्या बटणाचा मुक्त वापर करायला हवा! :)

साला ज्यांना पटेल ते इथे येतील अन् राहतील. नाही पटणार ते येणार नाहीत! कुणालाच पटलं नाही तर कुणीच येणार नाही! साला, मग भले मिपा बंद पडले तरी कोई बात नाही! च्यामारी, पुन्हा नव्याने सुरवात करू! (अर्थात, मिपा बंद पडावे हाच काही लोकांचा हाच अंतस्थ हेतू आहे हा भाग निराळा!) :)

तात्या.

--

मैने क्या लाया था, जो खो दिया? (गीतासार!) :)

शितल's picture

9 Aug 2008 - 4:42 am | शितल

मिपा बंद पडावा अशी इच्छा अगदी बोटावर मोजता इतक्यांचीच असेल असे वाटते.
पण मिपा सदैव चालु राहुन ते त्याच्यावरिल लेखांचा आनंद वाचकांना घेता येईल अशी इच्छा असणार्‍याची संख्या निश्चितच जास्त आहे :)
हेतुपुरसर अथवा अनावधानाने कोणी ही दुखावले जाणार नाही याची ही काळजी घेणारे लिखाण मिपावर आले तर ते वाचनात जास्त आनंद आहे :)
कारण सर्व मिपाकर हे एका परिवारासारखे आहे कोणी ही दुखावले गेले तर दुसर्‍याला वाईट नक्कीच वाटेल.

बेसनलाडू's picture

9 Aug 2008 - 4:56 am | बेसनलाडू

हेतुपुरसर अथवा अनावधानाने कोणी ही दुखावले जाणार नाही याची ही काळजी घेणारे लिखाण मिपावर आले तर ते वाचनात जास्त आनंद आहे
कारण सर्व मिपाकर हे एका परिवारासारखे आहे कोणी ही दुखावले गेले तर दुसर्‍याला वाईट नक्कीच वाटेल.

बरोबर पण असे सगळ्यांना वाटणे महत्त्वाचे!
(सूचक)बेसनलाडू

सर्किट's picture

9 Aug 2008 - 10:48 am | सर्किट (not verified)

हेतुपुरसर अथवा अनावधानाने कोणी ही दुखावले जाणार नाही याची ही काळजी घेणारे लिखाण मिपावर आले तर ते वाचनात जास्त आनंद आहे

हेतुपुरस्सर किंवा अनवधानाने मिपाकरांविशयी कुठे इतरत्र लिहिले जात असेल, तर किती आनंद होतो ?

ारण सर्व मिपाकर हे एका परिवारासारखे आहे कोणी ही दुखावले गेले तर दुसर्‍याला वाईट नक्कीच वाटेल.

तुमच्या दु:खात मीही सहभागी आहे.

- सर्किट

सागररसिक's picture

9 Aug 2008 - 9:55 am | सागररसिक

चगले लेख यावेत

पिवळा डांबिस's picture

9 Aug 2008 - 10:27 am | पिवळा डांबिस

मिस्टर गमत्या, आपण मांडलेले विचार तर स्तुत्यच आहेत......
पण आमचा एक प्रश्न आहे आणि इथे आम्ही तुमची वाटचाल पाहिलेली आहे...

लाखो वाचक भेट देत असतात
येस, इन युवर ड्रीम्स, राईट नाऊ!!:)

काहि तरी चांगले मनोरंजक, आभ्यास पुर्ण लेख लिहण्याची ताकत आपण नाहक वाया घालवत आहोत.
असेल, तेही खरे असेल! पण मला एक सांगा मिस्टर गमत्या, आपण इथे काहीतरी चांगले मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण असे काय लिहिले आहे हो? तुमची वाटचाल पहाता असे काहीच आढळले नाही...
मग तुम्हाला हा हक्क कुठून येतो हो हे इतर मिपाकरांकडून अपेक्षित करण्याचा?
आधी इथे स्वतःचे असे काहीतरी लिहा, आणि मग इतरांना शहाणपणा शिकवा ही नम्र विनंती.......

अशा फुकट सल्ल्यांनी कंटाळलेला,
पिवळा डांबिस

विसोबा खेचर's picture

9 Aug 2008 - 10:47 am | विसोबा खेचर

मग तुम्हाला हा हक्क कुठून येतो हो हे इतर मिपाकरांकडून अपेक्षित करण्याचा?

