पुण्यातील छावणी(कँप) भागात महाराष्ट्र राज्य सरकारची उपायूक्त आणि संचालक स्तरीय बरीच शासकीय कार्यालय असलेली सेंट्रल बिल्डींग इ.स. १९९३-९४ असेल मी एक नियमीत व्हिजीटर होतो. तिथे मला वाटते दोन कँटीन होती. या कँटीनला सकाळी भेट द्या अथवा दुपारी बाल कामगार दिवसभर काम करत, सांगण्याचा उद्देश हा कि शाळा उरकली आणि मग कामाला लागले असेही नसावे. जाणवलं तरी इतरांवर टिका करण्याचा मला अधिकार आहे का ? समस्या जाणवली आणि त्याच्या सोडवणूकीसाठी मी काही केले नसेल तर माझा इतरांवर टिका करण्याचा हक्क बनतो का कदाचीत नाही. एनीवे या सेंट्रल बिल्डींग कँटीन्स मधील मुल केवळ कँटीन मध्ये काम करत होती का ? असेही नाही मोठ्या साहेबांच्या केबीन पर्यंत या छोटूंच्या हस्ते चहाही क्वचीत जेवणही पोचते होत असावे. हे बालकामगार या अधिकारी मंडळींना दिसत नसतील का ? ज्या काही गोष्टी दुकानात विकत मिळत नाहीत त्यात संवेदनशीलता आणि सकारात्मक कृतीशीलता यांचाही समावेश असावा.
१९९४-९५ असेल औरंगाबादेच्या एका भेटीत अदालत रोडवर संध्याकाळची वेळ उसाच्या रसाचा मंडप गिर्हाईक स्वतःस उसाच्या रसाने थंड तृप्त करत आहे आणि तेवढ्यात एक किंकाळी लक्षवेधल जातं तेव्हा उसाच्या रसाच्या मशिन मध्ये एका दहा वर्षाच्या लहानग्याचा हात गेलेला ! प्रसंग आठवला की आजही डोळे पाणावतात. आधीच्या परिच्छेदात बाजूची कार्यालय शासकीय होती. अदालत रोडवर कदाचित न्यायालयीन कार्यालये असावीत. म्हटलेतर विरोधाभास नाहीत का हे ?
याच औरंगाबादेतला प्रसंग रात्री ११ वाजलेत बाकीची रेस्टॉरंट बंद झालीत फक्त पावभाजीचा गाडा आहे. माझ्या पायात अजून शूज आहेत कुठूनसा एक लहानगा केविलवाण्या नजरेने येतो शूज पॉलीश करू का म्हणतो. मी त्याला नुसतेच पैसे घेऊन जा म्हणतो तो नकार देतो, मी काय करायच अशा वेळेस रात्री ११ वाजता ८-९ वर्षाच्या मूलाला शूज पॉलीश करावयास द्यायचे की नाही ? मी ते दिले. त्या मुलाने त्याचे होत होते त्या पेक्षा ना अधिक पैसे घेतले ना पावभाजी खाण्यास तयार झाला ! हां तो दूर गेला की पुढच्या दोन मिनीटात अजून त्यापेक्षाही एक लहानगा उगवला त्यानेही शूज पॉलीश करून घ्या म्हणून गळ घातली तसेही दोन मिनीटेही झालेली नव्हती पॉलीश करून माझी पावभाजी खाऊन होई पर्यंत माझे शूज दोनदा पॉलीश करून झालेले. या लहानग्यानेही वरचे पैसे आणि पावभाजी नाकारली. एकी कडे धावत्या गाड्यांचा पाठलाग करून भिक मागणारी मूल आणि धावत्या गाड्यांचा पाठलाग करून काही बाही विकू पहाणारी मूल आठवतात त्या पेक्षा शू पॉलीश करून सेफली हि मूल इज्जतीने उदर निर्वाहाच्या प्रयत्नात होती आई वडील समोर नसतानाही ती लहानगी आपल्या आईवडीलांनी शिकवलेल्या शिकवणीस जगत होती.
