सर्वप्रथम एक खुलासा
माझे मराठी भाषेचे ज्ञान तोडके , इंग्रजी चे ज्ञान ही मोडके त्यात
माझे बारहा ऑफ़लाइन पॅड लंगडे
( रया लिहावे लागते इव्ह च्या पियकराला अडम अ वर टोपी घालता येत नाही आणि अजुन बरेच काही बारहॉ देखे है इसकी रंजीशे,,,.)
त्यात मुळ स्पॅनिश वरुन इंग्लिश वरुन माय मराठी इतना लंबा सफ़र.
त्यात मी हा असा अजुन ही बरेच काही मात्र सगळे आपणच का उघड करावे ?
बाकी या अनुवादाने भाषिक मनोरंजन झाल्यास तो एक बोनस च समजावा व त्याचा हि आनंद लुटावा. त्यामुळे अनुवादा कडुन फ़ारशा अपेक्षा ठेवु नयेत हे ओघाने आलेच,
अगोदर वाचलेले नसल्यास लेखक व त्याच्या साहित्यकृतीं मध्ये या निमीत्ताने रस निर्माण व्हावा इतक्याच माफ़क अपेक्षेने केलेला हा अनुवाद प्रपंच वा घोळ जे काय असेल ते.
मुळ लेखक - Jorge Francisco Isidoro Luis Borges
लॉटरी इन बॅबीलॉन
बॅबीलॉन च्या शेकडो गुलामांपैकी मी एक. जुलमी निरंकुश सत्तेचा, अपमानांचा, कैदेत खितपत पडण्याचा माझ्या गाठीशी मोठा अनुभव आहे. माझा उजवा हात बघा त्यातले मधले बोट गायब आहे, माझ्या फ़ाटक्या झग्याच्या भोकातुन तुम्ही बघु शकाल, तुम्हाला माझ्या पोटावर एक लालभडक रंगात गोंदलेल चिन्ह दिसेल. ते खर म्हणजे बेथ च दुसर अक्षर आहे. पौर्णिमे च्या रात्री पुरती फ़क्त, ज्यांच्या शरीरावर “गिमेल” चिन्ह गोंदलेल आहे त्यांच्यावर आमची ( बेथ गोंदवलेल्यांची ) सत्ता चालते, अर्थात आमच्यावर मात्र त्या रात्री “अलीफ़ं” चिन्ह गोंदवलेल्यांची सत्ता चालते. मात्र पौर्णिमा सोडुन इतर सर्व रात्री “अलीफ़ं” चिन्हांकीत लोक हे “गिमेल” चिन्हांकीत लोकांच्या आज्ञेत च राहतात. मागे एकदा वर्षभर मला बळी देत असलेल्या पवित्र बैलांचा गळा चिरण्याचे काम देण्यात आले होते. तेव्हा माझ्या हातुन शेकडो बैलाची हत्या झाली होती. भल्या पहाटे अंधारात, मी हे काम उरकत असे. नंतर एका पुर्ण वर्षासाठी मला अद्रुश्य घोषीत करण्यात आले होते. मी जोरजोरात ओरडायचो तरी कोणी माझ्याकडे लक्ष देत नसे, मी कोणासमोर उभा राहुन हातवारे करायचो तरी जणु काही बघितलचं नाही अस तो माणुस वागायचा. इतकचं काय मी भाकरं चोरली तरी काही होत नसे, एरवी या गुन्ह्यासाठी मला फ़ाशीची शिक्षा च मिळाली असती. ग्रीकांना देखील ठाऊक नसलेलं एक सत्य मला माहीत आहे ते म्हणजे अनिश्चीतता ! म्हणुनच कोठडित जल्लादा समोर उभा राहिलो तरी मी आशा सोडली नव्हती, आणि अत्यंत आनंदांच्या क्षणात हि भितीने कधी माझी पाठ सोडली नाही.
