माझे साईपदयात्रेचे अनुभव - ६

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in भटकंती
18 Aug 2014 - 12:32 pm

इतके दिवस लेखन करतानाचे टुलबार निष्क्रिय झाले होते आणी शेवटच्या भागात फोटो डकवायचे असल्याने ते डकवता येत नव्हते त्यामुळे हा भाग प्रकाशित करण्यास उशीर झाला त्याबद्द्ल दिलगीर आहे.

माझे साईपदयात्रेचे अनुभव - १ - http://misalpav.com/node/28447

माझे साईपदयात्रेचे अनुभव - २ - http://misalpav.com/node/28457

माझे साईपदयात्रेचे अनुभव - ३ - http://misalpav.com/node/28464

माझे साईपदयात्रेचे अनुभव - ४ - http://misalpav.com/node/28482

माझे साईपदयात्रेचे अनुभव - ५ - http://misalpav.com/node/28489

माझे साईपदयात्रेचे अनुभव - ६

८ वा दिवस उजाडला, आज पदयात्रेचा शेवटचा दिवस. आज फक्त १४ कि.मी. चालायचे होते. ५ वाजता उठलो, जिथे रात्री थांबलो होतो तिथे बाहेरच मागच्या बाजुला पाण्याची व्यवस्था असल्याने बाकीच्यांनी रात्रीच आंघोळ करुन घेतली होती. मी ५ वाजता उठले , आजारी माणुस म्हणुन मंडळाच्या अध्यक्षांनी माझ्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था केली होती. आंघोळ करुन तयारी करुन घेतली. ६ वाजता निघालो , थांबा आतल्या गावात असल्याने १० की.मी. कच्चा रस्त्यावरुन जावे लागले. पाय दुखत होते पण आज सपोर्टची गरज नव्हती, दर्शन कालच झाले असल्याने मनातली हुरहुर संपली होती. थोडावेळ हातात काठी घेतली पण अजुन हळु चालु लागले म्हणुन श्रीमामांनी ती फेकुन दिली. डावा पाय कालपासुन आजारी असल्याने एका पायाने चालुन एक पाय ओढत नेत होते , जोडीदार सगळे हसत होते म्हणाले पोहोचेपर्यंत तु लंगडी झालीस. गंमत मस्करी करत जात होतो. १० की,मी. चालल्यावर शिर्डी मेन रोडवर आलो , तिथे लक्ष्मीवाडी येथे एके ठीकाणी थांबलो, एका घराच्या ओट्यावर पालखी सजवली जाणार होती. तिथेच सर्व पदयात्रींसाठी नाश्त्याची सोय होती. पालखी गुलाबाच्या फुलांनी सजवली. आणी ९.३० च्या दरम्यान निघालो. पालखीच्या पुढे मला आणी अजुन तिघांना साईबाबांचा फोटो घेउन उभं केलं होतं, मला तर सरळ उभंच राहता येत नव्हतं, दोन्ही बाजुंनी तोल जात होता. त्याच दिवशी परतायचं असल्याकारणाने मी घरुन गाडी बोलावली , माझे भाउजी आणी राउत घ्यायला येणार होते.