कैलाश आणि मलाला'ला मिळालेल्या शांतता पारितोषिकाने अस आठव्णींच्या राज्यात २० वर्षे मागे नेल पण वर्तमान बदलल असेल पण किती अलिकडच्या गणपतींच्या काळात डोंबार्यांचा खेळ लावून उंच दोरीवरून सात आठ वर्षाची मुलगी तिचा खेळ दाखवतेय तेही पुण्यात भर ट्रॅफिक मध्ये , मी धावत्या गाडीतन मोबाईलवर टिपण्याचा प्रयत्न केला पण नीटस जमलं नाही. त्याच रस्त्याच्या दोन्ही बाजू आयटी कंपन्यांची कार्यालये आणि मॉल्सनी दाटीवाटी करून असतात, आहे की नाही इंडीया आणि भारतात फरक ? माझ्या वाणी आणि भाजीवाल्या मारवाडी दुकानात राजस्थानातून आलेल्या लहानग्यांचा कायमचाच वावर मी मिठाईच्या दुकानात माशी दिसली की दुकानदाराला लगेच नाराजी व्यक्त करतो पण बालकामगार विषयाबद्दल आतन संवेदनशील असलो तरी कधी दुकानदारा जवळ नाराजी दाखवत नाही. पण अशात भाज्यांचे भाव वाढलेत आणि माझा भाजीवाला अंमळ जास्तच नफ्याने विकतो तोही तिथेच लहानाचा मोठा होताना मी पाहिलेला म्हणून अशात एकदा त्याला एकदा टोकला 'क्या है अभि सब्जीमे अच्छा कमाभी तो लेते हो ! आप को किसीने पढाया नही तो क्या आप अपने पास काम करनेवालो को पढाओगे नही ?' दुकानदार त्या क्षणी त्या बोलण्यावर वरमला नंतर कामवाला छोट्या त्या दुकानातून दिसेनासा झाला. तोच छोट्या पंधरावीस दिवसांनी अचानक एकदा एका मारवाडी दुकानावर काम भेटला हाकेच्या अंतरावर एक महात्मा गांधींच स्मारक, पुन्हा एक विरोधाभास. (स्टोरी देत नाहीए अगदी अलिकडची हकीकत सांगतोय) अगदी १० -१२ दिवसांपुर्वी एका वृत्तपत्राच्या स्टॉल पाशी उभाहोतो अंगावर फटके मारून घेत त्यांची टिपीकल वेषभूषाकरून एक १२-१४ वर्षांचा मुलगा आला त्याला मी पैसे देण्यास नकार देऊन शाळेत जाण्याचा सल्ला दिला. पैसे देण्यास नकार देण लोकांना नवीन नसतं पण मी शाळेत जाण्याचा न मागितलेला सल्ला दिलेला पाहून माझ्या आसपासची मंडळी जराशी नाही म्हटली तरी अचंबित झालेली होती.
माझ्या एका सहकार्याच्या मुलीला एकदा मलेरीया झाला आता त्यात विशेष काय ? म्हटल तर काही नाही म्हटल तर त्या मुलीला डेंग्यू आजोळी झाला आणि सहकार्याच्या म्हणण्यानुसार त्याचे सासरे मलेरिया विभागात अधिकारी आहेत अधिकार्याच्या घराच्या बाजूच्या पाण्यातच डासांची उत्पत्ती होऊन हा डेंग्यू झालेला. जिथे लोक हातात अधिकार असून स्वतःस आणि घरातल्या व्यक्तीसाठी काळजी घेत नाहीत ते लोक बाहेरच्या जगा बद्द्ल किती संवेदनशील असू शकतील ? हि कथा ऐकल्या नंतर मला सेंट्रल बिल्डींग मधल्या अधिकार्याच्यां बालकामगार विषयातील अनास्थेच जे नवल वाटत असे ते वाटेनास झाल.
