यश आणि अपयश

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
1 Aug 2008 - 7:37 am

" आता तिने तिची भुमिका बदलली.तिने अपयश घेण्याचं रिस्क घेतलं.लोकांकडून नाराजी घेतली.कारण तिच्या आत्म्याला शांतीची गरज होती. "

प्रो.देसायांची सर्वात धाकटी मुलगी सध्या त्यांच्याकडे राहायला आली होती.त्यांच्या धाकट्या नातीला घेऊन ते त्यादिवशी शाळेत घेऊन जाताना मी दुरून पाहिलं होतं.म्हटलं संध्याकाळी तळ्यावर भेटतील त्यावेळी चौकशी करूं.
भेटल्यावर मला म्हणाले,
" थोडे दिवस मुलगी माहेरपणाला आली आहे.आमच्या नातीला तोपर्यंत शाळेत बसवू या.
गेल्या आठवड्यापासून ती किंडरगार्टन मधे जाऊ लागली. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मी तिला शुभेच्छा दिल्या.
तेव्हा मी खोटं बोलत होतो.खरं म्हणजे मी तिला अयशस्वी हो अशीच इच्छा मनात करीत होतो.अपयशात काय क्षमता असते त्यावर माझा विश्वास आहे.
यशस्वी होणं म्हणजे कंटाळवाणी प्रकार आहे.यश सिद्ध करून दाखवतं की तुम्ही असं काही करणार आहात की जे तुम्हाला माहित आहे की तुम्ही ते करूं शकता,किंवा काही तरी पहिल्यावेळी नचुकता करणार आहात,आणि जे कदाचित बहूचर्चीत यश होणार असावं.
पहिल्याचवेळी मिळालेलं यश हा एक नशिबाचा भाग असतो.पण पहिल्यावेळचं अपयश मात्र अपेक्षीत असतं.आणि ते स्वाभावीक असावं.
अपयशातून आपण शिकतो.एक म्हण आहे की ती चांगली सुग्रण की जिने बरीच घरची भांडी फोडली असावीत. तुम्ही जर का स्वयंपाक घरात जास्त वेळ घालवलात तरच कदाचित तुम्हाला चांगलं शिजवायला येत असावं.
मला एकदा गंमत म्हणून एका स्वयंपाकी समुहा बरोबर उशिरा जेवण घेण्याची संधी मिळाली होती.कुणाला किती स्वयंपाक करताना जळलं किंवा कुणाचे हात किंवा बोटं किती ठिकाणी कातरली ह्याचीच जेवण करताना त्यांची बातचीत होत होती.त्यामुळे स्वयंपाक करण्याच्या प्रोसेस मधे अपघाताच्या अपयशाने स्वयंपाकात किती क्रेडिबिलिटी मिळते ह्याच मोजमाप होत होतं.

मी कॉलेजमधे प्रोफेसर होण्याआधी वर्तमानपत्रात लेख लिहित होतो. प्रत्येक आठवड्यातला एखादा लेख त्या आठवड्यातला इतर लेखाच्या तुलनेत सर्वात कमी महत्वाचा निघावा ह्याची मला जाणीव असायची.एखादा लेख कमी महत्वाचा व्हावा असं वाटून मी काही लिहित नव्हतो. रोज मी चांगला लेख लिहिण्याचा प्रयत्नात असायचो. तरी पण एक लेख दुसर्‍या लेखापेक्षा कमी दर्जाचा व्हायचा. आणि हे काही वेळां प्रकर्शानं व्हायचं.

कमी महत्वाचा लेख मला आवडू लागला.माझ्या यशस्वी लेखाबद्दल असं दिसून आलं की तो यशस्वी होण्यासाठी मी नेहमीच्या ट्रिक्स वापरत होतो. उदा.लोकांच्या भावनेचा फायदा घेऊन त्यांना काळजाला भिडेल असं काहीतरी निरनीराळ्या तर्‍हेने लिहायचं. किंवा एखाद्दा गाण्यात कसं तेच शब्द निरनीराळ्या आवडणार्‍या चालीत गातात तसंच तेच शब्द निरनीराळ्या पद्धतीत लिहायचो.बरेच वेळा माझा न आवडलेला लेख लिहिताना मी आता पर्यंत परिचीत असलेल्या ट्रिक्स न वापरता लिहायचो. नव्हे तर नवी ट्रिक वापरल्यावर मला खात्री पण नसायची की ही ट्रिक उपयोगी होईल की नाही.

माझी मधली मुलगी नाटकात काम करायची.तिच भुमिका ती बरेच वेळा करायची.आणि त्यात ती चांगली यशस्वी पण झाली होती.त्या भुमिकेतून बदल करण्याची तिला आवश्यकता नव्हती.तरीपण तिने तसं केलं.ती म्हणाली मला ह्या भुमिकेतून नवं असं काही शिकायला मिळत नव्हतं.आणि त्यामुळे ती कंटाळली होती.आणि असं कंटाळून काम करून तिला स्ट्रेस यायला लागला.त्यामुळे त्यात काही अर्थ राहिला नव्हता.
आता तिने तिची भुमिका बदलली.तिने अपयश घेण्याचं रिस्क घेतलं.लोकांकडून नाराजी घेतली.कारण तिच्या आत्म्याला शांतीची गरज होती.
माझी नात त्याबाबतीत खूपच दर्जा ठेऊन काम करणार्‍यापैकी आहे.कदाचित ह्या बाबतीत जरा जादाच आहे.ती अपयशाने खूपच नाराज व्हायची.मग मला तिची समजूत घालावी लागायची. परंतु मी तिला आठवण करून द्दायचो की त्यातून काय ती शिकली,आणि पुढच्या खेपेला ती आणखी चांगलं कसं करू ही शकेल.मी तिला निश्चितच अपयश कसं चांगल असत हे सांगण्याच्या भानगडीत पडायला मागत नव्हतो. कारण एव्हड्या लहानपणी तसा धडा शिकायचं तिचं वय नव्हतं. पण मी तिला नक्कीच सांगू शकलो की अपयशामुळे जगबुडती तरी येणार नाही. खरंच,मी तर म्हणेन नशिबाने ती सुरवातच असेल."

डिसेंबरचे दिवस असल्याने काळोख जरा लवकरच व्हायचा त्यामुळे भाऊसाहेबांशी जास्त चरवीचरण नकरता मी निरोप घेतला.

श्रीकृष्ण सामंत

कथाविचार