अचानक समोर पाहिलं तर माझा भाउ मोटरसायकल घेउन उभा, मला खुपच आनंद झाला, घरापासुन इतके दिवस लांब केव्हाच राहीले नव्हते. तो मला पाहुन जवळ आला, हसत होता, म्हणाला काय अवस्था झालीये तुझी, अगदि काळी ठीक्कर पडलीयेस, तुला नीट उभंही राहता येत नाहीये , मी म्हणाले त्यात काय झालं आले ना शेवटपर्यंत चालत , बास ! तो म्हणाला राउत आणी भाउजी गाडी घेउन येत आहेत , थोडं मागे आहेत , पोहोचतील. ते आले, मी अमोल ने माझं सामान ट्र्क मधे काढुन गाडीत शिफ्ट केलं ४ की.मी. पासुन सर्व नाचत जाणार होते. रोडवर बर्‍याच पालख्या होत्या, डी, जे. लावले होते, सेवा म्हणुन बाकीची मंडळी सरबत , पाणी वाटत होती. त्यावेळी शिर्डीत एकुण ९५ पालख्या पोहोचल्या होत्या. मंदीराजवळ पोहोचलो. आधी खंडोबाच्या मंदीरात दर्शन घेतलं, नंतर मंदीरात प्रवेश केला, पदयात्री असल्याकारणाने रांग लावावी लागली नाही, प्रत्येक पदयात्रींना मंडळाप्रमाणे दर्शनासाठी आत सोडत होते, आता डायरेक्ट दर्शन फक्त लालबागचा राजा पदयात्री मंडळालाच मिळ्तं बाकीच्यांना इतरांप्रमाणे दर्शनासाठी रांग लावावी लागते. दर्शन झालं.मंदीराबाहेर आलो.

सर्वांचा निरोप घेउन गाडीत बसले, अमोल, मामा असे जोडीला चालणारे ही बरोबरच आले. गाडीत बसलो आणि घरी निघालो, ए.सी. लावल्याने छान झोप लागली , बाकीचे जेवणासाठी थांबले होते मी तर जेवलेच नाही रस्ताभर झोपेतच होते, ५ तासात घरी पोहोचले. ८ दिवस उन्हात फीरल्याने व पाणी बदल, थंड सरबते घेतली होती त्यामुळे ५ तास ए.सी. बसल्याने घरी येईपर्यंत घसा बसुन आवाज बंद झाला होता. सर्व पदयात्री म्हणत होते की आता न चालल्याने उद्या तुमचे पाय खुप सुजुन येतील पण असे काही झाले नाही फक्त पुढे १५ दिवस तळपायाला सेंसेशन नव्हते. सारखी झोपत होते

तर अशी झाली माझी पहीली अविस्मरणीय पदयात्रा. आता दरवर्षी न चुकता जाते, अजुनही घरुन पदयात्रेला जायला विरोध होतो पण मी जाणारच हे माहीत असल्याने कुणीही अडवत नाही. आता इतका त्रास होत नाही, खास पदयात्रेसाठी वजनही कमी केले आहे. दरवर्षी गुढी पाडव्या निघतो आणी रामनवमीच्या आदल्या दिवशी पोहोचतो. आता आमच्या पदयात्रेत नवीन पदयात्रींना माझे उदाहरण दिले जाते, मी स्वतः नवीन पदयात्रींना सांगत असते की घाबरु नका , व्यवस्थीत चालत जाल, नाही झालं तर मी आहेच. सर्वांनाच अगदी माझ्याइतका त्रास होत नाही. पण इतक्या लांब पायी जायचं म्हणजे त्रास होणारच. आता मी २० मार्च २०१५ ला माझ्या ७ व्या वारी साठी जाईन त्याची तयारी आतापासुनच करायला घेतलीये, सामानाची जमवाजमव सुरु आहे. सर्व विचारतात आणखी कीती वर्षे जाणार ?? मी सांगते "मरेपर्यंत , जितकी वर्षे चालत जाउ शकेन तितकी वर्षे चालत जाईन जेव्हा पाय साथ सोडतील तेव्हा गाडीत बसुन जाईन , बायकांचे पाय चेपणे, पदयात्रींना जेवण , नाश्ता , पाणी वाटप ई. सेवा करेन".