हे सर्व रामायण का सांगतोय ? जे वाचण्यात आलं, जाणवल ते शेअर करण्यासाठीच ! आणि त्याच कारण आहे कैलाश, मलाला, यांच्या अभिनंदनानी वृत्तपत्रे भरून गेलेली असतानाच, दिव्याखाली आंधाराच्या दोन बातम्या वाचल्या. फोर्बस मासिकातील वार्ताहर या वृत्तात बचपन बचाओ आंदोलनाच्या आकडेवारी बद्दल साशंकता व्यक्त करते आहे. आणि हे एनडीटीव्ही वृत्त कैलाश सत्यार्थींच्या मध्यप्रदेशातील त्यांच्या विदीशा येथील मूळगावी बालकामगारांच्या सध्याच्या दुर्दैवी स्थितीचे वर्णन करते. सोबतीला आज माझ्या मिपा दिवसाची सुरवात झाली होती ती निनाद मुक्काम यांचा मलाला विषयीचा धागा आज अचानक वर आल्याने. हाही योगायोग म्हणावयाचा. निनाद मुक्काम यांचा धागा मला लिहीतं करण्यात अल्पसा कारणीभूत ठरला हे खरे.
प्रतिक्रिया
12 Oct 2014 - 2:07 am | प्रभाकर पेठकर
शिक्षणाचं महत्त्व अजूनही भारतात रुजलेले नाही असे म्हणावे लागेल. महानगरपालिकेने मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आहे पण पालक अनुस्तुक आहेत. शिक्षण घेणं आणि अर्थार्जन करणं ह्यात कितीतरी वर्षांचा कालावधी जातो. शिवाय त्यात बौद्धीक श्रम आणि सातत्याची, तसेच चिकाटीची गरज असते. अभ्यासासाठी निदान एक शांत कोपरा आणि प्रबळ इच्छाशक्ती ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. गरीबांना ह्या सर्वाची उपलब्धता नसते आणि महत्त्व कळत नसतं. अशिक्षित कुटुंबप्रमुखामुळे गरीबी आणि कुटुंब पोसण्यातील असमर्थता (पण निसर्ग आपले काम करीतच असतो) आणि अगतिकता मुलांना दीर्घकाळ 'अनुत्पादित' ठेवण्याच्या मार्गातील मोठा अडसर असतो. मुलं जरा शारीरिक दृष्ट्या सक्षम झाली (असं त्यांना वाटतं) की त्यांनी अर्थार्जन करून घरखर्चात हातभार लावावा अशी सर्वसाधारण धारणा असते.
अशी मुलं मिळेल ते श्रमाचे काम करून चार पैसे मिळवितात नाहीतर भीक मागतात अथवा गुन्हेगारीकडे वळतात.
अशा मुलांना शाळेकडे वळविण्यासाठी, त्यांच्या पालकांना, मुलांना शिकविण्यासाठी, कांहीतरी भत्ता चालू करावा लागेल. तसे झाल्यास वीसेक वर्षात चित्र बदलू शकेल.
13 Oct 2014 - 9:54 am | अर्धवटराव
शिक्षणाची इच्छा, पोषक वातावरण, शिक्षणाचे जगण्याला उपयोगी असे फायदे, भारतासारख्या देशात या समस्येचं मॅग्नीट्युड... सर्वच खुप कॉम्प्लेक्स आहे. समस्येचं मुळ शोधावं म्हटलं तर आपण हरवुन जाऊ इतकं ते अस्ताव्यस्त आहे.
12 Oct 2014 - 10:09 am | कंजूस
बाल कामगारविषयक चर्चा होईलच पण मी आणखी दोन उदा०देतो. १)2008.मित्राच्या घरी एक गावाहून आणलेली पंधराएक वर्षांची मुलगी त्याच्या लहान मुलांना संभाळत असे. एक दिवशी सरकारी खात्याच्या अंमलबजावणी अधिकाऱ्यांची टीम अधिक चानेलवाले आले. सर्व सोपस्कार पंचनामे करून फौजदारी खटला दाखल झाला. प्रकरण वरपर्यंत गेल्यामुळे पुढे काय झाले हे सांगत नाही. २)यातून धडा घेऊन मी (सेक्रेटरी या पदामुळे)आमच्या सोसायटीत कचरा गोळा करणाऱ्या बाईला सांगितले की तुझ्या मुलांना पाठवत जाऊ नको नाहीतर आमची वरात निघेल पोलिस स्टेशनला एक दिवशी बाल कामगार ठेवतात म्हणून. त्यावर ती बाई म्हणाली "काय करणार महागाई किती झालीय पाच मुलांना कसे पोसणार?"
12 Oct 2014 - 10:44 am | माहितगार
कामकरी महीलांच्या मुलांसाठी पाळणाघरांचा अभावच असतो. समजा घरात लहानग्यास सांभाळणारे मोठे भावंड असेलही पण एखादा लहानगा एखाद दिवस आईसोबतच राहण्याचा हट्टही करू शकतो ही सुद्धा समस्या असू शकते. किंवा अगदी तुम्ही म्हणता तसे मुलांचे पालन पोषण त्यांच्या बजेटमध्ये बसतं नाही. "काय करणार महागाई किती झालीय पाच मुलांना कसे पोसणार?" (पाळणाघर बजेट मध्ये न बसणे अथवा मुलांच्या हट्टामुळे असेल, पण ही समस्या निम्न आर्थीकस्तरातील अमेरीकनांकरताही व्यवस्थीत सुटलेली नसावी) . (पाळणाघरातून पसरणार्या इन्फेक्शन्सच्या समस्यांमूळेही मुले अगदी मध्यमवर्गीयांनाही सोबत ठेवावी लागतात हा वेगळाच प्रश्न आहे.)
कार्यालयीन क्षेत्रात अफोर्डेबल पाळणाघरांची उपलब्धता आणि आपण म्हणता त्या केसमध्ये सोसायटीने नजीकच्या पाळणाघरात कामकरी महिलेच्या मुलांची व्यवस्था करण्यात साहाय्य सामाजीक जबाबदारी म्हणून केले पाहीजे असे वाटते.
यातला महत्वाचा पैलू लोकसंख्या शिक्षणाच अपयश अधोरेखीत होतं राहत आणि समाज या समस्येकडे दुर्लक्ष करत राहतो. एकत्रकुटूंबांच्या विभाजनांमुळे घरातील ज्येष्ठांचे हरवत चाललेले पाठबळ हा सुद्धा मध्यमवर्गीय प्रश्नही आहेच.
12 Oct 2014 - 11:25 am | बाबा पाटील
टिव्ही आणी शाळांमधुन जनजागृती देखिल होत आहे,परवाच पाण्याचा ग्लास दे म्हटल्यावर आमच साडेसहा वर्षाच कन्यारत्न म्हटल " पपल्या,तु मला काय बालकामगार समजतोस काय ?" च्यामारी शाळावाले अजुन काय काय शिकुन ठेवणार आहेत काय माहिती ?
12 Oct 2014 - 2:55 pm | टवाळ कार्टा
=))
12 Oct 2014 - 7:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
डॉ साहेब, घरात जीभेवर ताबा ठेवा आणि हो, घरातली बंदुक बाहेर ठेवू नका. दिवस झरझर बदलू लागलेत..
(हघ्याहेवेसांन)
12 Oct 2014 - 10:29 pm | प्यारे१
हा हा!
भन्नाटच.
12 Oct 2014 - 12:22 pm | एस
काय गंमत आहे, आजपर्यंत सरकारी विभागाला एकही बालकामगार सापडलेला नाहीये.
उत्तम धागा. मला एक सुचवावेसे वाटते की आर्थिक-सामाजिक अडचणींच्या कारणाने बालकामगार प्रथा संपूर्णपणे नष्ट करणे तसे अवघड आहे. मग किमान दहा वर्षांवरच्या मुलांना अर्धवेळ काम करण्याची कायदेशीर परवानगी तरी द्यावी. दोन अटी मात्र असाव्यात. एक म्हणजे अशा मुलांसाठी रात्रशाळा किंवा तत्सम शालेय शिक्षणाची सोय बंधनकारक असावी, आणि दुसरे म्हणजे वर्कप्लेस सेफ्टी किंवा ते जे काम करताहेत त्याचे सेफ्टी ऑडिट वेळोवेळी झाले पाहिजे. त्याचबरोबर बालकामगारांचा विमा उतरवणे, त्यांच्या पगाराची रक्कम बॅंक खात्यातच जमा होणे वगैरे गोष्टी करता येणे शक्य आहे.
संवेदनशीलतेबरोबरच अशा प्रश्नांकडे व्यावहारिकतेनेही पाहिले गेले पाहिजे असे वाटते.
12 Oct 2014 - 12:58 pm | जेपी
रात्रशाळेची वेगळीच कथा आहे.सरकारी अनुदान मिळते म्हणुन रात्रशाळा काढायची आणी बोगस विद्यार्थी दाखवुन अनुदान लाटायचे.शाळा चालवायचा खर्च शुन्य अनुदान संस्थाचालकाच्या खिशात.
15 Oct 2014 - 12:12 am | पैसा
एन जी ओ बद्दल बरेच काही ऐकले वाचले आहे खरेच. पण बाहेर जे काही दिसतं त्याकडे एकतर दुर्लक्ष करावं लागतं, किंवा मग नसत्या भानगडींना तोंड द्यावं लागतं.
प्रत्यक्ष काम करणारी मुलं हा एक प्रकार झाला. याहून भयानक प्रकार ऐकला आहे. रोजंदारीवर काम करणार्या मजुरांची लहान बाळं भिकारी बाया ५० रुपये रोजाने भाड्याने आणतात. त्याना अफू घालून झोपवतात आणि मग ते मलूल पोरगं खांद्यावर टाकून भीक मागत फिरतात, अशा एक दोन बायांना "किसका बच्च है?" म्हणून दरडावून विचारल्यावर त्यांनी सरळ सूंबाल्या केलेला पाहिला आहे.
असल्या गरीबांवर दया दाखवूनही काही फायदा नाही असं वाटायला लागलं आहे. :(
15 Oct 2014 - 2:20 am | प्रभाकर पेठकर
रोजंदारीवर काम करणार्या मजुरांची लहान बाळं भिकारी बाया ५० रुपये रोजाने भाड्याने आणतात.
घरी मोलकरणीच्या अंगावर घर आणि आपलं बाळ सोडून कामावर गेलेल्या एका मध्यमवर्गिय बाईस एक दिवस अचानक बाळाची तिव्रतेने आठवण यायला लागली, म्हणून ती अर्धादिवस रजा घेऊन अचानक घरी आली तर मोलकरीण टिव्ही बघत बसली होती आणि बाळ गायब होतं. मालकिणीला अचानक आलेलं पाहून मोलकरणीची बोबडीच वळली. बाळ कुठे आहे ह्याचं ती काही केल्या उत्तर देईना. त्या बाईने आपल्या नवर्याला फोन करून बोलावले. नंतर दोघांनीही पोलीसात जायची तयारी केल्यावर त्या बाईने ते बाळ एका भिकारणीला भाड्याने दिल्याचे सांगितले. ती भिकारीण ५ वाजता येईल म्हणाली. त्या प्रमाणे बाळ घेऊन ती भिकारीण ५ वाजता आली तेंव्हा त्या घरात त्या बाळाच्या आई-वडिलांबरोबर पोलीसही वाट पाहात होते.
सकाळी मालकिण घराबाहेर पडली की ती भिकारीण ते बाळ घेऊन जायची, त्याला अफू खाऊ घालून झोपवून ठेवायची, अंगावर जुनेपुराणे घाणेरडे कपडे घालून गोणपाटावर त्याला झोपवून भिक मागायची. ही घटना मालाड मधली आहे. मोठे रॅकेट पकडण्यात आले होते.
15 Oct 2014 - 8:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
निश:ब्द !!!
15 Oct 2014 - 3:09 am | निनाद मुक्काम प...
ह्या प्रकारावर मधुरच्या ट्राफिक सिग्नल ह्या सिनेमात प्रकाश टाकला आहे , दुर्दैवाने बारबाला व पेज ३ तसेस कोर्पोरेट जगताचे अंतरंग दाखवणारे सिनेमे हिट झाले मात्र तुरुंग व सिग्नल अवती भवती फिरणाऱ्या लोकांचे अंतरंग दाखवणारे टायचे सिनेमे यशस्वी झाले नाही.
लोकांना त्यात तडका दिसला नसावा,
माझी बायको पहिल्यांदा भारतात आली तेव्हा एका मित्राच्या घरी १३ वर्षाच्या मुलाकडून मित्राची आई घरातून सर्व कामे खुर्चीवर बसून फर्मान सोडत सांगत होती व मधल्या काळात त्याला चहा व अल्पोपहार सुद्धा घेऊन येण्यास सांगितले , माझ्या बायकोस घशाखाली अन्न उतरले नाही ,
लाजिरवाणी गोष्ट म्हणजे जिन्यातून खाली उतरताना तू काहीच कसे खाल्ले नाही , असे विचारल्यावर तिच्या डोळ्यातील अश्रूंना वाट फुटली.
माझ्या मित्राकडे कॉलेज जीवनात मी अनेकदा गेलो असेल , कितीतरी वेळा रात्री मित्रांच्या सिगरेटी संपल्या की त्याला बाहेर पिटाळून आणायला सांगायचो , मी सिगारेट ओढत नाही पण त्याने आणलेल्या बियरच्या बाटल्या ढोसायचो. वर एखाद्या बादशहाने गळ्यातील कंठ हार काढून आपल्या सेवकाला द्यावा तशी खिशातून चिल्लर काढून त्याला द्यायचो,
तो येथे राबून आपले गावाकडे कुटुंब पोसत होता , व आम्ही कुटुंबाच्या पैशावर मौज मजा करत होतो , आणि ह्यात त्यावेळी खटकले सुद्धा नव्हते, चहाची टपरी ते अनेक मोक्याची ठिकाणी लहान मुलांना काम करताना पाहून त्यात वावगे अस एकही आहे हा विचार सुद्धा मनाला शिवला नव्हता , एका मित्राची नर्तन मधुशाळा होती, तेथे एक लहानगा १ओ वर्षाचा छोकरा त्या मधुशालेच्या नर्तकींच्या सोबत नाचायचा , त्यांच्यावर दौलतजादा व्हायची. आपण खूप कमावतो , पण का ह्याचे उत्तर त्याला महिती नव्हते , तो दिवसा एका चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या नामांकित
शाळेत शिकतो हे ऐकून व त्याचे फर्डे दार विंग्रजी ऐकून मला वाटलेली असूया आठवली.
आपल्या भोवती अनेक गोष्टी एवढ्या सर्रास घडतात कि आपली दृष्टी , मानसिकता बोथट होते. हेच खरे
हा पुरस्कार विभागून द्यायची काहीच गरज नव्हती तो खर्या अर्थाने कैलास ह्यांचा आहे , त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात जगाला संदेश , उपदेश एक स्टेटमेंट म्हणून केली नव्हती.