हेराक्लाइड पॉन्टीकस कौतुकाने नोंदवतो कि पायथॅगोरस ला त्याचे पिरह्स असणे आठवले होते. आणि त्याच्या अगोदर युफ़ोब्रस आणि त्याच्या अगोदर अजुन कोणी.. मला मात्र असे बदल आठवण्यासाठी मृत्यु वा असल्या गोष्टींची गरज पडत नाही. आयुष्याची हि सर्व राक्षसी विवीधता मला एकाच संस्थेत सरळ दिसुन येते. ती म्हणजे लॉटरी जी माझा बॅबिलॉन सोडुन इतर देशांत एकतर अस्तित्वात च नाहीये. किंवा असेल तरी लपुन छपुन खेळली जात असेल वा सदोष खेळली जात असेल. मी लॉटरी या प्रकाराच्या इतिहासात कधीच डोकावुन बघितल नाही. मला माहीत आहे विद्वानांच यावर एकमत होउ शकत नाही. लॉटरी चा जो खरा महान हेतु आहे त्याविषयी विचाराल तर मला काहीच माहीत नाही. म्हणजे चंद्रा च ज्योतिषशास्त्रात काय महत्व आहे हे एखादा ज्योतिष काहीच न शिकलेला माणुस समजुच शकत नाही तसचं काहिस. म्हणजे तितकचं मला लॉटरी च्या ग्रॅन्ड परपज विषयी माहीत आहे.
माझ्या देशात लॉटरी हे एक महत्वाचं वास्तव आहे एक महत्वाची बाब आहे. आजपर्यंत मी लॉटरी या विषयावर कधी काही विचारच नाही केला. जसा मी देवाविषयी किंवा माझ्या ह्र्दयाविषयी फ़ारसा विचार करायच्या फ़ंदात पडत नाही तसाच लॉटरीबाबत ही फ़ार विचार केला नव्हता. आता माझ्या प्रिय बॅबिलॉन पासुन तेथील माझ्या आवडत्या परंपरांपासुन दुर आलोयं तर आता कुठे थोडा विचार करु लागलोय लॉटरी विषयी, थोडा चक्रावुन गेलोयं, मला आठवतयं ते लोकांच काहीतरी मोठ पाप करताय जणु अशा भावनेने , लॉटरी विषयी रात्री बेरात्री अंधारात कुजबुजणं, बोलण,. माझे वडिल मला सांगत असत की अनेक शतकांपुर्वी लॉटरी चा जो खेळ होता हा बॅबिलॉन च्या जनतेमध्ये अगदी सामान्य लोकांमध्ये खेळला जात असे. आता खर खोट काय ते माहीत नाही पण वडिल सांगत की तेव्हा चे न्हावी जे असत ते लोकांकडुन तांब्याची नाणी घेत व त्या बदल्यात एक आयताकृती तुकडा ( हाडांनी बनवलेला ज्यावर काही प्रतिकं कोरलेली असत) तो देत. मग एक दिवस सोडत ठेवली जात असे. आणि ज्यांच्यावर दैव प्रसन्न होत असे, (चान्स च्या कन्कर्मेशन शिवाय ) ते मग चांदिची नाणी जिंकत असत. तुमच्या लक्षात आलं च असेल किती साधी ! अगदिच प्राथमिक स्वरुपाची अशी हि लॉटरी होती ते. अर्थातच या लॉटरीतील लोकांचा रस लवकरच संपला. कारण हि फ़क्त लोकांच्या आशेला जागवत असे. यात कुठलाच मोराल फ़ोर्स नव्हता.
यामध्ये मग काहिंनी एक शक्कल लढविली ती अशी की लकी नंबर्स च्या सोडती बरोबरच एक अनलकी नंबर्स ची सोडत देखील सुरु केली. म्हणजे अस की आता आयताकृती तुकडा ( ज्यावर नंबर लिहुन दिला जात असे ) त्यात आता दोन चान्स दिले जात. एक जर लकी नंबर आला तर तो माणुस मोठी रक्कम जिंकेल आणि जर अनलकी नंबर आला तर जिंकण्याएवजी त्याला मोठी रक्कम दंडस्वरुपात भरावी लागेल. आता हि रीस्क काही फ़ार मोठी नव्हती ( ३० लकी नंबर्स मध्ये १ अनलकी नंबर असे प्रमाण होते.) याने मात्र बॅबिलॉनवासीयांना वेड च लावले.मोठ्या संख्येने नागरीक तीकीट घेण्यासाठी गर्दी करु लागले. जो एक ही तिकीट विकत घेत नसे तो डरपोक समजला जाऊ लागला. असा माणूस ज्यात काहिच दम नाही जरादेखील साहस नाही. अशा डरपोक लोकांबरोबर आता आणखी एक वर्ग निर्माण झाला होता त्यात असे लोक होते की जे हरणारे व त्यामुळे दंड भरावा लागणारे असे होते. तर असे डरपोक व हरणारे दोन्ही प्रकारचे लोक सर्वांच्याच तिरस्कारा चा विषय बनले होते.