ह्या वारीला ३१ मार्च २०१४ ला निघुन ७ एप्रिल २०१४ ला पोहोचलो, प्रवास उत्तम झाला, बर्‍याच ठीकाणी नाचत गेलो. ह्यावर्षी आम्ही पोहोचलो त्या दिवशी २०० पालख्या पोहोचल्या होत्या. ह्या वेळेस सिन्नरच्या घाटाजवळ दुसर्‍या पदयात्री मंडळातला एक नवीन पदयात्री मुलगा भेटला, एका पायाने अधु होता , खुप मागे पडला होता पण कंटाळला नव्हता, आनंदी दिसत होता. त्याचा थांबा आमच्या थांब्याच्या पुढे होता मी आणी निलेशने त्याला आमचा थांबा येईपर्यंत त्याच्या गतीने साथ दिली. त्यालाही घरचे येउ देत नव्हते पण जिद्दीने आला होता. त्याच्या जिद्दीला सलाम. आणखी एका पदयात्रीला पाहिले , चालता येत नव्हते तीनचाकी सायकलवर बसुन इतक्या उन्हात हाताने पॅडल फीरवत होता, ह्या सर्व पदयात्रींपुढे मला झालेला त्रास काहीच मोठा नाही. ह्यांच्या श्रद्धेला आणी जिद्दीला माझा सलाम !!

ह्यावर्षी काही रस्त्यात जे जे पदयात्री मंडळ भेटले त्यांचे फोटो काढले आहेत.

11

12

13

14

15

16

17

18

19

20

21

22

22

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

18 Aug 2014 - 1:43 pm | स्पंदना

फोटोत बरीच मंडळी तरुण दिसताहेत.
हा शेवटचा भाग का? असो.
एकूण तुम्ही धैर्याने आणि इच्छाशक्तीच्या बळावर ही पदयात्रा करता हे जाणवले.
हे!! मी पयली का काय? *dance4*

तुम्ही पयल्यापासनं पयल्याच. ;)

ही पदयात्रा करताना फारच दमछाक झालेली आहे. सो आता 'रेष्ट'. :)

कमालच आहे .आणि लेखनशैलीही आवडली .इतक्या पदयात्रा करूनही विरोध का होतो ?नेहमी मार्च एप्रिलमध्येच असते का वार्षिक यात्रा ?

छान लिहिले आहे ...पुढेही लिहीत रहा ...

पैसा's picture

19 Aug 2014 - 9:15 am | पैसा

फोटो आवडले. पदयात्रा सुरू केल्यामुळे तब्ब्येत सुधारायची निकड भासली हे छानच झाले. ज्या गोष्टीने आपल्याला समाधान मिळतंय आणि दुसर्‍या कोणाला त्याचा काही त्रास नाहीये, ते माणसाने जरूर करावं. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

रेवती's picture

19 Aug 2014 - 10:27 am | रेवती

सहमत.

योगी९००'s picture

19 Aug 2014 - 9:30 am | योगी९००

तुमच्या साईभक्तीला आणि जिद्दीला सलाम...!!

बाकी पैसाताई यांनी म्हणल्याप्रमाणे "ज्या गोष्टीने आपल्याला समाधान मिळतंय आणि दुसर्‍या कोणाला त्याचा काही त्रास नाहीये, ते माणसाने जरूर करावं. "

पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

vikramaditya's picture

19 Aug 2014 - 10:26 am | vikramaditya

अश्या उपक्रमातुन मिळणारे आध्यात्मिक फायदे हा वैयक्तिक विषय असला तरी --
- ठरवलेले उद्दीष्ट पूर्ण करणे, ते ही एका ठरावीक वेळात, प्रतिकुल परिस्थितित,
- इतरांशी जुळवुन घेणे आणि संवाद साधणे
- अत्यल्प सुविधांचा अनुभव घेणे

अशा अनेक उपयुक्त गोष्टी घडतात. कुठलाही पुर्वग्रह न बाळगता आयुष्यात असे अनुभव घ्यावे आणि जे मनाला पटेल, योग्य वाटेल त्या मार्गावर जावे. शुभेछा.

आधिचेहि भाग वाचले.बरेच कष्ट आणि अनुभव घेतलेत.शुभेच्छा!!

