मागील लेख इथे वाचा
* अश्वत्थामा भाग-2
अश्वत्थामाच्या राज्यकारभाराबद्दल आणि त्याच्या विवाहाबद्दल महाभारतात कुठल्याही प्रकारचे भाष्य केलेले माझ्या वाचनात नाही
द्रोणाचार्यांनी पांचाल राज्याचे तुकडे केल्याने द्रुपदाचा तिळपापड झाला आणि त्यातच त्यांनी द्रोणवधाचा प्रण केला आणि त्यासाठी केलेल्या यज्ञातून जन्म झाला पांचाली द्रौपदीचा आणि दृष्टिध्रुम्नचा...
पांडव आणि कौरवांच्या शक्ती प्रदर्शनात मध्येच आलेल्या कर्णाला अर्जुनाशी युद्ध करण्याची इच्छा होती पण भीष्मांनी त्याला तुझ्यासारख्या सुतपुञाला राजपुत्रांशी युद्ध करण्यास मी परवानगी देऊ शकणार नाही असे सांगितले
त्याचवेळी दुर्योधनाने कर्णाच्या शोर्यामुळे प्रभावित होऊन त्याला अंगप्रदेशचा राजा घोषित केला
आणि तेव्हा पासून अश्वत्थामाच्या मैञीत वाटा मागणारे कुणी तरी आले.
त्यानंतर पांडवांना कुंतीसह कपटाने लाक्षागृहात जाळून मारण्याची योजना दुर्योधनाने शकुनीमामांच्या साथीने बनविली पण कर्णाने हया अधर्माला साथ न देण्याचे ठरविले तेव्हा तुलनेत दुर्योधनाला मनस्वी अश्वत्थामाची मैञी खचितच चांगली वाटलीच असेल
पांडव लाक्षागृहात वाचल्यावर द्रौपदीच्या विवाहाच्या वेळीच दिसले
त्यावेळी द्रोण-द्रुपदाचे संबंध मधुर होते
द्रौपदी पांडवांशी विवाह केल्यानंतर इंद्रप्रस्थ या नव्या नगरीत जाऊन त्यांनी ते नगर वसविले आणि तिथे मयसभेत द्रौपदी ने केलेल्या अपमानाचा बदला दुर्योधनाने पांडवांना शकुनी मामाच्या द्यूत युद्धात पराभूत केले
द्रौपदीच्या वस्ञहरणात गुरू द्रोणाचार्यही काही बोलू शकले नाहीत याचा पांडवांना राग होता
त्यानंतर वनवास आणि विजनवास भोगण्यात पांचालीने पांडवाची साथ दिली
विजनवासात विराट नगरीत पांडवांना शोधण्यासाठी कौरवसेनेने विराट नगरी वर आक्रमण करायचे ठरवले तेव्हा द्रोणाचार्यानी ही वेळ
अपशकुनी आहे" हे युद्ध करू नका आणि आपण अर्जुनाला पराजित करू शकणार नाही" अर्जुनाची ही प्रशंसा द्रोणाचार्यांच्या तोंडून ऐकून कर्णाच्या अंगाची लाही लाही झाली
आणि तो द्रोणाचार्य बद्दल कटु बोलू लागला आणि स्वतःच्या वीरतेचे गोडवे गाऊ लागला
त्यावेळी अश्वत्थामाने सगळ्या कौरवांना आणि कर्णाला चांगलेच सुनावले तो म्हणाला
"हे निर्दय दुर्योधना तू क्षत्रिय असूनही कपटाने द्युत खेळून पांडवाचे राज्य मिळवलेस आणि त्यात तू संतुष्ट असशीलही ?
दुसर्याला फसवून प्राप्त केलेल्या वैभवाची तु काय बढाई मारतोस?
ज्या पांडवांचे राज्य हिसकावून घेतलेस त्यांच्याशी समोरासमोर दोन हात करायची तरी तुझी स्वतः ची हिंमत आहे का?
द्रौपदीला द्युताच्या खेळात केवळ पांडवांना हरविल्यामुळे अपमानास्पद रीत्या ओढून आणलेस....युद्ध जिंकून नाही?
म्हणून आता तुच अर्जुनाचा प्रतिकार कर.. नाही तर असे का नाही करत की तु तुझ्या क्षात्रधर्मात निपुण, चतुर, जुगारी तुझ्या मामाला पण पराक्रम करायला का नाही सांगत?
तुमच्यातले कुणीपण पराक्रमी अर्जुनाशी मुकाबला करा कारण मी स्वतः या युद्धात भाग घेणार नाही
विराट जर युद्धस्थतळात आले तर मी त्यांचा
सामना मी अवश्य करेन"
त्याचवेळी कर्णालाही सुनावले
"हे कर्णा ! तु आज तुझ्या वीरतेचा डंका पिटतोयस पण अर्जुनाचे बळ आणि पराक्रम तुझ्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक श्रेष्ठ आहे "
अश्वत्थामाच्या हया गोष्टी ऐकून सगळे लोक चुपचाप झाला
असा साहसी आणि निर्भीड होता अश्वत्थामा
क्रमशः
प्रतिक्रिया
12 Oct 2014 - 10:14 pm | विलासराव
मी पयला!!!!!
13 Oct 2014 - 9:47 am | जेपी
अश्वत्थामाच्या राज्यकारभाराबद्दल आणि त्याच्या विवाहाबद्दल महाभारतात कुठल्याही प्रकारचे भाष्य केलेले माझ्या वाचनात नाही
या पॅरा ने आधिच्या आणी पुढिल लेखाचि हवा काढली आहे. *wink*
13 Oct 2014 - 12:51 pm | निलरंजन
महाभारत व्यासांनी लिहिलेले आहे आणि अश्वत्थामा त्यातील एक सहकलाकार म्हणून महाभारत त्याच्याबद्दल जितके वर्णन करते तितके च प्रांजळपणे सांगणे हेच माझे कर्तव्य आहे
मनाचे जोडून चुकीचे महाभारत सांगितल्यास
"मिपाकर मुझे माफ नही करेंगे"
14 Oct 2014 - 11:59 pm | पैसा
लिहा आणखी..