आला आला हा श्रावण...
आला आला हा श्रावण
घन निळा घेऊन
आले आकाश दाटुन
आठवणीत त्या जुन्या
माझे हरवले मन
ऐकुनी मेघांचा कहर
वारा झाला सैरभैर
पडता श्रवणी मल्हार
जणू नाचे मनी माझ्या
ते वनातील मोर
थांबता पावसाची संतत
ओढा वाही खळाळत
आम्हा जणू बोलावत
या रे पोरांनो खेळाया
ती होड्यांची शर्यत
बघुनी धरा ती ओजस
इंद्रधनुही क्षितीजास
वाटे रुप ते लोभस
पिऊनी धारा श्रावणाच्या
तृप्त झाली ही तुळस
-अथांग सागर