डांबिसराव, मला वाटतं की एक वाचक म्हणून गमत्याराव काही अपेक्षा करू शकतात अन् त्या लिहू शकतात. त्याकरता त्यांनी इथे काही लिहिलेही पाहिजे ही अट मला योग्य वाटत नाही!

असो,

तात्या.

पिवळा डांबिस's picture

9 Aug 2008 - 11:18 am | पिवळा डांबिस

मला वाटतं की एक वाचक म्हणून गमत्याराव काही अपेक्षा करू शकतात अन् त्या लिहू शकतात. त्याकरता त्यांनी इथे काही लिहिलेही पाहिजे ही अट मला योग्य वाटत नाही!
मग आपण दोघे या मुद्द्यावर असहमत आहोत!!
फक्त जर मिपाची मेंबरशिप घेतली असेल आणि आपण स्वत: मिपाच्या भवितव्यासाठी काहीही कॉन्ट्रीब्यूट न करता फक्त अपेक्षाच व्यक्त करण्यात येत असतील, आणि त्यात मिपाचे भले आहे असे तुम्हाला वाटत असेल तर देव मिपाचे भले करो....

स्वत: काहीही कॉन्ट्रीब्यूट न करता नुसत्या पोकळ सूचना करणार्‍या वाचकांविषयी फारसा आदर न बाळगणारा,
पिवळा डांबिस

विसोबा खेचर's picture

9 Aug 2008 - 11:26 am | विसोबा खेचर

तर देव मिपाचे भले करो....

ते तर करेलच! आणि नाही केलंन तरी बेहत्तर!

माझ्याकडून जेवढं चांगल्या रितीने चालवता येईल तेवढं चालवीन. नाहीच जमलं तर ते आपोआपच बंद पडेल! कोणतीच गोष्ट अमर नसते. साली, मिपा काय चीज आहे?!

असो,

आपला,
(बेफिकीर) तात्या.

पिवळा डांबिस's picture

9 Aug 2008 - 11:31 am | पिवळा डांबिस

आपण स्वतःच जर बेफिकीर आहांत तर आमचे काय म्हणणे?

दुख्खित,
पिवळा डांबिस

टारझन's picture

9 Aug 2008 - 11:34 am | टारझन

ड्यांबिश काकांशी सहमत.
आणि मला तरी वाटलं नाही की ईथे एवढी चिखलफेक झालीये जेवढी ..कोण लिहीणारा .. नाव नाही माहीत.. तो म्हणतोय. वाद-प्रतिवाद तर संसदेत पण चालतात ... सभापती काय त्यांना लगेच बरखास्त करतो का ?
या बाबतीत तात्यांनी टोकाची भुमिका घेऊ नये अशी एका थोडं-फार लिखाण करणार्‍या मिपाकरा तर्फे नम्र विनंती.

छोटासा मिपाकर
-- ( टारझन ऊर्फ खवीस )

साती's picture

9 Aug 2008 - 1:20 pm | साती

असं काय हो पिडा काका, गमत्याने अणुकराराविषयी माहितीपूर्ण आणि कोल्हापूरी मिसळीविषयी मनओरंजक लिहिले नाहीये का?तसंच मिपाकर सध्या कुठे आहेत या अभ्यासपूर्ण चर्चेतही प्रतिसाद दिलाय की!:)
गमत्याजी त्याचं काय आहे, जसं तुम्ही आपल्या ख.व. मध्ये लिहिलंय मला दुसर्‍यांची खेचायला आवडते तसंच इतरांनाही आवडत असणारच हो. तुम्ही अशी खेचाखेची सोडून उरलेलं वाचा की.
थोडिशी खेचाखेची समजून घ्यायला हवी. अति झालं तर तात्या आहेतच ना डिलीट करायला.

साती

सर्किट's picture

9 Aug 2008 - 10:49 am | सर्किट (not verified)

आधी इथे स्वतःचे असे काहीतरी लिहा, आणि मग इतरांना शहाणपणा शिकवा ही नम्र विनंती.......

+१ !

- (शहाणपणा शिकवणार्‍यांना कंटाळलेला) सर्किट

प्रकाश घाटपांडे's picture

9 Aug 2008 - 2:12 pm | प्रकाश घाटपांडे


आधी इथे स्वतःचे असे काहीतरी लिहा, आणि मग इतरांना शहाणपणा शिकवा ही नम्र विनंती.......

