विरह

ल्ल्या's picture
ल्ल्या in जे न देखे रवी...
1 Aug 2008 - 1:15 am

कवितेतल्या प्रियकराची प्रेयसी त्याला सोडुन गेली आहे..( कायमची नाही..)
तेव्हा बघुया काय म्हणतोय प्रियकर......

विरह

सहन होत नाही विरह तिचा आता मला...
दोन दिवसात येते म्हणाली महीना आता होत आला,
कसं रहावस वाटत तिला माझ्यावाचुन इतका वेळ दुर...
प्रत्येक क्षण तुटतोय मी इथे हे सांगायला झालोय तीला आतुर....

जातांना ती तशी देऊन गेली होती
दोन दिवसांच आगाऊ प्रेमं..
पण... दोन दिवसांचा महीना होईल,
याचा कुठे होता मला नेम..

हीच्या आठवणीत मी इथे दिवसभर कुढायचं...
एकच वेळा जेवायच,आणि रात्रभर जागायच...
हीने मात्र मस्त मनसोक्त्त हींडायच..
चापुन-चुपुन खायच..आणि डाराडुर झोपायचं..

बघा ना... हीच हे असच असत..
वेळ काळाच हीला काही भानच नसत..
मलाच मात्र असतो हीचा पुळका फार..
हीच काय ! हीच्यावर मरणारे असतात हजार..

ठरवलय आता... यावेळेला तीच काहीही ऎकणार नाही..
ऊशीरा का आली .. हेही विचारणार नाही..
मगचं कळेल तीला प्रेम म्हणजे काय असत..
प्रेयसी शिवाय जगण म्हणजे झुरत-झुरतच मरणं असत...
............................झुरत-झुरतच मरणं असत.

.....ललित

कविताविरंगुळा