स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
11 Aug 2014 - 11:58 am

माफ करा मंडळी, यापूर्वीच्या निवेदनात या रचनांचा मोफत आस्वाद घेता येईल, हा उल्लेख राहून गेला होता, म्हणून हे फेर निवेदन.

साहित्यातील नवरसांत देशभक्तीच्या दहाव्या रसाची भर घालणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उर्दू आणि हिंदी गीतांची सावरकर की अमर रचनाएं - हम ही हमारे वाली है ही सीडी www.savarkarsmarak.com या संकेतस्थळावर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येत्या १५ ऑगस्टपर्यंत नि:शुल्क उपलब्ध आहे. अमिताभ बच्चन यांच्या घनगंभीर आवाजातील निवेदन या ध्वनीफीतीला लाभलं आहे. जसपिंदर नरूला, सुरेश वाडकर, राहुल देशपांडे, स्वराधीश बलवल्ली, शंकर महादेवन, जावेद अली, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, शान आणि साधना सरगम अशा गुणी गायकांच्या आवाजात या रचनांचा आस्वाद घेता येईल.
सावरकरांच्या तीन मूळ आणि सात अनुवादित अशा एकूण १० रचनांचा समावेश या ध्वनीफीतीमध्ये आहे. सावरकरांचं साहित्य, विशेषत: काव्य आवडणाऱ्यांसाठी ही एक उत्तम पर्वणी.

नम्र निवेदन - ही सदर ध्वनिफीतीची जाहिरात नाही. या रचनांचा आस्वाद सर्वांना/इच्छुकांना घेता यावा, हीच सदिच्छा.

संगीतप्रकटन