पुणे ट्रॅफिक पोलिस .

किशोरअहिरे's picture
किशोरअहिरे in जनातलं, मनातलं
13 Oct 2014 - 12:32 pm

कालचा अनुभव .. अत्यंत लाजिरवाना/संतापजनक आणी जनतेला कसे लिगली लुटावे ह्याचा घेतलेला हा अनुभव
आभार पुणे ट्रॅफिक पोलिस .

काल दिवाळी शॉपींग साठी म्हनुन कार घेऊन निघालो .. नेहमी प्रमाणे जुन्या मुंबई - पूणे हायवे ला
वाकडेवाडि कडुन एक अंडर ब्रिज आहे .. तिकडुन कार काढली तर समोर साक्षात १०-१५ ट्रॅफिक पोलिस ऊभे
कमीत कमी २० कार / ४ चाकी आडवुन ऊभे .. पावत्या फाडायला.. (ईतके पोलिस सोडा एक पोलिस सुध्दा कधी संध्याकाळि भव्य ट्रॅफिक जाम असतो तेंव्हा तर दिसत सुध्दा नाही )
मला पण आडवुन ..
पोलिसः "ए चल लायसन काढ (अरेराविपनाने बोलत..) " (ह्याना नीट का बोलता येत नाही)
मी: "लायसन हातात दिले.. (सिट बेल्ट पण लावलेला)"

पोलिसः " (१०० रु. पावती हातात देऊन) १०० रु. दे आणी निघ..
मी: " कशाचे.. माझ्याकडे कारचे रजि./ पी यु. सी. सिट बेल्ट्स सगळे नीट आहे"
पोलिसः "वाद घालतो काय .. पैसे दे आणी निघ .. नो एन्ट्रि मधे गाडी आलीय तुझि"
मी:" कसली नो एन्ट्री .. कधी पासुन?"
पोलिसः " तिकडे एन्ट्री ला बोर्ड आहे.. पाहुन घे" ..
मी:"दिसला तर नाही?? (आनी जरी खराच असेल तर तो एखाद्या झाडा मागे लपुन जाईल असा लावाला असेल.. नाही तर २०+ लोक चुका करु शकत नाही)

असो १००र. तर गेले.. पण विरुध्द साईड ला सर्रास ट्रॅफिक चालु सेम पाथ नी .. ंमी पोलिस ला विचारले त्याना कसे जाउ देता .. आडवा ना त्याना पन..

त्या महाराजानी एक छोट्यासा व सहज न दिसेल असा बोर्ड दाखवला..(कारला प्रवेश नाही )आणी
मला सांगितले की ते बोर्ड पाहतिल ते.. आणी नाही पाहिले की १०० रु. दंड भरतील..

ह्या सगळ्ञा मधे एक नक्की कि मुद्दाम न दिसेल असा बोर्ड लावुन पैसे खाय्चे ..

जिकडुन वाहन पुला खाली एन्ट्री करतात त्यच्या वर मोठ्या फाँट मधे ह्यंनी का नाही लिहावे??
ईतकी वाईट प्रव्रूत्ती कशामुळे... ???

समाजअनुभव

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

13 Oct 2014 - 12:47 pm | विजुभाऊ

पुणे पोलीस ना!!! मग बरोबर आहे....

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2014 - 1:22 pm | टवाळ कार्टा

चेपुवर टाका फोटोसकत...कळूदे सगळ्यांना

मला माहित आहे साधरणपणे १९९८ पासुन हा अंडरपास
फक्त दुचाकी वाहनांसाठीच आहे. तसे फलक सुध्दा आहेत
हा माझा रोजचा येण्या-जाण्याचा रस्ता आहे.
तुमच्या बरोबर रिक्शावाल्यांनापण पकडले का?

काळा पहाड's picture

13 Oct 2014 - 1:37 pm | काळा पहाड

अहो तिथं बोल्ड मध्ये लिहिलंय की तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना प्रवेश नाही म्हणून. पेपरमध्ये पण बातम्या येत असतात सारख्या की इथले राजकारणी या बाबतीत सतत ढवळाढवळ करतात आणि पोलिसांना कामं करू देत नाहीत म्हणून. आता तुम्ही ते सकाळ नावाचं वृत्तपत्र वाचत असलात तर माहीत नाही. पण बहुतांशी सगळ्यांना माहीत आहे की हा अंडर ब्रिज फक्त दुचाकीसाठी आहे. तेव्हा पोलिसांनी जे केलं ते बरोबरच आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Oct 2014 - 2:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पोलिसांनी योग्य केले पण बोल्ण्यात नम्रता हवी की नको?. माजोरडेपणा उपयोगाचा नाही. अंडर ब्रिजवरून एखादा राष्ट्रवादीचा धटिंगण तुझी ती स्कॉर्पियो चालवत गेला तर तो पोलिस अडवेल काय?

जा तेथुन आणि बघा अडवतात का ?
मनातल्या शंका दुर होतील.

फास्टरफेणे's picture

13 Oct 2014 - 2:39 pm | फास्टरफेणे

मला वाटायचं फक्त भारतीय "बगळेच" लपून बसून "मासे" पकडतात...पण अमेरिकेतील पोलिसही तसंच करतात :)

तो रस्ता फक्त दोन चाकीसाठी आहे. सगळयांना माहित आहे. तिथे स्पष्ट बोर्ड आहे.

