व्रण जीर्ण बंधनांचे
भयगच्च कंपनांचे
दीर्घ आव्रुत्त घ्रुणांचे
क्षण क्षीण रासभाचे
समरी प्रदीप्त, दहनी अलिप्त, श्रवणी प्रदीर्घ रणदुंदुभी |
जठरी समस्त, नयनी प्रदीग्ध, भुवनी प्रक्षुब्ध शिवअंबिणी ||
रण अंगणी धुळीचे
मतिशून्य गोंधळीचे
विषदग्ध चित्त साचे
क्षण क्षीण रासभाचे
घनघोर युद्ध, क्रुत विद्ध शुंभ, शर वध्य दंभ, जय अंबिके |
चामर चिक्षूर, मदमत्त दुर्धर,
करि हन्त हन्त श्री अंबिके ||
लय स्तब्ध बद्ध गुरूचे
जय शुष्क रुक्ष तरूचे
हत रिक्त आर्ततेचे
क्षण क्षीण रासभाचे
अक्राळ विक्राळ जिव्हा सर्पिणी त्या,
सिंहस्थ म्रुत्यू रणी राक्षसां त्या |
चंडी प्रचंडी भूजा रक्त प्याल्या,
वसुधैव गगनी दिशा लुप्त झाल्या ||
क्षण मूढ कल्पनांचे
खडखट्ट टंकण्याचे
फिरूनि पुन्हाच वाचे
शत शब्द रासभाचे
_/\_ जय गुरुदेव।
प्रतिक्रिया
25 Oct 2014 - 8:22 am | जयंत कुलकर्णी
आपण "निराकार" आहात यावरचा विश्वास उडत चालला आहे.
आपण "गाढव'' आहात यावर विश्वास कधीच नव्हता......
:-)
25 Oct 2014 - 12:49 pm | आदूबाळ
+१
मस्त लयबद्ध कविता आहे. अर्थाबिर्थ गेला खड्ड्यात.
29 Oct 2014 - 4:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कविता मोठ्ठ्याने वाचली. गंमत वाटली.
25 Oct 2014 - 9:29 am | कवितानागेश
शॉल्लिट लिवलय.
कॉलिन्ग शरदिनी.
25 Oct 2014 - 10:25 am | एस
तुम्हांला काही अर्थ कळला असेल तर कृपया भांडाफोड करून मजसी वदावे.
बाकी ते जयंतरावांसारखेच म्हणतो.
25 Oct 2014 - 10:47 am | कवितानागेश
माझ्याकडे अनुभव नसल्यानी मला अर्थच कळत नाही. पण मला कळत नाही म्हणून मी अश अलौकिक रचणे ला निरर्थकही म्हणणार नाही. षब्द्वैभव बघूनच मी गार पडलेय.
25 Oct 2014 - 10:36 am | अत्रुप्त आत्मा
गाढव्राव झिंदाबाद! :-D
25 Oct 2014 - 10:39 am | अजया
___/\___
जे काय क्रिप्टिक लिहिलंय ते उलगडणारी पुढची कविता येऊ दे!
30 Oct 2014 - 3:37 pm | निराकार गाढव
म्या लिवल्येलं पुन्ना-पुन्न्यांदी वाचा. गाडाव ज्यॅकासाची लिवतं त्ये उमगाया मानसास्नी येळ लागनारच.
25 Oct 2014 - 11:05 am | कंजूस
१)गाढवाला कसले दु:ख झाले आहे ?
२)त्याचे क्षण असे क्षीण का होत आहेत ?
३)गाढवे जिथे राहातात तिथे सिंह नसतात तरी त्याला सिंहांपासून धोका कसा ?
४)गगनाकडे लाथा झाडणाऱ्या रासभास दिशा लुप्त झाल्याने काय फरक पडणार आहे ?
गुण २०
25 Oct 2014 - 5:46 pm | तिमा
त्याचे क्षण क्षीण झालेले नसून केवळ या 'क्षीणसागरावर' कशी मात करायची याचीच अल्प चिंता लागली आहे.
30 Oct 2014 - 5:22 am | निराकार गाढव
येकदाम ब्रोब्र!
