नमस्कार,
सर्व मिपाकरांना सांगण्यास मला आनंद होतो आहे की आपल्या सलोनी लायब्ररीची दुसरी शाखा या महीन्यापासून
ठाणे (पूर्व) कोपरी येथे सुरु होत आहे.
आपली पहीली शाखा सुरु झाल्याला या दसर्याला ३ वर्ष होतील आणि आजपर्यत आपल्या लायब्ररीला हजार लोकांनी भेट
दिली आहे, आणि आज लायब्ररीचे सहाशे सभासद आहेत.
आम्ही लायब्ररी चालू करताना आम्हाला घरच्या लोकांकडून तसेच बाहेरच्या लोकांकडून फार विरोध झाला सगळे आम्हाला
सांगत होते की अरे तुम्हाला गुंतवणूक करायची आहे तर झटपट व लवकर पैसा मिळेल अशा धंदयामद्ये करा.
लायब्ररी कशाला टाकता त्यात तुम्ही यशस्वी होणार नाही. लोकांना आजकाल पुस्तके वाचायला वेळ मिळत नाही
मनोरंजनाची एवढी साधनं असताना कोण पूस्तकांमध्ये आपला वेळ फुकट घालवेल, तसंच मुलं देखील टीव्ही वरच्या
कार्टून नेटवर्क वर रमलेले असतात. मुलांना वाचनाची आवड फारशी नाही असेच नकारात्मक उद्गगार येत होते म्हणून
आम्ही लायब्ररी चालू करताना हा विचार केला की लोक आपल्या कडे येऊ शकत नाहीत
तर आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांची वाचनाची आवड जोपासू आणि अशाप्रकारे "सलोनी सर्क्युलेटींग लायब्ररी"
"फ्री होम डिलीवरी" चा जन्म झाला. आणि आज लायब्ररीला तीन वर्ष पुर्ण व्हायला दोन महीने अवकाश असताना दुसर्या
शाखेची उभारणी झाली या आनंदात तुम्हाला सगळ्यांना सामील करावेसे वाटले म्हणून हा लेख लिहीला.
आपल्या लायब्ररीची काही छायाचित्रे :
लायब्ररी चे उदघाटन श्वास चित्रपटाच्या लेखिका "माधवी घारपुरे" ह्यांच्या हस्ते झाले
ती बाजुला डावीकडे चष्मेवाली आहे ना ती माझी मैत्रिण कल्पना (लायब्ररीयन)
लायब्ररीचा मोठा फलक.
आणि ही मी प्रगती.
प्रतिक्रिया
5 Aug 2008 - 12:33 pm | प्रगती
माझा लेख दिसत नाही काही अडचण आहे का?
5 Aug 2008 - 12:38 pm | सर्किट (not verified)
खूपच छान !
- (सर्व वाचनालयांचा चाहता) सर्किट
5 Aug 2008 - 12:43 pm | धमाल मुलगा
सलोनी भाग दोन ला हार्दिक शुभेच्छा! आणि अभिनंदन.
एक प्रश्नः सलोनी वाचनालयाची पुस्तकं भांडूपमध्ये हवी असतील तर काय करावं लागेल?
5 Aug 2008 - 12:44 pm | नीलकांत
तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा. येत्या काळात तुमची अजून जास्त भरभराट होवो ही शुभकामना !
नीलकांत
5 Aug 2008 - 12:48 pm | केशवसुमार
प्रगतीताई,
तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा.
भविष्यात ही तुमची प्रगती अशीच होत राहो ही शुभकामना.
केशवसुमार
5 Aug 2008 - 12:45 pm | मदनबाण
नवीन शाखा उघडल्या बद्दल अभिनंदन !!!!!
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
5 Aug 2008 - 1:02 pm | मनस्वी
सलोनी सर्क्युलेटिंग लायब्ररी ला अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन.
पत्ता आणि थोडक्यात माहिती देता येईल का?
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
5 Aug 2008 - 12:56 pm | पद्मश्री चित्रे
प्रगती,
अभिनंदन
पहिली शाखा कुठे आहे?
5 Aug 2008 - 1:28 pm | नरेंद्र गोळे
स्वस्तिक एन्क्लेव्ह, आझादनगर, ठाणे इथे.
5 Aug 2008 - 1:28 pm | नरेंद्र गोळे
फिरत्या वाचनालयास हार्दिक शुभेच्छा!
5 Aug 2008 - 1:39 pm | सुनील
"आमची कोठेही शाखा नाही" चा अहंगंड(?) मोडून चक्क दुसरी शाखा सुरू केल्याबद्दल अभिनंदन. अशाच उत्तरोत्तर शाखा वाढत जाओत ही शुभेच्छा!
काही प्रश्न
१) आपल्या वाचनालयात कोणत्या प्रकारची पुस्तके आहेत? केवळ ललित साहित्य की वैचारिक पुस्तकेदेखिल?
२) मराठी पुस्तके तर असतीलच पण इंग्रजी (विशेषतः वैचारिक) पुस्तके आपण ठेवता का?
३) माझ्या कल्पनेप्रमाणे फिरते वाचनालय म्हणजे आठवड्यातून एकदा (किंवा जसे असेल तसे) एखाद्या वस्तीत आपली गाडी जाते, जेथे लोक आपापली पुस्तके बदलून वगैरे घेऊ शकतात. असे नसेल तर कृपया कसे ते सांगावे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Aug 2008 - 1:49 pm | स्वाती दिनेश
प्रगती,
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
स्वाती
5 Aug 2008 - 4:21 pm | अन्जलि
दुस रया शाखेबद्दल अभिनन्दन. तुमच्या वाचनालयाचि पुस्तके भाडुपला मिळु शकतिल का?