रामपुरी's picture

19 Aug 2014 - 11:16 pm | रामपुरी

दर वर्षी जर एवढ्या पदयात्रा जात असतील तर त्या महामार्गावरील वाहनांना किती त्रास होत असेल हे फोटोवरून स्पष्ट होत आहे. दोन्ही बाजूचा रस्ता अडवून मस्त पदयात्रा चालू आहे. वर मागून येणार्‍या वाहनाने हॉर्न वाजवला तर हे लोक त्याच्या काचा फोडायला कमी करत नसतील. शेवटी देवाचं काम आहे. हॉर्न वाजवतो म्हणजे काय.
असो... चालू द्या म्हणण्याशिवाय पर्याय नाही.

nanaba's picture

25 Jul 2016 - 11:52 am | nanaba

petrol jalun poorna environment ch nukasan karatat..
he raste zad, lokanchi shet, jungle ani pranyanchi naisargik vasatisthan balakavun ali ahet..
chalu ahech.. chalu dya mhananyavachun paryay nasatoch!

मुक्त विहारि's picture

20 Aug 2014 - 12:11 am | मुक्त विहारि

लेखमाला आवडली.

जमल्यास तुम्हाला पदयात्रा करतांना आलेले अनुभव पण लिहीलेत तर उत्तम.

असंका's picture

20 Aug 2014 - 10:22 am | असंका

मागे आपण लोक कसे ईर्षेने एकमेकांच्या पुढे जातात त्याबद्दल लिहिले होते. तशा अजून काही गमती जमती लिहा ना प्रवासातल्या.

कवितानागेश's picture

20 Aug 2014 - 1:10 pm | कवितानागेश

खूप छान वाटलं. :)

साईबाबांच्या कृपेने यावेळी मी पदयात्रेची नववी फेरी २७ मार्च ते ३ एप्रिल ला यशस्वीरीत्या पुर्ण केली. जव्हार, मोखाडाचे घाट चढताना तापमान ४३॰ - ४५॰ असुन सुद्धा देवाच्या कृपेने पदयात्रा सुसह्य झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2017 - 8:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवाची कृपा असली की असं सर्व सुसह्य होतं. माझ्यावरही देवाची कृपा होवो.
आणि अशी एखादी पदयात्रा व्हावी, अशी त्या साईबाबाकडे प्रार्थना.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

5 Apr 2017 - 8:57 am | पैसा

तापमान ४३॰ - ४५॰ असताना घाटातून चालत??

काय माणूस आहेस का कोण? _/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2017 - 9:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्याकडे जळत्या कोळशावरुन लोक चालत जायचेत.
देवाची कृपा असल्यावर चटके सुद्धा लागत नाही.
(काहींना थेट दवाखान्यात न्यावं लागतं तो भाग वेगळा)

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

5 Apr 2017 - 9:38 am | पैसा

चपळाई असेल तर कोणीही निखार्‍यावरून चालू शकतो. ते असो. आपण सुट्टीत शिर्डीला जाऊया काय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2017 - 9:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चपळाई असेल तर कोणीही निखार्‍यावरून चालू शकतो.

अच्छा ! असं कनेक्शन असतं तर, मला वाटलं की देवाची कृपा की असलं की चटके सुद्धा बसत नाहीत.

आपण सुट्टीत शिर्डीला जाऊया काय?

नक्की जाऊ. शिर्डी सात किलोमिटर असा बोर्ड दिसेल तिथून पायी जाऊ.
मी पण लेख लिहिन. प्रतिसाद द्यायचा माझ्या धाग्यावर सांगून ठेवतो.

आपण कोण कोण जाऊ ?

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

5 Apr 2017 - 9:56 am | पैसा

६ किमी पर्यंत तर मी रोज चालते. जरा जास्त मोठं चॅलेंज पायजे.

>>>>कोण कोण जाऊया म्हणता? ज्यांची यायची इच्छा असेल ते सगळे!

प्रतिसाद द्यायचं आपलं ठरलंच आहे ना! तुम्ही माझ्या धाग्याला प्रतिसाद द्यायचा, मग मी तुमच्या धाग्याला देणार!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2017 - 10:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

६ किमी पर्यंत तर मी रोज चालते.