क्षीण चिंतासागराच्या प्रवाहाने घनव्याकूळलेल्या आर्ततेतून
पाझरलेल्या शब्दरुपि जलवल्लिका आहेत ह्या.
30 Oct 2014 - 6:07 am | अत्रुप्त आत्मा
@शब्दरुपि जलवल्लिका आहेत ह्या. >>> =))
25 Oct 2014 - 11:14 am | माम्लेदारचा पन्खा
बंपर हाय ह्ये....
शब्द अनाकलनीय तर्किकाचे
जणू वाशिंड माजलेल्या वृषभाचे
फिरूनी पुन्हा ते आले
काव्य इथल्याच गर्दभाचे....!
30 Oct 2014 - 3:34 pm | निराकार गाढव
__/\__
25 Oct 2014 - 11:14 am | पैसा
काय देखणी शब्दकळा आहे! शरदिनीतैंसारखी निराकार कविता. अर्थ बिर्थ लावायला नकोच.
25 Oct 2014 - 12:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
अनर्थात अर्थ शोधणे अर्थात अनर्थ असणे... यासाठीच्या तालिम / रियाज / सरावासाठी आदर्श असलेला एक अत्युत्तम काव्याविष्कार !!!
आता याची पुढच्या वर्षीच्या नोबेल पारितोषिकासाठी शिफारस करणे आले ;) :)
30 Oct 2014 - 5:59 am | निराकार गाढव
बेशर्ट ढण्यवाड, एक्काकाका!
ईश्श्य!... स्वप्नांत रंगले मी....

30 Oct 2014 - 9:24 am | सतिश गावडे
>> ईश्श्य!... स्वप्नांत रंगले मी....
लोकांची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध.
तुम्ही निराकार गाढव नसून निराकार गाढवीण आहात.
30 Oct 2014 - 9:38 am | गवि
आता पुष्कळ गाढवांच्या मयत्रीसाठी तयार रहा.. ;)
30 Oct 2014 - 9:41 am | प्रचेतस
कुठली गाढवे?
आकारवाली का आकारविहीन?
30 Oct 2014 - 9:43 am | अत्रुप्त आत्मा
=)))))
30 Oct 2014 - 3:33 pm | निराकार गाढव
ऑ! Sexist comment? You are welcome!!!
25 Oct 2014 - 12:29 pm | सस्नेह
अलिकडे गाढवेपण गाढवासारखी वागत नाहीत !
कलियुग हो कलियुग...
25 Oct 2014 - 12:52 pm | टवाळ कार्टा
.
25 Oct 2014 - 6:07 pm | प्यारे१
छानच ऑहॉ हॉहॉ कविता
30 Oct 2014 - 6:09 am | निराकार गाढव
थॉ हॉ न्कू ... थॉ हॉ न्कू ... थॉ हॉ न्कू
30 Oct 2014 - 6:09 am | निराकार गाढव
थॉ हॉ न्कू ... थॉ हॉ न्कू ... थॉ हॉ न्कू
26 Oct 2014 - 6:33 pm | बॅटमॅन
अर्थबिर्थ जावो गाढवाच्या.....ऊऊऊऊऊप्स सॉरी बरंका निराकार गाढवजी. आय मीन अर्थबिर्थ राहूदे, कविता आवडली.
26 Oct 2014 - 9:01 pm | सूड
आपण (म्हणजे तुम्ही) गाढव नाही याची खात्री होतीच, तुमच्या आयडीचे व्यास कोण हे कळलं की झालं !! ;)
26 Oct 2014 - 9:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
सोप्पय !
पहिल्यांदा आयडीची त्रिज्या काढा... व्यास तिच्या दुप्पट आस्तो. हाकानाका :) ;)
30 Oct 2014 - 6:25 am | निराकार गाढव
क्काय? गाढव नाही म्हणता? गुर्जींचा मॉठ्ठा आपमाण आहे हा.
30 Oct 2014 - 8:42 am | अत्रुप्त आत्मा
@गुर्जींचा मॉठ्ठा आपमाण आहे हा. >>> =))
30 Oct 2014 - 3:02 pm | पैसा
हा निराकार आत्मुबुवांचा शिष्य आहे का?