आता कंपनी ला ( लॉटरी संचालक आता कंपनी च्या नावाने ओळखले जाऊ लागले होते) जिंकणारे जे होते त्यांच हित बघणं आवश्यक होतं, कारण जो पर्यंत हरलेल्यां कडुन दंडा ची पुर्ण वसुली केली जात नाही तो पर्यंत त्या रकमेतुन विजेत्यांना बक्षीस वाटप करणं शक्य नव्हत. मग न्यायालयात हरलेल्यां विरोधात दंडा च्या वसुली साठी खटले दाखल करण्यास सुरुवात झाली. जे दंड अधिक कोर्टा चा खर्च हि आकारला जाउ लागला. जर दंड भरला नाही तर ठराविक दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागे. कंपनी ला शह देण्यासाठी सर्व हरलेल्यांनी मुद्दाम च दंड न भरता तुरुंगवास निवडला. या काही मोजक्या लोकांनी कंपनी ला आव्हान दिल्याने झाल काय उलट कंपनीची ताकद अधिक च वाढली आता कंपनी ची ताकद अधिकच व्यापक झाली, अधिकच प्रतिकात्मक झाली. आता पुढील सोडतीं मध्ये तर कंपनी ने अनलकी नंबर्स च्या यादी सोबतच. प्रत्येक नंबर मागे सरळ सरळ किती दिवसांचा तुरुंगवास भोगायचा तो आकडा च लिहुन द्यायला सुरुवात करुन दिली. सुरुवातीला तर याकडे इतक्या महत्वाच्या उल्लेखा कडे कोणाच लक्ष च गेल नाही. आणि हिच ती पहिली वेळ होती जेव्हा लॉटरी मध्ये आर्थिक सोडुन इतर बाबीं चा हि चंचुप्रवेश होऊ लागला होता. याने कंपनी ला प्रचंड मोठ यश मिळाल. कंपनी वर आता अनलकी नंबर्स ची संख्या वाढवण्यासाठी खेळाडुं कडुन मोठा दबाव येऊ लागला.
खर म्हणजे सर्वांनाच माहीत आहे की, आम्ही बॅबिलॉन वासी तर्क व सिमेट्री चे किती मोठे प्रेमी आहोत ते. त्यामूळे नाही म्हटलं तरी हि बाब थोडी खटकत च होती की लकी नंबर्स ला छान चांदिची नाणी बक्षीसात द्यायची आणि अनलकी नंबर्स ची गणती सरळ कैदे च्या दिवसांत च करुन द्यायची. आता काहि नैतिकता वाद्यांनी वाद घालायला सुरुवात केली की, खरा आनंद हा चांदि च्या वा कुठल्याही नाण्यात नसतो. आनंद हा इतर गोष्टीं मध्ये ही असतो किंबुहना काही इतर गोष्टींमध्ये आनंद अगदि च सरळ स्वछ प्रत्यक्ष स्वरुपात असतो. असा नुस्ता प्रतिकात्मक. नकली नसतो.
