टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
रिता गाभारा .....
देहात माझीया हा
चंद्र वितळून गेला ।
अन अंतरी मोगराही
सुगंध मिसळून गेला ।
झुकवुनी लाख पाहिले
नजरेस मी माझीया ।
तीर तुझ्या नजरेचा
काळजास वेधून गेला ।
बेरंगी दुनियेचा ना
कायदा मी मोडला ।
इशाराच एक तुझा
मज हाय रंगवून गेला ।
वेचियेली मी दुःखेही
माझ्या दोहो करांनी।
फासा दुर्दैवाचा मज
दान देऊन गेला ।
ओळखले नसे कधीही
माझ्याच मी जगाला ।
सौख्याचा क्षण मजला
नेहमीच फसवून गेला ।
गर्दीत अनोळख्यांच्या
मज मैत्र एक भेटला ।
जीवलगच तो जीवाचा
मग घाव घालून गेला ।
लाविले कसास माझ्या
मी प्रत्येक श्वासाला ।
क्षणाक्षणांनी काळही
मजला परखून गेला ।
शोधियले त्रिखंडात मी
त्याच सर्वेश्वराला ।
-हुदयीचा गाभारा पण
रिताच राहून गेला ।
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

वा
वा वा!!!!!
अतिशय सुंदर कविता.....
http://sucheltas.blogspot.com
छान..
झुकवुनी लाख पाहिले
नजरेस मी माझीया ।
तीर तुझ्या नजरेचा
काळजास वेधून गेला ।
व्वा..
ओळखले नसे कधीही
माझ्याच मी जगाला ।
सौख्याचा क्षण मजला
नेहमीच फसवून गेला ।
मस्तच..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
असेच
हीच कडवी विशेष आवडलीत. सुंदर.
राघव
मस्त
मस्त कविता
आवडली
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
आभार...
सुचेल-तसं, मदनबाण, अमोल ..........मनापासून आभार
मनिषा,
मनिषा, फारच सुंदर कविता.
वेचियेली मी दुःखेही
माझ्या दोहो करांनी।
फासा दुर्दैवाचा मज
दान देऊन गेला ।
ओळखले नसे कधीही
माझ्याच मी जगाला ।
सौख्याचा क्षण मजला
नेहमीच फसवून गेला ।
बिपिन.
वा वा..
अतिशय सुंदर कविता. काही ठिकाणी थोडी लय चुकते आहे. पण शब्दसामर्थ जबरदस्त आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
क्या बात है !!!
सर्वच ओळी आवडल्या, सुंदर कविता.
अजून येऊ दे अशाच सुंदर शब्द-आशयांची रचना.