30 Oct 2014 - 5:10 pm | अत्रुप्त आत्मा
@आत्मुबुवांचा शिष्य आहे का?>>>> :-D आत्मा हा निराकाराच असतो! शिष्याचे माहीत नाही. :P
1 Nov 2014 - 9:01 am | नाखु
निराकाराचे गुरु आहेत काय??? किमान एकलव्यासारखे तरी!!!
असल्यास गुरुंनी शिष्याला अंगठा दखवला का शिष्याने गुरुला ??? खुलासा झालाच पाहिजे!!
कालच मा.देवेन्द्र यांनी सांगितले पारदर्षी कारभार होणार म्हणून,तेव्हा शुभारंभ तुमच्या पासून होउन जावूदे!!
मि.पा.प्रतिसाद विबंडल्न गॅलरी प्रेक्षक.
आसन क्रमांक २५
1 Nov 2014 - 1:22 pm | निराकार गाढव
ऑ? माझ्यासारख्या मणावर मणातील मणाबाहेरून मणसोक्त विजय मिळवलेल्या गर्दभश्रेष्ठाचे गुर्जी असे शूद्र मणुष्ययोनीतील असतील आसं वाटलंच कसं तुंम्हाला?

1 Nov 2014 - 1:54 pm | पैसा
काकाजी, आत्मा अमर आहे! मणुश्ययोनीतले म्हणून अत्रुप्त आत्म्याचा अपमान करण्याचे धारिष्ट्य करू नका. शेवटी गुर्जी आहेत. ओम फट स्वाहा म्हणून एखादा शाप देतील तेव्हा कळेल!
3 Nov 2014 - 6:12 am | निराकार गाढव
मणुष्यजातीचे गुरूजी माणसांसाठी ठीक आहेत. पण माझ्यासारख्या हुच्च जातीच्या आणि विद्वानाला ते काय शिक्कीवणार? त्यासाठी आमचे स्पेशल गुर्जीच पायजेलेत.
3 Nov 2014 - 6:42 am | निराकार गाढव
आणि शापाची भिती कोणाला दाखवताय? आमचे गुर्जी शाप वगैरेवर विश्वास नाही ठेवत.
3 Nov 2014 - 10:02 am | पैसा
हे गाढव आहे का कोण! गाढवं नेहमी गरीब बिचारी असतात. हे लैच्च भांडखोर निघालं!
3 Nov 2014 - 11:24 am | टवाळ कार्टा
=))
1 Nov 2014 - 5:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
या घोर कलियुगात तुमच्या मणावर पडणारे मणामणाचे ओझे समजू शकतो ;)
29 Oct 2014 - 3:50 pm | मनीषा
ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखी वेद वदविले होते म्हणे ..
तुमच्यावर सरस्वती देवीचा वरदहस्तं असावा असे वाटते आहे ...
कविता भलतीच ऊंच आहे ....
29 Oct 2014 - 4:10 pm | विजुभाऊ
शिवअंबिणी हा शब्द "शिव + अंबु = शिवांबु " या अर्थानेच वापरलाय ना?
30 Oct 2014 - 6:32 am | निराकार गाढव
श्शी! अश्ये घाणेरडे प्रकार गाढवं नाही करत.
30 Oct 2014 - 9:49 am | अनुप ढेरे
हा हा हा. भारी!
30 Oct 2014 - 8:25 pm | सुहास..
हा हा हा हा हा हा !!
शरदिनीच !!
3 Nov 2014 - 7:55 am | आनंदी गोपाळ
मिपावर प्रतिसाद टंकताना टंकणार्यांच्या मनात नक्की काय सुरू असतं, त्याचं तरल अन भावदर्शी कथन. मोक्याच्या धाग्यांवर रासभलीला सुरू होण्याआधी मनातल्या खळबळीवर व रक्तातल्या वारुणीवर स्वार होऊन जी काय आवर्तने मेंदूत उठतात, ज्या आठवणींच्या संदर्भांचे आवेग दाटून येतात, अन रणांगणावर लखलखणार्या समशेरींसारख्या जिव्हा कारुण्यटंकन करू लागतात! त्याचे हे खरे वर्णन.
वावावा! आवडले, हे वेगळे सांगायला नको.