बळी

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
24 Nov 2014 - 8:25 pm

(कथा काल्पनिक आहे)

काही वर्षांपुर्वी देशात खाद्य तेलांची कमी दूर करण्यासाठी सोयाबीन तेलाचे उत्पादन वाढविण्याचे धोरण सरकारने राबवायला सुरवात केली, अल्प दरात बँके कडून कर्ज, सुरवातीच्या काही वर्ष व्याज माफी इत्यादी सुविधा सरकारने सोयाबीन तेल उत्पादकांना देऊ केल्या. या सरकारी धोरणांचा कृषी विज्ञानी श्रीयुत वाघमारे यांनी वीआरएस घेऊन विदर्भात त्यांच्या राहत्या गावी, सोयाबीन ऑयल मिल टाकली. सुरवातीच्या दोन-तीन वर्षानंतर गाडी रूळावर येऊ लागली, पण नफा काही त्यांच्या हातात आला नव्हता. त्यासाठी मिलची उत्पादन क्षमता किमान ७०% तरी गाठणे आवश्यक होते. अनेक समस्या समोर होत्या, काहींचे समाधान त्यांच्या हातात नव्हते, उदाहरणार्थ, विदर्भात वीज उत्पादन गरजेपेक्षा कित्येक पट जास्त, पण ती वीज मुंबई पुणेवाल्यांकरता, विदर्भातील उद्योगांना वीज कपातिला तोंड द्यावे लागत होते. गावांत तर वीज कपात आणखीन जास्त.

काही समस्यांचा समाधान त्यांच्या हातात होते, सोयाबीनच्या चढत्या भावांचा फटका त्यांना बसायचा. यावर उपाय म्हणून त्यांनी, सोयाबीन साठवणीसाठी गोदाम ही बांधले. सीजनच्या सुरवातीलाच जवळपासच्या शेतकऱ्यांना काही अडवान्स देऊन शासनाद्वारा घोषित एमएसपी वर सोयाबीन खरेदीचा करार केला आणि बऱ्यापैकी खरेदी ही केली. दुसरी समस्या सोयाबीन तेल विक्रीची होती. त्यांच्या उत्पादनाचा ६०-७०% तेल नागपूरचा तेलवाणी नावाचा व्यापारी विकत घायचा. त्याची नागपुरात पेकेजिंग युनिट होती. १,२ आणि ५ किलोच्या पेकिंग मध्ये आपल्या ब्रांड नावाने पुढे तेल विकायचा. तेलवाणी धंद्यात चोख होता. ज्या दिवशी बाजारात जो भाव असेल त्या भावाने तो तेल विकत घेत असे. त्याचे पेमेंट ही व्यवस्थित आणि नियमित होते. कसली ही तक्रार नव्हती. वाघमारे यांनी विचार केला त्याच्या बरोबर विक्री करार गेला तर त्यात दोघांना ही फायदा होईल, आपली विक्रीच चिंता पुष्कळ प्रमाणात कमी होईल आणि तेलवाणी यांना एका निश्चित दरात पूर्ण सीजन तेल मिळेल. अर्थात तेलवाणी यांना ही फायदा होईलच. वाघमारे तेलवाणी यांना भेटायला नागपूरला गेले. त्यांच्या समोर आपले मनोगत स्पष्ट केले. तेलवाणी म्हणाला, वाघमारे, धंद्यात केवल स्वत:च्या विचार करायचा असतो, दुसऱ्यांच्या नाही. आपल्या सारखे लोक समुद्रातले लहान मासे, मोठा घास घेणे शहाणपण नाही. मी तेल पॅक करून विकतो. माल विक्री झाल्यावर पुन्हा खरेदी करतो. साठवून ठेवत नाही. कमी नफा मिळतो, पण नुकसान होत नाही, झाले तरी कमीच होईल. तेवढे मी सहन करू शकेन. समजा सोयाबीनची डिमांड कमी झाली तर दुसरे तेल विकेन. पण आधीच करार केला तर मला तुझ्या कडून निश्चित दरात सोयाबीन तेल विकत घ्यावेच लागेल, मग नुकसान कोणाला होणार आणि नाही घेतला कोर्ट-कचेऱ्या होईल. आपले संबंध नेहमी करता खराब होतील.

वाघमारे यांनी तेलवाणी यांना समजविण्याचे प्रयत्न केले, वाघमारे म्हणाले, सोयाबीन तेलाचे भाव सतत वाढत आहे, भविष्यात ही कमी होणार नाही. सरकारचे धोरण ही देशात तेल उत्पादन वाढविण्याचे आहे. शिवाय करार झाल्याने तुमच्या साठी माल वेगळा काढून ठेवता येतो. गेल्या वेळी, तुमचा टेंकर दोन दिवस, वाट पाहत उभा राहिला. करार झाल्याने तसे घडणार नाही. तेलवाणी हसत म्हणाला, मी काय शिकायत गेली का, त्या बाबतीत. धंद्यात अस चलायचं. पण एक लक्षात ठेव वाघमारे, शेतमालाच्या धंद्यात सरकार काही जास्त लुडबुड करते, आपल्या फायद्या साठी सरकार केंव्हाही शेतकऱ्यांच्या आणि शेतमालावर उद्योजकांच्या पाठीत खंजीर खुपसू शकते. तुम्हा शिकलेल्या लोकांना करार वैगरे यांचे जास्त फेड. माझ ऐक, तू ही शेतकऱ्यांशी करार वैगरे करण्याच्या भानगडीत पडू नकोस, नाहक बळी जाईल तुझा.

वाघमारे घरी परतले, त्यांनी ही मनात विचार केला, तेलवाणी ठीकच म्हणतो, धंद्यात स्वत:चा विचार केला पाहिजे. जो ग्राहक पहिले येईल आणि जास्त भाव देईल त्यालाच माल विकायचा. रोज झोपण्याच्या आधी, वाघमारे समाचार अवश्य बघायचे. त्या दिवशी ही रात्री १० वाजता, समाचार बघण्यासाठी टीवी लावला. समोर ब्रेकिंग न्यूज सुरु होती. आज सायंकाळी केबिनेट मध्ये खाद्य तेलांचे वाढते भाव रोखण्यासाठी, सरकारने पामोलीन तेलावर आयात शुल्क पूर्णपणे समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व राजकीय पक्षांनी आणि ग्राहक संगठनानी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. निर्णय होताच क्षणी खाद्य तेलांचे भाव जवळपास ३०% टक्क्यांनी खाली आले. बातमी पाहताच वाघमारेंच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. आता सोयाबीनचे भाव गडगडणार. तेलाचे भाव ही कमी होतील. नफा तर सोडा, होणारे नुकसान त्यांना झेपेल का? शेतकऱ्यांसोबत केलेल्या कराराला पाळणे त्यांना शक्य होणार नाही, त्यांना तोंड कसे दाखविणार. बेंकेचे कर्ज कसे चुकविणार, विचार करता करता त्यांच्या छातीत कळ उठली.....

एका माणसाचा नाहक बळी गेला.

(आयातीत पामोलीन तेल भारतीयांच्या स्वास्थ्य दृष्टीने योग्य तेल नाही. तरी ही स्वस्त असल्यामुळे सरकार आयात करते. सरकारच्या दृष्टीने महागाई कमी करणे म्हणजे खाद्यपदार्थांच्या किंमती नियंत्रित करणे. मग कुणाचा ही जीव जावो, त्याची सरकारला चिंता नाही)

समाजविचार

प्रतिक्रिया

hitesh's picture

25 Nov 2014 - 3:43 am | hitesh

प्रत्येक धंद्यात टेन्शन अदतात.