शहरातल्या खालच्या वर्गातील गरीबांचा मात्र भलताच तर्क होता. त्यांच म्हणण होतं की श्रीमंत अभिजन वर्गातले लोकं मोठ्या प्रमाणात जुगार खेळतात व लोभ, भय आणि आशा निराशेच्या खेळातील सर्व आनंद उपभोगतात. आणि त्यांना (गरीबांना )मात्र कितीही इच्छा असली तरी या लॉटरी च्या खेळातली झिंग उपभोगण्याची संधी च मिळत नाही. त्यांना या आनंददायी प्रसंगी अतिशय एंद्रिय असा अनुभव देऊ शकणारया खेळापासुन नाइलाजाने वंचितच राहावे लागते. मग मात्र बॅबिलॉन मध्ये लॉटरी खेळण्याची संधी स्त्री-पुरुष गरीब-श्रीमंत सर्वांनाच समानतेने मिळाली पाहिजे यासाटी उग्र आंदोलने हॊऊ लागली. काहि जुने खोड मात्र हे मानायलाच तयार नव्हते कि ही एक इतिहासाची आवश्यकच अशी एक पायरी आहे. एकदा एका गुलामाने लॉटरी च एक तिकीट चोरलं. सोडती नंतर लक्षात आलं कि त्या तिकीटा च्या नंबर साठी शिक्षा नोंदवलेली होती की ज्याला तो अनलकी नंबर लागेल त्याच्या जिभेवर शिक्षेच्या स्वरुपात लाकडाचा जळका तुकडा ठेवावा. योगायोग असा कि बॅबिलॉन च्या कायद्यात हि जो लॉटरी च तिकीट चोरेल त्याच्यासाठी याच शिक्षेची तरतुद केलेली होती. आता यावर बॅबिलॉनकरां मध्ये थोडे मतभेद दिसुन आले. एका वर्गाच म्हणण होत कि. त्या गुलामाने चोरी केली म्हणुन हि शिक्षा योग्य आहे. दुसरा वर्ग थोडा अधिक बुद्धीजीवींचा होता त्यांच म्हणणं कि शिक्षा व्हायलाच हवी मात्र ती अशासाठी अधिक योग्य आहे कि त्या गुलामा च दैव जे आहे त्याने च हि शिक्षा सुनावलेली आहे नाहितर हेच तिकीट त्याने नेमक का चोरलं ? त्याला दुसर हि लकी नंबर च तिकीट मिळु शकल असत.
थोडा काळ मारामारी रक्तपात हिंसाचार वगैरे झाला पण अखेरीस आम जनतेचं आंदोलन यशस्वी झाल. सर्वानुमते अस ठरल कि कंपनी ला च आता संपुर्ण जनतेवर सार्वभौम अधिकार दिले गेले पाहीजेत. (कंपनीला हे सर्वाधिकार देणं व जनता व कंपनीची सांधेजोड करण अर्थातच आवश्यक होत कारण या सर्वस्वी नवीन प्रकारच्या कार्यक्रमांची व्याप्ती आणि गुंतागुंत फ़ारच मोठी होती) दुसर अस एक ठरलं की लॉटरी आता पुर्णपणे मोफ़त करण्यात आली, आणि अगदि प्रत्येकाला त्यात सहभागी करुन घेण्यात आल. लॉटरीत आता सर्वांनाच मुक्त प्रवेश दिला गेला. आणि अर्थातच याच बरोबर लॉटरी पुर्णपणे सिक्रेट हि ठेवण्यात येउ लागली. एकगठ्ठा मोठ्या संख्येने तिकीट विक्री करण्यावर बंदी टाकण्यात आली. प्रत्येक माणसाचा लॉटरीत सहभाग ऑटोमॅटीक होउ लागला.
दर ६० रात्री नंतर पवित्र सोडत काढण्यात येऊ लागली. सोडत महान पवित्र मंदिराच्या भव्य सभागृहात काढली जात असे. यात प्रत्येक माणसाची ( एकुण एक ) नियती पुढील ६० दिवसांच्या कालावधी साठी, पुढिल सोडती पर्यंत निश्चीत होउन जात असे.या सोडती चे परीणाम अमर्याद .अथांग .अनाकलनीय व मोजदाद करण्यास अशक्य असे होते.उदा. लकी नंबर लागला तर एखाद्या सामान्य माणसाला सरळ कौन्सिल मध्ये स्थान मिळुन जात असे, किंवा कधी त्याच्या शत्रु ला तुरुंगवास मिळत असे. किंवा कदाचित एखाद्या सुंदरी चा जिची त्याने स्वप्नातही कधी आशा केली नसेल. सहवास हि लाभत असे. त्याउलट अनलकी नंबर आला तर अनेक प्रकारच्या नुकसानीला, अपमानां ना कधी कधी तर मृत्यु ला हि तोंड द्यायची पाळी येत असे.
