देणाऱ्याने देत जावे.....

_मनश्री_'s picture
_मनश्री_ in जनातलं, मनातलं
4 Oct 2014 - 9:35 pm

देणाऱ्याने देत घेणाऱ्याने घेत रहावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे .
देण्याचा आनंद हा घेण्याच्या आनंदापेक्षा खूप मोठा असतो .
२ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर हा आठवडा जगात joy of giving week म्हणून साजरा केला जातो .
भारतात हा आठवडा 'दान उत्सव' या नावाने साजरा केला जातो .
प्रत्येक जण यथाशक्ती सहभाग घेतो ...
देण्याच्या वृत्तीचे अनमोल, दैवी मूल्य आहे. सर्व धर्मग्रंथ ह्या वृत्तीला, कृत्याला अव्वल दर्जा देतात. हा एक मोठ्यातला मोठा संस्कार जोपासला गेला पाहिजे. निसर्गाकडून हीच शिकवण आपल्याला मिळते. ही देण्याची वृत्ती मात्र सहजपणे आढळत नाही. देणं म्हणजे केवळ आर्थिक दान असा गैरसमज नसावा. आर्थिक दानाखेरीजही अनेक गोष्टी आपण देऊ शकतो; वाटू शकतो. वेळ, ज्ञान, शारीरिक कष्ट, सकारात्मक, भावना, प्रेम अशा अनेक मार्गांनी हे आपल्याला साधता येतं.

आपणही आपल्या पातळीवर हा उत्सव साजरा करू शकतो ,
एखाद्या अनाथाश्रमाला आर्थिक मदत करू शकतो ,आपल्या घरात काम करणाऱ्या मोलकरणी ,ड्रायव्हर यांच्या मुलांसाठी काही करू शकतो ,
आपल्या बिझी शेड्युल मधून थोडासा वेळ काढून तो आपल्या आई वडिलांसाठी देऊ शकतो

daan utsav

ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत

ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करून भरून घ्यावे

आभाळा एवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना थोडे उचलून घ्यावे.
- दत्ता हलसगिकर

giving

give

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

4 Oct 2014 - 9:54 pm | माम्लेदारचा पन्खा

दान जरुर द्यावं पण ते सत्पात्री असणंही तितकंच गरजेचं आहे.
|अर्हानर्हापरिज्ञानात दानधर्मः सः निष्फलः |

सर्वसाक्षी's picture

5 Oct 2014 - 6:45 pm | सर्वसाक्षी

आपल्या बिझी शेड्युल मधून थोडासा वेळ काढून तो आपल्या आई वडिलांसाठी देऊ शकतो

हे तर परमसुख! किमान कर्तव्य. यात दान कसले? मातापित्यांना आपल्या सहवासाचा लाभ देणे हा दानधर्म समजणारे जे कुणी असतील त्या समस्त दानशूर कर्णांना माझा प्रणाम.

_मनश्री_'s picture

5 Oct 2014 - 6:56 pm | _मनश्री_

अगदी बरोबर
आई वडिलांसाठी वेळ काढण हे प्रत्येक अपत्याच परम आणि प्रथम कर्तव्य आहे .
पण एका गावात रहात असून ६ महिने आई वडिलांकडे न फिरकणारे भरपूर दानशूर आजूबाजूला खूप बघितले
आजारी वडिलांना मी येऊन काय होणार आहे मी काय डॉक्टर आहे का ? अस सांगणारे महाभाग सुद्धा पाहिले

काउबॉय's picture

6 Oct 2014 - 3:15 am | काउबॉय

करावे अगदी काहीच दान जमत नसेल तर.

अर्धवटराव's picture

6 Oct 2014 - 5:23 am | अर्धवटराव

चर्चील साहेबांनी देखील यावर कमेण्ट केली आहे होय. मला वाटायचं या माणसाला फक्त घेणं (ओरबाडणं)च ठाऊक होतं.