5 Aug 2008 - 7:26 pm | प्रगती
"आमची कोठेही शाखा नाही" चा अहंगंड(?) मोडून चक्क दुसरी शाखा सुरू केल्याबद्दल अभिनंदन
आभारी आहोत! :)
१) आपल्या वाचनालयात कोणत्या प्रकारची पुस्तके आहेत? केवळ ललित साहित्य की वैचारिक पुस्तकेदेखिल?
आपल्या वाचनालयात दोन्ही प्रकारची पुस्तके आहेत.
२) मराठी पुस्तके तर असतीलच पण इंग्रजी (विशेषतः वैचारिक) पुस्तके आपण ठेवता का?
हो ठेवतो परंतु इंग्रजी वैचारीक फार जास्त नाहीत कारण त्याला वाचक नाहीत.
३) माझ्या कल्पनेप्रमाणे फिरते वाचनालय म्हणजे आठवड्यातून एकदा (किंवा जसे असेल तसे) एखाद्या वस्तीत आपली गाडी जाते, जेथे लोक आपापली पुस्तके बदलून वगैरे घेऊ शकतात. असे नसेल तर कृपया कसे ते सांगावे.
आम्ही सभासदांना आपल्या लायब्ररीतील पुस्तकांची लिस्ट देतो, त्यांनी फोन करून आम्हाला जी पुस्तके सांगीतली असतील
ती पुस्तके त्यांना देतो, आठवडयातून दोन वेळा किंवा एक वेळा त्यांच्या घरी दुचाकी वरुन जातो, लायब्ररीसाठी दोन दुचाकी
आणी पुस्तके पोचवणयासाठी दोन मुलं आहेत. सुरुवातीला ही कामं पण आम्हीच करायचो पण जसा कामाचा व्याप वाढला तशी
मुलं ठेवली.
6 Aug 2008 - 9:50 am | सुनील
सविस्तर उत्तरांबद्दल धन्यवाद.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Aug 2008 - 7:45 pm | प्रगती
"सलोनी सर्क्युलेटींग लायब्ररी"
शॉप नं ६, स्वस्तिक इनक्लेव , ब्रम्हांड
आझादनगर, ठाणे (प.)
माहीती वरीलप्रमाणेच
5 Aug 2008 - 7:50 pm | प्रगती
तुमचा भांडुप चा पत्ता जर आम्हाला सांगीतला तर आम्ही तुम्हाला पुस्तके तिकडे देऊ.
5 Aug 2008 - 8:08 pm | प्रगती
तुमचा पण भांडुप चा पत्ता जर आम्हाला कळवलात तर आम्ही पुस्तके देऊ.
आभारी आहे.
5 Aug 2008 - 8:20 pm | चतुरंग
'सलोनी'च्या अधिकाधिक शाखा निघोत हीच सदिच्छा! :)
चतुरंग
5 Aug 2008 - 8:26 pm | धनंजय
या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
5 Aug 2008 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'सलोनी'च्या 'प्रगती' बद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
5 Aug 2008 - 8:30 pm | प्राजु
प्रगति तुमचे मनापासून अभिनंदन.
आपल्या या वाचनालयाची उत्तरोत्तर अशीच भरभराट होवो हीच प्रार्थना. माझ्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Aug 2008 - 8:37 pm | श्रीयुत संतोष जोशी
नमस्कार,
अनेकानेक शुभेच्छा.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
5 Aug 2008 - 9:08 pm | शेखस्पिअर
अभिनंदन...
अशीच उत्तरोत्तर "प्रगती" होत राहो...ही 'सरसोती' चरणी प्रार्थना..
वाचनालयाची शाखा उघडणे ,ही बातमी खरेच अविश्वसनीय आहे..
(म्हणूनच बहुतेक प्रगतीने छायाचित्रांसहीत बातमी छापली असावी...हाहाहा)
छान उपक्रम आणि खूप खूप शुभेछ्छा..
6 Aug 2008 - 10:48 am | भडकमकर मास्तर
वाचनालयाची शाखा उघडणे ,ही बातमी खरेच अविश्वसनीय आहे..
अविश्वसनीय आणि अभिमानास्पद ...
खूप शुभेच्छा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
6 Aug 2008 - 6:08 am | गणा मास्तर
मनापासून अभिनंदन
6 Aug 2008 - 8:18 am | नंदन
मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरता अनेक शुभेच्छा.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
6 Aug 2008 - 8:52 am | शितल
तुमचा वाचनायलचा उपक्रम चांगला आहे. :)
तुम्हाला अनेक शुभेच्छा ! :)
6 Aug 2008 - 11:01 am | प्रगती
माझ्या आनंदात सहभागी झाल्याबद्द्ल आणि मला प्रोत्साहन दिल्याबद्द्ल सर्वाचे मनापासून आभार! :)
आता माझं पुढचं लक्ष्य आहे वाशी ( नवी मुंबई ).
6 Aug 2008 - 11:37 am | पक्या
तुमचा वाचनालयाचा उपक्रम अतिशय चांगला आणि स्तुत्य आहे.
वाचनालयाची दुसरी शाखा उघडल्याबद्द्ल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरता अनेक शुभेच्छा.
फक्त एक गोष्ट मात्र खटकली . वाचनालयाचा संपूर्ण फलक (वाचनालयाच्या नावासकट ) इंग्रजी मध्ये आहे.
6 Aug 2008 - 10:37 pm | यशोधरा
मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरता अनेक शुभेच्छा.