सहजीवन

शितल's picture
शितल in जे न देखे रवी...
1 Aug 2008 - 5:29 pm

सहजीवनाच्या मैदानात तुझ्यासाठी हरूनही
तुला, मला जिंकता आले नाही.
डाव तुझ्या हाती दिला तरी, तुला खेळता आला नाही.
रडुन जिंकता येत नाही आणि चिडुन डाव उधळायचा नसतो,
कधी समजणार हे तुला , प्रेमाने कोणालाही जिंकंता येते.

सहजीवनाच्या प्रवासात तुझ्यासाठी
राजमार्ग सोडुन पाऊल वाट स्विकारली होती
अरूंद, अवघड, वळणे पाऊलवाटेची जरी
गंमत त्यातली तुला कधी कळ्लीच नाही.
कधी कळणार हे तुला , सोबत असली प्रेमाची की प्रवास हा जाणवतही नाही.

सहजीवनाच्या जीवनात तुझ्यासाठी
विणले होते छोटेसे घरटे,समजून माझी तुला, पाहिली होती अनेक स्वप्ने
स्वप्नात रंगणे तुला कधी जमलेच नाही
कधी कळणार तुला, स्वप्नेही कधी कधी साकार होतात, स्वप्नील नजर मात्र हवी.

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

1 Aug 2008 - 5:38 pm | मनस्वी

डाव तुझ्या हाती दिला तरी, तुला खेळता आला नाही.

छान लिहिलएस शितल.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

मदनबाण's picture

1 Aug 2008 - 5:42 pm | मदनबाण

ताई मस्त लिहले आहेस..
सहजीवनाच्या प्रवासात तुझ्यासाठी
राजमार्ग सोडुन पाऊल वाट स्विकारली होती
अरूंद, अवघड, वळणे पाऊलवाटेची जरी
गंमत त्यातली तुला कधी कळ्लीच नाही.

हे फार आवडल..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

धनंजय's picture

1 Aug 2008 - 6:09 pm | धनंजय

मुक्तक.

इट टेक्स टू टु टॅंगो.

प्राजु's picture

1 Aug 2008 - 7:57 pm | प्राजु

छान कविता.
तुझ्या या मुक्तछंदाने, कधी ही नाही कधीच नाही... प्रीत तुला ही कळली नाही.. हे गाणे आठवले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

1 Aug 2008 - 8:00 pm | संदीप चित्रे

विचारांचा ओघ छान लिहिला आहेस ग

>> विणले होते छोटेसे घरटे,समजून माझी तुला, पाहिली होती अनेक स्वप्ने
>> स्वप्नात रंगणे तुला कधी जमलेच नाही

हे तर खास
--------------------------
www.atakmatak.blogspot.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2008 - 11:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तछंदातली कविता आवडली.
अजून येऊ दे असेच मुक्तक !!!

इनोबा म्हणे's picture

2 Aug 2008 - 12:56 am | इनोबा म्हणे

मुक्तछंदातली कविता आवडली.
अजून येऊ दे असेच मुक्तक !!!

हेच म्हणतो

शितल छान कविता करते आहेस, अजुन अशाच सुंदर कवितांची अपेक्षा करतो.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

पद्मश्री चित्रे's picture

2 Aug 2008 - 1:21 pm | पद्मश्री चित्रे

छान लिहिलं आहेस.
>>डाव तुझ्या हाती दिला तरी, तुला खेळता आला नाही.
हे जास्त आवडलं

विसोबा खेचर's picture

2 Aug 2008 - 1:26 pm | विसोबा खेचर

रडुन जिंकता येत नाही आणि चिडुन डाव उधळायचा नसतो,
कधी समजणार हे तुला , प्रेमाने कोणालाही जिंकंता येते.

वा! क्या बात है! शितल छान लिहिलं आहेस हो...

आपला,
(एकटा जीव सदाशिव) तात्या.

शितल's picture

3 Aug 2008 - 2:05 am | शितल

सर्व वाचकांचे धन्यवाद
आणि प्रतिक्रीये बद्दल आभार. :)

आनंदयात्री's picture

3 Aug 2008 - 4:05 pm | आनंदयात्री

>>स्वप्नात रंगणे तुला कधी जमलेच नाही
>>कधी कळणार तुला, स्वप्नेही कधी कधी साकार होतात, स्वप्नील नजर मात्र हवी.

सही लिहलं आहेस शितल !