"स्वच्छ भारत अभियान" आणि आपण

निलेश's picture
निलेश in जनातलं, मनातलं
2 Oct 2014 - 4:48 pm

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना‘चे उद्‌घाटन केले आहे. दिल्लीतील महर्षी वाल्मिकी मंदिरात पोहचून मोदींनी हातात झाडू घेऊन साफसफाई केली. या निमित्त भाषण करताना देशवासीयांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

आपण सगळे आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणार्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. आपला पैसा, आपला वेळ वाया जात आहे.
आपल्या नद्या या सांडपाणी वाहून नेणारी गटारे बनल्या आहेत. कचर्याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत.

आपण विदेशाती शहरांतील स्वच्छता पाहून त्याचे गुणगान गातो, मात्र तेथील स्वच्छता ही तेथे राहणाऱ्या लोकांमुळे आहे, त्यांच्या स्वच्छतेच्या सवयीमुळे आहे, हे आपण विसरतो. आपल्यातील किती जण आपल्या घराबरोबर, आपला परिसर, आपले ऑफिस स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतात? किती जन आपल्या मुलांना स्वच्छतेचे महत्व सांगतात, आणि त्याचे अनुकरण करायला सांगतात? आणि स्वतः अनुकरण करतात.

आज सार्वजनिक ठिकाणी, बसमध्ये, लोकल मध्ये, ऑफिसेस मध्ये, उद्यानांमध्ये, इमारतींच्या आवारात, रस्त्यावर सगळीकडे आपल्याला अस्वच्छता दिसेल. सिगारेटची थोटके, खाद्य पदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाकू गुटख्याच्या पिचकार्यांनी रंगवलेल्या भिंती दिसतील.

एकीकडे आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. मंगळावर आपले यान पोहोचले आहे. मात्र आपली शहरे, आपले गाव आपण अस्वच्छ करत आहोत. यात बदल केला पाहिजे.

याची सुरुवात आपण आपल्या पासून केली पाहिजे. आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो, तसे सार्वजनिक ठिकाणी, बसमध्ये, लोकल मध्ये, ऑफिसेस मध्ये, उद्यानांमध्ये, इमारतींच्या आवारात स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच आपल्या मित्रांना, ऑफिसमधील सहकाऱ्यांना, आपल्या मुलांना स्वच्छतेचे महत्व सांगितले पाहिजे. साफसफाई करणे हे फक्त सफाई कर्मचाऱ्यांचे काम नसून, आपले पण कर्तव्य आहे.

तरच आपण आपल्या भावी पिढीला एक आरोग्यमय आयुष्य देवू शकू.

समाजविचार

प्रतिक्रिया

जेपी's picture

2 Oct 2014 - 5:22 pm | जेपी

सुंदर निंबध.
शुद्धलेखनासाठी पाच मार्क एकस्ट्रा

1

भारत सरकारच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या 'स्वच्छ भारत अभियाना'साठी कोल्हापुरातील निर्मिती ग्राफिक्सचे संचालक अनंत खासबारदार यांनी डिझाइन केलेल्या लोगोची निवड केली आहे.

अधिक माहिती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Oct 2014 - 6:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम लेख !

साफसफाई करणे हे फक्त सफाई कर्मचाऱ्यांचे काम नसून, आपले पण कर्तव्य आहे.
+100

सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे चूक आहे इतके जरी सर्वसामान्य जनतेला समजले तरी खूप फरक पडेल.

तिमा's picture

2 Oct 2014 - 7:49 pm | तिमा

पान वगैरे न खाताही रस्त्यात थुंकणारी माणसे असंख्य आहेत. आपलीच थुंकी आपण गिळायची नसते अशी चुकीची शिकवण त्यांना मिळालेली असते. अशी माणसे भारतात ८० टक्के तरी असावीत. त्यांना कोण सुधारणार ?

विनोद१८'s picture

2 Oct 2014 - 11:42 pm | विनोद१८

..या विषयात आपल्या देशात सुधारणा होणे आवश्यक आहे, माझ्या मते याविषयी कडक कायदे करायला हवेत व त्यांची अंमलबजावणी सक्तीने व्हायला हवी.

भृशुंडी's picture

3 Oct 2014 - 8:46 am | भृशुंडी

गाडगेबाबा थकले सांगून.
नागरिकशास्त्राची पुस्तकंसुद्धा कामी येयीनात.
हजारेंच्या अण्णांनीही प्रयत्न केलेच.
आता मोदी.
चालायचंच.