असहमत! कलाकाराला दाद देणार्‍या रसिकाने कलाकारच असले पाहिजे असे नाही. एखाद्या कानसेनाने गवयाला जागा चुकल्याचे निदर्शनास आणुन दिले म्हणुन गवयाने चिडायचे नसते." एवढ असेल तर तु गाउन दाखव बरं" तो जाणकार श्रोता आहे गायक नव्हे. त्याच्याही काही अपेक्षा आहेत. हीच गोष्ट लेखक वाचकाची आहे. परस्परांची फिरकी जरुर घ्या पण परस्परांचा आदरही करा.
प्रकाश घाटपांडे

सर्किट's picture

10 Aug 2008 - 8:31 am | सर्किट (not verified)

काका,

(च्यामारी पुन्हा एक काका)

परस्परांविषयी आदर नसला, तर स्वतःच्या अनुदिनीत सगळे काही लिहिले नसते का ?

येथे लिहितो, कारण वाचक वर्गाविषयी आदर, दुसरे काय ?

येथील वाचक, इतर अनुदिन्यां तील वाचकांपेक्षा वेगळा, नाही का ?

का ?

कार्ण येथील वाचक लिहितो देखील.

आजवर अनुदिन्या आणि मिसळपाव, मनोगत, मायबोली, उपक्रम येथील फरक एवढाच, की येथील वाचक लिहितो.

लिहिलेच नाही, तर त्या वाचकाला ह्या चावड्यांवर काय महत्व ?

हे लक्षात यायला वयाची अधिकता नको, डोक्याची हवी !

काय ?

- सर्किट

प्रकाश घाटपांडे's picture

10 Aug 2008 - 8:51 am | प्रकाश घाटपांडे


हे लक्षात यायला वयाची अधिकता नको, डोक्याची हवी !


मनुष्य एकाच वेळी वेगवेगळ्या वयाचा असतो. शारिरिक वय, मानसिक वय, बौद्धिक वय. संवाद हा त्याला अनुलक्षुन होतो. अधिकता व कमतरता ही सापेक्ष आहे. त्याला डोक्याची हवा देखील कारणी भूत आहे.
खुप पुर्वी नाना पाटेकरा ने बाळासाहेबाना लिहिलेले अनावृत्त पत्र आठवले.
अलेले शल्कित बाला! ( दिली का काडी लाउन)

प्रकाश घाटपांडे

यशोधरा's picture

9 Aug 2008 - 11:40 am | यशोधरा

हेतुपुरस्सर किंवा अनवधानाने मिपाकरांविशयी कुठे इतरत्र लिहिले जात असेल, तर किती आनंद होतो ?

हे मात्र एकदम पटेश!

ऋषिकेश's picture

9 Aug 2008 - 1:15 pm | ऋषिकेश

चांगले मनोरंजक, आभ्यास पुर्ण लेख लिहण्याची ताकत आपण नाहक वाया घालवत आहोत

"हे मि.पा. वर काय चालले आहे?" या इतका मनोरंजक, अभ्यासपूर्ण लेख संपूर्ण मिपावर नसेल नाहि का? ;)
काय गमत्या राव!!!! तुमचा हा चिखलफेकी विरुद्धचा लेख म्हणजे "मौनावरचं तासभर वाख्यान" झालं. चिखलफेक नको असेल तर असं काहि लिहा जे वाचून लोक आपापसातले हेवेदावे विसरून लेखनाच्या मागे लागतील. तुम्ही तर तेल ओतताय.
हे काय चालले आहे वगैरे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार वाटला.

अंतरगत राजकारणामध्ये हि मला काडीमात्र रस नाहि

ये बात कुछ हजम नहि हुई

(उंटावरच्या उपदेशकांना कंटाळालेला) ऋषिकेश

चंबू गबाळे's picture

9 Aug 2008 - 1:45 pm | चंबू गबाळे

सहमत आहे.