असंका's picture

13 Oct 2014 - 2:55 pm | असंका

...आपल्याला झालेल्या त्रासाबद्द्ल सहानुभूती आहेच!!

सौंदाळा's picture

13 Oct 2014 - 3:29 pm | सौंदाळा

तो रस्ता फक्त दोन चाकीसाठी आहे.

येस्स
तिकडुन हल्ली फार वेळा गेलो नाही तरी जेव्हा गेलो होतो तेव्हा तरी व्यवस्थित फलक होता. तिथुन सर्रास चार चाकी जात असतात. कधी तरी धाड पडतच असते.
भाषेबाबत मात्र सहमत. आपल्याला उद्दामपणे कोणी अरे-तुरे केले तर मी सुध्दा समोरच्याचे वय वगैरे न बघता अरे-तुरे वर येतो.

मृत्युन्जय's picture

13 Oct 2014 - 3:48 pm | मृत्युन्जय

वाकडेवाडीचा पुलाखालील रस्ता दुचाकींसाठीच आहे. चारचाकी वाहनचालक वेळ वाचवण्यासाठी दामटुन तिथुन गाडी नेतात. पोलिस बर्‍याचवेळा दुर्लक्ष करतात. सध्या बहुधा टार्गेट पुर्ण करायचे असावे.

बाकी पोलिसांच्या उर्मट भाषेबद्दल सहमत. सौजन्य फक्त दोने वर्षातुन एकदा जाहीर होणार्‍या सप्ताहातच जमले तर दाखवायचे असते अशी त्यांची समजूत असावी. त्यांचेही बरोबरच आहे म्हणा. खास असे सप्ताह आयोजित केल्यावर इतर दिवशी सौजन्या नाही दाखवले तरी चालेल अशी समजूत होणारच.

थोडे करेक्शन - मधल्या काळात काही कारणाने तो चारचा़ईंसाठी चालू केलेला होता. बहुधा शिवाजीनगरच्या ग्रेड-सेपरटरच्या वेळेस. त्यामुळे तेव्हा लोआंना त्या पुलाखालून जायची सवय झाली आहे.
बाकी त्या रस्त्याचा आकर पाहता मी थोडा वेळ लागला तरी बाहेरूनच जाणे पसंत करतो.

तो भुयारी मार्ग तेथील एका मानानीयांच्या इच्छेमुळे चार चाकींसाठी चालू झाला होता. पण खुपच ट्राफीक जाम व्हायला लागल्यामुळे पोलिसांनी चार चाकींसाठी तो पुन्हा बंद केला.

काळा पहाड's picture

14 Oct 2014 - 6:15 pm | काळा पहाड

या माननीय वगैरे लोकांना आयसिसच्या ताब्यात देण्यासाठी काय करावे लागेल बरे?

जिन्क्स's picture

13 Oct 2014 - 4:21 pm | जिन्क्स

काळा पहाड यांच्याशी सहमत. पुण्यात जगजाहीर आहे की हा रस्ता फक्त फक्त दुचाकी वाहनांसाठीच आहे. तसे फलक सुध्दा आहेत. तसही चारचाकी अरामात बसेल एवढा रस्ताही नाही.

तुषार काळभोर's picture

13 Oct 2014 - 5:31 pm | तुषार काळभोर

पण असाच आहे. दुचाकीला बंदी असल्याचा फलक इतर ४-८ फलकांबरोबर आहे, त्यामुळे गाडी चालवताना त्याकडे लक्ष जात नाही. शिवाय त्याचा आकार अंदाजे २*३ फूट आहे. तो काही नजरेत भरण्यासारखा नाही. एकदा पावती फाडल्याशिवाय तो नियम कळतसुद्धा नाही.
(वाकडेवाडीचा फलक मात्र सहज दिसण्यासारखा आहे.)

प्रसाद१९७१'s picture

13 Oct 2014 - 6:28 pm | प्रसाद१९७१

तो रस्ताच इतका छोटा आहे की चारचाकी घेउन जाताना नक्की मनात शंका येइल.

बाबा पाटील's picture

13 Oct 2014 - 8:24 pm | बाबा पाटील

तुम्ही पेपर वाचत नाही का हो ? अधुन मधुन वाचत जा ? कस आहे बाकी काही कळो न कळो पण आमच्या पुण्यातल्या रस्त्यांच्या वाहतुकीची माहिती तर मिळेल.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्या रस्त्यावरून चारचाकीला बंदी आहे. आणि लक्ष्यपूर्तीसाठी असे एकगठ्ठा पोलीस दिसणंही दुर्मिळ नाही. किंबहुना फक्त याच दिवसात प्रत्येक दंडाची पावती मिळते.

विटेकर's picture

14 Oct 2014 - 4:15 pm | विटेकर

तुमचे अभिनन्दन !
या भागात तुम्हाला ट्रयाफिक पोलिस दिसले ! रोज इतकी गर्दी असते त्या भागात , कुठे कडमडतात कोणास ठाऊक ?
काल सयाजी समोर एक कंटेनर उलथला होता.. तीन तास जाम !
अशी चीड येते ......
उद्या सन्धी आहे ती चीड बाहेर काढण्याची !!

असंका's picture

16 Oct 2014 - 1:45 pm | असंका

अभिनंदनाला +१

रवीराज's picture

16 Oct 2014 - 7:10 am | रवीराज

२ चाकी ४ चाकी सगळ्यांसाठी हा रस्ता अधिकृतरित्या काल चालू होता बर का.