भृशुंडी's picture

3 Oct 2014 - 8:47 am | भृशुंडी

गाडगेबाबा थकले सांगून.
नागरिकशास्त्राची पुस्तकंसुद्धा कामी येयीनात.
हजारेंच्या अण्णांनीही प्रयत्न केलेच.
आता मोदी.
चालायचंच.

विवेकपटाईत's picture

3 Oct 2014 - 9:21 am | विवेकपटाईत

आज रामदेव बाबांच्या चेल्यांना संपूर्ण हरद्वार स्वच्छ करताना बघितले. कांग्रेस गवत बरोबर उपटीत होते. निदान एक आठवडा तरी आता रस्ते स्वच्छ दिसतील.

जिन्गल बेल's picture

3 Oct 2014 - 11:07 am | जिन्गल बेल

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५०वी जयंती २ ओक्टोबर २०१९ ला आहे.

प्रभाकर पेठकर's picture

3 Oct 2014 - 11:19 am | प्रभाकर पेठकर

खरंच की.

निलेश's picture

3 Oct 2014 - 2:27 pm | निलेश

चुकी बद्दल क्षमस्व. लेख प्रकाशित केल्यावर लक्षात आले. पण मिपावर प्रकाशित केलेला लेख दुरुस्त करण्याची सोय नाही.

कवितानागेश's picture

3 Oct 2014 - 11:08 am | कवितानागेश

उत्तम उपक्रम आहे हा. हे गंभीरपणे चालू रहायला हवंय.
लोक फक्त आपल्या स्वतःच्या रहात्या घराला घर समजतात, शहराला/ गावाला/ देशाला 'आपले घर' समजत नाहीत, हा खरा प्रॉब्लेम आहे. लोकांमध्ये एकमेकांमधली दरी कमी होत नाही आणि नागरिक विरुद्ध सरकार असा एक विनाकारण बसलेला तिढा सुटत नाही, तोपर्यंत लोक स्वच्छतेच्या बाबतीत बेपर्वा रहाणार हेदेखिल एक कारण आहेच.

उदयन's picture

3 Oct 2014 - 1:27 pm | उदयन

बाकी अहिंसे ने हिंसावाद्यांना जिंकले
निव्वळ स्वतःच्या प्रसिध्दीसाठी का होईना जे गांधींना मानत नव्हते ते देखील त्यांचे गुणगाण करत आहे. ;)

नानासाहेब नेफळे's picture

3 Oct 2014 - 3:50 pm | नानासाहेब नेफळे

गांधीविचार कालातीत आहेत, संघाच्या पठडीत वाढलेल्या मोदींनी गांधीँच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान सुरु केले हा एका अर्थी काँग्रेसच्याच विचारांचा विजय आहे.असो ,मोदी व देश दोघांना शुभेच्छा.

उदयन's picture

3 Oct 2014 - 6:38 pm | उदयन

स्वच्छतेचा एवढा पुळका होता तर गुजरातची झोपडपट्टी चीन अध्यक्षांपासून लपवण्यासाठी काही किलोमीटर हिरवं कापड का लावलं होत?. दहा वर्ष गुजरात कसला स्वच्छ केलात मग?

आक्शेप कषावर हाये? "हिरव्या" कापडावर? ;)
बाकी सुभेच्चा.

उदयन's picture

3 Oct 2014 - 8:43 pm | उदयन

संपुर्ण वाक्यात तुम्हाला "हिरवा" शब्दच बरा दिसला. इतर गोष्टींना सोईस्करपणे दुर्लक्ष केलेत

काविळीचं मी बघतो. टेंशन इल्ले.

तुमच्या मुद्द्याकडे-
@ काही किलोमीटर हिरवं कापड का लावलं होत? >>>

(समजा) तुम्हाला खरुज झालाय आणी घरी पाव्हणे आलेत तर,
१. तुम्ही पुर्ण बाह्यांचा शर्ट घालून बसता + उपचारांकडेसुद्दा नंतर लक्ष देता.
२. उघडबंब राहून २-२ मिंटाला खाजवून दाखवता?

मग तर कठिण आहे

मग आतातरी उपचार करूदेत का नको म्हंता?

नानासाहेब नेफळे's picture

3 Oct 2014 - 8:48 pm | नानासाहेब नेफळे

उदयन, तुमाला एक मेसेज पाठवला आहे, चेक करा.

आयुर्हित's picture

4 Oct 2014 - 1:15 am | आयुर्हित

Great Attitude - an inspirational video