स॑तोश's picture

9 Aug 2008 - 10:12 pm | स॑तोश

;) प्रिय, विसुभाउ, आपन आपले काम करीत रहावे,लोक चिखलफेक काय फुकट करतात . त्याना आपल्या मिपा च्या निमीत्ताने कमीतकमी दिवसभरातील दगदग शिन अपमान याची गरळ टिकेच्या माध्यमातुन ओकता येर्ते.यामुळे मिपा एकाप्रकारे अशा लोकाच्या मानसिक आरोग्याची काळ्जीच घेत आहे,नाही का . पण मधुन मधुन अशा लोकाना तिव्र विरेचनाची सुद्दा मात्रा द्यावी जेणे करून इतर समाजाचे आरोग्य उत्तम राहील

चिन्या१९८५'s picture

10 Aug 2008 - 1:09 am | चिन्या१९८५

याबाबत मी लिहितो कारण बहुतेक या चर्चेमध्ये माझा उल्लेख न होता माझ्याबद्दल चर्चा चाललेली असावी.लोक अगदी खडे,उपद्रवी म्हणू लागले आहेत्.त्यामुळे ज्याप्रमाणे गड ही काही गोष्टींसाठी योग्य स्थळ नाही असे मला वाटते त्याप्रमाणे अशा चर्चांसाठी मिसळपाव हे स्थळ योग्य नाही असे येथील लोकांना वाटते.याचा मी आदर करतो.यापुढे येथील चर्चांमधे भाग घेणार नाही व फक्त येथील लेख्,कविता,ललित वगैरे साहीत्यावर कॉमेंट्स टाकीन.
माझ्या लेखनामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास जाहीर माफी मागतो.
फक्त नाव न घेता टिका करण्यापेक्षा सरळ सरळ सांगा की 'या या लोकांनी हे हे करु नये'. म्हणजे बरे पडेल.

घाटावरचे भट's picture

10 Aug 2008 - 2:48 am | घाटावरचे भट

चिन्याराव,

ह्या गोष्टी वैयक्तिक घेतल्या नाहीत तर बरे होईल. गमत्यारावांनी मांडलेले मुद्दे एकूणच मिपाच्या सद्य परिस्थितीबद्दल आहेत, त्यात कोण्या एका लेखावर अथवा लेखकावर टीका करण्याचा त्यांचा उद्देश दिसत नाही. स्वतःवर गोष्टी ओढवून घेउन उगाच आधीच गढूळ झालेले मिपाचे वातावरण अधिक गढूळ करू नये. आपल्याला सर्वच लोक हवे आहेत, सर्व तर्‍हेच्या चर्चा आणि लेख हवे आहेत. गैरसमजातून मिपावर केवळ असामंजस्य निर्माण होईल आणि हे मिपाच्या प्रतिमेसाठी बरे नाही असं मला वाटतं.

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

प्रकाश घाटपांडे's picture

10 Aug 2008 - 7:32 am | प्रकाश घाटपांडे

घाटावरच्या भटाशी घाटावरचा पांडे सहमत आहे
प्रकाश घाटपांडे

श्रीयुत संतोष जोशी's picture

10 Aug 2008 - 7:37 am | श्रीयुत संतोष जोशी

नमस्कार,

मिपा बंद पडावे हाच काही लोकांचा हाच अंतस्थ हेतू आहे हा भाग निराळा!

तात्या, अशा लोकांना माझ्याकडे पाठवा .मी बघून घेईन.
मिपा कधीही बंद पडणार नाही अशी मला तरी खात्री आहे.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2008 - 12:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
मला वाटतं संतोषराव, तुम्ही तुमची मिपावरची स्वाक्षरी बदलून पहा आणि
'हे संस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा' अशी करा. :-)

ती वाचून आम्हा तमाम मिपाच्या चाहत्यांना हजारपट जास्त आनंद होईल, तर्री चापल्याचा!

(मिपाप्रेमी) यमी

विनायक प्रभू's picture

10 Aug 2008 - 8:07 am | विनायक प्रभू

प्र्त्येक जण आपआपल्या परीने अश्वत्थामा. कुणीतरी कधीतरी काढून घेतलेल्या मण्याच्या जखमेवर तेल मागणारा. ते नाही मिळाले तर आंतरजालावर फिरुन शोधणारा. तिथेही नाही मिळाले तर मिळेल तिथे आसूड ओढुन जखम करणारा. आणि असे मी काही करत नाही असे अटोकाट भासवणारा. सगळे काही आलबेल असणार्या महान विभुतीनी हे मनावर घेउ नये.
विनायक प्रभु

विसोबा खेचर's picture

10 Aug 2008 - 9:21 am | विसोबा खेचर

या विषयावरील चर्चा आता थांबवण्यात आली आहे!

पुरे झालं आता!

सर्व मिपाप्रेमींचे आभार...

यापुढील येथील सर्व प्रतिसाद उडवले जातील...

तात्या.

सर्वांनी प्रतिक्रिया दिल्याबद्द्ल आभार....