(जत्रा)

केशवटुकार's picture
केशवटुकार in जे न देखे रवी...
5 Aug 2008 - 11:55 am

आजची टुकारी ओगल्यांची जत्रा.
टुकारी करायच्या आधी सर्किटरावांच्या या इनिशिएटिव्ह ने प्रभावित झालो

(जत्रा)

जाल कविकिरडुंच्या करतात येथ जत्रा
पडतात विडंबने तरी भरतात येथ जत्रा

ओझे संमेलनांचे ठरतेय जीवघेणे
वेठीस जालनिश्यांना धरतात येथ जत्रा

ती कला का दयाळू झाली अशी कठोर?
प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा

आल्या भरुन संत्रा, देशी आणि विदेशी
मारुन फक्त गप्पा सरतात येथ जत्रा

आता पुढील शहरी पुन्हा नवीन ठाल्या
चंद्रावरी कधीतर भरतील येथ जत्रा.

-केशवटुकार

विडंबन

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

5 Aug 2008 - 12:31 pm | मनस्वी

चांगला प्रयत्न आहे टुक्या..
अजून येउदेत.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

सर्किट's picture

5 Aug 2008 - 12:34 pm | सर्किट (not verified)

ओझे संमेलनांचे ठरतेय जीवघेणे
वेठीस जालनिश्यांना धरतात येथ जत्रा

ती कला का दयाळू झाली अशी कठोर?
प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा

क्या बात है !

"जालनिश्यांना" वृत्तात बसत नाही. "वेठीस जाल माझे धरतात.." असे केले तर ?

बाकी मस्तच !!

प्रत्येक विडंबनात सराईतपणा वाढत जातोय !

मोस्ट इंप्रूव्ह्ड विडंबनकार असे काही पारितोषिक असेल, तर त्याचे मानकरी तुम्ही !

तिसर्‍याच विडंबनात गुरूजींचे नाव सार्थ करण्याच्या मागे आहात !

- (संतुष्ट) सर्किट

बेसनलाडू's picture

5 Aug 2008 - 1:59 pm | बेसनलाडू

होते आहे.
(सुधारक)बेसनलाडू

केशवसुमार's picture

5 Aug 2008 - 8:33 pm | केशवसुमार

टुकारशेठ,
सुधारणा होत आहे..चालु द्या..
(वाचक निवृत्त)केशवसुमार

चतुरंग's picture

5 Aug 2008 - 5:20 pm | चतुरंग

एकसे एक विडंबन सुरु आहे. मस्त विषय, चपखल शब्द!
घरचा अभ्यास अगदी मन लावून चालू आहे असे दिसते! ;)

(स्वगत -ही नवीन मुले फारच सराईत होत चालली आहेत, केसुशेठ जालावरुन प्रायव्हेट शिकवण्या घेतात की काय? :W :? )

चतुरंग

शितल's picture

5 Aug 2008 - 5:44 pm | शितल

टुकार शेठ,
विडंबन सही केले आहेस रे !
:)

अविनाश ओगले's picture

5 Aug 2008 - 8:42 pm | अविनाश ओगले

जमलंय विडंबन... मूळ जत्रेपेक्षा विडंबनेच जास्त होणार की काय?

ऋषिकेश's picture

5 Aug 2008 - 9:18 pm | ऋषिकेश

हे हे हे :) मस्तय!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश