माझे साईपदयात्रेचे अनुभव - ६
इतके दिवस लेखन करतानाचे टुलबार निष्क्रिय झाले होते आणी शेवटच्या भागात फोटो डकवायचे असल्याने ते डकवता येत नव्हते त्यामुळे हा भाग प्रकाशित करण्यास उशीर झाला त्याबद्द्ल दिलगीर आहे.
माझे साईपदयात्रेचे अनुभव - १ - http://misalpav.com/node/28447
माझे साईपदयात्रेचे अनुभव - २ - http://misalpav.com/node/28457
माझे साईपदयात्रेचे अनुभव - ३ - http://misalpav.com/node/28464
माझे साईपदयात्रेचे अनुभव - ४ - http://misalpav.com/node/28482
माझे साईपदयात्रेचे अनुभव - ५ - http://misalpav.com/node/28489
माझे साईपदयात्रेचे अनुभव - ६
८ वा दिवस उजाडला, आज पदयात्रेचा शेवटचा दिवस. आज फक्त १४ कि.मी. चालायचे होते. ५ वाजता उठलो, जिथे रात्री थांबलो होतो तिथे बाहेरच मागच्या बाजुला पाण्याची व्यवस्था असल्याने बाकीच्यांनी रात्रीच आंघोळ करुन घेतली होती. मी ५ वाजता उठले , आजारी माणुस म्हणुन मंडळाच्या अध्यक्षांनी माझ्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था केली होती. आंघोळ करुन तयारी करुन घेतली. ६ वाजता निघालो , थांबा आतल्या गावात असल्याने १० की.मी. कच्चा रस्त्यावरुन जावे लागले. पाय दुखत होते पण आज सपोर्टची गरज नव्हती, दर्शन कालच झाले असल्याने मनातली हुरहुर संपली होती. थोडावेळ हातात काठी घेतली पण अजुन हळु चालु लागले म्हणुन श्रीमामांनी ती फेकुन दिली. डावा पाय कालपासुन आजारी असल्याने एका पायाने चालुन एक पाय ओढत नेत होते , जोडीदार सगळे हसत होते म्हणाले पोहोचेपर्यंत तु लंगडी झालीस. गंमत मस्करी करत जात होतो. १० की,मी. चालल्यावर शिर्डी मेन रोडवर आलो , तिथे लक्ष्मीवाडी येथे एके ठीकाणी थांबलो, एका घराच्या ओट्यावर पालखी सजवली जाणार होती. तिथेच सर्व पदयात्रींसाठी नाश्त्याची सोय होती. पालखी गुलाबाच्या फुलांनी सजवली. आणी ९.३० च्या दरम्यान निघालो. पालखीच्या पुढे मला आणी अजुन तिघांना साईबाबांचा फोटो घेउन उभं केलं होतं, मला तर सरळ उभंच राहता येत नव्हतं, दोन्ही बाजुंनी तोल जात होता. त्याच दिवशी परतायचं असल्याकारणाने मी घरुन गाडी बोलावली , माझे भाउजी आणी राउत घ्यायला येणार होते.
अचानक समोर पाहिलं तर माझा भाउ मोटरसायकल घेउन उभा, मला खुपच आनंद झाला, घरापासुन इतके दिवस लांब केव्हाच राहीले नव्हते. तो मला पाहुन जवळ आला, हसत होता, म्हणाला काय अवस्था झालीये तुझी, अगदि काळी ठीक्कर पडलीयेस, तुला नीट उभंही राहता येत नाहीये , मी म्हणाले त्यात काय झालं आले ना शेवटपर्यंत चालत , बास ! तो म्हणाला राउत आणी भाउजी गाडी घेउन येत आहेत , थोडं मागे आहेत , पोहोचतील. ते आले, मी अमोल ने माझं सामान ट्र्क मधे काढुन गाडीत शिफ्ट केलं ४ की.मी. पासुन सर्व नाचत जाणार होते. रोडवर बर्याच पालख्या होत्या, डी, जे. लावले होते, सेवा म्हणुन बाकीची मंडळी सरबत , पाणी वाटत होती. त्यावेळी शिर्डीत एकुण ९५ पालख्या पोहोचल्या होत्या. मंदीराजवळ पोहोचलो. आधी खंडोबाच्या मंदीरात दर्शन घेतलं, नंतर मंदीरात प्रवेश केला, पदयात्री असल्याकारणाने रांग लावावी लागली नाही, प्रत्येक पदयात्रींना मंडळाप्रमाणे दर्शनासाठी आत सोडत होते, आता डायरेक्ट दर्शन फक्त लालबागचा राजा पदयात्री मंडळालाच मिळ्तं बाकीच्यांना इतरांप्रमाणे दर्शनासाठी रांग लावावी लागते. दर्शन झालं.मंदीराबाहेर आलो.
सर्वांचा निरोप घेउन गाडीत बसले, अमोल, मामा असे जोडीला चालणारे ही बरोबरच आले. गाडीत बसलो आणि घरी निघालो, ए.सी. लावल्याने छान झोप लागली , बाकीचे जेवणासाठी थांबले होते मी तर जेवलेच नाही रस्ताभर झोपेतच होते, ५ तासात घरी पोहोचले. ८ दिवस उन्हात फीरल्याने व पाणी बदल, थंड सरबते घेतली होती त्यामुळे ५ तास ए.सी. बसल्याने घरी येईपर्यंत घसा बसुन आवाज बंद झाला होता. सर्व पदयात्री म्हणत होते की आता न चालल्याने उद्या तुमचे पाय खुप सुजुन येतील पण असे काही झाले नाही फक्त पुढे १५ दिवस तळपायाला सेंसेशन नव्हते. सारखी झोपत होते
तर अशी झाली माझी पहीली अविस्मरणीय पदयात्रा. आता दरवर्षी न चुकता जाते, अजुनही घरुन पदयात्रेला जायला विरोध होतो पण मी जाणारच हे माहीत असल्याने कुणीही अडवत नाही. आता इतका त्रास होत नाही, खास पदयात्रेसाठी वजनही कमी केले आहे. दरवर्षी गुढी पाडव्या निघतो आणी रामनवमीच्या आदल्या दिवशी पोहोचतो. आता आमच्या पदयात्रेत नवीन पदयात्रींना माझे उदाहरण दिले जाते, मी स्वतः नवीन पदयात्रींना सांगत असते की घाबरु नका , व्यवस्थीत चालत जाल, नाही झालं तर मी आहेच. सर्वांनाच अगदी माझ्याइतका त्रास होत नाही. पण इतक्या लांब पायी जायचं म्हणजे त्रास होणारच. आता मी २० मार्च २०१५ ला माझ्या ७ व्या वारी साठी जाईन त्याची तयारी आतापासुनच करायला घेतलीये, सामानाची जमवाजमव सुरु आहे. सर्व विचारतात आणखी कीती वर्षे जाणार ?? मी सांगते "मरेपर्यंत , जितकी वर्षे चालत जाउ शकेन तितकी वर्षे चालत जाईन जेव्हा पाय साथ सोडतील तेव्हा गाडीत बसुन जाईन , बायकांचे पाय चेपणे, पदयात्रींना जेवण , नाश्ता , पाणी वाटप ई. सेवा करेन".
ह्या वारीला ३१ मार्च २०१४ ला निघुन ७ एप्रिल २०१४ ला पोहोचलो, प्रवास उत्तम झाला, बर्याच ठीकाणी नाचत गेलो. ह्यावर्षी आम्ही पोहोचलो त्या दिवशी २०० पालख्या पोहोचल्या होत्या. ह्या वेळेस सिन्नरच्या घाटाजवळ दुसर्या पदयात्री मंडळातला एक नवीन पदयात्री मुलगा भेटला, एका पायाने अधु होता , खुप मागे पडला होता पण कंटाळला नव्हता, आनंदी दिसत होता. त्याचा थांबा आमच्या थांब्याच्या पुढे होता मी आणी निलेशने त्याला आमचा थांबा येईपर्यंत त्याच्या गतीने साथ दिली. त्यालाही घरचे येउ देत नव्हते पण जिद्दीने आला होता. त्याच्या जिद्दीला सलाम. आणखी एका पदयात्रीला पाहिले , चालता येत नव्हते तीनचाकी सायकलवर बसुन इतक्या उन्हात हाताने पॅडल फीरवत होता, ह्या सर्व पदयात्रींपुढे मला झालेला त्रास काहीच मोठा नाही. ह्यांच्या श्रद्धेला आणी जिद्दीला माझा सलाम !!
ह्यावर्षी काही रस्त्यात जे जे पदयात्री मंडळ भेटले त्यांचे फोटो काढले आहेत.
वाचने
19065
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
फोटोत बरीच मंडळी तरुण
In reply to फोटोत बरीच मंडळी तरुण by स्पंदना
तुम्ही पयल्यापासनं पयल्याच.
कमालच आहे .आणि लेखनशैलीही
छान लिहिले आहे ...पुढेही
छान!
In reply to छान! by पैसा
सहमत.
छान..!!
अभिनंदन.
आधिचेहि भाग वाचले.बरेच कष्ट
बाप रे
In reply to बाप रे by रामपुरी
hya gadya
छान...
मागे आपण लोक कसे ईर्षेने
खूप छान वाटलं.
साईबाबांच्या कृपेने यावेळी मी
In reply to साईबाबांच्या कृपेने यावेळी मी by कविता१९७८
क्या बात है....!
In reply to साईबाबांच्या कृपेने यावेळी मी by कविता१९७८
४३॰ - ४५॰
In reply to ४३॰ - ४५॰ by पैसा
देवाची कृपा असल्यावर कै बी करता येतं.
In reply to देवाची कृपा असल्यावर कै बी करता येतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असं कै नस्तं ओ!
In reply to असं कै नस्तं ओ! by पैसा
नक्की.
In reply to नक्की. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फक्त ७ किमी का ओ?
In reply to फक्त ७ किमी का ओ? by पैसा
सध्या मी पण पाच किमि चालतोय सकाळी.
In reply to सध्या मी पण पाच किमि चालतोय सकाळी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहाहा!
In reply to हाहाहा! by पैसा
पै आली की पाहुणे येतात.
In reply to पै आली की पाहुणे येतात. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
_/\_
वेल डन कविता
हो गं पैसा ताई जमेल तुला
In reply to हो गं पैसा ताई जमेल तुला by कविता१९७८
+१०
In reply to +१० by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मॉर्निंग वॉक?
In reply to मॉर्निंग वॉक? by पैसा
बाबांची कृपा आहेच...
नवीन कुठे पदयात्रा ?