मस्त..! रेग्युलर चालू ठेवा. मी पण पाच, सात, किमी चालत असतोच. पण झेपणार नै म्हणुन म्हणतो.
परीक्षेच्या काळात गेली वीस दिवस चालणे बंद होतं.
पोटाचा घेर वाढल्यासारखा वाटतोय. पण १५ जून पर्यंत चालणे आणि बॅडमिंटन असा प्लान आहे.

साईबाबांची कृपा राहीली तर...मोठं च्यालेंज पण घेईन.

प्रतिसाद द्यायचं आपलं ठरलंच आहे ना !

आपलं ठरलंच आहे, पण पै पाहुण्यांचे पण प्रतिसाद पाहिजेल ना ?

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

5 Apr 2017 - 10:13 am | पैसा

तेजा मैं हूं, मार्क इधर है...

पै आहे. पाहुणे तुम्ही आणा! =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2017 - 10:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

असो, गुड्डे. आज मिपावर पडीक असेन. पदयात्रेचं प्लानींग करा.
कोण कोण येतंय त्याची यादी करतो. तुम्ही गृप लिडर आमच्या. :)

बाबा सर्वांना सुखात ठेवा. मलाही सुखात ठेवा.
पैसे टीकू दे घरात, बरकत राहू दे... बाकी काय नको.

बोलो श्री सच्चिदानंद, सदगुरु साईनाथ महाराज की जय !

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

5 Apr 2017 - 10:47 am | पैसा

_/\_

मनिमौ's picture

5 Apr 2017 - 8:33 am | मनिमौ

शाब्बास

कविता१९७८'s picture

8 Apr 2017 - 12:46 pm | कविता१९७८

हो गं पैसा ताई जमेल तुला पदयात्रा करायला, साईदेवाच्या कृपेने तु पदयात्रा करु शकशील गं, ईच्छा असेल तर नक्की मार्ग सापडेल बघ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Apr 2017 - 6:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी पण पैंना हेच म्हणालो की श्री समर्थ साईंची कृपा असेल तर तुम्ही मजल दरमजल करत (गोव्याहून गाडीने) माझ्या गावापासून शिर्डी पर्यंत नक्की जाऊ शकता. पण त्यांना भीती वाटते की त्रास होईल वगैरे. मी म्हणालो त्यांना की पाच गुरुवार करा बाबांचं स्मरण करा. नक्की यश मिळेल. श्रद्धा असली पाहिजे बस.... पण त्यांचा विश्वास नै म्हणे देव धर्मावर (असं म्हणतात) :(

पै, मॉर्निंग वाकला तरी चला ? मी निघालो... !

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

9 Apr 2017 - 9:57 am | पैसा

तुमच्यावर बाबांची कृपा आहे नक्कीच! सकाळची कामे करीपर्यंत माझे साडेनऊ वाजतात. आमचा वॉक इव्हिनिंग किंवा लेट नाईट सुद्धा कधी कधी!

ते असो. तिकीट काढलं की तुम्हाला कळवते हं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Apr 2017 - 1:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्यावर बाबांची कृपा आहे नक्कीच!

देवांची कृपा आहेच, त्या शिवाय इतकं आपण आनंदी नाही राहू शकत. ''चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीवीण''''तुका म्हणे विठो भरला सबाहीं । तया उणें काहीं चराचरीं''

तिकीट काढलं की तुम्हाला कळवते हं.

नक्की. आपण येवल्याला जाऊन पैठण्या पाहुन येऊ नुस्तं. ( विंडो शॉपींग)

-दिलीप बिरुटे
(जाल संत)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Sep 2017 - 3:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बरेच दिवस झाले तुमचा काही धागा आला नाही. सध्या कुठे सुरु आहे पदयात्रा ?
विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...

-दिलीप बिरुटे