कधी कधी एखादि घटना उदा. क्ष या व्यक्तीची त्याच्या च घरात झालेली हत्या , किंवा ज्ञ या व्यक्तीच अचानक मोठ्या महत्वाच्या पदावर पोहोचणं ही तीस ते चाळीस सोडतींच्या एकत्रित परीणामांचा परम्युटेशन्स कॉम्बीनेशन्स चा परीणाम म्हणुन झालेली घटना असे. पण त्या घटनेमागची एकत्रित कारण मिमांसा करण श्रुंखला लावण सामान्य लोकांना अतिशय अवघड होउन बसलं होत. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे कंपनी चे संचालक तेव्हाही ( आणि अजुनही) अतिशय शक्तीशाली आहेत चतुर आहेत. एखादी आनंदाची घटना म्हणजे दुसर तिसर काही नसुन सरळ सरळ लॉटरी च्या च एखाद्या सोडती च्या परीणामस्वरुप आहे. असा विचार आला तर घटनेतील थ्रिल च निघुन जात असे. हि कंपनी च्या संचालकांसाटी मोठी च समस्या होती.यासाठी कंपनीच्या एजंटांनी एक नवीन शक्कल लढविली. लोकांच्या मनातील भाव –भावना आशा निराशा त्यांची स्वप्ने आदि जाणुन घेण्यासाठी त्यांनी आता ज्योतिषांची व गुप्तहेरांची मदत घ्यायला सुरुवात केली
शहरात एक मंदिर होत. तेथे सिहांचे काही दगडी पुतळे होते. अशी वंदता हळुहळु पसरली की या मंदीरातील सिंहाच्या दगडी शिल्पातील पोकळीत ( तडे गेलेल्या ) जर आपल्या आकांक्षा आदि लिहीलेली पत्रे ठेवली तर कंपनी पर्यंत ती पोहोचतात इथे लोकं आपापल्या मनात धगधगत असलेल्या वासना इच्छा आदि व्यक्त केलेली पत्रे आणुन ठेवु लागले..कंपनी या सर्वांची पद्धतशीर नोंद घेउ लागली. लोकांच्या आकांक्षांचे रेकॉर्ड्स काळजीपुर्वक सांभाळले जाउ लागले. कंपनी यावर प्रत्यक्ष कधीच उत्तर देत नसे ती लॉटरी च्या सोडतीतुन याचे अप्रत्यक्ष उत्तर देत असे...
क्रमश:
१-बोर्जेस विषयी अधिक माहीतीसाठी http://en.wikipedia.org/wiki/Jorge_Luis_Borges
२-बोर्जेस चा मार्मिक इंटरव्ह्यु- http://www.theparisreview.org/interviews/4331/the-art-of-fiction- no-39-jorge-luis-borges
प्रतिक्रिया
8 Nov 2014 - 8:53 am | खटपट्या
वाचतोय !!
8 Nov 2014 - 9:47 am | बोका-ए-आझम
वाचतोय. पुभाप्र.
8 Nov 2014 - 10:30 am | एस
मार्मिक आणि भेदक! समाजाच्या अशा भाष्यकारांचे लेखन विचारप्रवर्तक असते!
8 Nov 2014 - 11:51 am | साती
एकदम भारी आहे कथा.
अनुवाद छान जमलाय.
8 Nov 2014 - 12:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
वाचतोय ! कथा उत्कंठावर्धक आहे. पुढे अधिकाधीक खुलत जाईल अशी खात्री झालीय !
9 Nov 2014 - 12:36 am | मुक्त विहारि
वाचतोय...
10 Nov 2014 - 10:10 am | मदनबाण
वाचतोय...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }