अविनाश ओगले यांच्या "जत्रा" या सुंदर गझलेचे विडंबन...
ओगले साहेब क्षमा असावी..!
("वधूवर मेळावा" नावाच्या जत्रेला)
उपवर वधू वरांच्या करतात येथ जत्रा.
दोनास चार करण्या भरतात येथ जत्रा.
नजरा कुमारिकांच्या ठरतात जीवघेण्या,
वेठीस बिज्वरांना धरतात येथ जत्रा.
झाले ठिकाण जत्रा चेहरे न्याहाळण्याचे.
चिरडून सर्व हृदये सरतात येथ जत्रा.
वरबाप ना दयाळू हुंड्यास का कठोर,
प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा.
आता पुढील वर्षी पुन्हा नवीन आशा.
स्वर्गातल्याच गाठी स्मरतात येथ जत्रा ?
-- अभिजीत दाते
प्रतिक्रिया
5 Aug 2008 - 5:12 pm | चतुरंग
अगदी योग्य विषय, चपखल शब्द आणि सहज मांडणी! :)
चतुरंग
5 Aug 2008 - 8:38 pm | अविनाश ओगले
आवडले विडंबन! क्षमा कसली मागताय राव? तुमचे आभार मानायला पाहिजेत...
5 Aug 2008 - 10:49 pm | सर्किट (not verified)
नजरा कुमारिकांच्या ठरतात जीवघेण्या,
वेठीस बिज्वरांना धरतात येथ जत्रा.
वा !
आमचे एक निरीक्षण अचूक ठरते आहे असे दिसते. मूळ कवितेत दम असेल, तरच विडंबन सुंदर होते.
छान !
- सर्किट
6 Aug 2008 - 12:27 am | प्राजु
अतिशय चपखल...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 Aug 2008 - 11:19 am | बेसनलाडू
नजरा कुमारिकांच्या ठरतात जीवघेण्या,
वेठीस बिज्वरांना धरतात येथ जत्रा.
वा !
(उपवर)बेसनलाडू
10 Aug 2008 - 1:01 am | चंपक
अभिजीत,
अभिजात विडंबन!
सिंप्ली ढासू!
चंपक
10 Aug 2008 - 1:38 am | भडकमकर मास्तर
वावा..
जमलेय ..
मजा आली...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/